मुंबई: भारतीय संघ मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर रवाना झाला आहे. या संघाचे नेतृत्व शिखर धवन याच्याकडे तर प्रशिक्षक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथम भारताचे दोन संघ क्रिकेट सामने खेळणार आहेत. याआधई १९९८ साली दोन संघ खेळले होते. पण त्यातील एकाच संघाने आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. वाचा- श्रीलंका दौऱ्यावर जाण्याआधी प्रशिक्षक राहुल द्रविडने एक देश आणि दोन संघ याबद्दल त्याचे मत सांगितले. ही एक शॉर्ट टर्म गोष्ट आहे. तुम्ही याकडे फक्त सध्याच्या परिस्थिती लक्षात घेऊन करू शकता. भविष्यात दिर्घ काळासाठी याबद्दल काही सांगता येणार नाही. दोन्ही संघांच्या रणनितीवर आणखी चर्चा करावी लागले. वाचा- याआधी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दोन संघाची योजना योग्य असल्याचे म्हटले होते. भारतीय संघ १३ जुलैपासून श्रीलंकेत प्रत्येकी ३ वनडे आणि टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. तर त्याच वेळी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. वाचा- पत्रकार परिषदेत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख राहुल द्रविड म्हणाला, ही दिर्घकालीन योजना मानण्यास मी तयार नाही. यात अनेक स्टॉकहोल्डर्स आहेत, स्पॉन्सर्स, मीडिया राइट्सची गरज असेल. ही गोष्ट फार महाग ठरू शकते. दोन संघ छोट्या कालावधीसाठी हाताळणे सोपे ठरले. आता एका खेळाडूसाठी अनेक प्रोटोकॉल फॉलो करने अवघड वाटते. भविष्यात सर्व गोष्टी ठीक होतील. तर आताच त्यावर काही बोलने योग्य होणार नाही. वाचा- सध्याच्या परिस्थितीत द्रविड म्हणाला, क्वारंटाइन आणि अन्य नियमांचे पालन करणे खुप अवघड आहे. पुढील महिन्यात काय होणार आहे याबद्दल कोणालाच कल्पना नाही. जोपर्यंत दोन देशात येण्या जाण्यावर बंधणे आहेत. तोपर्यंत दोन संघ खेळवण्याची योजना योग्य ठरू शकते. भारताकडे दोन संघ करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/35WBmbX
No comments:
Post a Comment