साऊदम्पटन : फायनलमध्ये भारताला लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला आणि त्यानंतर कर्णधार विराट कोहलीवर जोरदार टीका व्हायला सुरुवात झाली. पण न्यूझीलंडमध्ये तर आता कोहलीचा भयंकर अपमान केल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण आतापर्यंत असा अपमान कोहलीचा कोणीही केला नसेल. फायनलमध्ये विराट कोहलीला दोन्ही डावांमध्ये न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज कायले जेमिन्सनने बाद केले. त्यानंतर न्यूझीलंडमधील 'TheAccNZ' या वेबसाईटने आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये एक महिला आहे आणि तिच्या हातामध्ये पट्टा आहे. हा पट्टा एका माणसाच्या गळ्यात घालण्यात आलेला आहे. एखादी व्यक्ती आपल्या पाळीव प्राण्याला कशी फिरवते, तसे या फोटोमध्ये दिसत आहे. पण या वेबसाईटने त्यानंतर कहर केला आहे. कारण या वेबसाइटने या महिलेला कायले जेमिन्सन म्हटले आहे आणि ज्या पुरुषाच्या गळ्यामध्ये पट्टा आहे त्याला विराट कोहली म्हटले आहे. एखाद्या खेळाडूवर झालेली ही सर्वात वाईट टिप्पणी आहे. विराटला पहिल्या डावात जेमिन्सनने पायचीत बाद केले. त्यानंतर दुसऱ्या डावातही जेमिन्सननेच कोहलीची विकेट मिळवली. महत्वाचे म्हणजे जेमिन्सन हा आयपीएलमध्ये विराट कोहलीच्याच आरसीबीच्या संघात आहे. पण जेमिन्सनने या सामन्याच दमदार कामगिरी केली आणि सामनावीराचा पुरस्कारही पटकावला. पण हे सर्व बरोबर असले तरी कोहलीचा जो अपमान करण्यात आला आहे तो खालच्या दर्जाचाच आहे. त्यामुळे या फोटोशी कोणीही सहमत होणार नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारताचा हा काही पहिलाच मोठा पराभव नाही. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २०१७ साली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये दाखल झाला होता. यावेळी भारतासमोर आव्हान होते ते पाकिस्तानचे. भारतीय संघाच्या बैठकीमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायची, असे ठरले होते. पण कोहलीने मात्र नाणेफेक जिंकल्यावर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.कोहलीच्या या निर्णयाचा मोठा फटका भारतीय संघाला बसला आणि त्यांना पराभव स्विकारावा लागला होता. त्यानंतर २०१९ साली इंग्लंडमध्ये विश्वचषक खेळवण्यात आला होता. या विश्वचषकातही कोहली एक कर्णधार म्हणून अपयशी ठरला होता. या विश्वचषकात भारताला उपांत्य फेरीतच बाहेर पडावे लागले होते. या विश्वचषकानंतर कोहली आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये वाद झाल्याचीही चर्चा रंगली होती. त्यानंतर आता फायनलमध्येही भारताला विराटच्या नेतृत्वाखाली पराभव पत्करावा लागला आहे. भारताचा कर्णधार बदलायचा असेल, तर काही पर्याय उपलब्ध आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3dcaett
No comments:
Post a Comment