मुंबई: गेल्या काही दिवसांपासून आयसीसी भारतात होणार की नाही याबद्दल बरीच चर्चा सुरू होती. यावर आता पडदा पडला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआयने या वर्षाच्या अखेरीस होणारा टी-२० वर्ल्डकप भारतात नाही तर युएईमध्ये होणार असल्याचे जाहीर केले. वाचा- बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सोमवारी ही माहिती दिली. बीसीसीआयने वर्ल्डकप संदर्भात आपला निर्णय कळवण्यासाठी आयसीसीला आजची तारीख दिली होती. वर्ल्डकपच्या तारखामध्ये कोणताही बदल होणार नाही. आयपीएलच्या झाल्यानंतर वर्ल्डकपच्या क्वालिफायरच्या लढती सुरू होतील. या लढती ओमानमध्ये होणार आहेत. त्यानंतर युएईमध्ये दुबई, अबूधाबी आणि शारजाह येथे सामने होतील. वाचा- टी-२० वर्ल्डकप संदर्भात आयसीसीला निर्णय कळवण्याचा आज शेवटचा दिवस होता. आम्ही बीसीसीआयच्या सर्व अधिकाऱ्यांसोबत कॉन्फरन्स कॉल केला. देशातील करोना परिस्थितीवर चर्चा केल्याचे शुल्का यांनी सांगितले. वाचा- वाचा- पुढील दोन-तीन महिन्यांनी काय होणार आहे याची कोणालाच कल्पना नाही. सर्व गोष्टींचा विचार करून हा निर्णय घेतलाय. वर्ल्डकप युएईमध्ये शिफ्ट करावे असे आम्ही आयसीसीला कळवले आहे. भारतानंतर हेच आयोजनासाठीचे उत्तम ठिकाण आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3h0tuMT
No comments:
Post a Comment