कोलंबो: इंग्लंडमध्ये मर्यादीत षटकांच्या मालिकेसाठी गेलेल्या श्रीलंका क्रिकेट संघातील तीन खेळाडू करोना प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळले आहेत. या तिघांवर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने कारवाई केली आहे. वाचा- फलंदाज कुसाल मेंडिस, विकेटकीपर निरोशन डिकवेला आणि सलामीवीर धनुष्का गुणतिलका यांना बायो बबलचे उल्लंघन केल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे आणि तातडीने इंग्लंडमधून मायदेशात येण्यास सांगितले आहे. वाचा- इंग्लंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी-२० मालिकेत श्रीलंकेचा दारूण पराभव झाला होता. इंग्लंडने मालिका ३-०ने जिंकली होती. मालिका गमावल्याच्या रात्री श्रीलंकेचे क्रिकेटपटू डरहमच्या रस्त्यावर फिरताना दिसले होते. हे तीनही खेळाडू तिसऱ्या सामन्यात खेळले होते. संघातील दोन खेळाडू कुसाल मेंडिस आणि निरोशन डिकवेला यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये दोघेही रस्त्यावर सिगारेट ओढताना दिसत होते. तर सलामीवीर धनुष्का देखील बायो बबलमधून बाहेर पडला होता. या खेळाडूंनी मास्क देखील घातला नव्हता. खेळाडूंनी हॉटेलमधून बाहेर पडण्याची परवानगी नव्हती. तरी देखील हे खेळाडू बाहेर पडले. या घटनेनंतर चाहत्यांनी सोशल मीडियावरून जोरदार टीका केली होती. वाचा- श्रीलंका क्रिकेटच्या कार्यकारी समितीने मेंडिस, गुणतिलका आणि डिकवेला यांच्यावर बायो बबलचे उल्लंघन केल्याबद्दल निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना तातडीने श्रीलंकेत परतण्याचे आदेश दिले आहेत, असे बोर्डाचे सचिव मोहन डिसिल्वा यांनी सांगितले. श्रीलंका क्रिकेट संघाने ऑक्टोबर २०२० नंतर सलग पाचवी टी-२० मालिका गमावली आहे. श्रीलंका संघाने ऑक्टोबर २०१९ पासून १३ टी-२० सामने खेळले आहेत. त्यापैकी फक्त एका सामन्यात त्याना विजय मिळवता आलाय. तर १२ सामन्यात त्यांचा पराभव झालाय. इतकच नव्हे तर तीनही फॉर्मेटमध्ये श्रीलंका संघाने २० पैकी ३ सामन्यात विजय मिळवला आहे. आता लंकेला इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3y8F7av
No comments:
Post a Comment