मुंबई: शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर आज रवाना झाला. या संघाचे प्रशिक्षकपद राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख राहुल द्रविड यांच्याकडे देण्यात आले आहे. भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध प्रत्येक तीन सामन्यांची वनडे आणि टी-२० मालिका खेळणार आहे. वाचा- भारतीय संघाच्या दौऱ्याकडे या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते. या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. त्याच्या आधी भारतीय संघ ही अखेरची टी-२० मालिका खेळत आहे. वाचा- वाचा- वर्ल्डकपच्या आधी ही मालिका होत असल्याने महत्त्वाची मानली जात आहे. पण श्रीलंका संघाची कामगिरी पाहता भारतीय संघाला या दौऱ्याचा काहीच फायदा होणार नाही असे दिसते. श्रीलंका संघाने ऑक्टोबर २०१९ पासून १३ टी-२० सामने खेळले आहेत. त्यापैकी फक्त एका सामन्यात त्याना विजय मिळवता आलाय. तर १२ सामन्यात त्यांचा पराभव झालाय. संघाची अशी कामगिरी ही सर्वात वाइट मानली जातेय. या काळात त्यांनी ऑस्ट्रेलिया, भारत, वेस्ट इंडिज आणि इंग्लंडविरुद्ध मालिका खेळली होती. वाचा- इतकच नव्हे तर तीनही फॉर्मेटमध्ये श्रीलंका संघाने २० पैकी ३ सामन्यात विजय मिळवला आहे. अशात भारतीय संघाने कमकूवत श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवून हाती फार काही लागणार नाही. वाचा- श्रीलंकेविरुद्ध टी-२० मध्ये सर्व संघांची कामगिरी पाहिली तर भारतीय संघ अव्वल स्थानी दिसतो. भारत आणि लंकेत आतापर्यंत १९ सामने झाले आहेत. त्यापैकी १३ मध्ये भारताचा विजय झालाय. ५ श्रीलंकेने जिंकले आहेत तर एका सामन्याचा निकाल लागला नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2UasI7e
No comments:
Post a Comment