साउदम्प्टन : WTC फायनलमध्ये भारताचा पराभव झाल्यानंतर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. सामना झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने पत्रकार परिषदेत कसोटी संघात बदल केले जाऊ शकतात असे संकेत दिले. वाचा- विजयासाठी खेळणाऱ्या खेळाडूंचा संघात समावेश केला जाईल असे विराटने स्पष्ट केले. विराटच्या या वक्तव्यानंतर अनेक खेळाडूंवर बाहेर बसण्याची वेळ येऊ शकते. त्याने कोणत्याही खेळाडूचे नाव घेतले नाही, पण आगामी इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका ही संबंधित खेळाडूंसाठी अखेरची संधी असू शकते. जाणून घेऊयात संघातील असे खेळाडू ज्यांच्यावर बाहेर बसण्याची वेळ येऊ शकते. वाचा- चेतेश्वर पुजारा- विराटच्या वक्तव्यानंतर भारताची दुसरी वॉल म्हटले जाणाऱ्या चेतेश्वर पुजाराला सर्वाधिक धोका आहे. विराटला ज्या पद्धतीचे क्रिकेट खेळायचे आहे त्यानुसार आता पुजारा हात झटकू शकत नाही. पुजाराने फायनल मॅचमध्ये ५४ चेंडूत ८ धावा तर दुसऱ्या डावात ८० चेंडूत १५ धावा केल्या. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पुजारा असेच खेळला तर तो विराटच्या संघातून बाहेर जाऊ शकतो. वाचा- जसप्रीत बुमराह- भारतीय गोलंदाजांमध्ये सर्वाधिक निराशा कोणी केली असेल तर ती बुमराहने होय. त्याच्यावर देखील संघातून बाहेर होण्याची धोका आहे. गेल्या काही महिन्यांपासून बुमराह चांगली कामगिरी करेल या आशेवर त्याला संघात स्थान दिले जात आहे. WTC मध्ये २६ षटकात त्याला एकही विकेट मिळाली नाही. इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाने अनेक युवा जलद गोलंदाजांना नेले आहे. अशा परिस्थितीत बुमराह संघाबाहेर जाऊ शकतो. वाचा- अजिंक्य रहाणे- WTC मध्ये भारताकडून अजिंक्य रहाणेने सर्वाधिक धावा केल्या. त्याने १८ कसोटीत ३ शतक ६ अर्धशतकांच्या मदतीने १ हजार १५९ धावा केल्या. त्याची सरासरी ४२.९२ इतकी होती. तो संघाचा उपकर्णधार देखील आहे. धावा करण्या सोबत अजिंक्यला आता गरजेच्या वेळी कामगिरी करुन दाखवण्याची आवश्यकता आहे. अन्य खेळाडूंच्या तुलनेत अजिंक्यवर बाहेर जाण्याचा धोका कमी आहे. पण विराटने केएल राहुल सारख्या खेळाडूला बाहेर बसवले आहे हे विसरून चालणार नाही. वाचा- शुभमन गिल- भारतीय संघाचे भविष्य म्हणून गिलकडे पाहिले जाते. पण संघाची गरज तो पूर्ण करताना दिसत नाही. गिलच्या ऐवजी संघात मयांक अग्रवालला का संधी दिली जात नाही असा प्रश्न विचारला जात आहे. गिलने WTCमध्ये ८ कसोटीत ३१.८४च्या सरासरीने ४ हजार ४१४ धावा केल्या. धावा करण्याच्या बाबतीत किंवा संघातील जबाबदारी समजून घेण्यात गिल कमी पडला. जर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत मयांक सलामीवीर म्हणून दिसला तर आश्चर्य वाटून घेऊ नका.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gUujXM
No comments:
Post a Comment