साऊदम्पटन : भारतीय संघाला फायनलमध्ये लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. पण त्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली पत्नी अनुष्का शर्माबरोबर सुट्ट्यांचा आनंद लुटत असल्याचे पाहायला मिळाले आहे. विराट आणि अनुष्का यांचा फोटो आता चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. फायनल संपल्यावर भारतीय संघाला आता २० दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये कोणताही सराव सामना भारतीय संघ खेळणार नाही. त्यामुळे फायनलनंतर विराट पत्नी अनुष्काबरोबर या सुट्टीचा आनंद लुटत असल्याचे पाहायला मिळाले आहे. विराट आणि अनुष्का फायनल संपल्यावर एका हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट करण्यासाठी गेले होते. त्यावेळी या दोघांचा एक फोटो काढण्यात आला. अनुष्काने हा फोटो आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा फोटो सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. दिग्गज क्रिकेटपटूंची कोहलीवर टीकावेस्ट इंडिजचे माजी महान क्रिकेटपटू मायकल होल्डिंग यांनी यावेळी कोहलीवर टीका केली आहे. होल्डिंग यांनी यावेळी सांगितले की, " विराट कोहलीकडून एक चुक वारंवार होताना दिसत आहे. गेल्या काही दौऱ्यांमध्ये मी ही गोष्ट सांगितली होती. विराट कोहली हा एक आक्रमक कर्णधार आहे. पण त्याच्या आक्रममकपणाचा वाईट परिणाम संघातील खेळाडूंवर होताना पाहायला मिळतो. त्यामुळे विराट नेतृत्व करत असताना भारतीय संघ दडपण हाताळताना अपयशी ठरत असल्याचे पाहायला मिळाले आहे. आक्रमकता हा विराटचा स्वभाव आहे, पण या गोष्टीचा परीणाम संघावर होता कामा नये. कोहलीने एक कर्णधार म्हणून या गोष्टीकडे पाहायला हवे. माझ्यामते कोहलीने आता शांत राहण्याची गरज आहे. कोहली जर शांत राहीला तर संघातील खेळाडूंकडून चांगली कामगिरी पाहायला मिळू शकते. त्यामुळे कोहलीने आपल्या स्वभावात संघासाठी हा बदल करायला हवा, असे मला तरी वाटते. कारण कोहली आक्रमक झाला की काही खेळाडू बिथरत असतील आणि त्याचा वाईट परीणाम कामगिरीवर होत असेल. सध्याच्या घडीला भारतीय खेळाडू सुट्टीचा आनंद लुटत आहेत. पण त्यानंतर कोहलीने शांत राहून संघ हाताळावा, तेच त्याच्या आणि संघाच्या हिताचे असेल." विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने फायनल गमावली. यापूर्वी २०१७ साली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्येही भारताला पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर २०१९ साली झालेल्या विश्वचषकात भारताचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले होते. विराटच्या नेतृत्वाखाली भारताला आतापर्यंत एकही आयसीसीची स्पर्धा जिंकता आलेली नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3hgVg6D
No comments:
Post a Comment