मुंबई: भारतीय क्रिकेट संघातील स्टार ऑलराउडर हार्दिक पंड्याची पत्नी सोशल मीडियावर सक्रिय असते. नताशा तिच्या फोटो आणि व्हिडिओमुळे नेहमी चर्चेत असते. तिच्या पोस्टना मोठ्या प्रमाणात लाइक्स मिळतात. नताशाने एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. इस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडियोत नताशा कॅटवॉक करताना दिसते. यात तिने काळ्या रंगाची टोपी आणि बुट घातला आहे. वाचा- नताशाच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रीया दिल्या आहे. हार्दिकने देखील कमेंट बॉक्समध्ये हार्ट आणि आग अशी इमोजी पोस्ट केली आहे. तर क्रुणाल पंड्याची पत्नी पंखुडी शर्माने देखील प्रतिक्रिया दिली आहे. वाचा- सध्या श्रीलंका दौऱ्यावर जाण्यासाठी मुंबईत क्वारंटाइनमध्ये आहे. नताशाचा हा व्हिडिओ मुंबईतील हॉटेलमधील दिसतोय. नताशा प्रमाणे हार्दिक देखील सोशल मीडियावर सक्रिय असतो. इंग्लंड दौऱ्यासाठी हार्दिकचा भारतीय संघात समावेश करण्यात आला नव्हता. पण श्रीलंका दौऱ्यासाठी त्याला संघात घेण्यात आले आहे. लंका दौऱ्यात भारत तीन सामन्यांची वनडे आणि तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात १३ जुलैपासून होईल. तर अखेरची लढत २५ जुलै रोजी होणार आहे. वाचा- ... गेल्या काही महिन्यांपासून हार्दिकची कामगिरी फार चांगली झालेली नाही. आयपीएलच्या १४व्या हंगामातील पहिल्या सत्रात मुंबई इंडियन्सकडून खेळताना हार्दिकची कामगिरी चांगली झाली नव्हती. त्याने सात सामन्यात ८.६६च्या सरासरीने फक्त ५२ धावा केल्या होत्या. या स्पर्धेत त्याने कोणत्याही सामन्यात गोलंदाजी केली नव्हती. आयपीएल सुरु होण्याआधी भारतीय संघाकडून खेळताना त्याने गोलंदाजी केली नव्हती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3y4rklh
No comments:
Post a Comment