साऊदम्पटन : फायनलमधील मोक्याच्या क्षणी भारताकडे एक चांगली संधी चालून आली होती. पण यावेळी भारताच्या चेतेश्वर पुजाराकडून एक मोठी चुक घडली आणि त्याचा फटका भारताला बसल्याचे पाहायला मिळाले. नेमकं काय घडलं, पाहा...ही गोष्ट घडली ती ३१व्या षटकात. हे षटक भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा टाकत होता. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर बुमराने योग्य टप्प्यावर चेंडू टाकला होता. या चेंडूचा सामान करता न्यूझीलंडचा अनुभवी क्रिकेटपटू रॉस टेलर हा चकला. त्याला या चेंडूचा चांगला सामना करता आला नाही. यावेळी बुमराने टाकलेल्या चेंडूने टेलरच्या बॅटची कडा घेतली आणि तो स्लिपच्या दिशेने झेपावला. यावेळी पहिल्य स्लिपमध्ये पुजारा उभा होता. त्यावेळी पुजाराच्या हातामध्ये सहज हा चेंडू विसावणार आणि टेलर आऊट होणार, हे स्पष्ट दिसत होते. चेंडू यावेळी पुजाराच्या हातामध्येही आला. पण पुजाराला यावेळी ही कॅच पकडता आली नाही आणि त्याचा मोठा फटका भारतीय संघाला बसला. कारण त्यावेळी टेलर हा २६ धावांवर खेळत होता. त्यावेळी जर टेलर बाद झाला असता तर भारतीय संघाला या सामन्यात झोकात पुनरागमन करता आले असते. पण पुजाराच्या हातून ही मोठी चुक घडली आणि टेलरला २६ धावांवर असताना जीवदान मिळाले. विल्यम्सनही ठरला नशिबवान...न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्य्मसन यावेळी चांगलाच नशिबवान ठरल्याचे पाहायला मिळाले. यावेळी चेंडू स्टम्पच्या लाइनमध्ये पडला होता आणि तो थेट विल्यम्सनच्या पॅडला लागला. त्यावेळी भारतीय संघाने जोरदार अपील केले. मैदानावरील पंचांनी यावेळी विल्यम्सन बाद असल्याचे निर्णय दिला आणि भारतीय संघात आनंदाचे वातावरण पसरले. कारण विल्यम्सन हा भारताच्या मार्गातील मोठा अडसर होता. भारतीय संघाने यावेळी जोरदार सेलिब्रेशन सुरु केले. पंचांनी बाद दिल्यावर विल्यम्सन थोडासा नाराज दिसला. पण त्यानंतर विल्यम्सनने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. पंचांनी यावेळी चेंडू योग्य असल्याचा निर्वाळा दिला. जेव्हा चेंडू पॅडला लागत होता तेव्हा तो बॅटच्या संपर्कातही आला नव्हता. हे समजताच भारतीय चाहत्यांच्या आनंदाला उधाण आले होते. विल्यम्सन आता बाद ठरणार, असे सर्वांनाच वाटत होते. त्यानंतर तिसऱ्या पंचांनी चेंडू कुठे पडला आणि कोणत्या दिशेला गेला हे पाहिले. त्यावेळी चेंडू स्टम्पच्या लाइनमध्येच पडला होता. भारतासाठी ही जमेची बाजू होती. पण चेंडू स्टम्पच्या लाइनमध्ये पडला असला तरी तो स्टम्पला लागत नसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी आपला निर्णय मैदानातील पंचांना सांगितला. मैदानातील पंचांना यावेळी आपला निर्णय बदलावा लागला आणि विल्यम्सन नाबाद असल्याचे स्पष्ट झाले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3j2S5Ch
No comments:
Post a Comment