Ads

Thursday, June 24, 2021

IND vs NZ WTC Final: भारताचा पराभव झाला; ही आहेत ७ कारणं...




IND vs NZ WTC Final: भारताचा पराभव झाला; ही आहेत ७ कारणं...


न्यूझीलंडला विजेतेपद
न्यूझीलंडला विजेतेपद

साउदम्प्टन येथे झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये न्यूझीलंडने भारताचा ८ विकेटनी पराभव करून विजेतेपद मिळवले. कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षात सर्वोत्तम कामगिरी करणारा भारताचा संघ या सामन्यात सर्वच क्षेत्रात अपयशी ठरला. पावसामुळे कसोटी सामन्यातील पाच दिवसापैकी तीन दिवस खेळ झाला. त्यामुळे अखेरच्या राखीव दिवसाचा वापर करण्यात आला. न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने चांगली सुरूवात करून देखील पहिल्या डावात २१७ धावा केल्या. त्यानंतर न्यूझीलंडने २४९ धावा करून ३२ धावाची आघाडी घेतली. भारताच्या दुसऱ्या डावात भेदक गोलंदाजीकरून विजयासाठीचे १३९ धावांचे आव्हान त्यांनी दोन विकेटच्या बदल्यात पार केले. या सामन्यात टीम इंडिया कुठे चुकली? जाणून घ्या भारताच्या पराभवाची ठोस कारणे...



​सलामीची जोडी अपयशी
​सलामीची जोडी अपयशी

फायनल मॅचमध्ये भारताने सलामीची जोडी म्हणून रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांची निवड केली होती. या जोडीला चांगली सुरुवात करून देता आली नाही. पहिल्या डावात ६१ धावा केल्यानंतर देखील रोहित आणि गिल मोठी धावसंख्या करु शकले नाहीत. दुसऱ्या डावात देखील दोघांनी चुका केल्या. हे दोन्ही फलंदाज प्रथमच इंग्लंडमध्ये सलामीवीर म्हणून खेळत होते. रोहितने याआधी एक कसोटी ती देखील २०१४ मध्ये खेळली होती. ज्यात तो धावा करू शकला नव्हता. गिलचा इंग्लंडमधील हा पहिला सामना होता.



​रन मशिनचे अपयश
​रन मशिनचे अपयश

भारताचा कर्णधार विराट कोहली हा क्रिकेटमधील तिनही प्रकारात सर्वोत्तम फलंदाज मानला जातो. पण फायनलमध्ये विराटला दोन्ही डावात मिळून ५७ धावा करता आल्या. पहिल्या डावात चांगल्या सुरुवातीनंतर त्याला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. तो ४४ धावांवर बाद झाला. दुसऱ्या डावात जेव्हा सामना कोणाच्या बाजूने झुकेल हे ठरणार होते तेव्हा तो १३ धावांवर बाद झाला. या दोन्ही डावात विराटला काइल जेमिसनने बाद केले.



​फक्त कसोटी खेळणारे अपयशी ठरले
​फक्त कसोटी खेळणारे अपयशी ठरले

भारतीय संघात फायनलसाठी असे दोन खेळाडू होते जे फक्त कसोटी क्रिकेट खेळतात. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे होय. या दोन्ही कसोटीपटूंची निराश जनक कामगिरी भारताच्या अपयशाचे मोठे कारण ठरली. पुजाराने पहिल्या डावात ८ तर दुसऱ्या डावात १५ धावा केल्या. तो WTC स्पर्धेत चांगली कामगिरी करू शकला नव्हता. दुसऱ्या डावात जेव्हा संघाला पुजाराच्या स्पेशालिटीची गरज होती तेव्हा तो बाद झाला.



​उपकर्णधार अपयशी
​उपकर्णधार अपयशी

भारताचा कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे देखील फक्त कसोटी खेळतो. फायनल सामन्यात पहिल्या डावात ४९ धावा केल्या. पण तो ज्या पद्धतीने बाद झाला त्यावर अनेकांना धक्का बसला. न्यूझीलंड संघाने भारताच्या या अनुभवी फलंदाजाला बरोबर सापळ्यात अडकवले. दुसऱ्या डावात अजिंक्य १५ धावा करू शकला. विराट आणि पुजारा बाद झाल्यावर अजिंक्यवर सर्व आशा होती. पण इंग्लंडमध्ये तो पुन्हा एकदा अपयशी ठरला.



​मोठा अपेक्षा भंग
​मोठा अपेक्षा भंग

भारताचा विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंतकडून या सामन्यात मोठी आशा होती. त्याने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध कामगिरी उंचावली होती. पण दोन्ही डावात पंतचा बेजबाबदारपणा नडला. दुसऱ्या डावात गरज नसताना उंच हवेत शॉट मारून पंत ४१ धावांवर बाद झाला. भारताच्या सहा विकेट पडल्या होत्या. तेव्हा पंतने सामना वाचवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्या ऐवजी विकेट टाकणारा शॉट खेळला. पहिल्या डावात त्याने फक्त ४ धावा केल्या.



​ऑलराउंडरचा शून्य उपयोग
​ऑलराउंडरचा शून्य उपयोग

सामना सुरू होण्याआधी पावसाची शक्यता आहे हे माहित असून देखील भारताने रविंद्र जडेजा आणि आर अश्विन दोन ऑलराउडरांना स्थान दिले होते. पण दोघांचा काहीच उपयोग झाला नाही. फलंदाजीत धावा करण्यात दोघेही अपयशी ठरले. जडेजाने १५ आणि १६ तर अश्विनने २२ आणि ७ धावा केल्या. गोलंदाजीत ही जोडी फार प्रभावी ठरलेली दिसली नाही. दोघांनी मिळून पाच विकेट घेतल्या. त्यातही अश्विनने दोन्ही डावात चार विकेट घेण्यात यशस्वी ठरला.



​गोलंदाजांचे अपयश
​गोलंदाजांचे अपयश

न्यूझीलंडकडे भारतापेक्षा एक जलद गोलंदाज अधिक होता. पण भारताने संघात घेतलेले तिनही जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा यांचा मारा विजय मिळून देण्यासाठी पुरेसा होता. पण शमी वगळता अन्य दोघांना फार प्रभावी कामगिरी करता आली नाही. विशेषत: जसप्रीत बुमराहची गोलंदाजी ही भारतासाठी काळजी वाढवणारी आहे. तसेच फलंदाजी करताना देखील न्यूझीलंडच्या तुलनेत भारताच्या तळातील या फलंदाजांना अपयश आले.





from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3xFIWng

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...