नवी दिल्ली : फायनलमध्ये न्यूझीलंडने भारतावर आठ विकेट्स राखून विजय मिळवला. या पराभवामुळे भारतीय चाहते नाराज झाले आहेत. पण यावेळी नाराज झालेल्या भारतीय चाहत्यांना न्यूझीलंडच्या खेळाडूंनी एक आनंदाची बातमी दिली आहे. ही आनंदाची बातमी आहे तरी काय, जाणून घ्या...न्यूझीलंडचा संघ हा सर्वांची मनं जिंकतो, हे आतापर्यंत सर्वांनीच पाहिले आहे. त्यामुळे फायनलमधील पराभव झाल्यानंतर निराश झालेल्या भारतीय चाहत्यांना आता न्यूझीलंडच्या खेळाडूंनी एक आनंदाची बातमी दिली आहे. भारतीय चाहत्यांबरोबरच बीसीसीआयसाठीही एक मोठी गोष्ट ठरली आहे. फायनलनंतर भारतीय संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघ हा आयपीएलसाठी रवाना होणार आहे. यापूर्वी आयपीएलच्या फायनलमध्ये परदेशी खेळाडू खेळणार नसल्याचे समोर आले होते. पण आता आयपीएलच्या उर्वरीत सामन्यांसाठी न्यूझीलंडचे खेळाडू उपलब्ध होणार असून ते सामने खेळणार असल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे केन विल्यम्सन, फायनलमध्ये सामनावीर ठरलेला कायले जेमिन्सन, ट्रेंट बोल्ट, अॅडम मिल्ने, ल्यूकी फर्ग्युसन, जिमी निशामसारखे न्यूझीलंडच्या खेळाडूंचा जलवा आता आयपीएलमध्ये सर्वांना पाहायला मिळणार आहे. याबाबत आयपीएलमधील एका संघाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, " भारतामध्ये आयपीएलचे आयोजन एप्रिल आणि मे महिन्यात करण्यात आले होते. पण ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे आता आयपीएलचे उर्वरीत सामने युएईमध्ये खेळवले जाणार आहे. या सामन्यांसाठी न्यूझीलंडचे खेळाडू उपलब्ध होणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. आता बीसीसीआय इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या क्रिकेट मंडळांबरोबर खेळाडूंनी परवानगी देण्यासाठी चर्चा करणार आहे." फायनलमध्ये भारताला पराभवाचा धक्का बसला आहे. फायनलच्या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला नसता तरच नवल कारण भारताची टॉप ऑर्डर कमकूवत होती. गेल्या एक वर्षातील कामगिरी पाहिली तर भारताचे आघाडीचे पाचही फलंदाज फ्लॉप ठरलेत. जगातील आघाडीच्या १० फलंदाजांमध्ये एकाही भारतीय फलंदाजाचा समावेश नाही. त्यामुळे फायनलपूर्वी दिग्गजांनी भारत या फायनलसाठी फेव्हरेट नसल्याचेही सांगितले होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gSvOFJ
No comments:
Post a Comment