साऊदम्पटन : फायनलमध्ये पराभवानंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर आता चाहते चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळत आहे. रवी शास्त्री यांचे ट्विट सध्याच्या घडीला चांगलेच व्हायरल होत आहे. शास्त्री यांनी नेमकं काय वक्तव्य केलं, पाहा...फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर शास्त्री यांनी म्हटले की, " या परिस्थितीमध्ये सर्वोत्तम संघाने बाजी मारली. एवढ्या मोठ्या कालावधीनंतर न्यूझीलंडचा संघ विजयासाठी लायक होता. मोठ्या गोष्टी सहजपणे मिळत नाहीत. न्यूझीलंडने फायनलमध्ये चांगला खेळ केला आणि त्यांचा सन्मान करायलाच हवा." शास्त्री यांच्या या वक्तव्यावर चाहते चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले. शास्त्री यांनी फायनलसाठी उत्तम संघ निवडला नाही आणि त्यामुळेच भारताचा पराभव झाला, असे बऱ्याच चाहत्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर चाहत्यांनी यावेळी शास्त्री यांना चांगलेच धारेवर धरत त्यांना ट्रोलही केले आहे. रवी शास्त्री यांनी भारतीय संघाचे जेव्हापासून मुख्य प्रशिक्षकपद सांभाळले आहे, तेव्हापासून संघाने विजय मिळवले आहेत. पण आयसीसीच्या एकाही स्पर्धेत भारताला यश मिळालेले नाही. फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर शास्त्री यांनी एक ट्विट केले होते, या ट्विटनंतर चाहते शास्त्री यांच्यावर चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले आहेत. भारताचा महान क्रिकेटपटू सचि़न तेंडुलकरने या फायनलबाबत महत्वाचा सल्ला दिला होता. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्याला सुरुवात होण्याआधी सचिन तेंडुलकरने त्याच्या मुलाखतीत भारतीय संघाला अनेक सुचना केल्या होत्या. त्यात पहिली १० षटके अतिशय महत्त्वाची असतील असे त्याने सांगिले होते. या षटकात विकेट न गमावता सावधपणे खेळले पाहिजे. भारतीय संघातील फलंदाजांना दोन्ही डावात धावा करता आल्या नाही. या दोन्ही डावात एकाही फलंदाजाने अर्धशतक केले नाही. पहिल्या डावात २१७ तर दुसऱ्या डावात भारताला फक्त १७० धावा करता आल्या. त्यामुळे भारताचा हा पराभव फलंदाजांच्या चुकांमुळे झाल्याचे पाहायला मिळत आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही सामन्यानंतर आम्हाला ३०-४० धावा कमी पडल्या, असे म्हटले होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2STHmzx
No comments:
Post a Comment