पणजी: भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सध्या समालोचकाच्या भूमिकेत दिसणारा अजय जडेजाला कचरा पसरवल्याबद्दल ५ हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. ही घटना गोव्यातील आहे. उत्तर गोव्यातील गावाच्या सरपंचांनी जडेजाला हा दंड केलाय. उत्तर गाव्यातील एल्डोना या गावात माजी क्रिकेटपटू अजय जडेजाचा स्वत:च्या मालिकाचा बंगला आहे. गावात कचरा केल्या प्रकरणी सरपंच तृप्ती बांदोडकर यांनी जडेजाला हा दंड केला. यावर जडेजाने कोणतीही हरकत न घेता दंडाची रक्कम भरली. वाचा- गावातील कचऱ्याचा मुद्यावरून आम्ही त्रास्त आहोत. बाहेरून देखील गावात कचरा टाकला जातो. यासाठी आम्ही काही युवकांना कचऱ्याच्या बॅग गोळा करण्यासाठी आणि दोषींची ओळख करण्यासाठी पुरावा म्हणून स्कॅन करण्यासाठी नियुक्त केल्याचे तृप्ती यांनी सांगितले. वाचा- आम्हाला कचऱ्याच्या बॅगमध्ये अजय जडेजाच्या नावाचे एक बिल मिळाले. भविष्यात गावात कचरा टाकायचा नाही असे आम्ही त्यांना सांगितले. यावर जडेजा यांनी दंडाची रक्कम भरली. आम्हाला अभिमान आहे की एक लोकप्रिय क्रिकेटपटू आमच्या गावात राहतो. पण अशा लोकांनी नियमांचे पालन करावे, असे त्या म्हणाल्या. एल्डोना गावात अनेक स्टार आणि लोकप्रिय लोकांची घरे आहेत. वाचा- अजय जडेजाने भारताकडून १९९२ ते २००० या काळात क्रिकेट खेळले. त्याने १९६ वनडे आणि १५ कसोटीत देशाचे प्रतिनिधित्व केले. खालच्या क्रमांकावर फलंदाजी आणि फिल्डिंगसाठी जडेजा प्रसिद्ध होता. त्याने १३ वनडे लढतीत देशाचे नेतृत्व देखील केले होते. २००० साली मॅच फिक्सिंग प्रकरणी त्याच्यावर आरोप झाले आणि पाच वर्षाची बंदी घालण्यात आली. त्यानंतर त्याचे करिअर संपले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/35WPgen
No comments:
Post a Comment