नवी दिल्ली : भारताचा अष्ट़पैलू खेळाडू हार्दिक पंड्याला आता संघातून डच्चू मिळू शकतो आणि याबाबतचे कारणही आता पुढे आले आहे. त्याचबरोबर हार्दिकसाठी आता एक चांगला पर्यायही भारतीय संघाकडे असल्याचे दिसत आहे. हार्दिक पंड्याला डच्चू देण्याचे काय आहे कारण, जाणून घ्या...हार्दिक भारतीय संघातील एक अष्टपैलू खेळाडू असला तरी गेल्या काही वर्षांपासून त्याने गोलंदाजी केलेली नाही. हार्दिक गोलंदाजी करत नसल्याने त्याची निवड इंग्लंडच्या दौऱ्यासाठीही करण्यात आली नाही. आता श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी त्याची निवड करण्यात आली आहे. पण हार्दिक हा सध्या गोलंदाजी करत नाही, मुंबई इंडियन्सकडून खेळतानाही त्याने गोलंदाजी केली नव्हती. त्याचबरोबर फलंदाजीमध्येही हार्दिकला मोठी खेळी साकारता आलेली नाही. त्यामुळे हार्दिक हा सातत्याने अपयशी ठरत असल्यामुळे त्याला श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातही संधी मिळण्याची कमी शक्यता आहे. हार्दिकच्या जागी कोणता खेळाडू ठरू शकतो पर्याय, पाहा...हार्दिकला जर खेळवायचे नसेल तर त्याच्यासाठी शार्दुल ठाकूर हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. कारण शार्दुल हा चांगली गोलंदाजी करतोच, पण त्याचबरोबर तो आक्रमक फलंदाजीही करू शकतो. प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये शार्दुलने आतापर्यंत दमदार फलंदाजी केली आहे. पण भारतीय संघाकडून खेळताना मात्र त्याला फलंदाजीसाठी वरच्या स्थानावर पाठवण्यात आले नव्हते. त्यामुळे शार्दुलला जर फलंदाजीसाठी वरच्या स्थानावर पाठवले तर तो हार्दिक पंड्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. भारताच्या निवड समिती सदस्याने काय सांगितले, पाहा...भारताचा माजी निवड समिती सदस्य शरणदीप सिंगने सांगितले की, " हार्दिक पंड्यावर एक अष्टपैलू खेळाडू म्हणून भारतीय संघ जास्त विसंबुन राहू शकत नाही. कारण हार्दिक गेले काही दिवस गोलंदाजी करताना दिसलेला नाही. हार्दिकसाठी शार्दुल ठाकूर हा एक चांगला पर्याय ठरू शकतो, कारण तो गोलंदाजीबरोबर चांगली फलंदाजीही करू शकतो. त्याचबरोबर शिवम दुबे आणि विजय शंकर चहे दोघेही हार्दिकसाठी चांगला पर्याय ठरू शकतात." त्यामुळे श्रीलंकेच्या दौऱ्यात हार्दिक पंड्याला संधी मिळणार का, याची उत्सुकता सर्वांना असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2TdBIbw
No comments:
Post a Comment