साउदम्प्टन: म्हटले की गोलंदाजांसाठी मोठे संकट होय. तो जितका वेळ मैदानात असतो तोपर्यंत प्रतिस्पर्धी संघ आणि गोलंदाज टेन्शनमध्ये असतात. विराटच्या धावा आणि त्याच्या शतकांच्या संख्येकडे पाहिल्यानंतर देखील ही गोष्ट लक्षात येते. पण जेव्हा फायनल सामन्याचा विचार केला जातो तेव्हा मात्र विराट कोहली नावाचा रन मशीन फ्लॉप होतो. वाचा- न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधली दोन डावातील त्याची कामगिरी हे ताजे उदाहरण होय. साउदम्प्टन येथे सुरू असलेल्या विराटकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण चांगल्या सुरुवातीनंतर विराटने निराशा केली. पहिल्या डावात १३२ चेंडूत एक चौकाराच्या मदतीने विराटने ४४ धावा तर दुसऱ्या चेंडूत २९ चेंडूत १३ धावा केल्या. या सामन्यात मोठी धावसंख्या करून टीकाकारांचे तोंड बंद करण्याची संधी विराटला होती. पण तसे झाले नाही. वाचा- विराटने खेळलेल्या फायनल सामन्यातील धावसंख्येवर नजर टाकली तर ही गोष्ट लक्षात येते. त्याने वनडेत ८ फायनल खेळल्या आहेत. यात २२च्या सरासरीने १५४ धावा केल्या आहेत. सर्वोत्तम धावसंख्या ४३ आहे. टी-२०च्या फायनलमध्ये त्याची कामगिरी थोडी चांगली आहे. टी-२०च्या दोन फायनलमध्ये त्याने ११८ धावा केल्या असून ७७ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. आता WTC फायनल मध्ये त्याने दोन डावात त्याने ५७ धावा केल्या. वाचा- विशेष म्हणजे जेव्हा आयसीसी स्पर्धेच्या फायनल आणि सेमीफायनल लढतीचा एकत्र विचार केला जातो तेव्हा विराट जगातील सर्वोत्तम फलंदाज ठरतो. विराटने न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यातील दुसऱ्या डावात चौथी धाव घेत हा विक्रम स्वत:च्या नावावर केला. आयसीसीच्या सर्व स्पर्धेतील फायनल आणि सेमीफायनलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराच्या नावावर होता. विराटने काल संगकाराचा विक्रम मागे टाकला. वाचा- विराटने आतापर्यंत आयसीसी वनडे वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि टी-२० वर्ल्डकपच्या फायनल आणि सेमीफायनल सामने खेळले आहेत. सध्या तो WTC फायनल खेळत आहे. या सर्व फायनल आणि सेमीफायनल मिळून त्याने ५३५ धावा केल्या आहेत. ज्या अन्य कोणत्याही फलंदाजापेक्षा अधिक आहेत. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/35NZei6
No comments:
Post a Comment