नवी दिल्ली : ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या तारखा आता आयसीसीने जाहीर केल्या आहेत. त्यामुळे आता ट्वेन्टी-२० विश्वचषक कधीपासून सुरु होणार आणि अंतिम फेरीचा सामना कधी रंगणार हे आता स्पष्ट झाले आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे असले तरी ही स्पर्धा आता युएईमध्ये रंगणार आहे. विश्वचषक आता १७ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे आणि अंतिम फेरीचा सामना १४ नोव्हेंबरला रंगणार आहे. या स्पर्धेचे पात्रता फेरीचे सामने ओमानमधअये खेळवण्यात येतील, या स्पर्धेतील दोन संघ विश्वचषक खेळण्यासाठी पात्र ठरतील. त्यानंतर हे पात्र ठरलेले संघ युएईमध्ये दाखल होतील आणि मुख्य स्पर्धेला सुरुवात होईल. विश्वचषकाबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी महत्वाची माहिती दिली आहे. गांगुली यांनी सांगितले की, " विश्वचषकाच्या वेळापत्रकाबाबत अजूनही चर्चा सुरु आहे. पण विश्वचषकाचे सामने हे दोन देशांमध्ये होणार आहेत. विश्वचषकाच्या पात्रता फेरीचे सामने ओमानमध्ये खेळवण्याचे ठरले आहे. त्यानंतर विश्वचषकातील महत्वाचे सामने हे दुबईमध्ये खेळवण्यात येणार आहेत." विश्वचषकाच्या पात्रता फेरीत श्रीलंका, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, नेदरलँड्स, नामिबिया, पापुआ न्यू गिनिया आणि ओमान हे आठ संघ खेळतील. या आठ संघांमध्ये पात्रता फेरीचे सामने होतील आणि यापैकी दोन संघ विश्वचषकातील महत्वाच्या सामन्यांसाठी पात्र ठरतील. त्यामुळे हे सर्व संघ ओमानमध्ये आपले सामने खेळतील. त्यामुळे आता ओमानसारख्या देशाला ही एक मोठी आणि चांगली संधी असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे ओमान आता या सामन्यांचे कसे आयोजन करते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. देशातील करोना परिस्थितीवर चर्चा केली गेली आणि त्यानंतर विश्वचषक भारताबाहेर खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआयने या वर्षाच्या अखेरीस होणारा टी-२० वर्ल्डकप भारतात नाही तर युएईमध्ये होणार असल्याचे जाहीर केले. आयपीएल संपल्यावर ओमानमध्ये विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीचे सामने खेळवले जातील. या फेरीत श्रीलंका, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, नेदरलँड्स, नामिबिया, पापुआ न्यू गिनिया आणि ओमान हे आठ संघ खेळतील.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2UcOMy4
No comments:
Post a Comment