साउदम्प्टन: आपल्या करिअरच्या अखेरच्या कसोटीत न्यूझीलंडच्या खेळाडूने भारताचा माजी दिग्गज विकेटकीपर आणि कर्णधार महेंद्र सिंग धोनीचा विक्रम मागे टाकण्याची कमाल केली आहे. भारताविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये न्यूझीलंडचा विकेटकीपर बीजे वॉटलिंग यांने धोनीचा विक्रम मागे टाकला. वाचा- WTC फायनलच्या आधी वॉटलिंग याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहिर केले होते. भारताविरुद्धची ही माझी अखेरची कसोटी असेल असे तो म्हणाला होता. न्यूझीलंडच्या पहिल्या डावात तो शून्यावर बाद झाला होता. पण भारताच्या दुसऱ्या डावात त्याने रविंद्र जडेजाचा कॅच घेतला आणि एका विक्रमाला गवसणी घातली. वॉटलिंगने निरोपच्या सामन्यात धोनी सारख्या दिग्गज खेळाडूचा विक्रम मोडला. वाचा- जडेजाचा कॅच घेत वॉटलिंगने २५७वा कॅच घेतला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात विकेटकीपरद्वारा सर्वाधिक कॅच घेण्याबाबत वॉटलिंग सातव्या स्थानावर पोहोचला आहे. धोनीने १६६ डावात २५६ कॅच घेतले होते. वाचा- सहाव्या दिवशी पहिल्या सत्रात वॉटलिंगच्या बोटांना दुखापत झाली होती. तरी देखील त्याने मैदान सोडले नाही. दरम्यान आज दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा भारताचा कर्णधार विराट कोहलीने त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. न्यूझीलंडचा आतापर्यंतचा सर्वोत्तम विकेटकीपर असलेल्या वॉटलिंगने ७५ कसोटीत २५७ कॅच घेतले आहेत. या कसोटीत त्याने पहिल्या डावात कोहली आणि अजिंक्य रहाणेचा कॅच घेतला होता. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/35Kak7N
No comments:
Post a Comment