नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटला आता एक मोठा धक्का बसला आहे. कारण भारतीय क्रिकेटपटू डोपिंग चाचणीमध्ये दोषी आढळल्यावर आता चार वर्षांच्या बंदीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. भारताच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडल्याचे पाहायला मिळत आहे. भारताची महिला क्रिकेटपटू अंशुला रावची डोपिंग टेस्ट घेण्यात आली. यावेळी अंशुलाचे दोन सॅम्पल्स घेण्यात आले होते आणि ते तपासणीसाठी बेल्जियमला पाठवण्यात आले होते. या चाचणीमध्ये अंशुला आता दोषी आढळली आहे, त्यामुळे तिच्यावर आत चार वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय ' नाडा'ने घेतला आहे. त्यामुळे अंशुला आता चार वर्षे क्रिकेट खेळू शकणार नाही. त्याचबरोबर या चाचणीसाठी दोन लाख रुपये खर्च आला असून ही रक्कम आता अंशुलालाच भरावी लागणार आहे. उत्तेजक चाचणीत दोषी ठरलेली अंशुला ही भारताची पहिलीच महिला क्रिकेटपटू आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रीय उत्तेजरविरोधी एजन्सीने (नाडा) अंशुला राववर आता चार वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्यावर्षी अंशुलावर उत्तेजक द्रव्य घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर अंशुला एकही सामना खेळली नाही आणि तिला आपले दोन सॅम्पल्स नाडाला द्यावे लागले. त्यानंतर या दोन्ही सॅम्पसची तपासणी बेल्जियममध्ये करण्यात आली असून त्यामध्ये अंशुला दोषी आढळली आहे. त्यामुळे आता तिच्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली असून ती चार वर्षे कोणतेही क्रिकेट खेळू शकत नाही. यापूर्वी भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ हा उत्तेजक सेवन चाचणीत दोषी आढळला होता. पृथ्वी बीसीसीआयची एक स्पर्धा खेळण्यासाठी इंदोरला गेला होता. त्यावेळी त्याला सर्दी झाली होती. पृथ्वीने त्यावेळी संघातील डॉक्टरांना न विचारता एक औषध घेतले होते आणि त्यानंतर झालेल्या उत्तेजक सेवन चाचणीत तो दोषी आढळला होता. त्यानंतर पृथ्वीवर आठ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. पृथ्वीच्या हातून ही चुक घडली होती आणि त्यामुळेच त्याच्यावर जास्त बंदीची शिक्षा ठोठवण्यात आली नव्हती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2TdOLd0
No comments:
Post a Comment