मुंबई : भारतीय फलंदाजांनी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये खराब कामगिरीने सर्वांना निराश केले. फलंदाजांच्या या खराब कामगिरीमुळे चॅम्पियनशिप न्यूझीलंडला मिळाले. या पराभवानंतर भारतीय संघात बदल होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत आणि त्याची सुरुवात कर्णधार विराट कोहलीपासून होणार आहे. वाचा- फायनल सामन्यात भारताच्या मधळ्याफळीतील फलंदाज चेतेश्वर पुजाराने अतिशय खराब फलंदाजी केली. आता ऑगस्ट महिन्यात भारत इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या सत्रातील पहिली मालिका असेल. त्यामुळे भारतीय संघ याची सुरुवात विजयाने करण्यास उत्सुक असेल. यासाठी संघ देखील महत्त्वाचा ठरणार आहे. वाचा- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय संघ व्यवस्थापन कसोटी स्पेशालिस्ट पुजाराला संघाबाहेर करण्याचा विचार करत आहे. पुजाराच्या खराब फलंदाजीमुळे आणि अजिंक्य रहाणे यांच्यावर दबाव येतोय. संघात पुजाराच्या जागी हनुमा विहारी किंवा केएल राहुलचा समावेश केला जाऊ शकतो. त्याच बरोबर विराट कोहलीच्या फलंदाजीचा क्रम बदलला जाऊ शकतो. विराट सध्या चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतोय. त्याच्या ऐवजी तो तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यास येऊ शकतो. वाचा- जानेवारी २०२० पासून पुजाराची फलंदाजी खराब होत आहे. त्याचा स्टाइक रेट ३०.२० इतका आहे. तर सर्वोत्तम धावसंख्या ७७ इतकी आहे. गेल्या ३० डावात त्याने एकही शतक झळकावले नाही. फलंदाजी करताना तो अधिक बचावात्मक खेळतो, याचा फायदा विरोधी संघाला मिळतो आणि भारताला तोटा होता. त्याच्या लवकर बाद होण्याने अन्य फलंदाजांवर दबाव वाढतो. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3djP38S
No comments:
Post a Comment