मुंबई: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाला पुन्हा एकदा आयसीसी स्पर्धेच्या विजेतेपदाने हुलकावणी दिली. साउदम्प्टन येथे झालेल्या फायनल सामन्यात केन विलियमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने भारताचा ८ विकेटनी पराभव केला. २०१९ मध्ये इंग्लंडमध्ये त्यांना आयसीसीच्या वनडे वर्ल्डकपच्या विजेतेपदाने हुलकावणी दिली होती. वाचा- टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल पावसामुळे चर्चेत होती. पाच दिवसाच्या खेळात दोन दिवस वाया गेले होते. आयसीसीने २३ जून हा राखीव दिवस ठेवला होता. त्याच दिवशी या फायनलचा निकाल देखील लागला. या सामन्यात भारताची कामगिरी खराब झाली. फलंदाजांना दोन्ही डावात धावा करता आल्या नाहीत. वाचा- भारताच्या या पराभवाचे अचूक कारण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सांगितले. सचिनने ट्विटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्याने न्यूझीलंड संघाचा WTCच्या कप (गदा) घेतलेला फोटो आहे. सचिनने न्यूझीलंड संघाचे अभिनंदन केले आहे. त्याच बरोबर भारताच्या या कामगिरीबद्दल निराश झाल्याचे सांगितले. याच बरोबर सचिनने पराभवाचे कारण देखील सांगितले. वाचा- मी आधीच सांगितले होते की पहिली १० षटके फार महत्त्वाची असतील. विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा या दोन विकेट १० चेंडूमध्ये पडल्या आणि तेथूनच भारत दबावात आला, असे सचिनने म्हटले. वाचा- वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्याला सुरुवात होण्याआधी सचिन तेंडुलकरने त्याच्या मुलाखतीत भारतीय संघाला अनेक सुचना केल्या होत्या. त्यात पहिली १० षटके अतिशय महत्त्वाची असतील असे त्याने सांगिले होते. या षटकात विकेट न गमावता सावधपणे खेळले पाहिजे. भारतीय संघातील फलंदाजांना दोन्ही डावात धावा करता आल्या नाही. या दोन्ही डावात एकाही फलंदाजाने अर्धशतक केले नाही. पहिल्या डावात २१७ तर दुसऱ्या डावात भारताला फक्त १७० धावा करता आल्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3daRGKd
No comments:
Post a Comment