नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना सुरु होण्यापूर्वीच भारतीय संघाला अजून एक मोठा धक्का बसला आहे. कारण भारताच्या अजून एका खेळाडूला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे आता इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात तो खेळणार नसल्याचे दिसत आहे. भारतीय संघाला यापूर्वी वेगवान गोलंदाज इशांत शर्माच्या रुपात धक्का बसला होता. कारण फायनल खेळत असताना इशांतच्या हाताला दुखापत झाली होती. ही दुखापत एवढी गंभीर स्वरुपाची होती की, त्याच्या बोटांवर शस्त्रक्रीया करावी लागली होती. इशांत अजून फिट होत नाही तोपर्यंत भारताच्या एका महत्वाच्या खेळाडूला गंभीर दुखापत झाली आहे. भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिलला आता गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले आहे. या दुखापतीमधून सारवण्यासाठी गिलला किमान एका महिन्याचा कालावधी लागू शकतो किंवा त्यापेक्षा जास्त वेळही ही दुखापत बरी होण्यासाठी लागू शकतो. गिलच्या पायाच्या पोटऱ्यांना दुखापत झाल्याचे समजत आहे. पण जर गिलच्या पायाचे स्नायू दुखावले गेले असतील तर ते बरे होण्यासाठी त्याला एका महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये ४ ऑगस्टपासून पहिल्या कसोटी सामन्याला नॉटिंगहॅम येथे सुरुवात होणार आहे. त्यामुळे या पहिल्या सामन्यात खेळणे तरी सध्याच्या घडीला गिलसाठी कठिण दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे गिलच्या जागी आता रोहित शर्माबरोबर सलामीला कोणाला पाठवायचे, याचा विचार आता कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनाला करावा लागणार आहे. भारताकडे सध्याच्या घडीला हनुमा विहारीसारखा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. हनुमा भारतीय संघ पोहोचण्यापूर्वीच इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळत होता. त्यामुळे तो चांगल्या लयीत आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात विहारीने दमदार कामगिरी करत भारताला पराभवापासून वंचित केले होते. त्याचबरोबर हनुमा सलामीलाही येऊ शकतो आणि तिसऱ्या क्रमांकावरही खेळू शकतो.त्याचबरोबर लोकेश राहुल आणि मयांक अगरवाल यांनाही गिलच्या जागी संघात संधी मिळू शकते. मयांकने आतापर्यंत विश्व अजिंक्यपद स्पर्धेत त्याने चांगली कामगिरी केली आहे. कमी सामन्यांमध्ये त्याच्या नावावर जास्त धावा आहेत. पण त्याला फायनलमध्ये खेळवण्यात आले नव्हते. पण मयांकला जर यावेळी संधी दिली तर तो नक्कीच या संधीचे सोने करू शकेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3h86njH
No comments:
Post a Comment