Ads

Monday, June 28, 2021

ट्वेन्टी-२० विश्वचषकाबाबत सौरव गांगुलींचा मोठा खुलासा, सामने युएईबरोबर या देशातही खेळवले जाणार...

नवी दिल्ली : ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे सामने आता फक्त युएईमध्ये होणार नसल्याचा खुलासा आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केला आहे. विश्वचषकाचे सामने युएईबरोबरआता अन्य एका देशामध्येही खेळवण्यात येणार आहे, असे गांगुली यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. गांगुली यांनी विश्वचषकाच्या आयोजनाबाबत नेमकं काय सांगितलं, पाहा....सौरव गांगुली यांनी विश्वचषकाच्या आयजोनाबाबत काही माहिती दिली आहे. गांगुली यांनी सांगितले की, " विश्वचषकाच्या वेळापत्रकाबाबत अजूनही चर्चा सुरु आहे. पण विश्वचषकाचे सामने हे दोन देशांमध्ये होणार आहेत. विश्वचषकाच्या पात्रता फेरीचे सामने ओमानमध्ये खेळवण्याचे ठरले आहे. त्यानंतर विश्वचषकातील महत्वाचे सामने हे दुबईमध्ये खेळवण्यात येणार आहेत." विश्वचषकाच्या पात्रता फेरीत श्रीलंका, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, नेदरलँड्स, नामिबिया, पापुआ न्यू गिनिया आणि ओमान हे आठ संघ खेळतील. या आठ संघांमध्ये पात्रता फेरीचे सामने होतील आणि यापैकी दोन संघ विश्वचषकातील महत्वाच्या सामन्यांसाठी पात्र ठरतील. त्यामुळे हे सर्व संघ ओमानमध्ये आपले सामने खेळतील. त्यानंतर जे दोन संघ सर्वोत्तम ठरतील त्यांना युएईला पाठवण्यात येणार आहे. आयपीएलच्या झाल्यानंतर वर्ल्डकपच्या क्वालिफायरच्या लढती सुरू होतील. या लढती ओमानमध्ये होणार आहेत. त्यानंतर युएईमध्ये दुबई, अबूधाबी आणि शारजाह येथे सामने होतील. टी-२० वर्ल्डकप संदर्भात आयसीसीला निर्णय कळवण्याचा आज शेवटचा दिवस होता. बीसीसीआयच्या सर्व अधिकाऱ्यांसोबत कॉन्फरन्स कॉल केला. देशातील करोना परिस्थितीवर चर्चा केली गेली आणि त्यानंतर विश्वचषक भारताबाहेर खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआयने या वर्षाच्या अखेरीस होणारा टी-२० वर्ल्डकप भारतात नाही तर युएईमध्ये होणार असल्याचे जाहीर केले. आयपीएल संपल्यावर ओमानमध्ये विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीचे सामने खेळवले जातील.ा या फेरीत आठ देश खेळणार आहेत. या आठ देशांमधून दोन संघ विश्वचषकासाठी पात्र ठरतील. त्यामुळे आता ओमानसाठी हा एक मोठी संधी असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे ओमान या सामन्यांचे आयोजन कसे करते, याकडे सर्वांचे लक्ष असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3AgVZhd

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...