Ads

Saturday, March 6, 2021

वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद ९६ धावा हे शतक समजले जाईल; कारण...

अहमदाबाद: इंग्लंडविरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताचा डाव ३६५ धावांवर संपुष्ठात आला. इंग्लंडने पहिल्या डावात केलेल्या २०५ धावांना भारताने चोख उत्तर दिले. विशेषत: टीम इंडियाने १४६ धावांवर ६ विकेट गमवल्या असताना तळातील फलंदाजांनी शानदार कामगिरी केली आणि १६० धावांची महत्त्वाची आघाडी मिळून दिली. वाचा- भारताकडून पहिल्या डावात ऋषभ पंतने शतक झळकावले. तर ( )चे शतक ४ धावांनी हुकले. त्याने १७४ चेंडूत १० चौकार आणि १ षटकारासह ५५.१७च्या स्ट्राइक रेटने नाबाद ९६ धावा केल्या. सुंदर फलंदाजीला आला होता तेव्हा भारताने ६ विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर त्याने पंतसोबत शतकी भागिदारी केली आणि दुसऱ्या दिवसाचा डाव संपला तेव्हा संघाला आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या दिवशी त्याने अक्षर पटेल सोबत शतकी भागिदारी करून पहिल्या डावातील आघाडी मोठी केली. वाचा- तरी सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत. भारताचे माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी सुंदरच्या या ९६ धावा म्हणजे शतकच आहे. ज्या परिस्थितीत त्याने शतक केले ते सोपे नव्हते. तो फक्त गोलंदाज नाही तर एक अष्ठपैलू असल्याचे सिद्ध झाले आहे. सुंदरने अशा वेळी फलंदाजी आणि गोलंदाजी केली आहे जेव्हा संघात रविंद्र जडेजा नाही. वाचा- वाचा- यामुळे शतक करू शकला नाही सुंदर भारताने ११३.५ षटकात ७ बाद ३६५ धावा केल्या होत्या. ११४व्या षटकात अक्षर पटेलने एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि तो धावबाद झाला. तेव्हा वॉशिंग्टन सुंदर ९६ धावांवर खेळत होता आणि नॉन स्ट्रायकरवर होता. पटेलच्या जागी आलेल्या इशांत शर्माला पहिल्याच चेंडूवर बेन स्टोक्सने LBW बाद केले. त्यानंतर मोहम्मद सिराज फलंदाजीसाठी आला. सिराजने बेन स्टोक्सचे दोन चेंडू खेळून काढले. पण ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर तो बोल्ड झाला आणि सुंदर ९६ धावांवर नाबाद राहिला. वाचा- सुंदरचे शतक पूर्ण न झाल्याबद्दल सर्व चाहते निराश झाले. पण त्याच्या या नाबाद ९६ धावा शतका इतक्याच महत्त्वाच्या ठरल्या.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/30jnshe

Video: विकेटच्या मागे इतका बडबड का करतोस? पंतने दिले मन जिंकणारे उत्तर

अहमदाबाद: इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या चौथ्या कसोटीतील पहिल्या डावात भारताचा विकेटकिपर ()ने दमदार शतक झळकावले. पंतच्या या शतकामुळे भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध आघाडी घेता आली. गेल्या काही महिन्यात पंतने त्याच्या कामगिरीत कमालीची सुधारणा केली आहे आणि यासाठी त्याचे कौतुक देखील केले जात आहे. वाचा- काल दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर रोहित शर्माने पंतला त्याच्या शतकाबद्दल विचारले. तसेच तो विकेटकिपिंग करताना सारखा काही ना काही बडबडत असतो त्याच्याबद्दल विचारणा केली. त्यावर पंतने जे उत्तर दिले त्याने सर्वांची मने जिंकली. रोहित शर्माने पंत आणि वॉशिंग्टन सुंदर यांची एक छोटी मुलाखत घेतली. याचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला. जेव्हा रोहितने पंतला विचारले, तु विकेटच्या मागे सारखा काही ना काही बडबडत असतो, असे लोक म्हणतात. विकेटच्या मागे का इतका दंगा करतोस? वाचा- यावर पंत म्हणाला, मी क्रिकेटचा आनंद घेत असतो. यामुळे संघाचा आत्मविश्वास देखील वाढतो. माझा प्रयत्न असतो की कशाही पद्धतीने संघाला मदत झाली पाहिजे. डोक्यात फक्त तेच सुरू असते. वाचा- ... वाचा- चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने पहिल्या डावात १४६ धावांवर पाच विकेट गमावल्या होत्या. तेव्हा पंतने सुंदरसह शतकी भागिदारी केली. या दोघांनी ११३ धावा केल्या. त्यानंतर पंतने कसोटीमधील तिसरे शतक पूर्ण केले. पंतने ११८ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकारांसह १०५ धावा केल्या.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ro24DA

Friday, March 5, 2021

पुण्यात जन्मलेल्या या अँकरशी जसप्रीत बुमराह करणार विवाह

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघातील मुख्य वेगवान गोलंदाज ( ) च्या लग्नाबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी आणि त्यानंतर टी-२० आणि वनडे सामन्यातून विश्रांती घेतली आहे. त्याची सुट्टी कशासाठी आहे हा प्रश्न सुरुवातीला सर्वांना पडला होता. पण बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने बुमराहची ही सुट्टी लग्नासाठी असल्याचे सांगितले. वाचा- बुमराह कोणाशी लग्न करणार याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरू होती. त्यातच दक्षिणेतील चित्रपटात काम करणारी अनुपमा परमेश्वरन हिचे नाव समोर आले होते. पण आता काही मीडिया रिपोर्ट्नुसार बुमराह ज्या मुलीशी लग्न करणार आहे त्या मुलीचे नाव ( ) असल्याचे कळते. संजना ही एक मॉडेल आणि क्रीडा अँकर आहे. वाचा- कोण आहे संजना गणेशन ज्या मीडिया रिपोट्समध्ये बुमराह हा संजना गणेशन सोबत लग्न करणार असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर संजना बद्दल चाहत्यांनी सर्च करण्यास सुरूवात केली. संजना मॉडेल आणि क्रीडा अँकर आहे. तिने क्रिकेट, बॅडमिंटन आणि फुटबॉलसह अनेक इव्हेंट्स होस्ट केले आहेत. २०१९ साली झालेला वनडे वर्ल्डकप तिने भाारताकडून होस्ट केला होता. वाचा- ... संजनाचा जन्म ६ मे १९९१ रोजी महाराष्ट्रातील पुणे शहरात झाला होता. ती आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्सचा शो नाइट क्लबची देखील होस्ट होती. इतकच नव्हे तर संजनाने आयपीएल लिलावाचे होस्ट म्हणून काम केले. तिने पुण्यातून इंजिनिअरिंगची डिग्री घेतली होती त्यानंतर मॉडेलिंग क्षेत्रात प्रवेश केला. २०१४च्या मिस इंडियाच्या फायनलपर्यंत ती पोहोचली होती.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/38dMliX

IND vs ENG 4th Test day 3: भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचे Live अपडेट

अहमदाबाद: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली आहे. कालच्या दुसऱ्या दिवशी भारताने ऋषभ पंतच्या शतकाच्या जोरावर भारताने ८९ धावांची आघाडी घेतली होती. आता भारताच्या तळातील अखेरचे तीन फलंदाज ही आघाडी किती मोठी हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. live अपडेट ( 4th Test day 3) >> चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात- अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर मैदानात


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/38hoEGt

video पंतचा हा शॉट इंग्लंडचे खेळाडू अनेक वर्ष विसणार नाहीत; सेहवाग म्हणाला...

अहमदाबाद : इंग्लंडविरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या चौथ्या कसोटीचा दुसरा दिवस ऋषभ पंतने गाजवला. पंतने भारतीय संघाला फक्त संकटातून बाहेर काढले नाही तर शतक झळकावत चाहत्यांचे मनोरंजन केले. त्याने ११८ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकारांसह १०१ धावा केल्या. वाचा- पंत कसोटीत देखील आक्रमक शैलीने खेळतो. पण इंग्लंडविरुद्ध पहिल्या ६० धावांपर्यंत तो विकेट न गमावता सावध खेळला. जेव्हा भारताने इंग्लंडच्या २०५ धावांना मागे टाकले. त्यानंतर पंतने फटकेबाजी सुरू केली. पंतने एडरसनच्या ८१व्या ओव्हरमध्ये लॉग ऑनच्या वरून चौकार मारला. या चौकाराचे सर्वांना खुश केले. भारताचा माजी स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने देखील त्याचे सोशल मीडियावर कौतुक केले. त्यानंतर ८३व्या ओव्हरला पंतने रिव्हर्स स्वीप शॉट मारून सर्वांना हैराण केले. एडरसनने विचार देखील केला नसले की पंत त्याला असा शॉट मारू शकेल. तो जेव्हा ९४ धावांवर होता तेव्हा जो रूटला षटकार मारून तिसरे शतक साजरे केले. ५ बाद १२१ अशी अवस्था असताना ऋषभ पंतच्या शानदार शतकामुळे भारताला आघाडी मिळवता आली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ७ बाद २९४ धावा केल्या होत्या. पंत-सुंदर जोडीने संघाला आघाडी मिळून दिली आणि त्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजाचा समाचार देखील घेतला. पंतने प्रथम अर्धशतक केले आणि त्यानंतर षटकार मारून शतक झळकावले. शतक झाल्यानंतर तो बाद लगेच बाद झाला. त्याने ११८ चेंडूत १०१ धावा केल्या. यात २ षटकार आणि १३ चौकारांचा समावेश होता. पंतने सुंदरसह सातव्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3rkg0yn

Road Safety World Series: भारताची मॅच सुरू; सचिन-सेहवाग मैदानावर, पाहा live अपडेट

रायपूर : छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे शदीह वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय मैदानावर भारत आणि बांगलादेश या दोन देशात सामना सुरू आहे. रोड सेफ्टी सीरीजमधील ही पहिली मॅच असून यात भारतीय लेजेंड्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाचे नेतृत्व सचिन तेंडुलकर करत आहे. हा सामना तुम्ही कलर्स सिनेप्लेक्स आणि कलर्स रिश्ते या चॅनलवर लाइव्ह पाहू शकता त्याच बरोबर ऑनलाइन Voot app आणि जिओ टीव्हीवर हे सामने पाहता येतील. LIVE SCORE: >> बोल्ड! युवराज सिंगने घेतली बांगलादेशची पाचवी विकेट- बांगलादेश ५ बाद ८१ >> चौथी विकेट, ओझाने घेतली आणखी एक विकेट- बांगलादेश ४ बाद ७४ >> नमन ओझाने घेतली बांगलादेशची तिसरी विकेट, बांगलादेश ३ बाद ७१ >> युवराज सिंगने घेतली दुसरी विकेट- बांगलादेश २ बाद ६७ >> बांगलादेशची पहिली विकेट >> इरफान पठाणने टाकली पहिली ओव्हर >> असा आहे भारतीय संघ >> भारतीय संघाने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bh20jm

IND vs ENG : ऋषभ पंत-वॉशिंग्टन सुंदर जोडीचा धमाका; दुसऱ्या दिवशी भारताने घेतली आघाडी

अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने ८९ धावांची आघाडी मिळवण्यात यश मिळवले. ५ बाद १२१ अशी अवस्था असताना ऋषभ पंतच्या शानदार शतकामुळे भारताला आघाडी मिळवता आली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ७ बाद २९४ धावा केल्या होत्या. ६० वर तर अक्षर पटेल ११ धावांवर खेळत आहेत. वाचा- दुसऱ्या दिवसाची सुरूवात भारताने कालच्या १ बाद २४ धावसंख्येवरून पुढे केली. पण पहिल्या सत्रात इंग्लंडने ३ विकेट घेत सामन्यात कमबॅक केले. यात चेतेश्वर पुजारा १७, विराट कोहली शून्य आणि अजिंक्य रहाणे २७ यांचा समावेश होता. पहिल्या सत्रानंतर भारताने ४ बाद ८० धावा केल्या होत्या. वाचा- रोहित शर्मा आणि या जोडीने भारताला शतक करून दिले. ही जोडी मोठी भागिदारी करेल असे वाटत असताना रोहित शर्मा बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याचे अर्धशतक एका धावाने हुकले. त्यानंतर अश्विन १३ धावांवर बाद झाला आणि टीम इंडिया आणखी अचडणीत सापडली. भारताच्या १४६ वर सात विकेट पडल्या होत्या. या परिस्थितीतून पंत आणि सुंदर या जोडीने संघाला बाहेर काढले. पंत-सुंदर जोडीने संघाला आघाडी मिळून दिले आणि त्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजाचा समाचार देखील घेतला. पंतने प्रथम अर्धशतक केले आणि त्यानंतर षटकार मारून शतक झळकावले. शतक झाल्यानंतर तो बाद लगेच बाद झाला. त्याने ११८ चेंडूत १०१ धावा केल्या. यात २ षटकार आणि १३ चौकारांचा समावेश होता. पंतने सुंदरसह सातव्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. वाचा- दुसऱ्या दिवशाचा खेळ संपला तेव्हा सुंदर ६० धावांवर नाबाद होता. तर अक्षर पटेल ११ धावांवर खेळत होता. इंग्लंडकडून जेम्स एडरसनने ३, बेन स्टोक्सने २, जॅक लीचने २ विकेट घेतल्या. आघाडी आणि मधळ्या फळीतील फलंदाज अपयशी ठरल्यानंतर भारताच्या तळातील फलंदाजांनी संघाला आघाडी मिळून दिली. आता तिसऱ्या दिवशी अखेरचे तीन फलंदाज आणखी किती आखाडी मिळवून देतात हे पाहावे लागेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2MRLn4o

प्रतिक्षा संपली, आजपासून सचिन तेंडुलकर पुन्हा क्रिकेट खेळणार; पाहा सरावाचा व्हिडिओ

नवी दिल्ली : मोठ्या कालावधीनंतर क्रिकेटमधील सर्वोत्तम सलामीची जोडी पुन्हा एकदा मैदानावर दिसणार आहे. भारताचा मास्टर ब्लास्टर (sachin tendulkar) आणि यांची फलंदाजी पाहता येणार आहे. ( )च्या पहिल्या लढतीत हे दोन्ही क्रिकेटपटू भारताकडून डावाची सुरूवात करणार आहेत. वाचा- पाच मार्च ते २१ मार्चपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेत एकूण सहा संघ खेळणार आहेत. छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. गेल्या वर्षी करोनामुळे ही स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. आता आजपासून याची सुरूवात होत आहे. रायपूरच्या शदही वीरनारायण स्टेडियमवर सामने होतील. भारताची पहिली लढत बांगलादेशविरुद्ध होणार आहे. वाचा- राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या हस्ते उद्घाटन होईल. या स्पर्धेत भारतासह बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या देशांचे संघ सहभागी होणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेले अनेक दिग्गज खेळाडू या स्पर्धेत खेळणार आहेत. भारताकडून सचिन आणि सेहवाग यांच्या बरोबर युसूफ पठाण, विनय कुमार, नमन ओझा, युवराज सिंग आणि इरफान पठाण हे खेळाडू दिसतील. वाचा- अन्य संघातील खेळाडूंमध्ये ब्रायन लारा, जॉन्टी रोड्स, केव्हिन पीटरसन, मोहम्मद नजीमुद्दीन आदी खेळाडू आहेत. आजच्या लढतीनंतर भारताची मॅच ९ आणि १३ तारखेला आहे. १७ आणि १९ तारखेला सेमीफायनल तर २१ तारखेला फायनल मॅच होणार आहे. असा आहे भारतीय संघ- सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहेवाग, युवराज सिंग, जहीर खान, मोहम्मद कैफ, इरफान पठाण, नोएल डेव्हिड, मुनाफ पटेल, मनप्रीत गोनी, नमन ओझा, प्रज्ञान ओझा, युसूफ पठाण


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/30h7LXO

कर्णधार विराट कोहलीने केला भोपळा न फोडण्याचा विक्रम

अहमदाबाद: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार ( ) पुन्हा एकदा धावा करण्यात अपयशी ठरला. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात तो मोठी धावसंख्या करेल असे वाटत होते. पण कोहली शून्यावर बाद झाला. वाचा- पहिल्या सत्रात चेतेश्वर पुजारा बाद झाल्यानंतर विराट मैदानावर आला. आणि बेन स्टोक्सच्या चेंडूवर बेन फोक्सने त्याचा कॅच घेतला. या मालिकेत विराट दुसऱ्यांचा शून्यावर बाद झाला. याआधी चेन्नईत झालेल्या दुसऱ्या कसोटीत तो पहिल्या डावात शून्यावर बाद झाला होता. तेव्हा मोइन अलीने त्याची बोल्ड घेतली होती. मोइन अलीच्या त्या चेंडूला ड्रीम बॉल असे म्हटले गेले होते. वाचा- कसोटी करिअरमध्ये विराट कोहली एका मालिकेत दोन वेळे शून्यावर बाद होण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी २०१४ साली इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तो दोन वेळा शून्यावर बाद झाला होता. वाचा- विराट त्याच्या करिअरमध्ये १२व्यांदा शून्यावर बाद झालाय. तर बेन स्टोक्सने त्याला पाचव्यांदा बाद केले. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये तो चौथ्यांचा शून्यावर बाद झाला आहे. भारतीय क्रिकेटपटूंमध्ये जसप्रीत बुमराह चार वेळा शून्यावर बाद झालाय. तर मोहम्मद शमी आणि चेतेश्वर पुजार हे प्रत्येकी ३ वेळा शून्यावर बाद झाले आहेत. नोव्हेंबर २०१९ मध्ये विराटने बांगलादेशविरुद्ध १३६ धावा केल्या होत्या. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने एकही शतक झळकावले नाही. विराटने १२ कसोटीत १,१९,३,१४,७४,४,११,७२,०,६२,२७,० अशा धावा केल्या आहेत. वाचा- कर्णधार म्हणून सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा एक नकोसा विक्रम त्याच्या नावावर नोंदला गेला आहे. कसोटीत सर्वाधिक वेळ शून्यावर बाद होण्याबाबत तो विराट टॉपवर आला आहे. विराट सोबत सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेला कर्णधार म्हणजे महेंद्र सिंह धोनी होय. धोनी आठ वेळा कसोटीत शून्यावर बाद झालाय. विराट देखील इतक्याच वेळा शून्यावर बाद झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय कर्णधारांमध्ये देखील विराट आता संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय कर्णधारामध्ये सौरव गांगुली १३ वेळा शून्यावर बाद झाला होता. विराट देखील आता गांगुलीच्या बरोबर पोहोचला आहे. त्यानंतर धोनीचा क्रमांक लागतो तो ११ वेळा तर कपिल देव १० वेळा शून्यावर बाद झालेत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sSgVX2

Thursday, March 4, 2021

IND vs ENG 4th Test day 2: भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचे Live अपडेट

अहमदाबाद: यांच्यातील चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली आहे. भारताने कालच्या १ बाद २४ धावसंख्येच्या पुढे खेळण्यास सुरूवात केली. इंग्लंडने पहिल्या डावात २०५ धावा केल्या आहेत. भारतीय संघाचा दुसऱ्या दिवशी मोठी धावसंख्या करण्याचा प्रयत्न असेल. भारत विरुद्ध इंग्लंड Live अपडेट ( 4th Test day 2)>> >> रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा मैदानात >> चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sPluS3

बेन स्टोक्सने भारतीय खेळाडूला दिली शिवी; विराट दिले उत्तर, पाहा व्हिडिओ

अहमदाबाद: भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा आणि अखेरचा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यातील पहिल्याच दिवशी एक राडा झाला. वाचा- ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पदार्पणाची संधी मिळालेल्या मोहम्मद सिराजने आतापर्यंतच्या छोट्या कसोटी करिअरमध्ये शानदार कामगिरी केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने दोन विकेट घेतल्या. पहिल्या दिवशी पाहूण्या संघाचा २०५ वर ऑल आउट केल्यानंतर भारताने १ बाद २४ धावा केल्या. वाचा- दिवसाचा खेळ संपल्यानंतर मोहम्मद सिराजने मैदानावर झालेल्या शब्दिक चकमकीबाबतचा खुलासा केला. सिरजाने इंग्लंडचा कर्णधार जो रूटला ५ धावांवर बाद केले. त्यानंतर मैदानावर आलेल्या त्याच्याकडे पाहून काही तरी बोलला. याबाबत सिराजला विचारण्यात आल्यावर तो म्हणाला, बेन स्टोक्सने मला शिवी दिली. ही गोष्ट विराट भाईला सांगितली. त्यानंतर त्याने संभाळून घेतले. वाचा- वाचा- रुटला बाद केल्यानंतर मैदानावर आलेल्या स्टोक्सला सिराजने बाउसर चेंडू टाकला. स्टोक्सला ते आवडले नाही. त्याने सिराजला कडेपाहून काही तरी बोलला. त्यानंतर विराटने जाऊन स्टोक्सला यासंदर्भात विचारणा केली. दोघांमध्ये बराच वेळ शाब्दिक वाद सुरू होता. नंतर अंपायरनी तो मिटवला. वाचा-


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sURCnv

चांगल्या पिचवर देखील घाणेरडे खेळला; इंग्लंड संघाला घरचा आहेर

अहमदाबाद: दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात वापरण्यात आलेल्या पिचवरून भारतावर टीका करणारा इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन( )ने गुरुवारी स्वत:च्या संघाला घरचा आहेर दिला. भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडला फक्त २०५ धावा करता आल्या. त्यानंतर वॉनने इंग्लंड संघाला सोशल मीडियावरून झापले. वाचा- भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीत इंग्लंडने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चौथ्या कसोटीसाठीचे पिच हे फलंदाजीसाठी अनुकूल होते. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने किमान ४०० धावा करणे अपेक्षित होते. पण इंग्लंडला फक्त २०५ धावा करता आल्या. यावरून वॉरने इंग्लंडच्या खेळाडूंना फटकारले. तो म्हणाला इंग्लंडची फलंदाजी केल्या काही कसोटी सामन्यात प्रचंड खराब झाली आहे. या पिचवर पहिल्या डावात धावा करता आल्या असत्या, कारण धावा करण्यासाठी हे योग्य मैदान आहे आणि येथे चेंडू वळत नाही तर बॅटवर येतोय. प्रचंड खराब फलंदाजी. वाचा- इंग्लंडने ३० धावात तीन फलंदाज गमावले होते. त्यात कर्णधार जो रूटचा देखील समावेश होता. पहिल्या डावात बेन स्टोक्सने अर्धशतकी खेळी केली. वाचा- विशेष म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत खराब पिचवरून वॉनने भारतीय संघावर आणि बीसीसीआयवर जोरदार टीका केली होती. इतक नव्हे तर चौथी कसोटी सुरू होण्याआधी त्याने एक व्हिडिओ देखील शेअर केला होता ज्यात त्याने खोदलेले पिच दाखवले होते. वाचा- पहिल्या दिवशी इंग्लंडचा डाव २०५ वर संपला. त्यानंतर दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने १ बाद २४ धावा केल्या होत्या. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक ४ विकेट घेत पुन्हा एकदा कमाल केली. तर आर अश्विनने ३ विकेट घेतल्या. मोहम्मद सिराजने २ तर सुंदरने एक विकेट घेतली.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qp1rbH

चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी राडा; विराट-स्टोक्स भिडले, पाहा Video

अहमदाबाद: इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताने १ बाद २४ धावा केल्या असून इंग्लंडने पहिल्या डावात २०५ धावा केल्याने भारत अद्याप १८१ धावांनी पिछाडीवर आहे. पहिला दिवस भारतीय गोलंदाजांनी गाजवला असला तरी या खेळात एक राडा देखील पाहायला मिळाला. वाचा- इंग्लंडची फलंदाजी सुरू असताना कर्णधार आणि हे एकमेकांना भिडले. सामन्यातील १३व्या षटकात मोहम्मद सिराजने जो रूटला बाद केले. त्यानंतर बेन स्टोक्स खेळण्यास आला. ओव्हर संपल्यानंतर स्टोक्सने सिराजकडे पाहून काही तरी बोलला. त्यानंतर ड्रिंक्स ब्रेकनंतर कोहली आणि स्टोक्स यांच्यात शाब्दीक चकमक झाली. वाचा- वाचा- या दोन्ही खेळाडूंच्यात बराच वेळ वाद सुरू होता. अखेर मैदानावरील अंपायर विरेंद्र शर्मा आणि नितीन मेनन यांना मध्ये पडावे लागले. हे प्रकरण शांत झाल्यानंतर देखील पुढील ओव्हरमध्ये स्टोक्सने सिराजला स्लेज करण्याचा प्रयत्न केला. वाचा- विराट आणि स्टोक्स यांच्यात वाद होण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी तिसऱ्या कसोटीत देखील या दोघांच्यात वाद झाला होता. तेव्हा स्टोक्स फलंदाजी करत होत आणि गोलंदाज आर अश्विन होता. अश्विन गोलंदाजी करण्यास येताच स्टोक्सने त्याला थांबवले. स्टोक्सचा प्रयत्न अश्विनची एकाग्रता भंग करण्याचा होता. तेव्हा विराटने त्याला वेळ वाया घालवू नको असे बजावले. २०१६ साली देखील या दोघांमध्ये असे वाद झाले होते. तेव्हा आयसीसीने स्टोक्सला डिमेरिट गुण दिले होते.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2OqVQ7q

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त ३ वेळा झाली अशी घटना; पाहा व्हिडिओ

नवी दिल्ली: एकाच सामन्यात हॅटट्रिक सारखी शानदार कामगिरी केल्यानंतर त्यानंतर एका ओव्हरमध्ये सहा खाण्याचा अनोखी पण नको वाटणारी कामगिरी श्रीलंकेचा फिरकीपटू अकीला धनंजयच्या नावावर नोंद झाली आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात त्याने हॅटट्रिक घेतली आणि त्याच सामन्यात कायरन पोलार्डने एका ओव्हरमध्ये ६ षटकार मारले. वाचा- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच ओव्हरमध्ये अशी कामगिरी करणारा तो फक्त तिसरा फलंदाज आहे. त्याआधी दक्षिण आफ्रिकेच्या आणि भारताच्या यांनी ही कामगिरी केली. पोलार्डच्या या धमाकेदार कामगिरीनंतर जाणून घेऊयात याआधीच्या फलंदाजांसाठीच्या परफेक्ट ओव्हर... वाचा- हर्षल गिब्स (२००७-वर्ल्ड कप)- १६ मार्च २००७ रोजी आयसीसी वनडे वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या हर्षल गिब्सने एकाच ओव्हरमध्ये सहा षटकार मारले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात एका ओव्हरमध्ये सहा षटकार मारणारा तो पहिला फलंदाज ठरला होता. त्याने नेदरलँडविरुद्ध ही कामगिरी केली होती. त्याने फिरकीटपटूला सह षटकार मारले होते. त्या सामन्यात गिब्सने ४० चेंडूत ७२ धावा केल्या, तर आफ्रिकेने हा सामना २२१ धावांनी जिंकला. वाचा- युवराज सिंग (२००७- टी-२० वर्ल्डकप)- पहिल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये १९ सप्टेंबर २००७ रोजी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात अॅड्यू फिंटऑफसोबत झालेल्या बाचाबाचीनंतर संतापलेल्या युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडला एकाच ओव्हरमध्ये सहा षटकार मारले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये सहा षटकार मारणारा तो पहिला आणि आतापर्यंतचा एकमेव खेळाडू आहे. या सामन्यात त्याने १२ चेंडूत ५० धावा केल्या आणि भारताने सामना १८ धावांनी जिंकला. वाचा- (२०२१- श्रीलंकेविरुद्ध टी-२०)- लंकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात विजयासाठी १३२ धावांचा पाठला करताना वेस्ट इंडिजचा कर्णधार पोलार्डने हॅटट्रिक करणाऱ्या धनंजयला एकाच षटकात सहा षटकार मारले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका खास यादीत नाव नोंदवले. त्याने ११ चेंडूत ३८ धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट ३४५.४५ इतका होता. वेस्ट इंडिजने हा सामना ४ विकेटनी जिंकला.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3uQs3Wi

पुन्हा एकदा फिरकीपटूंची कमाल; इंग्लंडचा ऑल आउट, पहिला दिवस भारताचा

अहमदाबाद: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. दिवसा अखेर भारताने १ बाद २४ धावा केल्या आहेत. पहिल्या दिवशी इंग्लंडचा पहिला डावा २०५ धावांवर संपुष्ठात आला. भारत अद्याप १८१ धावांनी पिछाडीवर आहे. या कसोटीसाठी भारतीय संघात जसप्रीत बुमराह ऐवजी मोहम्मद सिराजचा समावेश करण्यात आला. वाचा- वाचा- अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या चौथ्या कसोटीत इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय काही त्यांच्या फायद्याचा ठरला नाही. इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाले. या दोघांना अक्षर पटेलने बाद केले. त्यानंतर सिरजाने कर्णधार रूटला बाद करून पाहूण्या संघाची अवस्था ३ बाद ३० अशी केली. त्यानंतर मैदानावर असलेल्या बेन स्टोक्स आणि जॉनी बेयरस्टो यांनी चौथ्या विकेटसाठी ४८ धावांची भागिदारी केली. ही जोडी सिराजने फोडली. त्याने बेयरस्टोला २८ धावांवर बाद केले. त्यानंतर स्टोक्सने ओली पोपसह ४३ धावा जोडल्या. स्टोक्सने अर्धशतक पूर्ण केले आणि त्याला सुंदरने माघारी पाठवले. वाचा- इंग्लंडचा निम्मा संघ १२१ धावांवर बाद झाला होता. अखेरच्या पाच फलंदाजांपैकी लॉरेंन्स वगळता अन्य कोणाला मोठी धावसंख्या करता आली नाही. त्याने ४६ धावा केल्या. इंग्लंडा पहिला डाव २०५ धावा संपुष्ठात आला. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. अश्विनने ३, सिराजने २ तर सुंदरने एक विकेट घेतली. वाचा- भारताच्या डावाची सुरूवात शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी केली. जेम्स एडरसनने पहिल्याच ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर गिलला शून्यावर बाद करून भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर रोहित आणि चेतेश्वर पुजार यांनी विकेट न गमावता दिवसाचा खेळ संपवला.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3e9ia08

अशी झाली धुलाई की लोकांना गोलंदाजाच्या हॅटट्रिकचा विसर पडला; पाहा व्हिडिओ

एंटिगा: 1st t20i क्रिकेटमध्ये एखाद्या गोलंदाजाने घेणे ही गोष्ट खास अशी असते. क्रिकेटच्या इतिहासात फार असे कमी गोलंदाज आहेत ज्यांनी ही कामगिरी करून दाखवली आहे. कसोटी आणि वनडेच्या तुलनेत फलंदाज अधिक आक्रमक असलेल्या क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणे आणखी कठीण होय. वाचा- श्रीलंकेचा संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. दोन्ही संघातील पहिल्या टी-२० सामन्यात दोन मोठे विक्रम झाले. यातील एका विक्रमाची चर्चा सर्वजण करत आहेत. तो म्हणजे वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्ड याने एका ओव्हरमध्ये मारलेले सहा षटकार होय. वाचा- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये युवराज सिंग आणि हार्शल गिब्स यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने श्रीलंकेचा फिरकीपटू यांच्या ओव्हरमध्ये सहा षटकार मारले. या सामन्यात वेस्ट इंडिजने ४१ चेंडू आणि ४ विकेट राखून विजय मिळवला. सर्व जण पोलार्डच्या सहा षटकारांचे कौतुक करत आहेत. पण याच सामन्यात झालेला आणखी एक विक्रम म्हणजे ज्या गोलंदाजाला सहा षटकार मारले गेले त्याने काही मिनिट आधी हॅटट्रिक घेतली होती. वाचा- पोलार्डने एका ओव्हरमध्ये सहा षटकार मारल्यामुळे धनंजयच्या हॅटट्रिकचे कौतुकच झाले नाही. आयसीसीने देखील पोलार्डच्या सहा षटकारांचा व्हिडिओ शेअर केला. पण धनंजयच्या हॅटट्रिकचा व्हिडिओ मात्र कोणीच शेअर केला नाही. वाचा- पोलार्डने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लंकेला २० षटकात १३१ धावा करता आल्या. धनंजयने सामन्यातील चौथ्या ओव्हरमध्ये इविन लुईस, ख्रिस गेल आणि निकोलस पूरन यांची विकेट घेत हॅटट्रिक घेतली. यामुळे शून्य बाद ५१ वरून वेस्ट इंडिजची अवस्था ३ बाद ५२ अशी झाली. पण त्यानंतर सहाव्या ओव्हरमध्ये पोलार्डने धनंजयला ६ षटकार मारले. धनंजयने चार ओव्हरमध्ये ६२ धावा दिल्या. धनंजयच्या हॅटट्रिकचा व्हिडिओ


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sTPTPj

Wednesday, March 3, 2021

क्रिकेटपटूला पुरस्कार म्हणून मिळाली महाग गोष्ट; फोटो सोशल मीडियावर झाला व्हायरल

नवी दिल्ली: देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दिवसेदिवस वाढत आहेत. इंधनाच्या वाढत्या किमतीवर लोक सोशल मीडियावर चर्चा करत असतात. आता सोशल मीडियावर एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात क्रिकेटपटूला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार म्हणून त्याला चक्क पाच लीटर पेट्रोल () देण्यात आले. वाचा- भोपाळमध्ये झालेल्या एका क्रिकेट मॅचनंतर खेळाडूला सामनावीर म्हणून ट्रॉफी, गाडी किंवा पैसे नव्हे तर पाच लीटल पेट्रोल दिले गेले. सोशल मीडियावर ही बातमी वेगाने व्हायरल झाली. राजधानी दिल्लीत एक लीटर पेट्रोलसाठी ९१.१७ तर मुंबईत ९७.५७ रुपये मोजावे लागत आहेत. वाचा- रविवारी झालेल्या सामन्यात ज्या क्रिकेटपटूला मिळाला, त्याच्या फोटोवर युझर्स जोरदार प्रतिक्रिया देत आहेत. फक्त सामान्य क्रिकेटपटू नाही तर प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी देखील हा फोटो शेअर केला आहे. भोपाळमधील एका स्पर्धेबद्दल ऐकले, येथे खेळाडूंना पाच लीटर पेट्रोल मिळाले. सध्या हा पुरस्कार उपयोगी आहे, असे भोगले यांनी म्हटले आहे. वाचा- मध्ये प्रदेशमधील अनेक भागात पेट्रोलच्या किमती १०० रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. तर अन्य ठिकाणी त्या ९८ रुपये इतक्या आहेत. देशातील सर्वात मोठ्या सरकारी इंधन पुरवठा कंपनी इंडियन ऑइलने सलग चार दिवस मेट्रो शहरातील पेट्रोलच्या किमती बदलल्या नाहीत. तरी देखील देशातील अनेक भागात प्रथमच किमती १०० रुपयांच्या पुढे गेल्या आहेत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3rjWtya

IND vs ENG: भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचे Live अपडेट

अहमदाबाद: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतासाठी ही लढत महत्त्वाची आहे. या मॅचच्या निकालावर भारताचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधील स्थान निश्चित होणार आहे. live अपडेट ( 4th Test day 1 ) >> पहिल्या सत्राचा खेळ संपला, इंग्लंड ३ बाद ७४ (बेयरस्टो आणि स्टोक्स मैदानावर) >> रुट ५ धावांवर बाद, इंग्लंड ३ बाद ३० >> इंग्लंडचा कर्णधार जो रूट बाद, सिराजने घेतली मोठी विकेट >> इंग्लंडची आणखी एक विकेट, अक्षरने क्रॉलीला बाद केले- इंग्लंड २ बाद १५ >> डॉम सिबली २ धावांवर बाद, इंग्लंड १ बाद १० >> अक्षर पटेलचा धमाका, पहिल्याच ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर घेतली विकेट >> भारताने पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर DRS रिव्ह्यू गमावला >> इंग्लंडच्या पहिल्या डावाला सुरूवात असे आहेत दोन्ही संघ >> भारतीय संघात एक बादल- जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजचा संघात समावेश >> इंग्लंडच्या संघात दोन बदल >> वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियासाठी ही कसोटी महत्त्वाची >> चार सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ने आघाडीवर >> भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/30d7Lbi

एका ओव्हरमध्ये ६ षटकार; युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी

एंटिगा: वेस्ट इंडिजचा कर्णधार ()ने गुरुवारी भारताचा युवराज सिंग आणि हर्शल गिब्स यांच्या यादीत स्थान मिळवले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये सहा षटकार मारण्याचा पराक्रम पोलार्डने केलाय. अशी कामगिरी करणारा तो पहिला वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू आहे. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ही कामगिरी केली. वाचा- वेस्ट इंडिज आणि श्रीलंका () यांच्यात टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात लंकेचा गोलंदाज अकीला धनंजय याच्या ओव्हरमध्ये त्याने ही कामगिरी केली. विशेष म्हणजे या सामन्या धनंजयने हॅटट्रिक देखील केली. त्याने इविन लुईस, ख्रिस गेल आणि निकोलस पूरन यांची विकेट घेत हॅटट्रिक घेतली. वाचा- धनंजयने चार ओव्हरमध्ये ६२ धावा केल्या. या सामन्यात वेस्ट इंडिजने ४१ चेंडू आणि ४ विकेट राखून विजय मिळवला. पोलार्डने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लंकेला २० षटकात १३१ धावा करता आल्या. वाचा- वाचा- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताच्या युवराज सिंगने १९ सप्टेंबर २००७ रोजी पहिल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच ओव्हरमध्ये सहा षटकार मारले होते. दक्षिण आफ्रिकेच्या हर्शल गिब्सने वनडे वर्ल्डकपमध्ये नेदरलँडविरुद्ध डान बंग याच्या एका ओव्हरमध्ये सहा षटकार मारले होते.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3uR0End

बुमराह पाठोपाठ या अभिनेत्रीने घेतली सुट्टी; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघातील आघाडीचा जलद गोलंदाज ( )ने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातून माघार घेतली. त्याने बीसीसीआयला तशी विनंती केली होती. त्यानंतर बुमराहने घेतलेली सुट्टी ही लग्नासाठी असल्याचे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आता बुमराह कोणासोबत लग्न करणार याची चर्चा सुरू झाली आहे. वाचा- सोशल मीडियावर या चर्चा सुरू असताना एका अभिनेत्रीने देखील सुट्टी घेतल्याने बुमराहच्या सुट्टीचा आणि या अभिनेत्रीच्या सुट्टीचा चाहते लिंक लावण्याचा प्रयत्न करत आहेत. बुमराहसह सुट्टी घेणारी अभिनेत्री म्हणजे दक्षिणेतील चित्रपटात काम करणारी होय. वाचा- बुमराहने वैयक्तीक कारण देत चौथ्या कसोटीतून माघार घेतली होती. तेव्हा अशी चर्चा सुरू झाली होती की त्याने दुखापतीमुळे माघार घेतली आहे. पण एएनआय वृत्तसंस्थेने बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार बुमराहने लग्नासाठी सुट्टी घेतली आहे. पण तो कोणाची लग्न करणार आहे याबद्दल काही सांगितले नाही. बुमराह चौथ्या कसोटीत नंतर होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत देखील खेळणार नाही. त्याच बरोबर तो वनडे मालिकेसाठी उपलब्ध असणार नाही असे कळते. वाचा- अभिनेत्री अनुपमाने मळ्याळम आणि तेलगू चित्रपटात काम केले आहे. काही दिवासांपूर्वी बुमराह आणि अनुपमा यांच्या डेटिंगचे वृत्त समोर आले होते. बुमराहची सुट्टी आणि लग्न चर्चेत अनुपमाने इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. हा फोटो शेअर करताना तिने हॅपी हॉलिडे टू मी असे म्हटले आहे. सोबत हसणारी इमोजी टाकली आहे. वाचा- आता या पोस्टवरून अनेकांनी या दोघांचे लग्न होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. वाचा-


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2PpCKPf

चौथ्या कसोटीसाठी सुरू आहे तयारी; माजी कर्णधाराने शेअर केला पिचचा व्हिडिओ

लंडन: अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या भारत आणि इंग्लंड (ind vs eng ) यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा निकाल फक्त दोन दिवसात लागला होता. पिंक बॉल कसोटीनंतर पिचवरून अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता उद्यापासून त्याच मैदानावर चौथा आणि अखेरचा कसोटी सामना सुरू होणार आहे. या सामन्याआधी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने एक व्हिडिओ शेअर करून पिचवरून टोला हाणला आहे. वाचा- वॉनने एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तो खोदलेल्या जमीनीवर फलंदाजी करताना दिसत आहे. यासाठी त्याने चौथ्या कसोटीसाठी चांगली तयारी सुरू आहे, अशी कॅप्शन दिली आहे. तर इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून ज्यात तो अशाच खोदलेल्या जमीनीवर बॅट घेऊन उभा आहे. तो म्हणतो, या खोदलेल्या जमीनीवर कशा पद्धतीने फलंदाजी करायची याबद्दल सांगतोय. तो ही पिच कसे आहे आणि त्यावर कशा पद्धतीने खेळले पाहिजे हे तिरकस पद्धतीने सांगतोय. वाचा- वाचा- भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीतील पिचवरून वॉनने बरीच टीका केली होती. यावरून त्याचे आणि शेन वॉर्न यांच्यात सोशल मीडियावर बराच वाद देखील झाला होता. या दोन्ही सामन्यात फिरकीपटूंनी शानदार कामगिरी केली होती आणि भारताने विजय मिळवला होता. वाचा- आता उद्यापासून सुरू होणाऱ्या सामन्यात देखील फिरकीपटूंना अनुकूल अशी खेळपट्टी असल्याची शक्यता आहे. भारतीय संघाने दुसरा आणि तिसरा कसोटी सामना फिरकीपटूंच्या जोरावर जिंकला होता. तिसऱ्या कसोटीत इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला चांगली धावसंख्या उभी करता आली नव्हती. वाचा- भारताकडून अक्षर पटेल आणि आर अश्विन यांनी ११ आणि ७ विकेट घेतल्या होत्या.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sN7Wqm

टी-२० मध्ये धमाका; एका ओव्हरमध्ये ठोकल्या २८ धावा, स्टेडियममधील खुर्ची तोडली

वेलिंग्टन: ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात धमाकेदार कामगिरी केली. वेलिंग्टन येथे झालेल्या सामन्यात त्याने ३१ चेंडूत ७० धावा केल्या. यात ८ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. वाचा- पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवणाऱ्या न्यूझीलंड तिसऱ्या लढतीत टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय काही योग्य ठरला नाही. ऑस्ट्रेलियाने गोलंदाजांची धुलाई केली आणि २० षटकात २०८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मॅक्सवेलने सर्वाधिक ७०, कर्णधार एरॉन फिंचने ६९ तर जोश फिलिपने ४३ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात सर्वात स्फोटक फलंदाजी केली ती मॅक्सवेलने, त्याने जेम्स निशमच्या एका ओव्हरमध्ये २८ धावा ठोकल्या. डावातील १७व्या षटकात मॅक्सवेलने ४,६,४,४,४ आणि ६ अशा धावा वसुल केल्या. मॅक्सवेलच्या या स्फोटक खेळीत त्याने मारलेल्या एका षटकाराने स्टेडियममधील खुर्ची तुटली. सामन्यात ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. मॅथ्यू वेड पाच धावांवर बाद झाला. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाने धमाकेदार फलंदाजी केली. गेल्या काही दिवसांपासून खराभ फॉर्ममध्ये असलेल्या फिंचने ४४ चेंडूत ६९ धावा केल्या. यात ८ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. विजयासाठी २०९ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडचा डाव १७.१ षटकात १४४ धावांवर संपुष्ठात आला. ऑस्ट्रेलियाने ६४ धावांनी विजय मिळवला. पाच सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंड २-१ने आघाडीवर आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3068RWz

घातक गोलंदाजी; यॉर्कर चेंडूवर दोन स्टंप पडल्या, पाहा Video

अबुधाबी : अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे (Afghanistan vs Zimbabwe) यांच्यात पहिली कसोटी युएईमध्ये सुरू आहे. अफगाणिस्तानचा पहिला डाव फक्त १३१ धावात संपुष्ठात आला. तर झिम्बब्वेने पहिल्या डावात २५० धावा करत आघाडी घेतली. वाचा- जागतिक क्रिकेटमध्ये हे दोन्ही संघ दुबळे आहेत. पहिल्या कसोटी अफगाणिस्तानच्या डावातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. झिम्बाब्वेचा गोलंदाज व्हिक्टर नेयुची एका चेंडूवर विकेट घेतली. आयसीसीने त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. नेयुचीने हशमतुल्लाह शाहिदीची बोल्ड काढली. त्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील हैराण व्हाल... वाचा- नेयुचीने टाकलेला हा यॉर्कर चेंडू खेळण्यात शाहिदी चुकला आणि तो बोल्ड जाला. त्याचा चेंडू इतका घातक होता की तीन पैकी दोन विकेट पडल्या. शाहिदीला देखील विश्वास झाला नाही की नेमके काय झाले. वाचा- आयसीसीने झिम्बाब्वेच्या या गोलंदाजाचे कौतुक केले आहे. २०१३ नंतर प्रथमच झिम्बाब्वेच्या जलद गोलंदाजांनी एका डावात ८ विकेट घेतल्या असतील. अबुधाबीत कसोटीच्या पहिल्या डावात एखाद्या संघाने केलेल्या या सर्वात कमी धावा आहेत. याआधी २०१८ साली पाकिस्तानविरुद्ध न्यूझीलंडने १५३ धावा केल्या होत्या. वाचा- पहिल्या कसोटीतील दुसऱ्या डावात देखील अफगाणिस्तानची दाणादाण उडाली आहे. ४७ धावांवर त्यांचे ६ फलंदाज बाद झाले होते. ते अद्याप ७० धावांनी पिछाडीवर आहेत. त्यामुळे या सामन्यात झिम्बाब्वे विजय मिळवणार असे दिसतय.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sLsrn2

IND vs ENG: चौथ्या कसोटीत विराट कोहलीला वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी

अहमदाबाद: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार ()ला इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यात काही विक्रम करण्याची संधी आहे. विराटला चौथ्या कसोटीत वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी आहे. तर कर्णधार म्हणून देखील तो एक खास विक्रम करू शकतो. वाचा- अहमदाबाद येथे होणारी कसोटी ही विराट कोहलीची कर्णधार म्हणून ६०वा सामना असेल. याबाबत तो माजी कर्णधार एमएस धोनीच्या विक्रमाशी बरोबरी करेल. धोनीने भारतासाठी ६० कसोटीत नेतृत्व केले होते. तर कर्णधार म्हणून १२ हजार धावा करण्यासाठी विराटला फक्त १७ धावांची गरज आहे. चौथ्या कसोटीत त्याने १७ धावा केल्यास अशी कामगिरी करणारा तो तिसरा फलंदाज ठरेल. याआधी रिकी पॉन्टिंग आणि ग्रॉमी स्मिथ यांनी ही कामगिरी केली आहे. पॉन्टिंगने १५ हजार ४४० तर स्मिथने १४ हजार ८७८ धावा केल्या आहेत. वाचा- या शिवाय विराट कोहलीला पॉन्टिंगचा एक खास विक्रम मोडण्याची संधी आहे. या कसोटीत विराटने शतक झळकावल्यास तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक शतक करणारा खेळाडू होईल. पॉन्टिगने कर्णधार म्हणून ४१ शतक केली आहेत. विराटच्या नावावर सध्या तितकीच शतक आहेत. वाचा- चौथ्या कसोटीत भारतीय संघाने विजय मिळवल्यास विराट वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार क्लाइव्ह लॉयड यांच्या विक्रमाशी बरोबरी करेल. चौथी कसोटी जिंकल्यावर तो विराटच्या नेतृत्वाखालील ३६वा विजय असेल. लॉयड यांनी वेस्ट इंडिजला ३६ कसोटी विजय मिळवून दिलाय. वाचा- कसोटीत विराटने कर्णधार म्हणून २० शतक केली आहेत. कर्णधार म्हणून सर्वाधिक शतकांचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या स्मिथच्या नावावर आहे. त्याने कसोटीत २५ शतक केली आहेत. याबाबत विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पॉन्टिंग १९ शतकासह तिसऱ्या क्रमांकावर आहे. वाचा-


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/386juwJ

ऑस्ट्रेलियाला बसणार मोठा दणका; CSAने केली आयसीसीकडे तक्रार

सिडनी: इंग्लंडने चौथ्या कसोटीत भारताचा पराभव जरी केला तरी ऑस्ट्रेलियाचा संघ ( ) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप( )च्या फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडू शकतो. टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचा दुसरा संघ कोणता यासाठी भारत आणि हे दोन संघ स्पर्धेत आहेत. भारताने इंग्लंडविरुद्धची अखेरची कसोटी ड्रॉ केली तरी ते फायनलमध्ये पोहोचतील. या उलट इंग्लंडने विजय मिळवल्यास ऑस्ट्रेलियाला फायनलमध्ये जाणार होती. ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढणार असून त्यांना याचा फटका बसू शकतो. वाचा- वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीसाठी दोन संघ स्पर्धेत आहेत. पण अचानक आता भारताचे स्थान पक्के होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचे कारण म्हणजे आयसीसीकडून होणारी संभाव्य कारवाई होय. क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने (CSA) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे अर्थात ICCकडे क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA) ची तक्रार केली आहे आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. आता आयसीसीने या तक्रारीची दखल घेतली आहे. वाचा- ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका करोना व्हायरसमुळे स्थगित केली. हा दौरा स्थगित केल्यामुळे दक्षिण आफ्रिकेने आयसीसीकडे तक्रार केली. या तक्रारीत झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई आणि WTCमधील ऑस्ट्रेलियाचे गुण कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात सिडनी मॉर्निंग हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार, जर आयसीसीने ऑस्ट्रेलियावर गुण कपातीची कारवाई केली तर ते WTCच्या अंतिम फेरीत काही केल्या खेळू शकणार नाहीत. कारण ऑस्ट्रेलियाचे गुण कमी झाल्यास इंग्लंडने भारताचा पराभव केला तरी गुणतक्त्यात ते खालीच राहतील. वाचा- आयसीसीने ऑस्ट्रेलियाला या आठवड्याच्या अखेरपर्यंत उत्तर देण्याची वेळ दिली आहे. या गोष्टीवर चर्चा करून मार्ग काढता येईल का अशी विचारणा ऑस्ट्रेलिया बोर्डाकडे करण्यात आली आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/384Y6bm

भारताविरुद्धची कसोटी मालिका बरोबरीत सोडवायची आहे; जो रुटने केला खुलासा

अहमदाबाद: भारत आणि इंग्लंड () यांच्यात चौथा कसोटी सामना ४ मार्च पासून सुरू होणार आहे. भारतीय संघ सध्या मालिकेत २-१ने आघाडीवर आहे. तिसऱ्या कसोटीतील पराभवासह इंग्लंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायलनच्या स्पर्धेतून बाहेर पडला, तर भारतीय संघासाठी चौथी कसोटी महत्त्वाची ठरणार आहे. या सामन्यात भारताने विजय अधवा ड्रॉ करण्यात यश मिळवले तरी ते WTCच्या फायनलमध्ये पोहोचेल. वाचा- भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटी आधी इंग्लंडचा कर्णधार म्हणाला, भारताविरुद्धची ड्रॉ करण्यात यशस्वी झालो तरी कर्णधार म्हणून माझे सर्वात मोठे यश असेल. भारतासाठी ही मॅच फार महत्त्वाची आहे. पण इंग्लंडच्या कर्णधाराच्या मनात ही कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटावी अशी इच्छा आहे. इंग्लंडने अंतिम कसोटीत विजय मिळवल्यास ऑस्ट्रेलियात टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचेल. वाचा- क्रिकइन्फोशी बोलताना रुट म्हणाला, गेल्या काही वर्षातील भारतीय भूमीवरील रेकॉर्ड पाहता ही गोष्टी अविश्वसनिय आहे. त्यामुळे ही मालिका ड्रॉ करण्यात जरी यश आले तरी एक मोठा विजय असेल. विशेषत: गेल्या दोन सामन्यात पराभव झाल्यानंतर ही गोष्टी महत्त्वाची ठरेल. गेली दोन आठवडे आमच्यासाठी फार आव्हानात्मक होती. मालिका २-२ अशा बरोबरीत सोडवण्याचा आमचा प्रयत्न असेल. वाचा- कसोटी मालिका बरोबरीत सुटल्यास कर्णधार म्हणून ते माझे यश असेल. गेल्या काही वर्षात आम्ही जी प्रगती केली आहे. ती खुप चांगली आहे. विशेषत: परदेशात आम्ही विजय मिळवले आहेत. जर आम्ही चौथा कसोटी सामना जिंकला तर सहा कसोटीतील हा चौथा विजय असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Ohr5BA

Tuesday, March 2, 2021

यंदा कर्तव्य आहे; दुखापतीमुळे नव्हे तर विवाहासाठी भारताचा गोलंदाजाने घेतला ब्रेक

नवी दिल्ली: भारताचा मुख्य जलद गोलंदाज ( )ने इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या अखेरच्या चौथ्या कसोटीतून माघार घेतली आहे. त्याच बरोबर तो टी-२० साठी उपलब्ध असणार नाही. टी-२० नंतर होणाऱ्या तीन वनडे मालिकेसाठी देखील बुमराह खेळणार नसल्याचे वृत्त समोर आले होते. विश्रांतीसाठी बुमराहने बीसीसीआयकडे परवानगी मागितली होती. वाचा- अचानक बुमराहने सुट्टी का घेतली याबद्दल सर्वांना प्रश्न पडला होता. या चर्चा सोशल मीडियावर अधिक होत होती. काहींच्या मते बुमराहने दुखापतीमुळे सुट्टी घेतली. तर काहींच्या मते त्याने लग्नासाठी सुट्टी घेतली अशा चर्चा सुरू होत्या. वाचा- यासंदर्भात एएनआय दिलेल्या वृत्तानुसार बुमराह लवकरच विवाह करणार आहे आणि त्यासाठी त्याने सुट्टी घेतली आहे. बुमराहने बीसीसीआयला लग्नासाठी सुट्टी हवी आहे असे सांगितले. लग्नाच्या तयारीसाठी त्याने अखेरची कसोटी आणि टी-२० मधून माघार घेतली आहे. वाचा- इंग्लंडविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या लढतीत त्याला विश्रांती देण्यात आली होती. तिसऱ्या कसोटीत बुमराहाने जास्त गोलंदाजी करण्याची गरज पडली नाही. मालिकेत भारत सध्या २-१ने आघाडी घेतली आहे. अखेरचा सामना ड्रॉ झाला तरी भारत आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचेल. वाचा-


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3uZoE7M

IPL 2021: मोहालीचा समावेश न केल्याने वाद; पंजाब किंग्जने बीसीसीआयला विचारला जाब

नवी दिल्ली: आयपीएलच्या १४व्या हंगामासाठी बीसीसीआयने सहा शहरांची निवड केली आहे. यामुळे स्पर्धेतील तीन संघांना घरच्या मैदानावर सामने खेळता येणार नाही. आता यावरून नवा वाद सुरू झाला आहे. वाचा- आयपीएलमधील सुरुवातीच्या सत्रातील सामने प्रेक्षकांशिवाय रिकाम्या स्टेडियममध्ये होणार असल्याने () संघाचे सह मालक नेस वाडिया यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे विचारणा केली आहे. करोना रुग्णांची संख्या कमी असताना देखील पंजाब किंग्ज संघाच्या घरच्या मैदानाची निवड संभाव्य शहरात का केली नाही? असा सवाल वाडिया यांनी केली आहे. () हे पंजाब संघाचे होम ग्राउंड आहे. वाचा- आयपीएलच्या आगामी हंगामाची सुरूवात एप्रिल-मे महिन्यात होणार आहे. याचा कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नाही. ज्या सहा शहरांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे राजस्थान, हैदराबाद आणि पंजाब या संघांना घरच्या मैदानावर खेळता येणार नाही. करोना रुग्णांची संख्या वाढत असताना देखील मुंबईचा समावेश बीसीसीआयने केला आहे. वाचा- पीटीआयशी बोलताना वाडिया म्हणाले, आम्ही सामन्यांसाठी निवडण्यात आलेल्या स्थळावरून बीसीसीआयला पत्र लिहले आहे. आम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की आमची निवड का केली गेली नाही. आम्हाला पंजाबमध्ये खेळण्याची आशा आहे. पंजाबमध्ये करोना रुग्णांची संख्या कमी आहे. राज्यात मंगळवारी ६३५ नवे रुग्ण सापडले तर सक्रीय रुग्णांची संख्या ४ हजार ८३५ इतकी आहे. काही संघांना घरच्या मैदानाचा फायदा होणार नाही हा काळजीचा विषय आहे. मला कल्पना नाही की त्यांनी कोणत्या आधारावर स्थळांची निवड केली, असे वाडिया म्हणाले. वाचा- गेल्या वर्ष करोनामुळे स्पर्धा भारताबाहेर युएईमध्ये झाली होती. पण आता रुग्ण संख्या कमी असल्याने ही स्पर्धा भारतात घेण्याचा विचार आहे. या स्पर्धेसाठी प्रेक्षकांना परवानगी देऊ नये असे मत वाडिया यांनी व्यक्त केले. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी धरला मोहालीसाठी आग्रह आयपीएलच्या संभाव्य स्थळामध्ये मोहालीचा समावेश न केल्याने पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी देखील यावर पुन्हा विचार करावा अशी विनंती बीसीसीआयला केली आहे. आम्ही खेळाडूंच्या सुरक्षेसाठी सर्व उपाय योजना करू असे त्यांनी म्हटले आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sz7ls6

यो-यो टेस्ट मध्ये फेल झाला भारतीय क्रिकेटपटू; संघातून बाहेर होण्याची शक्यता

मुंबई: भारताचा फिरकीपटू फिटनेस टेस्ट नापास झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्याच बरोबर टीममधील अधिकाऱ्यांनी देखील ही गोष्ट मान्य केली आहे की राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये वरुण फेल झाला. त्याला आणखी एक संधी दिली जाऊ शकते. वाचा- वाचा- जर वरुण फिटनेस टेस पास नाही झाला तर त्याला मालिकेत खेळता येणार नाही. वरुण ला द्यायची होती. त्याच बरोबर आवश्यक १७.१ च्या मार्कला पार करायचे होते. बीसीसीआयने ३५ खेळाडूंची बेंगळुरू येथील एनसीएमध्ये फिटनेस टेस्ट घेतली होती. इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या आणखी एक खेळाडू फिटनेस टेस्ट नापास झालाय. वाचा- वाचा- इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी फक्त १० दिवस शिल्लक आहेत. वरुण आणि संबंधित दुसऱ्या खेळाडूला पुन्हा एकदा यो-यो टेस्ट देण्यासाठी पाठवले जाऊ शकते. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर १२ मार्चपासून अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० मालिका होणार आहे. वाचा- वरुणने आयपीएलच्या १४ सामन्यात १८ विकेट घेतल्या आहेत. २० धावा देत ५ विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3b5GEFA

करोना प्रोटोकॉलची ऐशी तैशी; बायो बबलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूला करोना

कराची: पाकिस्तानमध्ये सध्या सुरू असलेल्या पाकिस्तान सुपर लीग () ही स्पर्धा बायो-बबल ( ) अर्थात जैव सुरक्षित वातावरणात सुरू आहे. पण या स्पर्धेतील एका खेळाडूला करोनाची लागण झाली. त्यामुळे स्पर्धेतील बायो-बबल प्रोटोकॉल नीट ठेवण्यात अपयशी ठरल्याची टीका पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर () केली जात आहे. वाचा- ऑस्ट्रेलियाचा खेळाडू फवाद अहमद याला कोरनाची लागण झाली आहे. त्याच रिपोर्ट सोमवारी आला. यामुळे स्पर्धेतील एक मॅच स्थगित करण्यात आली. स्थानिय मिडियाने दिलेल्या वृत्तानुसार यासाठी जबाबदार आहे. वाचा- पीसीबीने दिलेल्या माहितीनुसार स्पर्धेचा कालावधी नियोजित वेळेनुसार २२ मार्चपर्यंत पूर्ण होईल. पण पाक मीडियाने संघातील खेळाडू, अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय सुरक्षित असल्याचा बोर्डाचा दावा खोटा ठरला असे म्हटले आहे. क्वारंटाइन कालावधि पूर्ण करण्याच्या आधीच काही खेळाडूंच्या कुटुंबियांना जैव सुरक्षित वातावरणात जाण्याची परवानगी दिल्याचे एका वृत्तात म्हटले आहे. वाचा- पाकिस्तान सुपर लीग या स्पर्धे शिवाय इतर कार्यक्रम देखील होत आहेत. अनेक खेळाडू बाहेरून जेवण मागवत आहेत, असे वृत्त समोर येत आहे. खेळाडू संघा सोबत बायो बबलमध्ये आहेत. पण ते जेव्हा मैदानावर येतात तेव्हा मैदानावरील कर्मचारी जे बायो बबलचा भाग नाहीत त्यांच्या संपर्कात येतात. करोना प्रोटोकॉल तोडल्याने जलद गोलंदाज वहाब रियाज आणि वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी यांना सामना खेळण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे देखील पीसीबीवर टीका झाली होती. वाचा- या प्रकरणी एका अधिकाऱ्याने सांगितले की, बोर्ड सर्वोत्तम करत आहे. आम्ही सर्व संघांसाठ कडक तयार केले आहे आणि खेळाडूंची नियमीतपणे पीसीआर टेस्ट केली जाते. फवादची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. पण तो कसा काय करोना पॉझिटिव्ह झाला यांची आम्हाला कल्पना नाही. वाचा-


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/384unzj

टी-२० वर्ल्डकपच्या आधी निवडण्यात आला सर्वोत्तम संघ, या भारतीय खेळाडूकडे नेतृत्व

नवी दिल्ली: भारतात या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप होणार आहे. जगातील प्रत्येक संघ या स्पर्धेसाठी तयारी करत आहे. ही स्पर्धा अद्याप लांब असली तरी अशा मोठ्या स्पर्धांसाठीची तयारी आणि संघ तयार करण्याची प्रक्रिया थोडी लांब असते. खेळाडूंची पूर्णपणे टेस्ट करून संघ निवडला जातो. वाचा- टी-२० वर्ल्डकपच्या आधी विस्डेनने ऑल-टाइम टी-२० वर्ल्डकप संघाची निवड केली आहे. या संघात महेंद्र सिंह धोनी आणि या दोघा भारतीय खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. संघाचे नेतृत्व धोनीकडे देण्यात आलय. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ साली पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकला होता. आता धोनी निवृत्त झाला असला तरी भारतीय संघासाठी तो एक महत्त्वाचा विजय होता. वाचा- या संघात पाकिस्तानच्या तिघा खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. त्यात शाहिद आफ्रिदी, उमर गुल आणि सईद अजमल यांचा समावेश आहे. आफ्रिदीचा समावेश ऑलराउंडर म्हणून, उमर गुल वेगवान तर अजमलचा समावेश फिरकीपटू म्हणून करण्यात आलाय. वाचा- वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलचा समावेश या संघात सलामीवीर म्हणून करण्यात आलाय. त्याच बरोबर श्रीलंकेचा महेला जयवर्धनेची देखील सलामीवीर म्हणून निवड केली आहे. संघात तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे. चौथ्या स्थानावर केव्हिन पिटरसन, पाचव्या स्थानावर मार्लन सॅम्युअल्स तर माइक हसीला सहव्या स्थानावर ठेवण्यात आलय. वाचा- धोनी संघाचा कर्णधार आणि विकेटकिपर असेल, त्याला सातव्या स्थानावर फलंदाजीसाठी ठेवण्यात आले आहे. धोनीनंतर आफ्रिदी आठव्या क्रमांकावर असेल. गोलंदाजीमध्ये संघात श्रीलंकेचा लसिथ मलिंगा याचा देखील समावेश आहे. वाचा- असा आहे ऑल टाइम टी-२० वर्ल्डकप संघ ख्रिस गेल, महेला जयवर्धने, विराट कोहली, केव्हिन पिटरसन, मार्लन सॅम्युअल्स, माइक हसी, एमएस धोनी, शाहिद आफ्रिदी, लसिथ मलिंगा, उमर गुल, सईद अजमल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Pi0nJw

'IPL मध्ये क्रिकेट नव्हे फक्त पैशांकडे लक्ष दिले जाते'; पाहा व्हिडिओ

नवी दिल्ली: on IPLआयपीएलच्या १४व्या हंगामाला एप्रिल महिन्यात सुरूवात होणार आहे. जगातील सर्वात श्रीमंत आणि यशस्वी टी-२० लीग म्हणून आयपीएलकडे पाहिले जाते. अशात संदर्भात एका क्रिकेटपटूने धक्कादायक असे वक्तव्य केले आहे. विशेष म्हणजे हे वक्तव्य करणारा खेळाडू स्वत: आयपीएल स्पर्धा खेळला आहे. वाचा- दक्षिण आफ्रिकेचा जलद गोलंदाज (Dale Steyn) याने आयपीएल संदर्भात असे वक्तव्य केले आहे जे ऐकल्यानंतर भारतीय चाहत्यांना धक्काच बसेल. स्टेनने पाकिस्तानच्या युट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले की, आयपीएलमध्ये क्रिकेटवर जास्त लक्ष दिले जात नाही. तर पैशांवर फोकस असतो. या उटल पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत मात्र क्रिकेटवर जास्त लक्ष दिले दिले जाते. वाचा- जेव्हा तुम्ही आयपीएल खेळायला जाता तेव्हा तिथे इतके मोठे संघ, इतकी मोठी नावे असतात आणि खेळाडूंच्या कमाईवर इतका भर दिला जातो की ज्यामुळे विसरायला होते. पण पीएसएल किंवा लंका प्रीमिअर लीग खेळता तेव्हा तुमचे लक्ष फक्त क्रिकेटवरच असते. वाचा- मी पीएसएल खेळत आहे आणि बऱ्या कालावधीपासून खेळत आहे. लोक माझ्या रुममध्ये येतात आणि फक्त माझ्या क्रिकेट संदर्भात चर्चा करतात. पण आयपीएलमध्ये लोक फक्त तुम्हाला किती पैसे मिळाले हेच विचारतात. तेथे क्रिकेट विसरले जाते. मी यापासून दूर राहू इच्छितो आणि खेळावर फोकस करण्याची इच्छा आहे. वाचा- डेल स्टेनने आयपीएलच्या या हंगामातून माघार घेतली आहे. मला काही काळासाठी आयपीएलमधून दूर रहायचे असल्याचे त्यांने सांगितले. तो रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाकडून खेळत होता. वाचा- सध्या पाकिस्तान सुपर लीग खेळणाऱ्या डेल स्टेनला काही खास कामगिरी करता आली नाही. पहिल्या सामन्यात त्याने चार षटकात ४४ धावा दिल्या होत्या. आतापर्यंत तो फक्त दोन विकेट घेऊ शकला.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bWZFsK

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात नसणार हा मुख्य खेळाडू

नवी दिल्ली: भारतीय संघातील मुख्य जलद गोलंदाज () ने तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात एक देखील ओव्हर टाकली नव्हती. तर पहिल्या डावात ६ ओव्हर टाकल्या होत्या त्याला एक देखील विकेट मिळाली नव्हती. बीसीसीआयच्या वर्कलोड मॅनेजमेंटनुसार आगामी काही सामन्यासाठी त्याला विश्रांती दिली जाणार आहे. वाचा- बुमराहने वैयक्तीक कारणामुळे चौथ्या कसोटीसाठी त्याचा विचार केला जाऊ नये असे सांगितले होते. त्यानुसार बुमराहचा चौथ्या सामन्यासाठी विचार केला जाणार नाही. आता बुमराहला इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी देखील विश्रांती दिला जाणार असल्याचे कळते. पुण्यात २३ मार्चपासून ३ सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. कसोटी मालिकेच्या आधी होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी त्याला आधीच विश्रांती दिली आहे. वाचा- बुमराहच्या गैरहजेरीत भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी मोठी यादी आहे. विशेषत: या वर्षाअखेरीस होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपचा विचार करता अनेक जलद गोलंदाज संधी मिळण्याची वाट पाहत आहेत. टी-२० मालिकेत भुवनेश्वर कुमारच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरेल. संघात टी.नटराजन, शार्दुल ठाकूर, दिपक चाहर आणि नवदीप सैनी यांना संधी मिळू शकते. यापैकी काहींना वनडे संघात देखील संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाचा- अहमदाबाद येथे इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका १२ मार्चपासून सुरू होणार आहे. या मालिकेनंतर पुण्यात वनडे मालिका होणार आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3uMY69p

रवी शास्त्रींनी घेतली करोनाची पहिली लस; शेअर केला फोटो

अहमदाबाद: भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक () यांनी सोमवारी करोना व्हायरस लशीचा ( ) पहिला डोस घेतला आहे. त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करून ही माहिती दिली. वाचा- शास्त्री सध्या अहमदाबाद येथे भारतीय संघासोबत आहेत. तेथे रुग्णालयात जाऊन त्यांनी लस घेतली. शास्त्री यांनी करोना व्हायरसपासून बचावासाठी पहिली लस घेतली. वाचा- सोशल मीडियावर फोटो पोस्ट करताना त्यांनी म्हटले आहे की, कोव्हिड १९च्या लशीचा पहिला डोस घेतला आहे. या व्हायरसच्या विरुद्ध भारताला सशक्त तयार करण्यासाठी डॉक्टर आणि वैज्ञानिकांना धन्यवाद. अहमदाबादच्या अपोलो रुग्णालयातील कांताबेन आणि त्यांच्या पथकाचे शास्त्री यांनी आभार मानले. वाचा- वाचा- भारतीय संघ सध्या इंग्लंडसोबत कसोटी मालिका खेळत आहे. चार सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ने आघाडीवर आहे. मालिकेतील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना चार मार्चपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. याच मैदानावर तिसऱ्या कसोटी सामना झाला होता. ज्याचा निकाल दुसऱ्या दिवशी लागला होता. भारताने तिसरा सामना १० विकेटनी जिंकून मालिकेत आघाडी घेतली होती. वाचा-


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3kAtsLQ

भारतीय संघ घाबरला होता, म्हणून...; क्रिकेटपटूची गंभीर टीका

नवी दिल्ली: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा निकाल फक्त दोन दिवसात लागला. त्यानंतर अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवरील पिचवरून वाद विवाद सुरू झालाय. अनेक माजी क्रिकेटपटूंनी यावर मत व्यक्त केली आहेत. एका बाजूला टीका करणारे माजी खेळाडू आहेत तर दुसऱ्या बाजूला भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनिल गावस्कर आणि वेस्ट इंडिजचे माजी महान फलंदाज व्हिव्हियन रिचड्स यांनी या पिचचे समर्थन केले. या चर्चेत पाकिस्तानच्या एका क्रिकेटपटूने उडी घेतली आहे. वाचा- पाकिस्तानचा माजी जलद गोलंदाज शोएब अख्तरने युट्यूब चॅनलवर शेअर केलेल्या व्हिडिओत यावर मत व्यक्त केले. तो म्हणतो, भारतीय संघ घाबरला होता. त्याचा परिणाम म्हणून तिसऱ्या कसोटीसाठी इतकी खराब पिच तयार केली. कसोटी सामन्यासाठी अशा प्रकारची विकेट असली पाहिजे का, निश्चितपणे नाही. एक अशी खेळपट्टी जेथे विनाकारण चेंडू वळत होता आणि सामना दोन दिवसात संपला. ही गोष्ट कसोटी क्रिकेटसाठी चांगली नाही. वाचा- घरच्या मैदानाचा फायदा घेण्याची गोष्टी मी समजू शकतो. पण अशा पद्धतीने फायदा घेणे जरा अती होते. जर भारताने या सामन्यात ४०० धावा केल्या असत्या तर इंग्लंड २००वर बाद झाला असता. पाहुणा संघ खराब खेळला. पण भारतीय संघ देखी १४५ धावांवर बाद झाला. जर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करू शकत असेल तर त्यांना घाबरण्याची गरज नाही आणि तिसऱ्या कसोटी प्रमाणे पिच करण्याची देखील गरज लागणार नाही, असे अख्तर म्हणाला. वाचा- भारतीय संघ मजबूत आहे आणि चांगली खेळपट्टी तयार करून कोणाला झुकतीबाजू न देता खेळण्याची गरज आहे. टीम इंडिया इतकी जबरदस्त आहे की ते इंग्लंडचा पराभव करू शकतील. मला वाटते की भारताने या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे. वाचा- दोन्ही देशातील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना चार मार्चपासून अहमदाबाद येथेच होणार आहे. वाचा-


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bTDy6x

Monday, March 1, 2021

भारताचा वर्ल्ड रेकॉर्ड; घरच्या मैदानावर कोणालाच अशी कामगिरी करता आली नाही

नवी दिल्ली: भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरुवारपासून चौथी कसोटी सुरू होणार आहे. चार सामन्यांच्या कसोटीत भारत २-१ने पुढे आहे. भारताकडे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याची सुवर्ण संधी आहे. चौथी कसोटी ड्रॉ झाली तरी भारत फायनलमध्ये पोहोचू शकतो. या बरोबर भारत घरच्या मैदानावर सलग १३वी जिंकण्याचा विक्रम करेल. वाचा- भारतीय संघाने घरच्या मैदानावर २०१२ साली इंग्लंडकडून अखेरचा पराभव स्विकारला होता. त्यानंतर भारताने एकाही कसोटी मालिकेत पराभव स्विकारला नाही. २०१९ साली बांगलादेशचा २-०ने पराभव करत भारताने १२वा मालिका विजय मिळवला होता. भारताने इंदूर कसोटीत बांगलादेशचा १३० धावांनी आणि त्यानंतर कोलकाता कसोटीत एक डाव आणि ४६ धावांनी पराभव केला होता. घरच्या मैदानावर सलग कसोटी मालिका विजय मिळवणारा भारतीय संघ असून त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा क्रमांक लागतो. त्यांनी दोन वेळा सलग १०-१० कसोटी मालिका जिंकल्या आहेत. वाचा- भारत- फेब्रुवारी २०१३ ते आतापर्यंत सलग १२ मालिका विजय ऑस्टेलिया- नोव्हेंबर १९९४ ते नोव्हेंबर २००० सलग १० मालिका विजय ऑस्ट्रेलिया- जुलै २००४ ते नोव्हेंबर २००८ सलग १० मालिका विजय वेस्ट इंडिज- मार्च १९७६ ते फेब्रुवारी १९९६ सलग ८ मालिका विजय भारताने २०१२च्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर ३७ कसोटी सामने खेळले आहेत. यातील ३० कसोटी विजय तर २ मध्ये पराभव झालाय. ५ कसोटी सामने ड्रॉ झाले आहेत. ऑस्ट्रेलियाने विजय मिळवलेल्या सलग १० कसोटी मालितील २७ पैकी २० सामने जिंकले होते. तर दोनमध्ये पराभव झाला होता. वाचा- भारताचा विजयाचा प्रवास १) फेब्रुवारी २०१३- ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४-०ने विजय २) नोव्हेंबर २०१३- वेस्ट इंडिजविरुद्ध २-०ने विजय ३) नोव्हेंबर २०१५- दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३-०ने विजय ४) सप्टेंबर २०१६- न्यूझीलंडविरुद्ध ३-०ने विजय ५) नोव्हेंबर २००६- इंग्लंडविरुद्ध ४-०ने विजय ६) फेब्रुवारी २००७- बांगलादेशविरुद्ध १-०ने विजय ७) फेब्रुवारी २०१७- ऑस्ट्रेलिया विरुद्ध २-१ने विजय ८) नोव्हेंबर २०१७- श्रीलंकेविरुद्ध १-०ने विजय ९) जून २०१८- अफगाणिस्तानविरुद्ध १-०ने विजय १०) ऑक्टोबर २०१८- २-०ने विजय ११) ऑक्टोबर २०१९- दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३-०ने विजय १२) नोव्हेंबर २०१९- बांगलादेशविरुद्ध २-०ने विजय


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sGE8LP

विराटने इतिहास घडवला; अशी कामगिरी करणारा जगातील पहिला क्रिकेटपटू

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने एक नवा इतिहास घडवला आहे. सोशल मीडियावर अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. विराटच्या इंस्टाग्रामवर फॉलोअर्सची संख्या १०० मिलियन म्हणजेच १० कोटी इतकी झाली आहे. इंस्टाग्रामवर इतक्या मोठ्या प्रमाणात फॉलोअर्सची संख्या असलेला तो जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. वाचा- आधुनिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज असलेल्या विराटचा समावेश १०० मिलियन क्लबमध्ये झाला आहे. अशी कामगिरी करणारा तो क्रीडा जगतातील चौथा तर सेलिब्रेटीमधील २३वा व्यक्ती ठरला आहे. वाचा- याआधी १०० मिलियन क्लबमध्ये पोहोचलेले जे खेळाडू होते ते सर्व फुटबॉलशी संबंधित होते. पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डो (२६६ मिलियन), अर्जेंटिनाचा लियोनेल मेसी (२६६ मिलियन) ब्राझीलचा नेमार (१४७ मिलियन) यांचा क्रमांक लागतो. आता विराट देखील यांच्या यादीत पोहोचला आहे. विराटने मिळवलेल्या या यशाबद्दल आयसीसीने देखील त्याचे कौतुक केले आहे. वाचा- विराट कोहलीने बॉलिवुडची अभिनेत्री प्रियंका चोप्राला मागे टाकले आहे. प्रियंकाचे फॉलोअर्स ६० मिलियन इतके आहेत. तर अभिनेत्री श्रद्धा कपूरचे फोलोअर्स ५८ मिलियन इतके आहेत. वाचा- इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली व्यक्ती म्हणजे ख्रिस्टियानो रोनाल्डो होय. त्याच्या फॉलोअर्सची संख्या २६६ मिलियन इतकी आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2PeHDdV

IND vs ENG : इंग्लंडच्या संघात मोठे फेरबदल, तब्बल तीन नवीन प्रशिक्षकांची केली नियुक्ती

अहमदाबाद, : भारतामधील कसोटी मालिकेत इंग्लंडचा संघ आता १-२ अशा पिछाडीवर आहे. त्याचबरोबर फिरकी गोलंदाजीमध्ये इंग्लंडचा संघ लवकर बाद होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे इंग्लंडच्या संघाला आता मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. कारण इंग्लंडच्या संघाने आता तब्बल तीन प्रशिक्षकांची नियुक्ती केल्याचे पाहायला मिळत आहे. इंग्लंड क्रिकेट मंडळाने सोमवारी याबाबतची घोषणा केली. फिरकी खेळपट्टीवर इंग्लंडचे फलंदाज जास्त काळ टिकाव धरताना दिसत नाहीत. त्यामुळे आता इंग्लंड क्रिकेट मंडळाने फलंदाजी प्रशिक्षकपदी माजी क्रिकेटपटू मार्कस ट्रेस्कॉटीकची निवड केली आहे. त्याचबरोबर आता इंग्लंड क्रिकेट मंडळाने वेगवान गोलंदाजी आणि फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकांचीही यावेळी नेमणूक केली आहे. इंग्लंड क्रिकेट मंडळाने फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकपदी न्यूझीलंडला माजी गोलंदाज जतीन पटेलची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. पटेलने न्यूझीलंडकडून खेळताना चांगली कामगिरी केली होती. पण आता तो इंग्लंडच्या फिरकीपटूंकडून कशई कामगिरी करून घेतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. त्याचबरोबर वेगवान गोलंदाजी प्रशिक्षकपदी आता जॉन लुइस यांची निवड करण्यात आली आहे. मार्कसने इंग्लंडकडून खेळताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजारपेक्षा जास्त धावा बनवल्या आहेत. त्यामुळे मार्कस आता मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून इंग्लंडचा फलंदाजी प्रशिक्षक हे पद सांभाळणार आहे. मार्कस हा समरसेट या क्लबचा सहाय्यक प्रशिक्षक होता, या पदाचा आता त्याने राजीनाम दिला आहे आणि आता काही दिवसांमध्येच तो इंग्लंडच्या फलंदाजी प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळणार आहे. त्यामुळे आता इंग्लंडचा संघ या तिघांच्या मार्गदर्शनाखाली नेमकी कशी कामगिरी करतो, याची उत्सुकता नक्कीच क्रिकेट विश्वाला असेल. इंग्लंड क्रिकेट मंडळाचे परफॉर्मन्स डायरेक्टर मो बोबाट यांनी सांगितले की, " इंग्लंडच्या संघाबरोबर एवढे चांगले क्रिकेटपटू जोडल्याचे पाहून मला आनंद झाला आहे. मार्कस, जॉन आणि जीतन यांनी आतापर्यंत आपली कामगिरी चोख बजावली आहे. आता हे तिघे एकत्र येऊन इंग्लंडच्या संघाला अजून मजबूत करतील, असा मला विश्वास आहे."


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bMPbwk

IND vs ENG : भारताला मोठा धक्का, वनडे मालिकेत रोहित शर्मा आणि रिषभ पंत होऊ शकतात संघाबाहेर...

अहमदाबाद, : भारतीय संघाला आता वनडे मालिकेतही मोठा धक्क बसू शकतो, असे दिसत आहे. कारण भारताचे तीन महत्वाचे खेळाडू या वनडे मालिकेत खेळणार नसल्याचे आता समोर येत आहे. कारण या मालिकेत आता रोहित शर्मा आणि रिषभ पंतसारखे महत्वाचे खेळाडू संघाबाहेर होऊ शकतात, असे दिसत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिका पुण्यामध्ये खेळवण्यात येणार आहे. ही मालिका २३ मार्चपासून सुरु होणार आहे. सध्याच्या घडीला पुण्यामध्ये करोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नेटवर्क-१८ (हिंदी) या वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार या मालिकेत रोहित, रिषभ आणि वॉशिंग्टन सुंदर यांना खेळवण्यात येणार नसल्याचे म्हटले जात आहे. रोहित, रिषभ आणि सुंदर यांना का देण्यात येणार विश्रांती? रोहित, रिषभ आणि सुंदर हे आयपीएलपासून सातत्याने क्रिकेट खेळत आहेत. ते गेल्या बऱ्याच महिन्यांपासून बायो-बबलमध्ये आहेत. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यातही ते खेळले होते, त्याचबरोबर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही ते खेळत आहे. त्यानंतर पाच ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिकाही खेळवण्यात येणार आहे. या मालिकेत हे तिघेही खेळाडू असतील. एवढे दिवस बायो-बबलमध्ये राहिल्यानंतर मानसीक ताण जाणवतो, त्याचबरोबर खेळाडूंना थकवाही जाणवत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर एप्रिल महिन्यापासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. आयपीएल ही जवळपास दीड महिने खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे या तिन्ही खेळाडूंना वनडे मालिकेमध्ये विश्रांती देण्यात येऊ शकते, असे म्हटले जात आहे. जर हे तीन खेळाडू वनडे मालिकेत खेळणार नसतील, तर ट्वेन्टी-२० मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना संघात स्थान देण्यात येऊ शकते. आतापर्यंत बायो-बबलच्या कारणावरुन इंग्लंडने आपल्या संघातील तीन खेळाडूंना मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडच्या मोइन अलीने दमदार अष्टपैलू कामगिरी केल्यानंतर त्याला मायदेशी पाठवण्याचा निर्णय इंग्लंडच्या संघाने घेतला होता. भारताचा ट्वेन्टी-२० संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत, इशान किशन, युजवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवातिया, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3dYbLEP

क्रिकेटमधील अविश्वसनिय कॅच; हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहाल

नवी दिल्ली: क्रिकेट मध्ये गेल्या काही वर्षात एकापेक्षा एक अफलातून घेतलेले पाहायला मिळाले आहेत. फक्त आंतरराष्ट्रीय वनडे किंवा टी-२० मध्ये नाही तर आयपीएल आणि बिग बॅश सारख्या टी-२० लीग स्पर्धेत असे कॅच पाहायला मिळतात. अशाच एका कॅचचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा- क्रिकेटमधील अनेक शानदार खेळी किंवा कॅच हे आंतरराष्ट्रीय स्तरावर नाही तर स्थानिक क्रिकेटमध्ये देखील पाहायला मिळते. दक्षिण आफ्रिकेतील एका स्थानिक स्पर्धेतील अशाच एका अफलातून कॅचचा व्हिडिओ चर्चेत आला आहे. हा कॅच पाहिल्यानंतर तुम्हालाही प्रश्न पडेल की चौकार जाणारा चेंडू कसा काय पकडला. वाचा- स्लिपमध्ये उभ्या असलेल्या फिल्डरने शॉर्ट फाइन लेगला जाऊन कॅच घेतला. जेव्हा गोलंदाजाने चेंडू टाकला तेव्हा फलंदाजाने पॅडल स्विप मारण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी स्लिपमध्ये उभ्या असलेल्या फिल्डने शॉर्ट लेगला पळत जाऊन कॅच घेतला. वाचा- फलंदाजाने शॉर्ट मारल्यावर चेंडू हवेत जातो विकेटकिपरच्या बाजूने गेलेला हा चेंडू कोणालाही चौकारच वाटले. पण त्याच वेळी स्लिपमधील फिल्डर वेगाने हवेत उडी मारून कॅच पकडतो. त्याचा हा कॅच पाहिल्यानंतर फलंदाज आणि अंपायर दोघांनाही विश्वास बसत नाही. वाचा- दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघात अनेक दर्जेदार फिल्डर झाले आहेत. जॉन्टी रोड्स त्यापैकी एक नाव होय. त्याने १९९२च्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानच्या इंझमाम उल हकला ज्या पद्धतीने धावबाद केले होते. ते वर्ल्ड क्रिकेटमधील सर्वोत्तम रन आउट मानले जाते.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2MGHEXm

डिप्रेशनच्या काळात विराटने दिली होती साथ; ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूचा मोठा खुलासा

नवी दिल्ली: २०२१च्या लिलावासाठी झालेल्या खेळाडूंच्या लिलावात ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेलला पुन्हा एकादा मोठी बोली लावण्यात आली. गेल्या वर्षी आयपीएलमध्ये खराब कामगिरी केल्याने त्याला पंजाब किंग्ज संघाने रिलीझ केले होते. पण यावर्षी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने १४.२५ कोटी रुपयांना खरेदी केले. वाचा- लिलावानंतर मॅक्सवेलने आरसीबीला विजेतेपद मिळवून देण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करू असे म्हटले होते. मॅक्सवेलने डिप्रेशनमुळे क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता. त्या काळात भारताचा कर्णधार विराट कोहलीने त्याचे समर्थन केले होते. वाचा- विराटने डिप्रेशनच्या काळात माझी मदत केली होती. त्याने माझ्या निर्णयाचे समर्थन केले होते. ज्या गोष्टींचा माझ्यावर दबाव होता, त्या सर्व विराटला समजल्या होत्या. मला वाटते की तो देखील या सर्वातून गेला असेल. मॅक्सवेलने मानिसक आरोग्य ठिक नसल्याने काही महिने क्रिकेटपासून ब्रेक घेतला होता. त्या काळात मी हाच विचार करायचो की क्रिकेटमध्ये परत कसे येऊ. डिप्रेशनमधून बाहेर आल्यानंतर मॅक्सवेलने मैदानावर शानदार कामगिरी केली. २०१९-२० मध्ये त्याने मेलबर्न स्टार्सकडून कमबॅक केले. त्यानंतर तो राष्ट्रीय संघात आला आणि सातत्याने चांगली कामगिरी करून दाखवतोय. वाचा- आगामी आयपीएलमध्ये सोबत खेळण्यास उत्सुक आहे. फक्त मॅच नाही तर सरावाची त्याची पद्धत समजून घेण्यास उत्सुक आहे. त्याच्याकडून नेतृत्वगुण शिकून घेण्यास उत्सुक असल्याचे मॅक्सवेल म्हणाला. विराट कसोटी ते टी-२० पर्यंत सर्व प्रकारात चांगली कामगिरी करतोय. परिस्थितीनुसार तो त्याचा खेळ बदलतो. मोठ्या काळावधीपासून त्याने दबदबा कायम ठेवला आहे. विराटने काही दिवसांपूर्वी २०१४च्या इंग्लंड दौऱ्या डिप्रेशनमध्ये गेल्याचे सांगितले होते. तेव्हा भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने त्याची मदत केली होती.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sAbax6

IND vs ENG : जो रुटपुढे विराट कोहली ठरतोय सुपर फ्लॉप, जाणून घ्या सत्य...

अहमदाबाद, : विराट कोहली आणि जो रुट हे जगातील अव्वल फलंदाजांपैकी एक आहेत. पण सध्याच्या घडीला पाहिले तर रुटपुढे कोहली हा सुपर फ्लॉप ठरताना दिसत आहे. रुट हा या वर्षात भन्नाट फॉर्मात आहे. रुटने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावले होते. हा त्याचा शंभरावा कसोटी सामना होता. आपल्या या द्विशतकाच्या जोरावर रुटने इंग्लंडला विजय मिळवून दिला होता. त्याचबरोबर तिसऱ्या कसोटी सामन्यात रुटने फक्त आठ धावांमध्ये भारताच्या पाच फलंदाजांना बाद केले होते. पण अजूनपर्यंत कोहलीला रुटसारखी फलंदाजीही करता आलेली नाही. रुटने या वर्षात आतापर्यंत पाच कसोटी सामने खेळले आहेत. या पाच कसोटी सामन्यांमध्ये रुटने ७६च्या सरासरीने ७५९ धावा बनवल्या आहे. यावर्षी सर्वाधिक धावा बनणारा कर्णधार हा आतापर्यंत रुट ठरलेला आहे. कारण आतापर्यंत कोणत्याही कर्णधाराला ३००पेक्षा जास्त धावा करता आलेल्या नाहीत. रुटने या वर्षात तीन शतके झळकावली आहेत, यामध्ये दोन द्विशतकांचा समावेश आहे. इंग्लंडच्या संघाने या वर्षात एकूण २१३३ धावा केल्या आहेत. त्यामुळे रुटने संघाच्या धावसंख्येच्या जवळपास ३६ टक्के धावा एकट्यानेच केलेल्या आहेत. रुटच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने यावर्षी श्रीलंकेत २-१ असा विजय मिळवला होता. रुटने या वर्षात सर्वाधिक २२८ धावांची खेळी साकारली आहे. कोहलीला या वर्षात फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. कोहली या वर्षात तीन कसोटी सामने खेळला आहे. या तीन कसोटी सामन्यांतील पाच डावांमध्ये कोहलीची सरासरी ही ३६एवढी आहे. आतापर्यंत तीन कसोटी सामन्यांमध्ये कोहलीने १७२ धावा बनवल्या आहेत. ज्यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. कोहलीची यावेळी सर्वोत्तम धावसंख्या ७२ असून त्याला या वर्षात एकही शतक अजूनपर्यंत झळकावता आलेले नाही. भारतीय संघाने या वर्षात एकूण पाच कसोटी सामने खेळले आहेत. या पाच कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाने एकूण २४६४ धावा केल्या आहे. त्यानुसार कोहलीने आपल्या संघाच्या धावसंख्येमध्ये फक्त सात टक्के एवढ्याच धावा केल्या आहेत. कोहलीने या वर्षात ऑस्ट्रेलियातील दोन कसोटी सामने खेळले नव्हते. पण त्यानंतरही कोहलीला आतापर्यंतच्या तीन कसोटी सामन्यांमध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bQdM33

'चौथ्या कसोटीसाठी असेच पिच दिल्यास ICCने भारतावर ही कारवाई करावी'

अहमदाबाद: भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पिचवरून वाद अद्याप सुरूच आहे. डे-नाइट कसोटीची लढत दुसऱ्या दिवशीच संपली होती. भारताने १० विकेटनी विजय मिळून मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. या पिचवरून अनेकांनी आक्षेप घेतला आहे. आता इंग्लंडच्या एका माजी क्रिकेटपटूने यावर मत व्यक्त केले आहे. वाचा- इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मॉटी पनेसर याच्या मते, जर चौथ्या कसोटी सामन्यासाठी अशाच प्रकारचे पिच तयार केले तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारतावर कारवाई करावी. आयसीसीने भारताचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील काही अंक कमी करावेत असे त्याने म्हटले. वाचा- पिंक बॉलने झालेल्या तिसऱ्या कसोटीचा निकाल दोन दिवसात लागला होता. इंग्लंडचे फलंदाज दोन वेळा फिरकी गोलंदाजांसमोर बाद झाले. इंग्लंडचे अनेक दिग्गज खेळाडू अहमदाबादच्या पिचवर टीका करत आहेत. पनेसर प्रमाणे अनेकांनी पुढील सामन्यात देखील असेच पिच असेल तर भारतीय संघाचे WTCमधील गुण कमी करावेत असे मत व्यक्त केले आहे. वाचा- पुढील सामन्यात देखील असे झाले तर आयसीसीने भारताला दंड करावा. सर्वांना आनंद आहे की ते जगातील सर्वात मोठे मैदान आहे. पण क्युरेटरने एक चांगले विकेट तयार केले पाहिजे होते. पच फिरकीपटूंना साध देणारे हवे. चेन्नईबाबत सर्वजण टीका करत आहेत आणि अहमदाबादमध्ये तर त्यापेक्षा वाइट परिस्थिती होती. वाचा- पनेसर म्हणाला, फिरकीपटूंना साथ देणारे पिच असेल तर हरकत नाही. सामना किमान ३ ते ४ दिवस झाला पाहिजे. तुम्ही तशा प्रकारची विकेट तयार करत असाल तर सामना ३ दिवस तरी चालला पाहिजे. हे देखील वाचा


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2PiraFD

IND vs ENG : चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघात होऊ शकतात हे दोन बदल, बुमराची जागा कोणा घेणार पाहा...

अहमदाबाद, : चौथा कसोटी सामना हा दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे या सामन्यासाठी नेमकी संघ निवड कशी करायची, याचा विचार आता सुरु झाला आहे. पण चौथ्या सामन्यासाठी भारतीय संघात दोन महत्वाचे बदल होऊ शकतात, असे आता दिसत आहे. चौथ्या कसोटी सामन्यासाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर यांना स्थान देण्यात येणार नसल्याचे समजते आहे. तिसऱ्या सामन्याच बुमरा आणि सुंदर या दोघांनाही संधी देण्यात आली होती. पण या दोघांना या सामन्यात जास्त गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे आता चौथ्या कसोटी सामन्यात या दोघांना संघात कायम ठेवण्यात येणार नसल्याचे समजते आहे. बुमराच्या जागी उमेश यादव हा सर्वात चांगला पर्याय असू शकतो. कारण उमेशने काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयची फिटनेस चाचणी पास केली आहे. त्याचबरोबर तो वेगवान गोलंदाजीही करु शकतो, त्यामुळे बुमराच्या जागी उमेश यादवला संघात स्थान मिळू शकते. सुंदरला जर वगळण्यात आले तर त्याच्या जागी फिरकीपटू कुलदीप यादवला संधी मिळू शकते, असे म्हटले जात आहे. कारण जर सुंदरला संघातून वगळले तर त्याच्याजागी अजून एक फिरकीपटू संघात दाखल होऊ शकतो आणि तोच सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. त्यामुळे सुंदरच्या जागी आता कुलदीपचा विचार संघ व्यवस्थापन चौथ्या कसोटी सामन्यासाठी करत आहे. कुलदीपला दुसऱ्या कसोटी सामन्यात संधी देण्यात आली होती. पण या सामन्यात कुलदीपला जास्त विकेट्स मिळवता आल्या नव्हत्या. त्यानंतर तिसऱ्या कसोटी सामन्यात कुलदीपला वगळण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा कुलदीपला संघात स्थान मिळू शकते, असे म्हटले जात आहे. चौथ्या कसोटी सामन्यात नरेंद्र मोदी स्टेडियमचीदेखील परिक्षा होणार आहे. कारण यावेळी पुन्हा एकदा ज सामना लवकर संपला तर खेळपट्टी चांगल्या दर्जाची नसल्याच्या शिक्का आयसीसी मारु शकते. त्यानंतर बऱ्याच कालावधीसाठी या मैदानात सामने होणार नाहीत. यावर्षी भारतामध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक आणि आयपीएल खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे या खेळपट्टीवर किती दिवस चौथा सामना चालतो, यावर या मैदानाचे भवितव्य अवलंबून असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3uHGg7W

या सहा शहरात होणार IPL 2021चे आयोजन; पण तीन संघांना बसणार फटका

नवी दिल्ली: या वर्षी एप्रिल-मे महिन्या होणाऱ्या आयपीएलच्या १४व्या ( ) हंगामासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने सहा शहरांची निवड केली आहे. या शहरांच्या निवडीची फटका स्पर्धेतील तीन संघांना बसणार आहे. वाचा- बीसीसीआयने साठी मुंबई, चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद आणि दिल्ली या सहा शहरांची निवड केली आहे. मुंबईतील सामने प्रेक्षकांच्या उपस्थितीशिवाय होणार आहे. यामुळे राजस्थान रॉयल्स, सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज या शहरांना त्यांच्या घरच्या मैदानावर खेळता येणार नाही. वाचा- सामन्यांच्या आयोजनासाठी ज्या शहरांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी अहमदाबाद हे एकमेव असे शहर आहे ज्याचा कोणताही संघ नाही. अन्य पाच शहराचे संघ आहेत. जे त्यांच्या घरच्या मैदानावर खेळू शकतली. त्यामुळे यावर्षी स्पर्धा आठ ऐवजी सहा शहरातून होणार आहे. हैदराबाद संघाला देशांतर्गत क्रिकेटमुळे मैदान मिळाले नाही. तर दिल्लीचा समावेश अखेरच्या टप्प्यात करण्यात आला. वाचा- महाराष्ट्रात करोनाची रुग्ण वाढत चालले आहेत. तरी देखील वानखेडेवर सामने भरवण्याची परवानगी देण्यात आली आहे. पुण्यात भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिका प्रेक्षकांच्या उपस्थितीशिवाय होणार आहे. वाचा- आयपीएलच्या या हंगामाची सुरूवात एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्या होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ११ एप्रिलपासून सामन्यांना सुरूवात होऊ शकते. यातील काही राज्यात प्रेक्षकांना स्टेडियमवर जाता येणार नाही. तर काही राज्यात ५० टक्के प्रेक्षक उपस्थित राहू शकतील. वाचा- बीसीसीआयने सहा शहरांची निवड केल्याने राजस्थान, हैदराबाद आणि पंजाब संघांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला आमच्या घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा झाला असता असे एका संघातील अधिकाऱ्याने सांगितले. जर घरच्या मैदानावर नाही खेळलो तर प्ले ऑफमध्ये पोहोचणे अवघड होईल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3q5sXug

शार्दुल ठाकूरची सर्वाधिक षटकारांसह तुफानी खेळी, मुंबईला मिळवून दिला मोठा विजय

नवी दिल्ली : मुंबईचा वेगवान गोलंदाज ज्या म्हटले जायचे तो धडाकेबाज फलंदाजीही करू शकतो, हे आज पाहायला मिळाले. शार्दुल ठाकूरने आज झालेल्या सामन्यात सर्वाधिक षटकार खेचत एक धडाकेबाज खेळी साकारली. शार्दुलच्या या धडाकेबाज खेळीमुळे मुंबईच्या संघाला २०० धावांनी मोठा विजय मिळवता आला. मुंबईचा विजय हजारे ट्रॉफीमध्य आजचा सामना हा हिमाचल प्रदेशबरोबर होता. या सामन्यात शार्दुलने फक्त ५७ चेंडूंमध्ये प्रत्येकी सहा चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर ९२ धावांची धमाकेदार खेळी साकारली. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या सामन्यात शार्दुलने सर्वाधिक जास्त षटकार लगावले, त्याचबरोबर शार्दुलपेक्षा जास्त धावाही कोणत्या खेळाडूला करता आल्या नाहीत. शार्दुलच्या या दमदार खेळीच्या जोरावर मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ३२१ धावांचा डोंगर उभारला होता. या सामन्यात मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. मुंबईने आपले तीन फलंदाज फक्त आठ धावांमध्येच गमावले होते. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि आदित्य तरे यांनी मुंबईचा डाव सारवला. सूर्यकुमारने यावेळी ७५ चेंडूंत १५ चौकारांच्या जोरावर ९१ धावांची खेळी साकारली. आदित्य तरेने यावेळी सहा चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ८३ धावा केल्या. पण त्यानंतर शार्दुल खेळपट्टीवर आला आणि त्याने गोलंदजांचा यथेच्छ समाचार घेतला. मैदानामध्ये सर्व बाजूंना फटकेबाजी करत शार्दुलने धावांचा पाऊस पाडला. शार्दुलची ही खेळी मुंबईसाठी नक्कीच सामना जिंकवून देणारी ठरली. आता यापुढच्या सामन्यात सर्वांचे लक्ष नक्कीच शार्दुलच्या कामगिरीवर असेल. मुंबईच्या ३२२ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या हिमाचल प्रदेशच्या संघाला यावेळी चांगली फलंदाजी करता आली नाही. मुंबईने हिमाचलचा डाव यावेळी फक्त १२१ धावांमध्ये आटोपला आणि २०० धावांनी दमदार विजय साकारला. मुंबईकडून यावेळी प्रशांत सोलंकीने सर्वाधिक चार विकेट्स मिळवल्या. प्रशांतला यावेळी शम्स मुलानीने चांगली साथ दिली आणि त्याने तीन फलंदजांना बाद केले. मुंबईचा वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीने यावेळी दोन विकेट्स मिळवल्या.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2NNIYbn

IND vs ENG : अहमदाबादची वादग्रस्त खेळपट्टी कोणत्या भारताच्या खेळाडूच्या सांगण्यावरुन बनवली, पाहा...

अहमदाबाद, : नरेंद्र मोदी स्टेडियमवरील पहिलाच सामना फक्त दोन दिवसांत संपला. त्यानंतर या खेळपट्टीवरुन आता जोरदार वाद सुरु आहे. पण ही खेळपट्टी भारताच्या एका क्रिकेटपटूच्या सांगण्यावरुनचच बनवण्यात आली असल्याची गोष्ट आता समोर आली आहे. या स्टेडियमवर आता चौथा कसोटी सामना ४ मार्चपासून सुरु होणार आहे. यावेळी वेगवेगळ्या खेळपट्ट्या या मैदानात बनवण्यात आल्या आहेत. विशेष गोष्ट म्हणजे या मैदानात दोन वेगवेगळ्या मातींचा वापर करुन खेळपट्या बनवण्यात आल्या आहेत. या मैदाात एकूण ११ खेळपट्या आहेत. या ११ पैकी सहा खेळपट्या या लाल मातीपासून बनवण्यात आल्या आहेत, तर पाच खेळपट्या बनवण्यासाठी काळी माती वापरण्यात आली आहे. तिसऱ्या सामन्यासाठी जी खेळपट्टी बनवण्यात आली होती. ती लाल मातीने बनवलेली होती. ज्यामुळे फिरकीपटूंना या खेळपट्टीवर चांगलीच मदत मिळाल्याचे पाहायला मिळाले. भारताचा माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेलच्या सांगण्यावरुन या मैदानात ११ खेळपट्या बनवण्यात आल्या आहेत. पार्थिव जेव्हा २०१७ साली दिलीप ट्रॉफी स्पर्धा खेळण्यासाठी लखनऊला गेला होता तिथे त्याला अश्या वेगवेगळ्या मातीच्या खेळपट्या पाहायला मिळाल्या होत्या. या स्पर्धेनंतर जेव्हा पार्थिव अहमदाबादला पोहोचला तेव्हा मोटेरा स्टेडियमचे काम चालू होते. त्यावेळी पार्थिवने ही गोष्ट गुजरात क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितली होती. त्यानंतर गुजरातच्या पदाधिकाऱ्यांनी ही गोष्ट बीसीसीआयच्या पीच आणि ग्राऊंड्स समितीचे प्रमुख गलजीत सिंग यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना हा विचार सांगितला. त्यानंतर अहमदाबाद येथे अशा खेळपट्या बनवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर आता इंदुर आणि बडोदा येथेही असेच प्रयोग करण्यात आले आहेत. याबाबत दलजित सिंग यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत देताना सांगितले की, " पार्थिव पटेलने जी गोष्ट आम्हाला सांगितली त्यामुळे आम्ही प्रभावित झालो. त्यानंतर आम्ही मोटेरामध्ये वेगवेगळ्या मातींच्या बनवलेल्या खेळपट्या बनवायला सुरुवात केली. या गोष्टीचा फायदा खेळाडूंनाही होतो. कारण भारतामध्ये लाल आणि काळी माती खेळपट्या बनवण्यासाठी वापरण्यात येते. पण एकाच ठिकाणी जर या दोन मातींच्या खेळपट्या असल्या तर खेळाडूंनाही त्याची मदत होते."


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3kxXqjG

चौथ्या कसोटीसाठी अशीच खेळपट्टी हवी, इंग्लंडने रडणे बंद करावे; दिग्गज खेळाडूचे खडेबोल

नवी दिल्ली: () यांच्यात झालेल्या तिसऱ्या कसोटीतील पिचवरून अद्याप चर्चा सुरू आहे. सामना दुसऱ्याच दिवशी संपल्याने अनेक जण टीका करत आहेत. पण वेस्ट इंडिजचे महान फलंदाज () यांनी मात्र पिचचे समर्थन केले आहे. त्याच बरोबर इंग्लंडच्या खेळाडूंना रडणे बंद करून फलंदाजी कशी सुधारता येईल याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. वाचा- एका बाजूला पिचवरून अनेक जण टीका करत असताना भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी पिचला दोष देण्यास नकार दिला होता. आता असेच मत व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी व्यक्त केले आहे. रिचर्ड्स यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ते म्हणतात, भारतात झालेल्या कसोटी सामन्या संदर्भात मला अनेकांनी प्रश्न विचारले. हे प्रश्न दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीबाबत होते. या प्रश्नांवरून मी थोडा गोंधळात आहे. कारण सर्व जण विकेटबद्दल खुप चर्चा करत आहेत. जे पिचबद्दल रडत आहेत ते याचा विचार करत नाहीत की अशा परिस्थितीला कसे तोड द्यायचे. ज्या पिचवर चेंडू स्विंग होतो, गुड लेंथवरून चेंडूला उसळी मिळते, अशी खेळपट्टी फलंदाजीसाठी अडचणीची असते असे अनेकांना वाटते. पण तुम्ही दुसरी बाजू पाहिला पाहजे. वाचा- याला कसोटी क्रिकेट असे नाव दिले गेले आहे. कारण यात सर्वत बाबतीत तुमची कसोटी लागते. फिरकीला साथ देणारी खेळपट्टी ही दुसरी बाजू आहे. तुम्ही जेव्हा भारतात खेळता तेव्हा अशा परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी हवी. तुम्ही भारतात जाता तेव्हा फिरकीपटूंच्या भूमीवर जाताय हे लक्षात ठेवले पाहिजे. तुम्हाला हे माहिती हवे की स्वत:ची तयारी करण्यासाठी तुम्ही काय करणार आहात. वाचा- खेळपट्टीचा जास्त विचार करण्यापेक्षा याचा विचार करा की मॅच इतक्य लवकर कशी काय संपली. इंग्लंडला गोष्टीचे आकलन करण्याची संधी आहे. पहिल्या कसोटी सामन्यापासून इंग्लंडचा संघ एका सुरक्षित वातावरणात होते आता त्यांनी त्यामधून बाहेर पडले पाहिजे. मला विश्वास आहे की चौथ्या कसोटीसाठी अशाच विकेटवर खेळावे लागणार आहे आणि तसेच होईल. वाचा- मी जर भारतात असतो आणि विकेट तयार करण्याची जबाबदारी माझ्यावर असती तर मी तिसऱ्या कसोटी प्रमाणेच विकेट तयार केली असती, असे रिचर्ड्स म्हणाले.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3uGQ6XF

पाकिस्तान गोलंदाजांची धुलाई; फलंदाजाने केला होता हा वर्ल्ड रेकॉर्ड

नवी दिल्ली: पाकिस्तानचा संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर होता आणि पाकिस्तानच्या गोलंदाजांना कल्पना नव्हती की त्यांच्या सोबत काय होणार आहे. एक मार्च १९५८ रोजी २१ वर्षाच्या एका खेळाडूने वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. यांनी वयाच्या २१व्या वर्षी सबीना पार्क येथे कसोटी करिअरमधील पहिले शतक झळकावले होते. या पहिल्या शतकात त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. त्यांनी पाकिस्तानविरुद्ध नाबाद ३६४ धावा केल्या होत्या. सोबर्स यांनी १९३८ साली इंग्लंडच्या लेन हेटन यांनी केलेल्या ३६४ धावांचा विक्रम मोडला होता. वाचा- सोबर्स यांच्या नावावर हा विक्रम ३६ वर्ष कायम होता. १९९४ साली वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराने ३७५ धावा करत सोबर्स यांचा हा विक्रम मोडला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनने ३८० धावा करत लाराचा विक्रम मागे टाकला. लाराने ४०० धावा करत हा विक्रम पुन्हा स्वत:च्या नावावर केला. सोबर्स यांनी पाकिस्तानविरुद्ध १० तास १४ मिनिटे फलंदाजी केली होती. दुसऱ्या विकेटसाठी त्यांनी कॉर्नड हंटसह ४४६ धावा केल्या. हंट यांनी २६० धावांची खेळी केली होती. पाकिस्तानचे दोनच असे गोलंदाज होते ज्यांना दुखापत झाली नव्हती. फजल महमूद आणि खान मोहम्मद. महमूदने ८५.२ तर खानने ५४ षटक टाकली होती. वाचा- या साम्यात पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. इम्तियाज अहमदच्या १२२ धावांच्या जोरावर त्यांनी ३२८ धावा केल्या. उत्तरादाखल वेस्ट इंडिजने ३ बाद ७९० धावा केल्या. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हा चौथी मोठी धावसंख्या आहे. दुसर्या डावात पाकिस्तान २८८ वर बाद झाली. ही कसोटी वेस्ट इंडिजने १७४ धावांनी जिंकली. सोबर्स यांचा जन्म १९३६ रोजी बारबाडोस येथे झाला. सोबर्स यांच्या दोन्ही हातांना प्रत्येकी एक एक बोट अधिक होते. त्यांना एकूण १२ बोट होती. आपल्या आत्मचरित्रात त्यांनी या गोष्टीचा उल्लेख केला. १०व्या वर्षी एका हाताचे बोट तुटले. त्यानंतर १५व्या वर्षी त्यांनी ऑपरेशन करून ११वे बोट काढून टाकले. वाचा- फक्त फलंदाजी नव्हे तर गोलंदाजीने देखील त्यांनी कमाल केली होती. ९३ कसोटीत सोबर्स यांनी ५७.७८च्या सरासरीने ८ हजार ३२ धावा केल्या. यात २६ शतक आणि ३० अर्धशतक आहेत. गोलंदाजीत त्यांनी २३५ विकेट घेतल्या. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात करण्याचा विक्रम आज देखील सोबर्स यांच्या नावावर आहे. त्यांनी २१ वर्ष २१३व्या दिवशी त्रिशतक केले. तर डॉन ब्रॅडमन यांनी ३१ वर्ष ३१८व्या दिवशी त्रिशतक केले होते. प्रथम श्रेणीत एका ओव्हरमध्ये सहा षटकार मारण्याचा पराक्रम प्रथम सोबर्स यांनीच केला होता. सोबर्स यांचे भारतीय अभिनेत्री अंजू महेंद्रू यांच्यावर प्रेम होते. दोघांचा साखरपूडा देखील झाला होता. पण अंजू यांच्या घरच्यांनी विरोध केल्याने या दोघांचे लग्न झाले नाही.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3kFTIEQ

BCCIला फाट्यावर मारून बिहार क्रिकेट बोर्डाने केला हा राडा

नवी दिल्ली: बिहार क्रिकेट संघा (BCA)ने आता आणखी एका नव्या वादाला जन्म दिला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात ()ची परवानगी न घेता मान्यता नसलेल्या बिहार क्रिकेट लीग टी-२० स्पर्धेसाठीचा आयोजित केला. गेल्या काही काळापासून वादग्रस्त गोष्टींमुळे चर्चेत असलेल्या बीसीएने एका नव्या वादला सुरूवात केली आहे. वाचा- बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने याआधीच स्पष्ट केले आहे की, कोणत्याही राज्यात टी-२० लीगसाठी आदी बीसीसीआयची मान्यता घेतली पाहिजे. पण बिहार बोर्डाने मंजूरीच्या आधीच शनिवारी खेळाडूंचा लिलाव आयोजित केला. बिहार क्रिकेट संघाने ही स्पर्धा २१ ते २७ मार्च दरम्यान पटना येथे आयोजित केली आहे. या स्पर्धेत पाच संघ असतील. त्यात अंगिका एव्हेंजर्स, भागलपूर बुल्स, दरभंगा डायमंड्स, गया ग्लॅडिएटर्स आणि पटना पायलट्स हे संघ भाग घेणार आहेत. या सामन्याचे प्रसारण एका खासगी चॅनलवरून केले जाणार आहे. लिलावात खेळाडूंसाठी ५० हजार इतकी बोली ठेवण्यात आली होती. वाचा- राज्यातील स्पर्धांना मंजूरी देणाऱ्या बीसीसीआयच्या समितीच्या एका सदस्याने गोपनियतेच्या अटीवर माहिती दिली, जेवढी मला माहिती आहे त्यानुसार बिहार क्रिकेट संघाला २८ फेब्रुवारीच्या संध्याकाळपर्यंत कोणत्याही टी-२० लीगच्या आयोजनाची परवानगी दिली नाही. बीसीएचे अध्यक्ष राकेश तिवारी यांना यासंदर्भात विचारले असता त्यांनी मंजूरीसाठी अर्ज केल्याचे सांगितले. आम्ही बीसीसीआयकडे परवानगी मागितली होती. पण आतापर्यंत आम्हाला कोणतेही उत्तर मिळाले नाही. आम्ही वाट पाहू शकत नव्हतो. कारण कर्नाटक आणि तामिळनाडू प्रीमिअर लीग संदर्भात झालेल्या वादानंतर बीसीसीआयने एक महिन्यापेक्षा अधिक काळ झाल्यानंतर देखील परवानगी दिली नव्हती.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bKSNio

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...