नवी दिल्ली : भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध फायनलमध्ये मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर भारतीय संघात मोठे बदल होऊ शकतात, असे दिसत आहे. भारतीय संघातील काही महत्वाच्या खेळाडूंना यावेळी डच्चू देण्यात येऊ शकतो, पण त्यामध्ये पहिली विकेट कोणाची पडू शकते, हे आता समोर आले आहे. फायनलमध्ये भारतीय संघातील सर्वच खेळाडू अपयशी ठरले. एकाही फलंदाजाला अर्धशतक गाठता आले नाही, तर एकाही गोलंदाजाला पाच विकेट्स मिळवत्या आल्या नाहीत. त्यामुळेच भारताचा फायनलमध्ये मोठा पराभव झाला. त्यामुळे आता भारतीय संघात मोठे बदल होऊ शकतात. यामध्ये पहिलाच झटका एका अनुभवी खेळाडूला बसू शकतो, असे आता समोर येत आहे. फायनलमध्ये भारताला सर्वाधिक अपेक्षा या तंत्रशुद्ध फलंदाज चेतेश्वर पुजाराकडून होत्या. पण फायनलच्या दोन्ही डावांत पुजाराला मोठी खेळी साकारता आली नाही. पुजारा हा भारतीय संघातून फक्त कसोटीच क्रिकेटचं खेळतो, पण त्यामध्येही त्याचा आता चांगली कामगिरी करता येत नसल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये पुजाराकडून मोठी धावसंख्या पाहायला मिळालेली नाही. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेचा विचार करताना भारतीय संघातून पहिल्यांदा चेतेश्वर पुजाराला बाहेर काढले जाऊ शकते, असे दिसत आहे. कारण फायनलनंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने पुजाराबाबत एक वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचा अर्थ काढल्यास, पुजाराला डच्चू दिला जाऊ शकतो, असे दिसत आहे. पुजाराला यावेळी एक ब्रेक दिला जाईल. काही वेळ संघाबाहेर बसल्यावर पुजाराला आपल्या फलंदाजीबाबत विचार करायला थोडा वेळ मिळेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याला भारतीय संघात स्थान दिले जाईल. कारण पुजारासारख्या महत्वाच्या खेळाडूला गमावून भारतीय संघाला चालणार नाही. सध्याच्या घडीला त्याचा फॉर्म चांगला नाही, पण त्याच्याकडे असलेली गुणवत्ता हे अव्वल दर्जाची आहे. पण सध्याच्या घडीला पुजारा आपल्या गुणवत्तेला न्याय देता येत नसल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे पुजाराला काही काळ संघापासून बाहेर करण्याचा निर्णय भारतीय संघ घेऊ शकतो. आता इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघ खेळाडूंबाबत नेमका काय निर्णय घेतो, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. त्यामुळे कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री आता काय निर्णय घेतात, हे पाहावे लागेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gVVnFZ
No comments:
Post a Comment