साउदम्प्टन: न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधील सहाव्या आणि अखेरच्या दिवशी भारताची अत्यंत खराब सुरूवात झाली आहे. कालच्या २ बाद ६४ वरुन खेळण्यास सुरू करणाऱ्या भारताची पहिल्या ३० मिनिटात ४ बाद ७२ अशी अवस्था झाली. वाचा- सहाव्या दिवशी चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी २ बाद ६४ वरून पुढे खेळण्यास सुरूवात केली. विराट कोहलीने काल ८ धावा केल्या होत्या. या धावसंख्येत त्याने पाच धावांची भर घातली आणि तो बाद झाला. काइल जेमिसनने त्याला बाद केले. पहिल्या डावात देखील काइलने त्याची विकेट घेतली होती. वाचा- विराटच्या पाठोपाठ चेतेश्वर पुजारा देखील बाद झाला. पुजाराने कालच्या धावसंख्येत २ धावांची भर टाकली आणि काइलच्या चेंडूवर तो बाद झाला. पुजारा बाद झाल्याने भारताची अवस्था २ बाद ७२ अशी झाली. वाचा- भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावात अतिशय खराब फलंदाजी केली आणि विकेट गमावल्या. काल शुभमन गिल, रोहित शर्मा यांना देखील अपयश आले. आघाडीच्या चारही फलंदाजांनी पहिल्या डावातून कोणताही धडा घेतल्या नसल्याचे दिसत आहे. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/35J0Mtw
No comments:
Post a Comment