साऊदम्पटन : भारतीय संघाला फायनलमध्ये पराभवाचा जोरदार धक्का बसला. पण यानंतर भारतीय संघाला अजून एक मोठा धक्का बसला आहे. भारताच्या एका महत्वाच्या खेळाडूला गंभीर दुखापत झाल्याचे आता समोर आले आहे. फायनलमध्ये खेळत असताना आपल्या दिशेने आलेला चेंडू अडवण्याचा या खेळाडूने प्रयत्न केला होता. हा चेंडू त्याच्या बोटांवर एवढ्या जोरावर लागला की रक्त यायला सुरुवात झाली. त्यामुळे त्याला सामना अर्धवट सोडावा लागला होता. आता या खेळाडूवर शस्त्रक्रीया करण्यात आली आहे. न्यूझीलंडच्या रॉस टेलरने एक जोरदार फटका मारला होता आणि तो अडवताना भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माच्या बोटातून रक्त यायला सुरुवात झाली. ही दुखापत गंभीर असल्यामुळे त्याला सामना सोडून जावे लागले होते. आता इशांतच्या या बोटावर शस्त्रक्रीया करण्यात आली आहे. ही जखम गंभीर असल्यामुळे त्याच्या बोटांवर टाके घालण्यात आले आहेत. आता १० दिवसांनी इशांतच्या बोटाची तपासणी केली जाईल. इशांतची ही दुखापत बरी झाली असेल तर तो काही दिवसांनी सराव करू शकतो. पण ही दुखापत जर बरी झाली नाही, तर इशांतला जास्त काळ क्रिकेटपासून लांब रहावे लागेल. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी यावेळी इशांतच्या दुखापतीबाबत सांगितले की, " इशांतच्या बोटाला सामना सुरु असताना दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर असल्यामुळे त्याच्या बोटांवर टाके घालण्यात आले आहेत. ़दहा दिवसानंतर इशांतची दुखापत कशी आहे, हे पाहिले जाईल. १० दिवसांनी इशांतची दुखापत बरी होऊ शकते, असे वाटत आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी आता सहा आठवड्यांचा अवकाश आहे. त्यापूर्वी इशांत फिट होईल आणि सराव सुरु करेल, अशी आशा आहे." सध्याच्या घडीला भारतीय संघ सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. कारण आता जुलैचा संपूर्ण महिना क्रिकेट होणार नाही. पण भारतीय संघाला १५ जुलैला पुन्हा एकदा क्वारंटाइन व्हावे लागणार आहे. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी सराव करु शकतो.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3dbPemT
No comments:
Post a Comment