Ads

Friday, March 12, 2021

IPLचा आम्हाला फायदा झाला; या देशाच्या अधिकाऱ्याचे वक्तव्य

लंडन: जगातील सर्वात श्रीमंत आणि लोकप्रिय टी-२० लीग म्हणून इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेकडे पाहिजे जाते. स्पर्धेबाबत अनेकदा टीका केली जाते. या स्पर्धेत फक्त पैसा पाहिला जातो वैगरे टीका होत असते. आयपीएलचा १४वा हंगाम देखील जवळ आला आहे. अशात या स्पर्धेबद्दल महत्त्वाचे विधान एका देशाच्या क्रिकेट बोर्डाच्या व्यवस्थापकीय संचालकाने केले आहे. वाचा- इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट () बोर्डाचे व्यवस्थापकीय संचालक एशले जाइल्स यांच्या मते, आयपीएल स्पर्धा आमच्यासाठी फायद्याची ठरली. या स्पर्धेमुळे इंग्लंडचे क्रिकेटपटू राष्ट्रीय संघाला मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये अव्वल स्थानी पोहचवू शकले. याच आठवड्यात इंग्लंडा स्टार खेळाडू जोस बटलर म्हणाला होता की, ECBने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी कधीच आयपीएलमधून माघार घेण्यास सांगितले नाही. वाचा- खेळाडूंच्या चर्चेत मी त्यांना स्वत:च्या कार्यक्रमावर लक्ष देण्यास सांगितले. त्यांना कोणते आदेश दिले नाहीत, असे जाइल्स म्हणाले. आम्ही कोणत्याही पद्धतीचा दबाव टाकत नाही. आयपीएलकडे दुर्लक्ष केले जात नाही. माझ्या मते या स्पर्धेचा आम्हाला खुप फायदा झाला. आमच्या संघातील १२ ते १६ खेळडू आयपीएलमध्ये खेळणार आहेत. वाचा- काही वर्षांपूर्वी आमच्या खेळाडूंसाठी आयपीएलचा अनुभव घेणे अवघड होते. आता आमच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये मोठी मागणी आहे. कदाचीत यामुळेच क्रिकेटच्या दोन्ही प्रकारात नंबर एकला आहोत. वाचा- ... इंग्लंडचे १२ खेळाडू आयपीएलमध्ये खेळणार आहेत. त्यापैकी काहींचा करार कोटींमध्ये आहे. यात बटलर, स्टोक्स, आर्चर, मोइन अली, सॅम करन, टॉम कुरेन, डेव्हिड मलान यांचा समावेश आहे. वाचा- आयपीएलचा १४वा हंगाम ९ एप्रिल ते ३० मे या काळात होणार आहे. जर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिका दोन जूनपासून सुरू होईल. आम्ही खेळाडूंना आयपीएलमध्ये पाठवण्यास तयार आहोत. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेचा कार्यक्रम नंतर तयार केला होता. तो मुख्य कार्यक्रमाचा भाग नव्हता. वाचा- इंग्लंडचे खेळाडू आयपीएच्या सुरुवातीपासून उपलब्ध असतील. जर खेळाडूंचे संघ स्पर्धेच्या अखेरपर्यंत पोहोचले तर ते देखील संबंधीत संघासोबत असतील.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2NawdY2

मुंबईचा सूर्यकुमार आज टीम इंडियाकडून पदार्पण करणार; सोशल मीडियावर शेअर केला हा फोटो

अहमदाबाद: मुंबईचा क्रिकेटपटू ( )चा मोठ्या प्रतिक्षेनंतर भारतीय संघात निवडण्यात आले. आजपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या लढतीत सूर्यकुमारची अंतिम ११ जणांमध्ये निवड होण्याची शक्यता आहे. वाचा- देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमारला ३०व्या वर्षी भारतीय संघात संधी मिळाली. आज इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात त्याची निवड झाल्यास सूर्यकुमारचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. वाचा- ... भारतीय संघा कसा असेल याबाबत कर्णधार विराट कोहलीने अद्याप काही सांगितले नाही. पण मुंबईच्या क्रिकेटपटूने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत सूर्यकुमार भारतीय संघाच्या जर्सीमध्ये दिसतोय. सूर्यने त्याच्या ट्विटरचा प्रोफाइल फोटो बदलला आहे. सूर्यकुमारच्या या फोटोवरून तो आज अंतिम ११ मध्ये असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. वाचा- सूर्यकुमारने इस्टाग्राम स्टोरीवर बॉलिवूड अभिनेता आणि फिटनेस आयकॉन साहिल खानची पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये साहिलने सूर्यकुमार आज आंतरराष्ट्रीयस्तरावर पदार्पण करणार असल्याचे म्हटले आहे. वाचा- आयपीएलमध्ये मुंबई संघाकडून खेळणाऱ्या सूर्यकुमारने ७७ प्रथम श्रेणी सामन्यात १४ शतक आणि २६ अर्धशतक केली आहेत. त्याच्या नावावर ५ हजार ३२६ धावा आहेत. तर ७० टी-२० सामन्यात १९ अर्धशतकांसह ३ हजार ५६७ धावा त्याने केल्या आहेत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3t7rWUs

IND vs ENG : आर. अश्विनचे नाव काढल्यावर विराट कोहली भडकला, म्हणाला...

अहमदाबाद, : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत आर. अश्विनने नेत्रदीपक कामगिरी केली होती. त्यावेळी भारताचा कर्णधार विराट कोहलीने अश्विनचे कौतुकही केले होते. पण कसोटी मालिका संपल्यावर एका पत्रकार परीषदेत जेव्हा अश्विनबाबत एक प्रश्न विचारण्यात आला तेव्हा कोहली चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. अश्विनचे भारताच्या ट्वेन्टी-२० संघात पुनरागमन होणार का, असा प्रश्न विराटला विचारण्यात आला आहे. या प्रश्नावर विराट चांगलाच चिडलेला पाहायला मिळाला. त्यावेळी कोहली म्हणाला की, " टी-२० क्रिकेटमध्ये वॉशिंग्टन चांगली कामगिरी करीत आहे. एकाच जागेसाठी एकाच प्रकारच्या दोन खेळाडूंना तुम्ही संधी देऊ शकत नाही. एखाद्या मोसमात वॉशिंग्टची कामगिरी कमालीची खालावत नाही तोपर्यंत तरी अश्विनला संधी मिळत नाही. असे प्रश्न विचारताना काही तरी तक्र असावा. तुम्हीच मला सांगा की अश्विनला संघात कुठे स्थान द्यावे? प्रश्न विचारणे सोपे आहे. पण आपण काय विचारत आहोत, याचाही पुरेसा विचार करायला हवा. " गेल्या आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करूनही अश्विनचे टी-२० पुनरागमन सध्या तरी शक्य नसल्याचे कोहलीने स्पष्ट केले. त्याचबरोबर वॉशिंग्टनने २६ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत २९.१४च्या सरासरीनेच धावा दिल्या असून, त्याने २१ विकेटही मिळविल्या आहेत. त्यामुळे सध्याच्या घडीला तरी ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी सुंदरलाच पहिले प्राधान्य दिले जाईल, असे कोहलीने आपल्या उत्तरामधून स्पष्ट केल्याचे पाहायला मिळाले आहे. तंदुरुस्तीबाबत तडजोड नाही - विराट कोहलीफिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती तंदुरुस्ती चाचणीत पुन्हा अपयशी ठरला. त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी निवड करण्यात आली होती. मात्र, त्याने खांद्याची दुखापत लपविली होती. तो यो-यो चाचणीतही यशस्वी ठरू शकला नाही. कोहली म्हणाला, " भारतीय क्रिकेट संघाने ही सिस्टिम तयार केली आहे आणि प्रत्येकाने ती समजून घेणे गरजेचे आहे. भारतीय संघाकडून खेळताना कुठल्या गोष्टींची गरज आहे, याची आम्ही खेळाडूंकडून अपेक्षा करूच शकतो. देशाकडून खेळताना तुमची तंदुरुस्ती सर्वोत्तम असलीच पाहिजे. तंदुरुस्तीबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही." यावेळी कोहलीने भारताच्या सलामीच्या जोडीबाबतही आपले मत व्यक्त केले आहे. कोहली यावेळी म्हणाला की, " रोहित खेळणार असेल, तर सलामी जोडीचा प्रश्नच येत नाही. लोकेश राहुल आणि रोहित शर्मा हीच जोडी डावाची सुरुवात करील. राहुल-रोहित या आघाडीच्या जोडीने कामगिरीत सातत्य राखले आहे."


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3vhj8NU

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अपयशी ठरलेल्या पृथ्वी शॉ कसा झाला पुन्हा आक्रमक; झाला मोठा खुलासा

मुंबई: भारतीय संघातील युवा फलंदाज ( ) सध्या सुरू असलेल्या ()त धमाकेदार फलंदाजी करत आहे. मुंबईचे नेतृत्व करत असलेल्या पृथ्वीने या स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम स्वत:च्या नावावर केलाय. त्याने आतापर्यंत चार शतक केली असून त्यात एका द्विशतकाचा समावेश आहे. विजय हजारे स्पर्धेच्या आधी पृथ्वी शॉ भारतीय संघात होता. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या कसोटीत पृथ्वी शॉ दोन्ही डावात शून्यावर एकाच पद्धतीने बाद झाला. त्यानंतर पृथ्वीला संघातून वगळण्यात आले. मायदेशात परतल्यावर पृथ्वी मुंबईकडून विजय हजारे स्पर्धेत उतरला. वाचा- पृथ्वीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाकेदार फलंदाजी सुरू केल्याने अनेकांना प्रश्न पडला की या खेळाडूच्या कामगिरीत अचानक बदल कसा काय झाला. याचा खुलासा खुद्द पृथ्वीनेच केला आहे. वाचा- ऑस्ट्रेलियात दौऱ्यात अपयशी ठरलेल्या पृथ्वीने मायदेशात आल्यावर थेट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची भेट घेतली. ऑस्ट्रेलियात आतल्या बाजूला येणाऱ्या येणाऱ्या चेंडूचा पृथ्वीला अडचण येत होती. सचिनने पृथ्वीला सल्ला दिला, जास्त काही करण्याची गरज नाही. फक्त जितके शक्य असेल तितके शरीराच्या जवळ खेळ. वाचा- मी चेंडूवर वेळाने पोहोचत होतो. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मी यावर काम केले होते. पण त्याच्या आधी दुबईत आयपीएल खेळले होतो त्यामुळे असे झाले असेल. ऑस्ट्रेलियात झालेल्या पहिल्या एडिलेड येथील कसोटीत मिशेल स्टार्कने आणि पॅट कमिन्स यांनी इनस्विंग चेंडू टाकला होता. दोन्ही वेळा पृथ्वी एकाच पद्धतीने बाद झाला. चेंडू त्याच्या बॅट आणि पॅडच्या मधून गेला. दोन्ही वेळा सारख्याच पद्धतीने बाद झाल्यावर पृथ्वीने देखील मान्य केले की तो कमी पडतोय. वाचा- माझी मनस्थिती ठीक नव्हती. ज्या पद्धतीने मी आतापर्यंत धावा केल्या होत्या. त्यात काही चूक होती. मी बॅट शरीराच्या जवळ ठेवली. भारतीय संघाचे मुख्य कोच रवी शास्त्री आणि फलंदाजीचे कोच विक्रम राठोड यांनी देखील मी कुठे चूक करतोय याची जाणीव करून दिली, असे पृथ्वीने सांगितले.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/30yI2KG

माही मार रहा है; धोनीचा ताजा व्हिडिओ झाला व्हायरल

चेन्नई: आयपीएलच्या १४व्या हंगामासाठी सर्व संघांनी सराव सत्र सुरू केले आहे. स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी संघ ज्यांनी खेळलेल्या एका हंगामाचा अपवाद वगळता सर्व हंगामात किमान प्लेऑफमध्ये प्रवेश केला. इतक नव्हे तर आयपीएलमध्ये सर्वाधिक फायनल खेळणारा संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज () होय. वाचा- चेन्नई संघाने घरच्या मैदानावर सराव सत्र सुरू केले आहे. या सराव सत्रात संघाचा कर्णधार () जोरदार फलंदाजी करताना दिसत आहे. त्याच्या फलंदाजीचा व्हिडिओ चेन्नई संघाने सोशल मीडियावर शेअर केलाय. वाचा- आयपीएलच्या १३व्या हंगामात चेन्नईचा संघ अपयशी ठरला होता. गुणतक्त्यात चेन्नई संघ सातव्या क्रमांकावर होता. गेल्या वर्षाचे अपयश विसरून संघ पुन्हा तयारीला लागला आहे. धोनीसह अंबाती रायडू आणि अन्य खेळाडू या सराव सत्रात सहभागी झाले आहेत. वाचा- सराव सत्रात धोनी गोलंदाजांची धुलाई करताना दिसत आहे. आगामी आयपीएलमध्ये देखील त्याने अशीच फलंदाजी करावी असे चाहत्यांना वाटते. चेन्नईची पहिली लढत मुंबईच्या वानखेडे मैदानावर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणार आहे. ही लढत १० एप्रिल रोजी होईल. वाचा- चेन्नई संघात सुरेश रैनाचा देखील समावेश झाला आहे. त्याच बरोबर लिलावात त्यांनी मोइन अलीला विकत घेतले होते. या शिवाय श्रीलंकेचे दोन युवा गोलंदाज महीश थिकशाना आणि मथीशा पथिराना यांना देखील सीएसकेने सरावात सहभागी करून घेतले आहे. यातील पथिरानाच्या गोलंदाजीची स्टाइल मलिंगासारखी आहे. चेन्नईच्या लढती


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3t746Is

हसून हसून पोट दुखेल; एका चेंडूवर तीन वेळा बाद झाले असते हे फलंदाज, पाहा गंमतीदार व्हिडिओ

लखनऊ : मैदानावर होणाऱ्या विक्रमांचे किंवा शानदार कामगिरीचे व्हिडिओ जसे व्हायरल होत असतात तसेच गंमतीशीर घटनांचे व्हिडिओ देखील चर्चेत येत असतात. अशाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. इंग्लंड माजी कर्णधार मायकल वॉनने सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. आशिया खंडात विशेषत: भारत, पाक, श्रीलंका, बांगलादेश तसेच इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशात ज्या स्तराचे क्रिकेट खेळले जाते त्या तुलनेत युरोप, अमेरिका या देशात अजून क्रिकेट विकसीत झाले नाही. वाचा- मायकल वॉनने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये क्रिकेटमधील सर्वात सुमार दर्जाची फिल्डिंग पाहायला मिळते. युरोपीयन क्रिकेट सीरीजमध्ये स्टॉकहोम सुपर किंग्ज संघातील फलंदाजांनी चार धावा पळून काढल्या. आता तुम्हाला वाटेल यात विशेष असे काय आहे. पण ज्या पद्धतीने या फलंदाजांनी धावा काढल्या ते पाहिल्यानंतर हसून हसून पोट दुखेल. वाचा- फलंदाजी करणाऱ्या स्टॉकहोम सुपर किंग्ज संघातील फलंदाजाने चेंडू मारला तो विकेटकिपरच्या मागे हवेत उंच उडाला. विकेटकिपर कॅच घेण्यासाठी पळत गेल. पण सोपा कॅच त्याला घेता आला नाही. कॅच सोडल्यानंतर त्याने धाव घेणाऱ्या फलंदाजांना बाद करण्यासाठी थ्रो केला. पण चेंडू काही विकेटला लागला नाही. दोन्ही फलंदाजांनी दोन धावा पूर्ण केल्या. चेंडू फिल्डरच्या हातात नसल्याचे पाहून फलंदाजांनी तिसरी धाव देखील पूर्ण केली. पण गंमत म्हणजे नॉन स्ट्रायकर दिशेच्या फलंदाज चौथी धाव घेण्यासाठी पळाला. तेव्हा देखील विकेटच्या जवळ उभ्या असलेल्या फिल्डरला चेंडू विकेटवर मारता आला नाही. एकाच चेंडूवर फिल्डिंग करणाऱ्या संघाने तीन वेळा बाद करण्याची संधी वाया घालववली. हा व्हिडिओ शेअर करताना वॉनने Now this is proper !!! असे म्हटले आहे. वाचा- हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला प्रत्येक वेळी एखादी नवी गोष्ट दिसेल. धावा काढताना नॉन स्ट्रयकर बाजूला उभ्या असलेल्या फलंदाजाचे पॅट निघाले, त्याने तिसरी आणि चौथी धाव लंगडत काढली तरी देखील तो बाद झाला नाही. या व्हिडिओवर सोशल मीडियावर अनेक गंमतीदार प्रतिक्रिया येत आहेत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2N9Ywpw

मिताली राजने इतिहास घडवला; अशी कामगिरी करणारी पहिली भारतीय तर...

लखनऊ : भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार फलंदाज ( )ने शुक्रवारी इतिहास घडवला. ३८ वर्षीय मितालीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारी ती भारताची पहिली तर जगातील फक्त दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. मितालीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या वनडेत हा विक्रम केला. वाचा- आफ्रिकेविरुद्ध लखनऊ येथे झालेल्या सामन्यात मितालीने ३५ धावा करताच १० हजार धावांचा टप्पा पार केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वप्रथम १० हजार धावाचा विक्रम इंग्लंडच्या चार्लेट एडवर्ड्सने केला होता. चार्लेटला मागे टाकण्यासाठी आता मितालीला २९९ धावांची गरज आहे. वाचा- या सामन्यात मितालीला फार धावा करता आल्या नाही. ती ३६ धावांवर बाद झाली. मितालीने वनडेत सर्वाधिक ६ जार ९७४ धावा केल्या आहेत. वनडेत ७ हजार धावा करण्यासाठी तिला फक्त ३६ धावांची गरज आहे. तिने ८९ टी-२० सामन्यात २ हजार ३६४ धावा तर १० कसोटीत ६३३ धावा केल्या आहेत. वाचा- आफ्रिकेविरुद्ध झालेल्या तिसऱ्या वनडेत मितालीने पूनम राऊत सह ७७ धावांची भागिदारी केली. भारताची अवस्था २ बाद ६४ असताना या दोघांनी डाव सावरला. पूनमने सर्वाधिक ७७ धावा केल्या. भारताने ५० षटकात ५ बाद २४८ धावा केल्या आहेत. वाचा- पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ १-१ अशा स्थितीत आहेत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/38y6m3Q

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने स्वप्नात देखील विचार केला नसेल की त्यांच्या सोबत असे होईल; पाहा Video

नवी दिल्ली: वर्ष २००६ तेव्हा क्रिकेटमध्ये टी-२०ची सुरूवात झाली नव्हती. ना भारताने पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकला होता. ना आयपीएल, बिग बॅश लीग अथवा अन्य टी-२० लीग स्पर्धा सुरू झाल्या होत्या. आज ज्या पद्धतीने स्फोटक फलंदाजी करून धावांचा डोंगर उभा केला जातो, तसा वेग नव्हता. तरी क्रिकेटच्या इतिहासात १२ मार्च २००६ या तारखेला खास असे महत्त्व आहे. वनडे क्रिकेटमध्ये १२ मार्च २००६ असा एक सामना झाला होता ज्याने टी-२० प्रमाणे फलंदाजी झाली होती. या सामन्यात वनडे क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच ४००हून अधिक धावा झाल्या होत्या, त्याही एकदा नव्हे तर दोन वेळा. जोहान्सबर्ग येथे झालेल्या सामन्याचा निकाल पाहून क्रिकेट चाहते देखील हैराण झाले होते. वाचा- दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्याची वनडे मालिका सुरू होती. दोन्ही संघ मालिकेत २-२ अशा बरोबरीत होते. अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉन्टिंगने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या मैदानावर पॉन्टिंगने २००३ साली भारताचा पराभव करून वर्ल्डकप जिंकला होता. फलंदाजीसाठी अनुकूल असलेल्या या मैदानावर ऑस्ट्रेलियाने धमाकेदार फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाकडून एडम गिलख्रिस्ट आणि सायमन कॅटिचने सुरूवात केली. गिलख्रिस्टने ३५ चेंडूत अर्धशतक केले. पण त्यानंतर तो ४४ चेंडूत ५५ धावा करून बाद झाला. १५.२ षटकात ऑस्ट्रेलियाने १ बाद ९७ धावा केल्या होत्या. त्यानंतर पॉन्टिंग मैदानावर आला. पहिल्या पाच चेंडूवर त्याने एकही धाव घेतली नाही. तर सुरुवातीच्या १७ चेंडूत फक्त १० धावा केल्या. पण त्यानंतर जे झाले त्याचा कोणीही विचार केला नाही. आफ्रिकेच्या गोलंदजांची अशी धुलाई कधीच झाली नसेल. पॉन्टिंग कॅटीच यांनी ११९ धावांची भागिदारी केली. कॅटीच ७९ धावांवर बाद झाला. वाचा- दुसऱ्या बाजूला पॉन्टिंगकडून धुलाई सुरूच होती. आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅमी स्मिथला समजत नव्हते की कोणत्या गोलंदाजाला चेंडू देऊ. प्रत्येक गोलंदाजाची धुलाई सुरू होती. मायकल हसीने तर ५१ चेंडूत ८१ धावा केल्या. तो बाद झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाने ४६.१ षटकात ३७४ धावा केल्या होत्या. त्यानंतरच्या ओव्हरमध्ये पॉन्टिंग १०५ चेंडूत १६४ धावा करून बाद झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाने ४०० धावा केल्या होत्या. वनडे क्रिकेटमध्ये प्रथमच इतक्या धावा झाल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने ४ विकेटच्या बदल्यात ४३४ धावा केल्या. जो वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च होता. ऑस्ट्रेलियाची फलंदाजी- आफ्रिकेकडून जॅक कॉलिसने ६ षटकात ७० धावा, मखाया टीनीने ९ षटकात ८० धावा दिल्या होत्या. सामन्याचा निकाल तेव्हाच स्पष्ट झाला होता जेव्हा ऑस्ट्रेलियाने ४३४ धावा केल्या. त्याच दुसऱ्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला पहिली विकेट मिळाली. कर्णधार स्मिथला साथ देण्यासाठी हर्शल गिब्स मैदानावर उतरला आणि ऑस्ट्रेलियाच्या स्वप्नाना सुरुंग लागला. स्मिथ आमि गिब्स यांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना रिर्टन गिफ्ट देण्यास सुरूवात केली. या दोघांनी १३ चौकार आणि २ षटकारासह ५५ चेंडूत ९० धावा केल्या. आफ्रिकेने २०० धावांचा टप्पा पार केला होता आणि गिब्स वनडेतील पहिल्या द्विशतकाच्या जवळ पोहोचला होता. पण १११ चेंडूत १७५ धावा करून तो बाद झाला. त्याने २१ चौकार आणि ७ षटकार मारेल. तो बाद झाला तेव्हा आफ्रिकेने ३१.५ षटकात २९९ धावा केल्या होत्या. तरी देखील ऑस्ट्रेलियाला विजय जवळ दिसत होता. जॅक कॅलिस देखील २० धावांवर बाद झाला. वाचा- कॅलिस बाद झाल्यानंतर आफ्रिकेने विकेट गमवण्यास सुरूवात केली. पण एका बाजूने मार्क बाउचर विकेटवर थांबला होता आणि धावा देखील करत होता. जोहान वेनडरने फक्त १८ चेंडूत ३ षटकार आणि १ चौकारासह ३५ धावा केल्या. ४९.३ षटकानंतर जेव्हा एड्यू हॉल सात धावांवर बाद झाला तेव्हा सर्व क्रिकेट चाहत्यांचा श्वास रोखला होता. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी एक विकेट तर आफ्रिकेला ३ चेंडूत २ धावांची गरज होती. आफ्रिकेला हा सामना इतक्या जवळ आणून गमवायचा नव्हता. तर ऑस्ट्रेलियाला इतकी मोठी धावसंख्या उभी करून पराभूत व्हायचे नव्हते. ब्रेट लीच्या हातात चेंडू होता आणि मखाया टीनी फलंदाज, त्याने कशी बशी एक धाव घेतली. आता दोन चेंडूत एक विकेट आणि एक धाव सामन्याचा निकाल ठरवणार होता. लीच्या चेंडूवर बाउचरने चौकार मारला आणि इतिहास घडवला. आफ्रिकेची फलंदाजी ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ निराश होता. इतकी मोठी धावसंख्या उभी करून त्यांचा पराभव झाला होता. या सामन्यात एकूण ८७ चौकार आणि २६ षटकार मारले गेले. जो एक विक्रम ठरला. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिक लुइसच्या नावावर एक असा विक्रम नोंदला गेला जो कोणालाही आवडणार नाही. त्याने १० षटकात एकही विकेट न घेता ११३ धावा दिल्या. वनडे क्रिकेटमधील ही आज देखील सर्वात महाग गोलंदाजी आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या सामन्याला १५ वर्ष झाली तरी ज्यांनी हा सामना पाहिला त्यांच्या मनात आठवणी ताज्या आहेत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cDJelR

Thursday, March 11, 2021

IND vs ENG पहिली टी-२०: टीम इंडियामध्ये कोणाला मिळणार संधी, जाणून घ्या संभाव्य संघ

अहमदाबाद: भारत आणि इंग्लंड () यांच्यातील पहिली आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट चाहते कसोटी क्रिकेटचा आनंद घेत होते आता क्रिकेटमधील सर्वात छोट्या फॉर्मेटचा आनंद घेता येणार आहे. वाचा- दोन्ही संघातील पाच सामन्यांच्या मालिकेसाठी खेळाडूंनी जोरदार तयारी केली आहे. इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या या मालिकेसाठी भारतीय संघासमोर अंतिम ११ खेळाडू निवडण्याचे आव्हान असेल. टीम इंडियातील स्टार खेळाडू आणि ऋषभ पंत यांच्या निवडीबाबत कोणता निर्णय घेतला जातो हे पाहावे लागले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतला पहिल्या टी-२० लढतीत संघात स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. गेल्या काही टी-२० सामन्यात विकेटकिपर म्हणून केएल राहुलने संघातील स्थान पक्के केले आहे. पण पंतने ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून जो शानदार फॉर्म दाखवला आहे, तो पाहता त्याला संघाबाहेर ठेवणे योग्य ठरणार नाही. पंत संघाबाहेर झाल तर सोशल मीडियावर देखील त्याचे पडसाद उमटतील. वाचा- पंतला संघात घ्यायचे म्हटले तर अन्य एखाद्या खेळाडूला डच्चू द्यावा लागेल. दोन्ही संघातील साना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होणार आहे. त्या आधी जाणून घेऊयात संभाव्य संघ- भारत- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, युजवेंद्र चहल आणि नवदीप सैनी इंग्लंड- इयॉन मॉर्गन (कर्णधार), जेसन राय, जोस बटलर, डेव्हिड मलान, सॅम बिलिंग्स, बेन स्टोक्स, मोइन अली, सॅम कुरेन, आदिल रशीद, टॉम कुरेन, ख्रिस जॉर्डन


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/38xsyuT

महाराष्ट्राच्या या खेळाडूच्या नावावर आहे पहिल्या त्रिशतकासह इतके विक्रम

मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये आजचा दिवस ११ मार्च हा दिवस खास असा आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठे योगदान देणारे आणि विक्रम स्वत:च्या नावावर करणारे () यांचा आज जन्मदिवस आहे. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील एका शिक्षकाच्या घरी जन्मलेल्या विजय हजारे यांनी अशी कामगिरी केली ज्याची आठवण आज देखील काढली जाते. वाचा- विजय हजारे यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५८.३८च्या सरासरीने १८ हजार ७४० धावा केल्या. यात १० द्विशतकाचा समावेश होता. इतक नव्हे तर रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सर्वप्रथम त्रिशतक करण्याचा विक्रम देखील विजय हजारे यांच्या नावावर आहे. त्यांनी महाराष्ट्राकडून खेळताना बडोदाविरुद्ध नाबाद ३१६ धावा केल्या होत्या. विजय हजारे यांच्याबद्दलची आणखी एक खास गोष्ट म्हणजे त्यांच्या कुटुंबातील चार पिढ्यांनी क्रिकेट खेळले आहे. विजय हजारे याचे भाऊ विवेक हजारे, मुलगा रंजीत हजारे आणि नातू कुणार हजारे हे क्रिकेट खेळले आहेत. वाचा- भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी त्यांनी १९४३-४४ साली द रेस्ट्स कडून खेळताना द हिंदुज विरुद्ध नाबाद ३०९ धावा केल्या होत्या. या सामन्यात विजय हजारे यांच्या संघाने ३८७ धावा केल्या होत्या. वाचा- देशांतर्गत क्रिकेटमध्ये पहिले त्रिशतक त्यांच्या नावावर आहे. इतक नव्हे तर कसोटी सामन्यातील दोन्ही डावात शतक करणारे देखील ते पहिले भारतीय आहेत. १९४७-४८ मध्ये त्यांनी एडिलेड कसोटी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ११६ आणि १४५ धावा केल्या होत्या. देशांतर्गत क्रिकेटमध्ये ५० शतक करणारे ते पहिले फलंदाज आहेत. वाचा- विजय हजारे यांनी भारताकडून ३० कसोटीत २ हजार १९२ धावा केल्या. यात ७ शतक आणि ९ अर्धशतकांचा समावेश होता. प्रथम श्रेणीतील २३८ सामन्यात त्यांनी ६० शतक, ७३ अर्धशतकांसह १८ हजार ७४० धावा केल्या. फलंदाजी प्रमाणे गोलंदाजीत देखील त्यांनी कमाल केली होती. कसोटीत त्यांनी २० विकेट घेतल्या होत्या. २९ धावात चार विकेट ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती. तर प्रथम श्रेणीत ९० धावात ८ विकेट अशी सर्वोत्तम गोलंदाजी होती. या प्रकारात त्यांनी ५९५ विकेट घेतल्या होत्या. >> भारतात त्यांच्या नावाने दर वर्षी विजय हजारे ट्रॉफीचे आयोजन केले जाते. >> एका कसोटी सामन्यात दोन्ही डावात शून्यावर बाद होणारे ते पहिले भारतीय होते. >> १९४७ साली रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये विजय हजारे आणि गुल मोहम्मद यांनी ५७७ धावांची भागिदारी केली होती. हा विक्रम अनेक वर्ष कायम होता. २००६ साली कुमार संगकारा आणि माहेला जयवर्धने यांनी ६२४ धावा करत हा विक्रम मोडला. >> कसोटी क्रिकेटमध्ये १ हजार धावा पूर्ण करणारे ते पहिले फलंदाज होते. >> पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले ते पहिले क्रिकेटपटू होते.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3rFWPz5

Video: त्याला आहे तसा राहु द्या, पाहा रोहित शर्मा कोणाबद्दल असे म्हणाला

अहमदाबाद : विकेटकिपर आणि फलंदाज ऋषभ पंतने केल्या काही महिन्यात भारतीय संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ऑस्ट्रेलिया पाठोपाठ त्याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघाला विजय मिळवून देणारी फलंदाजी केली होती. त्याच बरोबर विकेटच्या मागे देखील तो चांगली कामगिरी करत आहे. वाचा- भारतीय संघाचा सलामीवर रोहित शर्माच्या मते पंतला नैसर्गिकपणे खेळण्याची परवानगी दिली तर तो चौथ्या कसोटी प्रमाणे पुन्हा शानदार फलंदाजी करू शकतो. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत भारतीय संघ अडचणीत असताना पंतने शतक केले होते. वाचा- उद्यापासून १२ मार्च भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-२० मालिका सुरू होणार आहे. निवड समितीने त्याच्या शानदार कामगिरीमुळे पुन्हा एकदा संघात स्थान दिले. टी-२० मालिकेआधी पत्रकार परिषदेत बोलताना रोहित म्हणाला, पंतला पंतच राहू द्या. जर तसे झाले तर चौथ्या कसोटी प्रमाणे तो पुन्हा कामगिरी करेल. मी याआधी देखील सांगितले होते की, पंतला एकटे सोडून द्या. मगच तो चांगली कामगिरी करेल. वाचा- गेल्या दोन महिन्यात ऑस्ट्रेलियापासून ते आतापर्यंत तो शानदार खेळत आहे. त्याच्यावर अनावश्यक दबाव टाकण्याची गरज नाही, असे रोहित म्हणाला. वाचा- पंतला पंतच राहू द्या. त्याला खेळाचा आनंद घेण्यास आवडतो. भारतीय संघ व्यवस्थापनाची देखील हिच इच्छा आहे की, मैदानावर जा आणि खेळाचा आनंद घ्या, तुम्हाला जे आवडते ते करा. पंतने आता मॅचमधील परिस्थिती कशी आहे हे समजून घेण्यास सुरूवात केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून हे दिसून आले.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3rBL3pC

'शॉ'नदार पृथ्वीने केला हा विक्रम; दिग्गजांना मागे टाकले

नवी दिल्ली: भारतीय संघातील सलामीवीर पृथ्वी शॉला खराब कामगिरीमुळे संघाबाहेर केल्यानंतर त्याने शानदार कमबॅक केले आहे. विजय हजारे स्पर्धेत मुंबईचे नेतृत्व करणाऱ्या या युवा फलंदाजाने स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला. कर्नाटक विरुद्धच्या सेमीफायनलमध्ये त्याने आणखी एक धमाकेदार शतक झळकावले. वाचा- पृथ्वीने स्पर्धेतील चौथे शतक पूर्ण केले. त्याने १२३ चेंडूत १६५ धावा केल्या. पृथ्वीने १२२ चेंडूत ७ षटकार आणि १७ चौकारांसह १६५ धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट १३५.२५ इतका होता. वाचा- विजय हजारे स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मयांक अग्रवालच्या नावावर होता. पृथ्वीने त्याचा विक्रम मागे टाकला. मयांकने २०१८ साली या स्पर्धेत ७२३ धावा केल्या होत्या. कर्नाटकविरुद्धच्या सामन्यात त्याने हा विक्रम स्वत:च्या नावावर केला. आता या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम पृथ्वीच्या नावावर आहे. तर तिसऱ्या स्थानावर ६७३ धावा करणारा देवदत्त पडिक्कल आहे. चौथ्या क्रमांकावर देवदत्तच असून त्याने २०१९ साली ६०९ धावा केल्या होत्या. वाचा- या स्पर्धेतील पृथ्वीचे आजचे चौथे शतक ठरले. या चार शतकांमध्ये एका द्विशतकाचा समावेश होता. दिल्लीविरुद्ध त्याने ८९ चेंडूत नाबाद १०५, त्यानंतर पुड्डूचेरीविरुद्ध १५२ चेंडूत २२७, क्वार्टर फायनलमध्ये सौराष्ट्र विरुद्ध १२३ चेंडूत १८५ धावा केल्या.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3enTNMe

पृथ्वी शॉला रोखणे अशक्य; ७९ चेंडूत आणखी एक शतक आणि...

नवी दिल्ली: भारतीय संघातून डच्चू मिळालेल्या ()ने देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाकेदार फलंदाजीचा फॉर्म कायम ठेवला आहे. पृथ्वीने ()च्या सेमीफायनलमध्ये कर्नाटकच्या () विरुद्ध शतकी खेळी केली. वाचा- मुंबईचा कर्णधार असलेल्या पृथ्वीने याआधी क्वार्टर फायनलमध्ये शतक केले होते. आता पुन्हा एक शतकी खेळी केली. विजय हजारे ट्रॉफीतील दुसऱ्या सेमीफायनलमध्ये मुंबईने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईची सुरुवात खराब झाली यशस्वी ययस्वाल ६ धावा करून बाद झाला. त्यानंतर आदित्य तारे देखील १६ धावांवर माघारी परतला. हे दोन फलंदाज कमी धावसंख्येवर बाद झाले असले तरी दुसऱ्या बाजूने पृथ्वीची फटकेबाजी सुरू होती. पृथ्वीने प्रथम ४८ चेंडूत अर्धशतक केले आणि नंतर ७९ चेंडूत १२ चौकार आणि ३ षटकारांसह शतक पूर्ण केले. वाचा- मुंबईने प्रथम फलंदाजी करत सर्वबाद ३२२ धावा केल्या. पृथ्वीने १२२ चेंडूत ७ षटकार आणि १७ चौकारांसह १६५ धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट १३५.२५ इतका होता. पृथ्वी वगळता मुंबईच्या अन्य कोणत्याही फलंदाजाला अर्धशतक ही करता आले नाही. वाचा- या स्पर्धेतील पृथ्वीचे हे चौथे शतक ठरले. याआधी त्याने प्रथम दिल्लीविरुद्ध नाबाद १०५, त्यानंतर पुड्डुचेरी विरुद्ध नाबाद २२७ तर सौराष्ट्र विरुद्ध नाबाद १८५ धावा केल्या होत्या. या सामन्याआधी विजय हजारे स्पर्धेत पृथ्वीने ५८९ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या कसोटीत दोन्ही डावात शून्यावर बाद झालेल्या पृथ्वीला संघातून वगळण्यात आले आहे. त्यानंतर तो मुंबईकडून विजय हजारे ट्रॉफीत खेळत आहे. वाचा-


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2PSx3tA

ऋषभ पंतची कमाल, रोहित शर्माशी केली बरोबरी

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने फलंदाजांची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारताचा धडाकेबाज फलंदाज आणि विकेटकिपर ( )ने कसोटी क्रमवारीत प्रथमच टॉप १० मध्ये स्थान मिळवले आहे. क्रमवारीत पंत ७व्या क्रमांकावर आहे. इतक नव्हे तर त्याने रोहित शर्माच्या क्रमवारीशी बरोबरी केली. वाचा- कसोटी क्रमवारीत रोहित शर्मा सातव्या क्रमांकावर आहे. तर हेन्नरी निकोलस देखील याच क्रमांकावर आहे. पंतने ७४७ गुणांसह हे स्थान मिळवले. हे तिनही फलंदाज संयुक्तपणे सातव्या स्थानावर आहे. याच्या पुढे पाकिस्तानचा बाबर आझम आहे. त्याचे ७६० इतके गुण आहेत. कसोटी क्रमवारीत फलंदाजांमध्ये न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन ९१९ गुणांसह पहिल्या स्थानावर, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ दुसऱ्या, मार्नस लाबुशाने तिसऱ्या, जो रूट चौथ्या तर विराट कोहली ५व्या स्थानावर आहे. विराटचे ८१४ इतके गुण आहेत. वाचा- नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पंतने धमाकेदार कामगिरी केली होती. त्याच्या या कामगिरीचे बक्षिस क्रमवारीत दिसून आले. गोलंदाजांच्या क्रमवारीत आर अश्विन दुसऱ्या तर अष्ठपैलूंच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. या यादीत रविंद्र जडेजा तिसऱ्या स्थानावर आहे. टी-२० क्रमवारीचा विचार करता भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर तर इंग्लंड पहिल्या स्थानावर आहे. या दोन्ही संघात १२ मार्च उद्यापासून पाच सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. भारतापेक्षा इंग्लंडकडे सात गुण अधिक आहेत. क्रमवारीत भारत दुसऱ्या स्थानावर होता. पण न्यूझीलंडविरुद्धची टी-२० मालिका २-३ने पराभूत झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. पण ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघात फक्त एका गुणाचा फरक आहे. वाचा- फलंदाजामध्ये भारताचा केएल राहुल तिसऱ्या स्थानावर घसरला. विराट कोहली सहाव्या स्थानावर आहे. अव्वल स्थानी इंग्लंडचा डेव्हिड मलान, एरॉन फिंच दुसऱ्या स्थानावर आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3tm3oaL

फलंदाज बाद झाल्यावर लिहले गेले OBS; पाहा काय आहे क्रिकेटमधील हा नियम

नवी दिल्ली: वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेतील पहिल्या लढतीत श्रीलंकेच्या याला अजब पद्धतीने बाद ठरवण्यात आले. त्याला बाद देण्यावरून क्रिकेट चाहत्यांमध्ये सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. धनुष्काला अर्थात फिल्डर्सला अडथळा निर्माण केल्याबद्दल बाद दिले गेले. धनुष्काला ज्या नियमांच्या आधारे बाद दिले गेले. तो नियम आहे तरी काय आणि नेमक मैदानावर काय जाले ते जाणून घेऊयात... वाचा- मेरीलेबोन क्रिकेट क्लबच्या नियमानुसार ऑब्सट्रक्टिंग द फिल्ड नुसार एखाद्या फलंदाजाला बाद देण्यासंदर्भातील नियम सांगितले आहेत. लॉर्ड्स क्रिकेटच्या वेबसाइटवर नियम ३७ मध्ये याची चर्चा आणि सविस्तर माहिती दिली गेली आहे. नियम ३७.१ मध्ये ऑब्सट्रक्टिंग द फिल्ड संदर्भात सांगितले आहे नियम ३७.१.१- कोणताही फलंदाज ऑब्सट्रक्टिंग द फिल्डनुसार बाद होतो म्हणजे तो चेंडू खेळल्यानंतर मुद्दामहून विरोधी संघातील खेळाडूंच्या कामात अडथळे निर्माण करतो किंवा शब्द किंवा अॅक्शनने त्याचे लक्ष विचलीत करतो. नियम ३७.१.२- फलंदाज मुद्दाम चेंडू हाताने मारतो जेव्हा त्याच्या हातात बॅट नसते. तर तो बाद मानला जाईल. त्याच बरोबर फलंदाज विकेट वाचवण्यासाठी बॅटने चेंडू एकापेक्षा अधिक वेळा मारू शकत नाही. ३७.१.३- हा नियम लागू तेव्हाच होईल जेव्हा तो नो बॉल नसेल वाचा- ३७.२- जर फलंदाजाने जाणीवपूर्वक फिल्डिंगमध्ये अडथळा आणला नसेल किंवा प्रतिस्पर्धी खेळाडूंचे लक्ष विचलीत केले गेले नसेल तर तो बाद नसले. फलंदाजाने दुखापतीपासून वाचण्यासाठी फिल्डिंगमध्ये अडथळे आणले असेल तर तो बाद ठरत नाही. चेंडू बॅट अथवा शरीराला लागून विकेटकडे जात असेल तर फलंदाज चेंडू रोखू शकतो. ३७.३- गोलंदाजाला कॅच घेण्यापासून रोखने ३७.३.१- जर चेंडू नो बॉल नसले तर फलंदाज फिल्डरला जाणीवपूर्वक कॅच घेण्यापासून रोखत असेल तर तो बाद ठरले ३७.३.२- विकेट वाचवण्यासाठी जर फलंदाजाने चेंडू रोखला तो बाद ठरणार नाही ३७.३.३- जर ऑब्सट्रक्टिंग द फिल्डच्या वेळी नो बॉल टाकला असेल तर फलंदाजाला बाद दिले जाऊ शकते ३७.३.४- फलंदाज विकेट वाचवण्यासाठी चेंडू रोखू शकतो. वाचा- सोशल मीडियावर झाला विरोध धनुष्का गुनतिलका ज्या नियमाच्या आधारे बाद ठरवण्यात आले. त्यावरून क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. त्याने जाणिवपूर्वक चेंडू थांबवला नाही किंवा फिल्डिगमध्ये अडथळा आणला नव्हता असे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत होते. त्यामुळे अनेक क्रिकेट चाहत्यांनी अंपायरचा निर्णय चुकीचा होता असे मत सोशल मीडियावर व्यक्त केले आहे. वाचा- फक्त क्रिकेट चाहते नाही तर क्रिकेटपटूंनी देखील या घटनेवर मत व्यक्त केले आहे. डॅरन सॅमी, टॉम मुडी, संजय मांजरेकर यांनी देखील अंपायरचा निर्णय चुकल्याचे म्हटले आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3vbDw2R

Wednesday, March 10, 2021

क्रिकेटपटूला बाद दिल्याने सुरू झाला नवा वाद; पाहा व्हिडिओ

एंटीगा: वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात एक वाद झाला. श्रीलंकेचा फलंदाज ऑब्स्ट्रकटिंग द फिल्ड अर्थात फिल्डिंगमध्ये अडथळा निर्माण केल्याबद्दल आउट देण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तसेच क्रिकेट चाहते देखील त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. वाचा- वेस्ट इंडिजविरुद्ध श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या डावातील २२वे षटक कायरन पोलार्ड टाकत होता. धनुष्काने डिफेंन्सिव्ह शॉट खेळला, चेंडू त्याच्या पाया जवळच होता. दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या पथम निसाकाने धावा घेण्याचा प्रयत्न केला आणि तो पळू लागला. तेव्हा धनुष्काने धाव घेण्यास नकार दिला. वाचा- क्रीझपासून तीन-चार पावले पुढे आलेला धनुष्का पुन्हा मागे जात होता. तेव्हा त्याच्या पायाला चेंडू लागला आणि तो मागे आला. या दरम्यान पोलार्ड त्याला रन आउट करण्यासाठी चेंडूकडे धावत आला. या घटनेच्या व्हिडिओमध्ये धनुष्का चेंडूपासून दूर होण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याला तसे करता आले नाही. त्याने जाणीवपूर्वी चेंडूला पाय लावला किंवा फिल्डिंगमध्ये अडथळा आणला असे दिसत नाही. वाचा- या घटनेवर वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना तक्रार केल्यावर मैदानावरील दोघा अंपायर्सनी तिसऱ्या अंपायरची मदत मागितली. तिसऱ्या अंपायरने फिल्डिंगमध्ये अडथळा आणल्याबद्दल त्याला बाद दिले. धनुष्काने ६१ चेंडूत ५५ धावा केल्या. वाचा- धनुष्काला धावबाद देण्याच्या घटनेवर सोशल मीडियावर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. जवळ जवळ सर्व चाहत्यांच्या मते धनुष्काने जाणीवपूर्वक तसे केले नाही. या सामन्यात श्रीलंकेचा संघ ४९ षटकात २३२ धावांवर ऑल आउट झाला. त्यानंतर वेस्ट इंडिजने ४७ षटकात दोन विकेटच्या बदल्यात विजय मिळवला.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2PS8GMC

भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपचा हा संघ असेल मुख्य दावेदार, इंग्लंडच्या खेळाडूने केली भविष्यवाणी

अहमदाबाद: भारताविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेच्या आधी इंग्लंडचा मर्यादीत षटकाचा उपकर्णधार याने आगामी आयसीसी टी-२० वर्ल्डकपचा मुख्य दावेदार कोणता संघ असेल याची भविष्यवाणी केली आहे. वाचा- या वर्षाच्या अखेरीस भारतात होणार आहे. २००७ साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या टी-२० वर्ल्डकपचा विजेता भारतीय संघ या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या वर्ल्डकपचा मुख्य दावेदार असेल असे बटलरचे म्हणणे आहे. वाचा- वर्ल्डकपच्या संभाव्य विजेत्यांमध्ये यजमान संघाचा देखील विचार केला जातो. पण भारता सारखा मजबूत संघ असतो तेव्हा तो मुख्य दावेदार असेल. वाचा- अनेक संघांची कामगिरी शानदार अशी आहे. गेल्या काही वर्षात यजमान संघांनी वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी केली आहे. भारत देखील या फॉर्मेटमध्ये मजबूत आहे. टी-२० मध्ये भारत ज्या पद्धतीने खेळतो आणि मायदेशात खेळण्याचा होणारा फायदा यामुळे भारत यावर्षाचा मुख्य दावेदार असेल, असे बटलर म्हणाला. वाचा- भारताविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसंदर्भात बोलताना बटल म्हणाला, आमच्याकडे वर्ल्डकपच्या आधी संघात समन्वय करण्याची मोठी संधी आहे. ही मालिका आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची असेल. आशा आहे की आम्ही विजयी होऊ. वर्ल्डकपच्या आधी भारताविरुद्ध खेळणे ही एक संघ म्हणून चांगली संधी आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3l4pv28

IND vs ENG T20I : रोहित आणि विराटला वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी; पाक खेळाडूचा विक्रम धोक्यात

अहमदाबाद: भारत आणि इंग्लंड ( ) यांच्यात १२ मार्चपासून पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू होणार आहे. या सर्व लढती अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहेत. दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत १४ टी-२० लढती झाल्या आहे. यापैकी दोघांनी प्रत्येकी ७ मध्ये विजय मिळवला आहे. वाचा- टी-२० मालिकेत इंग्लंड चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत भारताने इंग्लंडचा ३-१ने पराभव केला होता. त्यामुळे आता टी-२० मध्ये विजय मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. त्याच बरोबर या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे. या मालिकेत काही महत्त्वाचे विक्रम होण्याची संधी आहे त्यावर एक नजर... वाचा- विराट कोहली- भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आतापर्यंत ८५ सामन्यात २ हजार ९२८ धावा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत विराटला ३ हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३ हजार धावा पूर्ण करण्यासाठी त्याला ७२ धावांची गरज आहे. पाच सामन्यात त्याने या धावा केल्या तर अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरले या मालिकेत १७ धावा पूर्ण करता तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून १२ हजार धावा करणारा तो तिसरा कर्णधार होता. रिकी पॉन्टिंगने कर्णधार म्हणून सर्वाधिक १५ हजार ४४० तर ग्रॅमी स्मिथने १४ हजार ८७८ धावा केल्या आहेत. वाचा- रोहित शर्मा- इंग्लंडविरुद्ध भारताच्या उपकर्णधाराला विक्रमाची संधी आहे. या मालिकेत रोहितने १३ षटकार मारल्यास आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावर होऊ शकतो. रोहितने १२७ षटकार मारले आहेत. काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलने रोहितला मागे टाकत हा विक्रम स्वत:च्या नावावर केला होता. आता रोहितला पुन्हा हा विक्रम स्वत:च्या नावावर करण्याची संधी आहे. गप्टिलने १३९ षटकार मारले आहेत. वाचा- याच बरोबर ६७ धावा करताच रोहित गप्टिलला मागे टाकू शकतो. रोहितने टी-२० मध्ये आतापर्यंत २ हजार ७७३ धावा केल्या आहेत. डेव्हिड मलान- इंग्लंडचा फलंदाज डेव्हिड मलानला पाकिस्तानच्या बाबर आझमचा विक्रम मोडण्याची संधी आहे. मलानने टी-२०च्या १९ डावात ८५५ धावा केल्या आहेत. जर भारताविरुद्धच्या पाच सामन्यात त्याने १४५ धावा केल्या तर तो १ हजार धावा पूर्ण करेल. यासह टी-२० मध्ये सर्वात वेगाने १ हजार धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर होईल. हा विक्रम सध्या बाबरच्या नावावर आहे. त्याने २६ डावात ही कामगिरी केली आहे. वाचा- चहल मोडणार बुमराहचा विक्रम- युजवेंद्र चहलने टी-२० क्रिकेटमध्ये ५९ विकेट घेतल्या आहे. जसप्रीत बुमराहच्या नावावर देखील इतक्याच विकेट आहेत. या मालिकेत चहल त्याला मागे टाकू शकतो. सूर्यकुमार यादव- भारतीय संघात निवड झालेल्या सूर्यकुमारला अंतिम ११ मध्ये स्थान मिळाल्यास तो असा पहिला क्रिकेटपटू ठरेल ज्याने आयपीएलमध्ये १०० सामने खेळल्यानंतर भारताकडून पदार्पण केले.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2PQsVdz

​भारतीय संघाला बसला मोठा झटका; दोन महत्त्वाचे खेळाडू झाले संघाबाहेर

अहमदाबाद: भारत आणि इंग्लंड () यांच्यात ५ सामन्यांची टी-२० मालिका १२ मार्चपासून सुरू होणार आहे. कसोटी मालिकेत ३-१ विजय मिळवलेल्या भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. पण टी-२० मालिकेआधी टीम इंडियाला एक मोठा झटका बसलाय. भारतीय संघात निवड करण्यात आलेला फिरकीपटू () सलग दुसऱ्यांदा फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरलाय. यामुळे इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेतून तो बाहेर झाला आहे. फक्त वरूण नाही तर जलद गोलंदाज देखील दुखापतीमुळे मालिकेतील पहिल्या काही सामन्यात खेळण्याची शक्यता नाही. वाचा- बेंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी मध्ये झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये तो नापास झाला. वरुण सलग दुसऱ्यांदा फिटनेस टेस्ट पास करण्यात अपयशी ठरला आहे. तर यॉर्कर किंग अशी ओळख असलेल्या नटराजनच्या खांद्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो सध्या तरी संघासोबत असणार नाही. वरुणने गेल्या वर्षी झालेल्या आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केली होती. त्यानंतर त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली होती. पण दुखापतीमुळे तो संघाबाहेर झाला. आता इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी त्याची संघात निवड झाली होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये तो नापास झाला होता. आता पुन्हा तो अपयशी ठरला. वरुण दोन वेळा यो-यो टेस्टमध्ये नापास झाला. यात त्याला दोन किलोमीटर धावायचे होते. वाचा- टी नटराजनने देखील आयपीएल २०२० मध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला भारतीय संघात संधी मिळाली. अन्य खेळाडूंच्या दुखापतीमुळे नटराजनला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वनडे, कसोटी आणि टी-२० प्रकारात पदार्पण करण्याची संधी मिळाली. आता इंग्लंडविरुद्ध त्याला संधी देण्यात आली होती. वरुणच्या निवडीबाबत आता असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने अशा खेळाडूची निवड का केली ज्याने ऑक्टोबरपासून राज्य संघाकडून कोणतीही मॅच खेळली नाही. वाचा- मुश्ताक अली टी-२० स्पर्धा सुरू असताना तो रिहॅबिलिटेशनमध्ये होता. त्यानंतर विजय हजारे ट्रॉफीत देखील तो एकही सामना खेळू शकला नाही. पाच महिन्यापूर्वी खेळलेल्या मॅचच्या आधारावर त्याची फिटनेस कशी काय निश्चित केली जाऊ शकेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वरुणची निवड निवड समितीसाठी एक धडा असेल. वाचा- जर एखाद्या खेळाडूने भारतीय संघाच्या निवडीसाठीचे मापदंड पूर्ण केले नाही तर फक्त गोलंदाजीच्या आधारावर त्याची संघात निवड करता येणार नाही. नटराजनच्या फिटनेसवर काम सुरू आहे. टी-२० मालिकेच्या दुसऱ्या टप्प्यात तो खेळण्यासाठी उपलब्ध होऊ शकतो. टी-२० नंतर पुण्यात वनडे सामने होणार आहेत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3etyYPo

शानदार विजयानंतर भारतीय महिला क्रिकेटपटूंनी केला डान्स; व्हिडिओ झाला तुफान व्हायरल

नवी दिल्ली: भारतीय महिला संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका खेळत आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीत पराभव झाल्यानंतर भारताने दुसऱ्या लढतीत शानदार कमबॅक केले आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. वाचा- भारतीय महिला संघाने दुसरा सामना ९ विकेटनी जिंकला. दुसऱ्या वनडेत भारताने प्रथम गोलंदाजी केली आणि आफ्रिकेला १५७ धावांवर रोखले. झूलन गोस्वामी आणि राजेश्वरी गायकवाडने घातक गोलंदाजी केली. झूलनने ४, राजेश्वरीने ३ विकेट घेतल्या. त्यानंतर फलंदाजीत स्मृतीने ८० तर पूनम राऊतने ६२ धावा केल्या आणि २८.४ षटकात विजय मिळवला. वाचा- या सामन्यात अर्धशतक करणाऱ्या स्मृतीने एक अनोखा विक्रम केला आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आजपर्यत कोणत्याही महिला अथवा पुरुष क्रिकेटपटूने धावांचा पाठलाग करताना सलग १० सामन्यात अर्धशतक झळकावले नाही. स्मृतीने फक्त महिलाच नाही तर पुरुषांच्या क्रिकेटमधील सर्व दिग्गजांना मागे टाकले आहे. सलग दहा सामन्यात १० अर्धशतक करणारी ती जगातील पहिली क्रिकेटपटू आहे. वाचा- भारतीय संघाच्या या विजयानंतर संघातील खेळाडू वेदा कृष्णमूर्ती, आकांक्षा कोहली, व्हीआर वनिता, ममता माबेन यांनी ड्रेसिंग रुममध्ये डान्स केला. तमिळ सुपरस्टार विजय याच्या मास्टर चित्रपटातील गाण्यावर त्यांनी डान्स केला. याचा व्हिडिओ वेदाने इंस्टाग्रामवर शेअर केलाय. वाचा- काही दिवसांपूर्वी भारताच्या पुरुष संघातील खेळाडू आर अश्विन आणि कुलदीप यादव यांनी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान जिम वर्कआउट करताना मास्टरच्या गाण्यावर डान्स केला होता.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/38qZZ2b

इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; पण भारतीय संघाचा झाला पराभव

नवी दिल्ली: ( T20)मध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात इंग्लंडच्या (England Legends) संघाने भारताचा (India Legends) ६ धावांनी पराभव केला. या सामन्या इंग्लंडकडून ()ने ३७ चेंडूत ७५ धावा केल्या. त्याने ५ षटकार आणि ६ षटकार मारले. त्याच्या या वादळी खेळीने इंग्लंडने २० षटकात १८८ धावा केल्या. वाचा- विजयासाठी मोठे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग आणि युवराज सिंग हे लवकर बाद झाले. पण त्यानंतर इरफान पठाण()ने ३४ चेंडूत नाबाद ६१ धावांची स्फोटक फलंदाजी केली. वाचा- वाचा- इरफानच्या खेळीने भारतीय संघाला विजय मिळवता आला नसला तरी त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. इरफानने ४ चौकार आणि ५ षटकार मारले. तर मनप्रीत गोनीने १६ चेंडूत नाबाद ३५ धावा केल्या. भारतीय संघाला अखेरच्या २ चेंडूत ८ धावा हव्या होत्या. पण त्यांना दोनच धावा करता आल्या. वाचा- स्पर्धेत भारतीय संघाने याआधीच्या सलग तीन सामन्यात विजय मिळवला होता. आता इंग्लंडविरुद्ध मात्र त्यांचा पराभव झाला. या सामन्यात इरफान पठाणच्या वादळी खेळी सर्वांचे मन जिंकले. त्याच्या फलंदाजीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. इरफानने फक्त फलंदाजी नाही तर गोलंदाजीत देखील कमाल केली. त्याने चार ओव्हरमध्ये २८ धावात दोन विकेट घेतल्या.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/38oeTWM

Tuesday, March 9, 2021

पाकिस्तानचा पराभव करून भारताने जिंकला होता मिनी वर्ल्डकप; पाहा Video

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान ( ) यांच्यातील द्विपक्षीय क्रिकेट सामने सध्या होत नसले तरी आयसीसीच्या स्पर्धेत हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळतात. या दोन्ही संघांमध्ये इतिहासात अशा अनेक लढती झाल्या आहेत ज्या चाहते कधीच विसरले नाहीत. अशाच एक लढत ३६ वर्षापूर्वी झाली होती जी भारतीय चाहते कधीच विसरणार नाहीत. वाचा- भारतीय संघाने १० मार्च १९८५ रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर झालेल्या अंतिम लढतीत पाकिस्तानचा पराभव करून (world championship of cricket) अर्थात मिनी वर्ल्डकप जिंकला होता. सुनिल गावस्कर यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत धमाकेदार कामगिरी केली होती. त्यांनी साखळी फेरीत पाकिस्तानचा ६ विकेटनी पराभव केला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा पराभव करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. या सामन्यात न्यूझीलंडवर सात विकेटनी विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला. तर दुसरीकडे पाकिस्तानने वेस्ट इंडिजचा पराभव करत धक्कादायकरित्या फायनलमध्ये स्थान मिळवले. वाचा- अंतिम लढतीत पाकचा कर्णधार जावेद मियादादने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण कपिल देव आणि चेतन शर्मा यांच्या गोलंदाजीसमोर पाकची अवस्था ४ बाद ३३ झाली. पाकिस्तानला ५० षटकात ९ बाद १७६ धावा करता आल्या. भारताकडून कपिल देव आणि लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. वाचा- विजयासाठई १७७ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. ( ) आणि कृष्णमाचारी श्रीकांत यांनी पहिल्या विकेटसाठी १०३ धावांची भागिदारी केली. भारताने १७ चेंडू राखून आणि फक्त २ विकेटच्या बदल्यात विजय मिळवला. श्रीकांत यांनी ६७ तर रवी शास्त्री यांनी नाबाद ६३ धावा केल्या. श्रीकांत यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. तर शास्त्री यांना मालिकावीरने गौरवण्यात आले. पुरस्कार म्हणून ऑडी कार मिळाली. ज्यावर बसून भारतीय खेळाडूंनी मैदानाची फेरी मारली. या मालिकेत श्रीकांत यांनी सर्वाधिक २३८ धावा तर शिवरामकृष्ण यांनी सर्वाधिक १० विकेट घेतल्या. रवी शास्त्री यांनी ५ सामन्यात ४५.५०च्या सरासरीने १८२ धावा आणि ८ विकेट घेतल्या. वाचा- ही मालिका सुरू होण्याआधी सुनिल गावस्कर आणि कपिल देव यांच्यात वाद असल्याच्या बातम्या येत होत्या. विजयाचा चषक घेतल्यानंतर गावस्कर यांनी घोषणा केली की ही त्यांच्या नेतृत्वाखालील अखेरची स्पर्धा होती. या विजेतेपदानंतर त्यांनी भारतीय संघाचे कर्णधारपद सोडले.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2POLOO2

शिखर धवनला मिळणार डच्चू; ही असेल भारताची सलामीची जोडी

अहमदाबाद: इंग्लंडला चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत पराभूत केल्यानंतर आता भारतीय संघाची तयारी टी-२० सामन्यासाठी सुरू आहे. टी-२०च्या आधी भारतीय संघासमोरची सर्वात मोठी डोकेदुखी म्हणजे अंतिम ११ खेळाडूंची निवड करणे होय. कारण प्रत्येक स्थानासाठी संघात दोन-दोन खेळाडू आहेत. अशा परिस्थितीत चांगल्या खेळाडूंना देखील संघाबाहेर राहण्याची वेळ येऊ शकते. वाचा- सलामीच्या जोडीवर नजर टाकली तर भारतीय संघात असे तीन खेळाडू आहेत ज्यांना रिप्लेस करणे शक्य नाही आणि त्यांना संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय देखील योग्य नसले. भारतीय संघ व्यवस्थापन संघ निवडीचा निर्णय कसा घेतो यावर बऱ्याच गोष्टी ठरणार आहेत. अशात सलामीवीर शिखर धवनला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. वाचा- शिखरला संघात तेव्हाच संधी मिळेल जेव्हा किंवा यापैकी कोणाला तरी दुखापत होईल किंवा त्यांना विश्रांती दिली जाईल. गेल्यावर्षी झालेल्या आयपीएलमध्ये राहुलने सर्वाधिक धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या स्थानावर होता. पण रोहितचा टी-२० संघात समावेश झाल्याने शिखरला जागा मिळण्याचे अवघड झाले आहे. भारतीय संघाची पहिली पसंद रोहित आणि राहुल हिच असेल. डाव्या आणि उजव्या हाताचा फलंदाज अशी ओपनीग जोडीचा विचार केला गेला तर राहुल संघाबाहेर होऊ शकतो. पण त्याचा फॉर्म पाहता विराट कोहली असे करणार नाही. वाचा- इंग्लंडविरुद्ध शुक्रवारी होणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्यात राहुल चाहरची निवड केली जाऊ शकते. राहुल तेवतिया आणि वरुण चक्रवर्ती यांच्या फिटनेस संदर्भात अद्याप अपडेट आले नाहीत. त्यामुळे चाहरला संधी मिळू शकते. तो सध्या भारती संघासोबत आहे आणि सराव सत्रात दिसतोय.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bwLjjZ

मुख्य कोच रवी शास्त्री म्हणाले, भारताचे दोन संघ मैदानावर दिसू शकतील

नवी दिल्ली: क्रिकेट संघात फक्त ११ खेळाडू मैदानावर खेळू शकतात. कसोटी, वनडे अथवा टी-२० या तिनही प्रकारात चार खेळाडूांना बेंचवर बसावे लागते. सर्वसाधारणपणे संघात सहा ते आठ खेळाडू असे असतात जे कायम असतात. कोणत्याही संघ व्यवस्थापन अथवा निवड समितीसाठी ही गोष्टी कधीही चांगली ठरेत जेव्हा त्यांच्याकडे निवडण्यासाठी अनेक पर्याय असतात. संघातील स्पर्धेसाठी आणि संघ अधिक मजबूत करण्यासाठी ही गोष्ट चांगली ठरते. भारतीय संघ व्यवस्थापनासाठी आता ही गोष्ट डोकेदुखी ठरू शकते. वाचा- इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी संघात कोणत्या खेळाडूंना जागा द्यायची असा मोठा प्रश्न निर्माण झालाय. विकेटकिपरचा विचार केल्यास ऋषभ पंत सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याच बरोबर इशान किशन देखील संघात स्थान मिळवण्याच्या जवळ पोहोचलाय. संजू सॅमसनला संघात स्थान मिळाले नसले तरी तो चांगली कामगिरी करून पुन्हा दावेदारी सिद्ध करू शकतो. फक्त हे तीन खेळाडू नाही तर दिनेश कार्तिक आणि वृद्धिमान साहा, एस भगत आणि एन जगदीशन हे देखील या एका जागेचे दावेदार आहेत. पंतने इतकी चांगली कामगिरी केल्यानंतर देखील स्पर्धा अधिक आहे. वाचा- भारताची आताची अडचण हीच आहे की त्यांना अधिक खेळाडूंमधून निवड करायची आहे. भारतीय संघाचे मुख्य कोच यांच्या मते ही एक चांगली डोकेदुखी आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जेव्हा रविंद्र जडेजाला दुखापत झाली. तेव्हा त्याच्या जागी इंग्लंड दौऱ्यात अक्षर पटेलला संधी मिळाली. आता अक्षरने अशी काही कामगिरी केली आहे की त्याला संघातून वगळणे शक्य नाही. वाचा- जसप्रीत बुमराहने लग्नासाठी ब्रेक घेतला आहे. तो लवकरच संघात परतेल. मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार देखील कामगिरीसाठी सज्ज झालेत. उमेश यादव १५ जणांच्यात स्थान मिळवेल. पण अंतिम ११ मध्ये त्याला जागा मिळणार नाही. नवदीप सैनी, टी नटराजन आणि शार्दुल ठाकूर यांनी देखील अपेक्षा वाढवल्या आहेत. सर्व साधारणपणे आम्ही १७ ते १८ खेळाडूंसह प्रवास करतो. पण यावेळी ऑस्ट्रेलियात जैव वातावरणात रहावे लागल्याने २५-३० खेळाडूंसह प्रवास केला. त्यामुळे सर्वोत्तम संघ निवडताना खुप मेहनत करावी लागली. ऑस्ट्रेलियात गोष्टी अशा घडल्या की सर्व ३० खेळाडूंना खेळावे लागले. यामुळे कोणत्या खेळाडूची कशी कामगिरी आहे हे कळाले. संघात टी नटराजन आणि सुंदर यांना देखील संधी मिळाली. वाचा- भविष्यात अशी वेळ येऊ शकते की भारतीय संघाचे दोन संघ मैदानावर उतरतील, असे रवी शास्त्री म्हणाले. इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी पुढील १९ जणांमधून अंतिम संघ निवडायचा आहे. भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, इशान किशन, युजवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया,टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bwKiZ2

पृथ्वीच्या नाबाद १८५ धावा; धोनी, विराट यांचा विक्रम मोडला

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर ()ने विजय हजारे ट्रॉफीत धमाकेदार फलंदाजी सुरूच ठेवली आहे. मुंबईचा कर्णधार पृथ्वीने सौराष्ट्र संघाविरुद्ध मंगळवारी झालेल्या क्वॉर्टर फायनल सामन्यात नाबाद १८५ धावा केल्या. या स्पर्धेतील त्याचे हे तिसरे शतक आहे. वाचा- लिस्ट एच्या या शतकी खेळीत पृथ्वीने भारताचा माजी कर्णधार () आणि भारताचा विद्यमान कर्णधार () यांचा विक्रम मागे टाकला. या दोघांच्या नावावर गेल्या काही वर्षापासून हा विक्रम होता. वाचा- पृथ्वीने १२३ चेंडूत २१ चौकार आणि ७ षटकारांसह नाबाद १८५ धावा केल्या. लिस्ट ए क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना करण्यात आलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. याआधी हा विक्रम भारताचा माजी कर्णधार धोनीच्या नावावर होता. त्याने २००५ साली श्रीलंकेविरुद्ध जयपूर येथे नाबाद १८३ धावा केल्या होत्या. हा विक्रम १० वर्ष त्याच्या नावावर होता. त्यानंतर विराट कोहलीने २०१२ साली पाकिस्तानने ढाका येथे १८३ धावा केल्या. वाचा- विजय हजारे स्पर्धेत पृथ्वीने आतापर्यंत एक द्विशतक आणि दोन शतकासह ५८९ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या कसोटीत दोन्ही डावात शून्यावर बाद झालेल्या पृथ्वीला संघातून वगळण्यात आले आहे. त्यानंतर तो मुंबईकडून विजय हजारे ट्रॉफीत खेळत आहे. या स्पर्धेतील त्याचे हे तिसरे शतक असून याआधी दिल्लीविरुद्ध नाबाद १०५, त्यानंतर पुड्डुचेरीविरुद्ध नाबाद २२७ तर आता नाबाद १८५ धावा केल्या आहेत. वाचा-


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3rw4IHb

सांगलीच्या स्मृती मानधनाने वर्ल्ड क्रिकेटमध्ये इतिहास घडवला; पुरुषांनाही करता आला नाही हा विक्रम

लखनऊ: सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेतील दुसऱ्या लढतीत विजय मिळून भारताने १-१ अशी बरोबरी केली. मंगळवारी झालेल्या दुसऱ्या लढतीत भारताने ९ विकेटनी विजय मिळवला. भारताची सलामीवीर ()ने नाबाद ८० धावा केल्या आणि संघाला मोठा विजय मिळून दिला. वाचा- आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये स्मृती मानधनाने असा विक्रम केला जो आतापर्यंत जगातील कोणत्याही क्रिकेटपटूला करता आली नाही. जागतीक क्रिकेटमध्ये महिलाच नाही तर पुरुषांच्या क्रिकेटमध्ये आजवर ही कामगिरी कोणी केली नाही. दुसऱ्या वडनेत भारताने प्रथम गोलंदाजी केली आणि आफ्रिकेला १५७ धावांवर रोखले. झूलन गोस्वामी आणि राजेश्वरी गायकवाडने घातक गोलंदाजी केली. झूलनने ४, राजेश्वरीने ३ विकेट घेतल्या. त्यानंतर फलंदाजीत स्मृतीने ८० तर पूनम राऊतने ६२ धावा केल्या आणि २८.४ षटकात विजय मिळवला. वाचा- या सामन्यात अर्धशतक करणाऱ्या स्मृतीने एक अनोखा विक्रम केला आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आजपर्यत कोणत्याही महिला अथवा पुरुष क्रिकेटपटूने धावांचा पाठलाग करताना सलग १० सामन्यात अर्धशतक झळकावले नाही. स्मृतीने फक्त महिलाच नाही तर पुरुषांच्या क्रिकेटमधील सर्व दिग्गजांना मागे टाकले आहे. सलग दहा सामन्यात १० अर्धशतक करणारी ती जगातील पहिली क्रिकेटपटू आहे. गेल्या १० सामन्यातील स्मृतीची कामगिरी ६७ विरुद्ध ऑस्ट्रेलिया- १५ मार्च २०१८ ५२ विरुद्ध ऑस्ट्रेलिया- १८ मार्च २०१८ ८६ विरुद्ध इंग्लंड- ६ एप्रिल २०१८ ५३* विरुद्ध इंग्लंड- १२ एप्रिल २०१८ ७३* विरुद्ध श्रीलंका- ११ सप्टेंबर २०१८ १०५ विरुद्ध न्यूझीलंड- २४ जानेवारी २०१९ ९०* विरुद्ध न्यूझीलंड- २९ जानेवारी २०१९ ७४ विरुद्ध वेस्ट इंडिज- ६ नोव्हेंबर २०१९ ८०* विरुद्ध दक्षिण आफ्रिका- ९ मार्च २०२१ वाचा- आफ्रिकेविरुद्ध स्मृतीने ६४ चेंडूत नाबाद ८० धावा केल्या. यात १० चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. तिने पहिल्या विकेटसाठी २२ तर दुसऱ्या विकेटसाठी १३८ धावांची भागिदारी केली. वाचा-


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ekEZxJ

आधी नाबाद १०५, मग नाबाद २२७ आणि आता नाबाद १८५; या खेळाडूला भारतीय संघात स्थान मिळणार का?

नवी दिल्ली: () २०२१च्या चौथ्या क्वार्टर फायनल सामन्यात मुंबईचा सलामीवीर ( )ने पुन्हा एकदा स्फोटक फलंदाजी केली. काही दिवसांपूर्वी पृथ्वीने या स्पर्धेत नाबाद द्विशतक झळकावले होते. आता पुन्हा त्याने नाबाद १८५ धावांची खेळी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. वाचा- मुंबई आणि सौराष्ट्र यांच्यात झालेल्या क्वार्टर फायनल सामन्यात पृथ्वीच्या या स्फोटक खेळीच्या जोरावर मुंबईने ९ विकेटनी विजय मिळवला आणि सेमीफायनलमध्ये स्थान मिळवले. या सामन्यात सौराष्ट्रने प्रथम फलंदाजी करत २८५ धावा केल्या होत्या. मुंबईने हे लक्ष्य ४१.५ षटकात ९ विकेट राखून पार केले. मुंबईच्या या विजयात पृथ्वी पुन्हा एकदा हिरो ठरला. वाचा- पृथ्वीने १२३ चेंडूत ७ षटकार आणि २१ चौकारांसह नाबाद १८५ धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट १५०.४१ इतका होता. तर दुसरा सलामीवीर यशस्वी जयस्वालने ७५ धावा केल्या. यशस्वी बाद झाल्यानंतर पृथ्वीने आदित्य तारेसह संघाला विजय मिळून दिला. आदित्यने नाबाद २० धावा केल्या. वाचा- ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या कसोटीत दोन्ही डावात शून्यावर बाद झालेल्या पृथ्वीला संघातून वगळण्यात आले आहे. त्यानंतर तो मुंबईकडून विजय हजारे ट्रॉफीत खेळत आहे. या स्पर्धेतील त्याचे हे तिसरे शतक असून याआधी दिल्लीविरुद्ध नाबाद १०५, त्यानंतर पुड्डुचेरीविरुद्ध नाबाद २२७ तर आता नाबाद १८५ धावा केल्या आहेत. वाचा- विजय हजारे स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर आता पृथ्वीला भारतीय संघात स्थान मिळते का हे पाहावे लागणार आहे. पृथ्वीचे आंतरराष्ट्रीय पदार्पण धमाकेदार झाले होते. त्याने पदार्पणाच्या कसोटीत शतक केले होते. पण त्यानंतर पृथ्वी फार प्रभाव टाकू शकला नाही.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3vaTs5i

Video : 'सेहवाग हे बघ, तु वाघ असशील पण तो ढाण्या वाघ आहे'

नवी दिल्ली : रायपूर येथे सध्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमधील सामने सुरू आहेत. या स्पर्धेत भारतीय संघाकडून , , आदी दिग्गज खेळाडू खेळत आहेत. करोनामुळे ही स्पर्धा गेल्या वर्षी स्थगित करण्यात आली होती. आता पुन्हा ती सुरू झाली आहे. भारताने वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि बांगलादेशचा पराभव करुन विजयाची हॅटट्रिक केली. वाचा- या स्पर्धेच्या निमित्ताने भारतीय संघातील माजी दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. सोशल मीडियावर त्याच्या खास शैलीत पोस्ट करणाऱ्या सेहवागने सचिन तेंडुलकरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. वाचा- इंस्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडिओ भारतीय संगाच्या ड्रेसिंग रुममधील आहे. सेहवाग सोबत सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंग देखील आहेत. या व्हिडिओत सेहवाग गंमतीने सचिनला म्हणतो, हा आमचा देव आहे. अजून देखील क्रिकेट खेळण्यास उत्सुक आहेत. सुई लावून मॅच खेळत आहे. सचिन तेव्हा फिजिओकडून थेरपी करत असतो. त्यानंतर सेहवाग कॅमेरा युवराज सिंगकडे नेतो. तेव्हा युवराज त्याला म्हणतो, हे बघ तु वाघ आहेस पण तो ढाण्या वाघ आहे. वाचा- युवीच्या या डायलॉगवर सर्वजण हसू लागतात. सेहवाग पुन्हा कॅमेरा सचिनकडे घेऊन येतो आणि त्याला काही प्रतिक्रिया देणार का विचारतो. त्यावर सचिन म्हणतो की तुझ्या समोर कोणाला प्रतिक्रिया देण्याची संधी मिळते का? पाहा व्हिडिओ- वाचा- भारतीय संघाने गेल्या आठवड्यात बांगलादेशचा १० विकेटनी पराभव केला होता. या सामन्यात सेहवागने ३५ चेंडूत नाबाद ८० धावा केल्या होत्या. ज्यात ५ षटकार आणि १० चौकारांचा समावेश होता. तर सचिनने २६ चेंडूत ५ चौकारांसह नाबाद ३३ धावा केल्या होत्या. वाचा-


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qyWVHs

सलग दुसऱ्या महिन्यात ICC पुरस्कारात भारतीय खेळाडूने मारली बाजी, गेल्या महिन्यात पंत तर या महिन्यात...

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने २०२१च्या सुरूवातीला प्रत्येक महिन्याला सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला पुरस्कार देण्याची घोषणा केली होती. जानेवारी महिन्यापासून सुरू झालेल्या या पुरस्काराचा पहिला मानकरी ऋषभ पंत ठरला होता. आता फेब्रुवारी महिन्याचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. वाचा- आयसीसीने मंगळवारी ९ मार्च रोजी पुरुषांच्या विजेत्याची घोषणा केली. फेब्रुवारी महिन्यात हा पुरस्कार भारताचा फिरकीपटू ( )ला जाहीर झाला आहे. तर महिलांमध्ये इंग्लंडच्या Tammy Beaumont ने हा पुरस्कार जिंकला. आयसीसीच्या या पुरस्कारांमध्ये सलग दुसऱ्या महिन्यात भारतीय खेळाडूने बाजी मारली आहे. वाचा- इंग्लंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत आर अश्विनने शानदार कामगिरी केली होती. अश्विनने संपूर्ण मालिकेत ३२ विकेट घेतल्या होत्या. तर एक शतक देखील झळकावले होते. त्याने इंग्लंडचा कर्णधार जो रूटला मागे टाकत हा पुरस्कार पटकावला. या पुरस्काराच्या शर्यतीत रुट देखील होता. फक्त या महिन्यात नाही तर गेल्या महिन्यात देखील रूटचे नाव संभाव्या खेळाडूंमध्ये होते तेव्हा पंतने बाजी मारली होती. वाचा- वाचा- फेब्रुवारी महिन्यात इंग्लंडविरुद्ध झालेल्या ३ कसोटीत अश्विनने १ शतक आणि २४ विकेट घेतल्या. या मालिकेत त्याने सर्वात वेगाने ४०० विकेट घेण्याचा जगातील दुसरा गोलंदाज होण्याचा मान मिळवला. मालिकेतील धमाकेदार कामगिरीमुळे त्याला मालिकावीर पुरस्कार देखील मिळाला.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/38qPZ9g

जसप्रीत बुमराहच्या लग्नाची तारीख ठरली; संजना गणेशन सोबत गोव्यात करणार विवाह!

मुंबई: भारतीय संघातील जलद गोलंदाज (Jasprit Bumrah) लवकरच लग्न करणार आहे. भारतीय क्रिकेट विश्वात गेल्या काही दिवसांपासून त्याच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. पण जसप्रीत कोणाशी लग्न करणार आहे याबाबत सस्पेंस अद्याप संपलेला नाही. प्रथम असे वृत्त आले होते की तो दक्षिण चित्रपटात काम करणारी अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन हिच्याशी लग्न करणार आहे. पण आता तो मॉडेल आणि स्पोर्ट्स अँकर () हिच्याशी लग्न करणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. इतक नव्हे तर या दोघांचा विवाह गोव्यात होणार आहे. बुमराह आणि गणेशन यांना कधीच एकत्र मीडियाने पहिले नाही. या दोघांच्या लग्नाचे वृत्त खरे ठरले तर मीडियापासून त्यांनी ही गोष्टी इतके दिवस यशस्वपणे लवून ठेवली असेच म्हणावे लागले. वाचा- मीडिया रिपोर्ट्सनुसार बुमराह आणि संजना १४ किंवा १५ मार्च रोजी गोव्यात विवाह करतील. बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीतून माघार घेतली होती. त्यानंतर टी-२० आणि वनडे मालिकेसाठी त्याला विश्रांती देण्यात आली आहे. बुमराहने चौथ्या कसोटीतून माघार घेतल्यापासून त्याच्या लग्नाची चर्चा सुरू झाली. संजना एक स्पोर्ट्स अँकर आहे. या दोघांना कधीच सार्वजनिक आयुष्यात एकत्र पहिले गेले नाही. बीसीसीआयच्या एका पुरस्कार सोहळ्यात संजनाने बुमराहची मुलाखत घेतली होती. आता तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बुमराहच्या या विवाहात भारतीय संघातील खेळाडूंना उपस्थित राहता येणार नाही. कारण टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिका खेळत असेल आणि त्यांना बायो बबलमधून बाहेर येता येणार नाही. वाचा- पुण्याची संजना गणेशन ज्या मीडिया रिपोट्समध्ये बुमराह हा संजना गणेशन सोबत लग्न करणार असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर संजना बद्दल चाहत्यांनी सर्च करण्यास सुरूवात केली. संजना मॉडेल आणि क्रीडा अँकर आहे. तिने क्रिकेट, बॅडमिंटन आणि फुटबॉलसह अनेक इव्हेंट्स होस्ट केले आहेत. २०१९ साली झालेला वनडे वर्ल्डकप तिने भाारताकडून होस्ट केला होता. वाचा- संजनाचा जन्म ६ मे १९९१ रोजी महाराष्ट्रातील पुणे शहरात झाला होता. ती आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्सचा शो नाइट क्लबची देखील होस्ट होती. इतकच नव्हे तर संजनाने आयपीएल लिलावाचे होस्ट म्हणून काम केले. तिने पुण्यातून इंजिनिअरिंगची डिग्री घेतली होती त्यानंतर मॉडेलिंग क्षेत्रात प्रवेश केला. २०१४च्या मिस इंडियाच्या फायनलपर्यंत ती पोहोचली होती.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Oj2bBT

टी-२० मालिकेआधी भारतीय संघ व्यवस्थापनासमोर मोठी अडचण; अंतिम ११ साठी १९ जणांमध्ये स्पर्धा

अहमदाबाद: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ आता पाच सामन्यांची खेळणार आहे. कसोटी मालिका ३-१ने जिंकल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. पण आता टी-२० मालिकेच्या आधी भारतीय संघासमोर एक मोठी अडचण निर्माण झाली आहे. टी-२० मालिकेसाठी अंतिम ११ मध्ये कोणत्या खेळाडूंना संधी द्यायची असा मोठा प्रश्न भारतीय संघ व्यवस्थापनासमोर निर्माण झाला आहे. या वर्षाच्या अखेरीस भारतात टी-२० वर्ल्डकप होणार असून त्याच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे. अंतिम संघ निवडण्याचे आव्हान व्यवस्थापनासमोर आहे. कारण ११ जागासाठी १९ खेळाडू उपलब्ध आहेत. यातील काही स्थानासाठी दोन दोन खेळाडूंची दावेदारी आहे. वाचा- शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची निवड कशी होते, हे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, कर्णधार विराट कोहली आणि गोलंदाज प्रशिक्षक भरत अरुण यांच्यावर ठरणार आहे. प्रथम मालिका विजय मिळून मग प्रयोग करण्याचा विचार होऊ शकतो. अशा परिस्थितीत मालिका विजयानंतर कमी अनुभव असलेल्या खेळाडूंना नंतर संधी दिला जाऊ शकते. वाचा- भारतीय संघासाठी मालिकेचा निकाल देखील महत्त्वाचा ठरणार आहे. पहिल्या तीन लढतीसाठी एकच संघ असू शकतो. संघात ऋषभ पंतला स्थान मिळण्याची शक्यता आहे. पंतचा समावेश म्हणजे लोकेश राहुलला संधी मिळणार नाही. सलामीवीर म्हणून शिखर धवन आणि रोहित शर्मा हीच जोडी कायम असेल. काही महिन्यांपूर्वी राहुलकडे सलामीचा फलंदाच आणि विकेटकिपर म्हणून पाहिले जात होते. पण आता या दोन्ही जागांसाठी स्पर्धा वाढली आहे. वाचा- धवनने विजय हजारे ट्रॉफीत १५०च्या जवळ धावा केल्या होत्या. तर रोहित बाबत चर्चा करण्याची गरज नाही. राहुलला संघात सलामीवीर म्हणून संधी दिली तर शिखरला मधळ्या फळीत खेळवावे लागले. राहुल आयपीएलमधील आघाडीचा फलंदाज आहे. अशा परिस्थितीत विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर त्यानंतर पंत पाचव्या आणि मग हार्दिक पंड्या सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतात. अशा स्थितीत फक्त चौथ्या क्रमांकाची जागी शिल्लक आहे. या जागेसाठी श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांच्या स्पर्धा आहे. वाचा- गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार मोठ्या कालावधीनंतर संघात परत येतोय. त्याची स्पर्धा दीपक चाहर आणि शार्दुल ठाकूर यांच्याशी असेल. अनुभव आणि डेथ ओव्हरमधील उत्तम गोलंदाजीच्या जोरावर कुमार पुढे असेल. पण त्याने मुश्ताक अली टी-२० वगळता फार क्रिकेट खेळले नाही. फिरकीपटूंमध्ये युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल ही जोडी संघात दिसू शकते. त्याच बरोबर टी नटराजन आणि नवदीप सैनी यांना संधी मिळते का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. संघात सर्वोत्तम खेळाडू आहेत आणि या सर्वांना खेळवण्याचे आव्हान संघ व्यवस्थापनापुढे असेल. इंग्लंडविरुद्ध १२ मार्च रोजी पहिली टी-२० लढत होणार आहे. ही संपूर्ण मालिका अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3kXX8CU

Monday, March 8, 2021

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे ठिकाण बदलले; फायनल लॉर्ड्सवर होणार नाही तर...

नवी दिल्ली: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल ( final ) १८ ते २२ जून या काळात होणार आहे. ही फायनल भारत आणि न्यूझीलंड ( ) यांच्यात होणार आहे. नियोजित कार्यक्रमानुसार ही लढत लॉर्ड्सवर होणार होती. पण आता त्याचे ठिकाण बदलण्यात आले आहे. वाचा- जागतिक कसोटी अजिंक्यपदाची अंतिम लढत आता साउथम्प्टन येथील रोज बाउल येथे होणार आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. करोना व्हायरसची परिस्थिती लक्षात घेऊन नव्या ठिकाणाची निवड करण्यात आली आहे. हे मैदाना हॉटेलच्या जवळ असल्याने त्याची निवड करण्यात आली आहे. वाचा- भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत ३-१ने विजय मिळवला. भारताने अंतिम कसोटीत एक डाव आणि २५ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचे तिकिट मिळवले. वाचा- असे... भारतीय संघातील फिरकीटपटू आर अश्विनच्या मते ही अंतिम लढत ३ सामन्यांची झाली असती तर त्याचे महत्त्व आणखी वाढले असते. ही फायनल मॅच खेळणे हे वर्ल्ड कप फायनल खेळण्यासारखे आहे. इंग्लंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत अश्विनने शानदार कामगिरी केली होती. त्याने मालिकेत ३२ विकेट घेतल्या, यासाठी त्याचा मालिकावीर म्हणून गौरव करण्यात आला. तर अक्षर पटेलने देखील पदार्पणाच्या कसोटीत २७ विकेट घेतल्या. वाचा- संधी अखेरच्या कसोटीत ऋषभ पंतने शतक झळकावले होते. त्याने केलेल्या १०१ धावांमुळे भारताला आघाडी घेता आली. पंतला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2MX5fmB

भारतीय खेळाडूने शतकाचा नवा रेकॉर्ड केला; विराटच्या विक्रमाशी केली बरोबरी

नवी दिल्ली: बीसीसीआयने आयोजित केलेल्या देशांतर्गत वनडे स्पर्धा ( ) स्पर्धेत सोमवारी नवा विक्रम नोंदवला. कर्नाटकचा सलामीवीर ()ने केरळविरुद्ध झालेल्या सामन्यात १०१ धावांची खेळी केली. त्याच्या या शतकासह स्पर्धेतील शतकांच्या विक्रमाचा इतिहासच बदलला. वाचा- देवदत्तने या स्पर्धेत सोमवारी झळकावलेले सलग चौथे शतक ठरले. आजपर्यंत कोणत्याही भारतीय फलंदाजाला अशी कामगिरी करता आली नाही. केरळविरुद्धच्या सामन्यात कर्नाटकने प्रथम फलंदाजीकरत ३३८ धावा केल्या. यात कर्णधार रविकुमार समर्थने १९२ धावांचे योगदान दिले. तर दुसरा सलामीवीर देवदत्तने १०१ धावा केल्या. ही त्याचे स्पर्धतील सलग चौथ्या शतक ठरले. या शतकासह त्याने विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली. वाचा- या स्पर्धेत देवदत्तने अर्धशतकाने सुरुवात केली होती. त्यानंतर गेल्या चार सामन्यात त्याने शतक केले. दुसऱ्या लढतीत त्याने बिहार विरुद्ध ९७ धावा केल्या होत्या. त्यानंतर उडिसाविरुद्ध १५२, केरळविरुद्ध नाबाद १२६, रेल्वेविरुद्ध नाबाद १४५ आणि आज पुन्हा केरळविरुद्ध १०१ धावा करून शतकांचा चौकार मारला. या सामन्यात कर्नाटकने ८० धावांनी विजय मिळवला. देवदत्तने सहा सामन्यात १६८.२५च्या सरासरीने ६७३ धावा केल्या आहेत. त्यात ४ शतक आणि २ अर्धशतक आहेत. वाचा- असे... एका विजय हजारे ट्रॉफीत सर्वाधिक शतकांच्याबाबत देवदत्तने आता भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. विटारने २००८-०९ साली दिल्लीकडून खेळताना चार शतक केली होती. देवदत्तने एका स्पर्धेत चार शतक करत विराटशी बरोबरी केली. देवदत्त आयपीएलमध्ये विराट कोहली नेतृत्व करत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळतो. गेल्या वर्षी त्याने RCB कडून धमाकेदार कामगिरी केली होती. आता देखील तो शानदार फॉर्ममध्ये दिसत असल्याने RCBसाठी आनंदाची बातमी आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3kU3vXK

BCCI जाहीर करणार दोन संघ; एक संघ खेळणार WTC तर दुसरा...

मुंबई: भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका ३-१ने जिंकल्यामुळे त्यांनी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला. ही फायनल लॉर्ड्स मैदानावर १८ ते २२ जून या काळात होणार आहे. तर याच काळात स्पर्धेचे आयोजन होणार आहे. गेल्या वर्षी करोना व्हायरमुळे आशिया कप स्पर्धा स्थिगत करण्यात आली होती. पण या वर्षी देखील भारतीय संघामुळे ती स्थगित करावी लागू शकते. कारण आशिया कप देखील जून- जुलै महिन्यात होणार आहे. पण जर आशिया कप रद्द झाला नाही तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला या स्पर्धेसाठी दुसरा संघ पाठवावा लागू शकतो. आशियाई क्रिकेट काउंसिलचे अध्यक्षपद सध्या जय शहाकडे आहे. वाचा- न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या WTC फायनलमध्ये खेळण्यासाठी भारतीय संघाला जूनच्या पहिल्या आठवड्यात इंग्लंडसाठी रवाना झाले पाहिजे. त्यामुळे आयपीएल २०२१ संपल्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंना इंग्लंडसाठी रवाा व्हावे लागले. कारण तेथे खेळाडूंना १४ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण करावा लागले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लंडनमधील लॉर्ड्स नव्हे तर साउथप्टन येथील एजेस बाउल स्टेडियम या मैदानाचे आयोजन करू शकते. कारण या स्टेडियमच्या परिसरात हॉटेलची सुविधा आहे. यामुळे करोना व्हायरसच्या दृष्टीने बायो बबल वातावरण तयार करण्यासाठी आयसीसी आणि इसीबीला सोईचे ठरेल. वाचा- पण या सर्वात बीसीसीआयला एका अडचणीला सामोरे जावे लागू शकते. आशियाई क्रिकेट संघटनेने जूनच्या अखेरीस ही स्पर्धा आयोजित करण्याचे ठरवले आहे. अशात भारतीय संघातील प्रमुख खेळाडू विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, मोहम्मद शमी, ऋषभ पंत हे खेळाडू उपलब्ध नसतील. वर्ल्ड चॅम्पियनशिपनंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका देखील होणार आहे. वाचा- मैदानावर सर्वाधिक सामने या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी बीसीसीआयला लंकेत होणाऱ्या आशिया कपसाठी दुसरा संघ पाठवावा लागेल. पण यात मोठे खेळाडू नसतली. हा संघ आयपीएल २०२१च्या कामगिरीच्या आधारावर तयार केली जाऊ शकते. भारताकडे या शिवाय कोणता मार्ग नसेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2OtqEUW

IPL 2021 Chennai Super Kings Schedule: चेपॉक नव्हे तर हे असेल धोनीचे होम ग्राउंड, पाहा CSKचे वेळापत्रक

मुंबई: आयपीएलच्या १४व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. स्पर्धेची सुरूवात ९ एप्रिलपासून होणार असून पहिली लढत गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू यांच्यात होईल. आयपीएलमधील मुंबई इंडियन्स नंतरचा सर्वात यशस्वी संघ म्हणजे ( ) होय. वाचा- धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जची पहिली लढत १० एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणार आहे. आयपीएलच्या प्रत्येक हंगामामध्ये किमान प्ले ऑफमध्ये जाणाऱ्या या संघाला गेल्या वर्षी मात्र मोठे अपयश आले होते. चेन्नईचा संघ २०२० मध्ये फक्त १२ गुणांसह ७व्या स्थानावर होता. त्यंना १४ पैकी फक्त ६ सामने जिंकला आले होते. आता गेल्या वर्षीच्या आठवणी विसरून चेन्नई एक नवी सुरुवात करण्यास उत्सुक असेल. वाचा- चेन्नईच्या लढती १० एप्रिल- दिल्ली कॅपिटल्स १६ एप्रिल- पंजाब किंग्ज १९ एप्रिल- राजस्थान रॉयल्स २१ एप्रिल- कोलकाता नाइट रायडर्स २५ एप्रिल- रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू २८ एप्रिल- सनरायजर्स हैदराबाद ०१ मे- मुंबई इंडियन्स ०५ मे- राजस्थान रॉयल्स ०७ मे- सनरायजर्स हैदराबाद ०९ मे- पंजाब किंग्ज १२ मे- मुंबई इंडियन्स २१ मे- दिल्ली कॅपिटल्स २३ मे- रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू वाचा- मैदानावर सर्वाधिक सामने या वर्षी कोणत्याही संघाला घरच्या मैदानावर खेळता येणार नसल्याने चेन्नईचा संघ देखील चेपॉकवर खेळू शकणार नाही. चेन्नई संघाचे सर्वाधिक ५ सामने मुंबईतील वानखेडेवर होतील. चार लढती दिल्ली, ३ लढती बेंगळुरू आणि दोन लढती कोलकातामध्ये होणार आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qrRfiy

Sunday, March 7, 2021

Mumbai Indians full Schedule: मुंबई इंडियन्सला जेतेपदाचे षटकार मारण्याची संधी, या मैदानावर खेळणार सर्वाधिक सामने

मुंबई: आयपीएलच्या १४व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या स्पर्धेतील सर्व लढती देशातील ६ शहरात होणार आहे. करोना व्हायरसमुळे २०२० चे आयोजन युएईमध्ये करण्यात आले होते. आता ही स्पर्धा पुन्हा एकदा भारतात आली आहे. स्पर्धेतील पहिली लढत ९ एप्रिल रोजी चेन्नईत गतविजेता आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात होणार आहे. आयपीएलचे सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स यावर्षी जेतेपदाचा षटकार मारण्यासाठी मैदानात उतरेल आणि त्यांची पहिली लढत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्याशी होणार आहे. वाचा- रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएलचा चषक उंचवला आहे. मुंबईने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० साली विजेतेपद मिळवले होते. जर त्यांनी या वर्षी विजेतेपद मिळवले तर ती हॅटट्रिक ठरेल. आयपीएल २०२१ची पहिली लढत ९ एप्रिल रोजी चेन्नईत होईल. ही लढत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात होणार आहे. तर जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्लेऑफच्या लढती आणि ३० मे रोजी फायनल मॅच होणार आहे. वाचा- मुंबई इंडियन्सचे सामने ९ एप्रिल- विरुद्ध RCB- चेन्नई १३ एप्रिल- विरुद्ध KKR- चेन्नई १७ एप्रिल- विरुद्ध SRH- चेन्नई २० एप्रिल- विरुद्ध DC- चेन्नई २३ एप्रिल- विरुद्ध PBKS-चेन्नई २९ एप्रिल- विरुद्ध RR- दिल्ली १ मे- विरुद्ध CSK- दिल्ली ४ मे- विरुद्ध SRH- दिल्ली ८ मे- विरुद्ध RR- दिल्ली १० मे- विरुद्ध KKR- बेंगळुरू १३ मे- विरुद्ध PBKS- बेंगळुरू १६ मे- विरुद्ध SK- बेंगळुरू २० मे- विरुद्ध RCB- कोलकाता २३ मे- विरुद्ध DC- कोलकाता मुंबईचा संघ चेन्नई सुपर किंग्ज संघाचे घरचे मैदान असलेल्या चेपॉक मैदानावर सर्वाधिक पाच सामने खेळणार आहे. तर दिल्लीत ४, बेंगळुरूत ३ आणि कोलकातामध्ये दोन लढती खेळणार आहे. मुंबई इंडियन्सच्या २९ एप्रिल, १३ मे आणि २३ मे रोजीच्या लढती या दुपारी ३.३० ला सुरू होतील. अन्य सर्व लढती संध्याकाळी ७.३० ला असतील.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3v6B6SW

ipl 2021 schedule आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक: स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच असे घडणार

मुंबई: आयपीएलच्या गव्हर्निंग काउंसिलने रविवारी १४व्या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केली. करोना व्हायरसचे रुग्ण वाढत असले तरी ही स्पर्धा या वर्षी भारतात होणार आहे. जवळ जवळ दोन वर्षांनी भारतात होत आहे. या हंगामाचे सर्व सामने अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता या शहरत होणार आहेत. वाचा- मैदानावर सर्वाधिक सामने आयपीएल २०२१ची पहिली लढत ९ एप्रिल रोजी चेन्नईत होईल. ही लढत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात होणार आहे. तर जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्लेऑफच्या लढती आणि ३० मे रोजी फायनल मॅच होणार आहे. साखळी फेरीत प्रत्येक संघ चार मैदानावर सामने खेळतील. ५६ साखळी सामन्यातील प्रत्येकी १० सामने चेन्नई, कोलकाता, मुंबई आणि बेंगळूरू येथे होणार आहेत. तर अहमदाबाद आणि दिल्ली येथे प्रत्येकी ८ सामने होतील. या वर्षी होणाऱ्या आयपीएलचे सर्वात खास गोष्टी म्हणजे कोणताही संघ घरच्या मैदानावर एकही सामना खेळणार नाही. त्यामुळे सर्व संघांच्या लढती या न्यूट्रल ठिकाणी होतील. असे आहे IPL 2021 वेळापत्रक


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3eoQVih

Saturday, March 6, 2021

इतक्या विकेट घेतल्या की वर्ल्ड रेकॉर्ड तुटला; भारतीय गोलंदाजाने केली कमाल

अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धच्या चार सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीत भारताचा पराभव झाला होता. या पहिल्या लढतीच्या काही तास आधी दुखापतीमुळे संघाबाहेर झाला. त्यानंतर चेन्नईत झालेल्या दुसऱ्या कसोटीत अक्षरने पदार्पण केले आणि त्यानंतर जे झाले त्याची नोंद फक्त भारतीय नव्हे तर जागतिक क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहली जाणार आहे. वाचा- अक्षरने पुढील तीन कसोटी सामन्यात धमाकेदार फलंदाजी केली. जागतीक क्रिकेटमध्ये त्याचे पदार्पण स्टार प्रमाणे झाले. त्याने ३ सामन्यात इतक्या विकेट घेतल्या की वर्ल्ड रेकॉर्ड मोडला. वाचा- वाचा- इंग्लंडविरुद्धच्या ३ सामन्यात अक्षरने इतक्या विकेट घेतल्या की पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अक्षरने स्वत:च्या नावावर केला. अक्षरने ३ सामन्यातील ६ डावात २७ विकेट घेतल्या. एका मालिकेत सर्वाधिक विकेट घेणाण्याचा दिलीप दोषी यांच्या विक्रमाशी अक्षरने बरोबरी केली. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९७९ साली ६ कसोटी मालिकेत ही कामगिरी केली. पण अक्षरने फक्त ३ कसोटीत त्यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. वाचा- अक्षरने पदार्पणाच्या मालिकेत सर्वाधिक विकेट घेण्याचा अजंता मेंडिस याचा २६ विकेटचा विक्रम मागे टाकला. मेंडिसने भारताविरुद्ध २६ विकेट घेतल्या होत्या. पदार्पणात सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज (३ पेक्षा अधिक सामने) अक्षर पटेल- २७ विकेट अजंता मेंडिस- २६ विकेट एलेक बेड्सर- २४ विकेट आर अश्वि- २२ विकेट स्टुअर्ट क्लार्क- २० विकेट वाचा- चौथ्या कसोटीत इंग्लंडचा एक डाव आणि २५ धावांनी पराभव करत भारतीय संघाने मालिका ३-१ जिंकली. या मालिका विजया बरोबर भारताने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल (world test championship final)मध्ये प्रवेश केला.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bk4n4L

Congratulations Team India: जोरदार जिंकला; भारताच्या विजयावर राष्ट्रपती ते सचिन पाहा काय म्हणाले...

मुंबई : आर अश्विन आणि अक्षर पटेल यांच्या फिरकीच्या जाळ्यात इंग्लंडचे फलंदाज पुन्हा एकदा अडकले. इंग्लंडने चौथा कसोटी सामना एक डाव आणि २५ धावांनी तर मालिका ३-१ने गमावली. या विजयासह भारताने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला. जूनमध्ये होणाऱ्या फायनलमध्ये भारताची लढत न्यूझीलंडविरुद्ध होईल. वाचा- भारतीय संघाच्या या विजयावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, , या खेळाडूंनी खास अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. वाचा- विजयाबद्दल अभिनंदन आणि फायनलसाठी शुभेच्छा- राष्ट्रपती फायनलासाठी शुभेच्छा, जोरदार जिंकला- सचिन वाचा- विजयाचे श्रेय युवा खेळाडूंचे- गौतम गंभीर बीसीसीआय अध्यक्ष म्हणाले... वाचा- सेहवागने दिली त्याच्या स्टाइलने दिल्या शुभेच्छा शिखर धवन म्हणाला.. वाचा- चषकासह विराट आयसीसीने प्रोफाइल फोटो बदलला


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qjZ9KF

मोठी घोषणा लवकरच; या तारखेपासून सुरू होणार IPL , फायनल मॅच ३० मे रोजी!

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत शानदार विजय मिळवल्याने आनंदात असलेल्या चाहत्यांना आणखी एक चांगली बातमी मिळणार आहे. या वर्षी होणाऱ्या आयपीएलचा १४वा हंगाम ९ एप्रिल ते ३० मे या काळात होण्याची शक्यता आहे. वाचा- आयपीएलच्या गव्हर्निंग काउंसिलच्या बैठकीत या तारखांना परवानगी दिली तर स्पर्धा या काळात होऊ शकते. अर्थात सामने कोणत्या मैदानावर आणि त्याच्या तारखा याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. या बाबत अंतिम निर्णय पुढील आठवड्यात होऊ शकतो. वाचा- नाव न सांगण्याच्या अटीवर गव्हर्निंग काउंसिलच्या एका सदस्याने ही माहिती दिली. या वर्षी ९ एप्रिलपासून आयपीएल सुरू होऊ शकते. आम्ही अद्याप बैठकीचा दिवस निश्चित केला नाही. पण ती पुढील आठवड्यात होऊ शकते. ही स्पर्धा ९ एप्रिल ते ३० मे या काळात भरवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. वाचा- बीसीसीआयमधील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही अंतिम निर्णय घेतला आहे. आयपीएल नऊ एप्रिल ते ३० मे या काळात होईल. पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत त्याला औपचारिक मंजुरी मिळेल. करोना व्हायरसमुळे बीसीसीआयने चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, दिल्ली, मुंबई आणि अहमदाबाद या शहरात सामने आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. वाचा- यातील मुंबई होणाऱ्या सामन्यांसाठी परवानगी घ्यावी लागले. कारण गेल्या काही दिवसात मुंबई आणि महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. तर कोलकातामधील सामने देखील विधानसभा निवडणुकीचा विचार करून निश्चित केले जातील.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3rp2wkP

अश्विनने इतिहास घडवला; कपिल देव यांच्यासह दिग्गजांना मागे टाकत केला हा विक्रम

अहमदाबाद: इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाने ४ सामन्यांची क्रिकेट मालिका ३-१ने जिंकली. भारताच्या या मालिका विजयात सर्वात महत्त्वाचा खेळाडू ठरला तो होय. अश्विनने या मालिकेत १८९ धावा केल्या आणि ३२ विकेट घेण्याचा पराक्रम केला. वाचा- अश्विनच्या या शानदार ऑल राउंड कामगिरीसाठी त्याला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला. चार सामन्यांच्या कसोटीत ३० पेक्षा अधिक विकेट दोन वेळा घेणार तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. याआधी २०१५ साली दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध त्याने चार सामन्यांच्या मालिकेत ३१ विकेट घेतल्या होत्या. भारताकडून बिशन सिंह बेदी, हरभजन सिंग, बीएस चंद्रशेखर आणि कपिल देव यांनी कसोटी मालिकेत अशी कामगिरी केली होती. पाहा अश्विन काय म्हणाला... वाचा- ... या मालिकेत अश्विनने तिसऱ्या कसोटीत जोफ्रा आर्चरची विकेट गेत ४००वी कसोटी विकेट मिळवली होती. ४०० विकेट घेणारा तो चौथा भारतीय गोलंदाज ठरला होता. या मालिकेतील दमदार कामगिरीचा पुरस्कार देखील त्याला मिळाला. गोलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. वाचा- चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात भारताकडून अक्षर पटेल आणि आर अश्विन यांनी प्रत्येकी पाच विकेट घेतल्या. या सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात २०५ धावा केल्या. त्यानंतर पंतचे शतक आणि सुंदरच्या नाबाद ९६ धावांच्या जोरावर भारताने १६० धावांची आघाडी घेतली. या आघाडीनंतर टीम इंडियाने इंग्लंडचा दुसरा डाव फक्त १३५ धावात गुंडाळला आणि एक डाव २५ धावांनी विजय मिळवला. वाचा-


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bkwRLO

WTC Final तारीख राखून ठेवा! लॉर्ड्सवर या दिवशी होणार भारत vs न्यूझीलंड महमुकाबला

अहमदाबाद: चौथ्या कसोटीत इंग्लंडचा एक डाव आणि २५ धावांनी पराभव करत भारतीय संघाने मालिका ३-१ जिंकली. या मालिका विजया बरोबर भारताने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल ()मध्ये प्रवेश केला. भारताने WTCच्या गुणतक्त्यात अव्वल स्थानी झेप घेतली. वाचा- भारताला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी चौथ्या कसोटीत ड्रॉ देखील पुरेसा होता. पण अक्षर पटेला आणि आर अश्विन यांच्या फिरकीच्या जोरवर भारताने शानदार विजय मिळवला. भारताच्या या विजयामुळे ऑस्ट्रेलियाचे WTC फायनल खेळण्याचे स्वप्न भंगले. वाचा- वाचा- आता क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या मैदानावर भारत आणि न्यूझीलंड ( ) यांच्यात फायनल मॅच होणार आहे. हा सामना १८ ते २२ जून या कालावधीत होणार असून, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याची संधी आहे. वाचा- इंग्लंडवरील विजयासह भारताने कसोटी क्रमवारीत देखील अव्वल स्थानी झेप घेतली. भारताने न्यूझीलंडला मागे टाकत अव्वल स्थान स्थान मिळवले. क्रमवारीत भारताचे १२२ गुण झालेत. तर न्यूझीलंड ११८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ekNh97

आता लक्ष्य WTCचे विजेतेपद; न्यूझीलंडविरुद्ध लॉर्ड्समध्ये भिडणार टीम इंडिया

अहमदाबाद: इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पराभव झाल्यानंतर आता भारतीय संघासमोर एक अवघड आव्हान होते. हे आव्हान म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याचे होय. भारतीय संघाने पहिल्या सामन्यातील २२७ धावांच्या पराभवानंतर सलग तीन सामन्यात विजय मिळवत मालिका तर ३-१ने जिंकलीच त्याच पाठोपाठ WTCच्या फायनलमध्ये प्रवेश केला. वाचा- वाचा- वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात भारतीय संघ ७२.२ टक्क्यांसह अव्वल स्थानी पोहोचला. तर इंग्लंडचा संघ चौथ्या स्थानावर घसरला त्यांची टक्केवारी ६१.४ टक्के इतकी राहिली. न्यूझीलंडचा संघ ७०.० टक्क्यांसह दुसऱ्या तर ऑस्ट्रेलियाचा संघ ६९.२ टक्क्यांसह तिसऱ्या स्थानावर राहिला. जर इंग्लंडने चौथी कसोटी जिंकली असती तर ऑस्ट्रेलियाला फायनलचे तिकीट मिळाले असते. पण भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या स्वप्नांवर पाणी फेरले. वाचा- वाचा- वाचा- आता भारतीय संघ क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघ सर्वात यशस्वी ठरला. सर्व अर्थाने टीम इंडिया अव्वल ठरली. विजयाच्या टक्केवारीत, गुणांच्या बाबत भारत ५२० गुणांसह अव्वल राहिला. तर या स्पर्धेच्या कालावधीत भारताने सर्वाधिक १२ कसोटी सामने जिकंले, चार पराभव तर एक सामना ड्रॉ केला. सर्वाधिक विजयाबाबत इंग्लंडचा संघ ११ विजयासह दुसऱ्या स्थानावर ठरला. गुणांच्या बाबत देखील ४४२ गुणांसह ते दुसऱ्या स्थानावर आहेत. पण आयसीसीने नियम बदलल्यामुळे ते चौथ्या स्थानावर घसरले.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cbtQwN

भारताची विजयाची हॅटट्रिक; चौथ्या कसोटी इंग्लंडचा पराभव करत WTCच्या फायनलमध्ये दिमाखदार प्रवेश

अहमदाबाद: इंग्लंडविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत सलग तिसऱ्या सामन्यात विजय मिळून भारतीय संघाने मालिका ३-१ने जिंकली. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिमयवर झालेल्या चौथ्या सामन्यात भारताने एक डाव आणि २५ धावांनी विजय मिळवला. वॉशिंग्टन सुंदरच्या शानदार नाबाद ९७ धावा आणि फिरकीपटूंची धमाकेदार कामगिरी लक्ष्यवेधी ठरली. दुसऱ्या डावात आणि यांनी प्रत्येकी पाच विकेट घेतल्या. इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका ३-१ ने जिंकत भारतीय संघाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये दिमाखदार प्रवेश केला आहे. जूनमध्ये लॉर्ड्स मैदानावर होणाऱ्या फायनलमध्ये भारत विजेतेपदासाठी न्यूझीलंडविरुद्ध खेळले. कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने कालच्या ७ बाद २९४ धावांच्या पुढे खेळण्यास सुरूवात केली. वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल मैदानावर होते. या दोघांनी आठव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून संघाला पहिल्या डावात १५०च्या पुढे आघाडी मिळून दिले. पटेल अर्धशतकाच्या आणि सुंदर शतकाच्या जवळ आला असता ही जोडी फुटली. एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात पटेल ४३ धावांवर बाद झाला. त्यानंतर इशांत शर्मा शून्यावर बाद झाला आणि त्याच ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर मोहम्मद सिराजला बाद करत बेन स्टोक्सने भारताचा ३६५ धावांवर ऑल आउट केला. यात सुंदरचे शतक फक्त चार धावांनी हुकले. ने १७४ चेंडूत १० चौकार आणि १ षटकारासह ५५.१७च्या स्ट्राइक रेटने नाबाद ९६ धावा केल्या. भारताने पहिल्या डावात १६० धावांची आघाडी घेतली. इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरूवात खराब झाली. अश्विनने क्रॉली आणि जॉनी बेयरस्टोला बाद करत इंग्लंडची अवस्था २ बाद १० अशी केली. त्यानंतर अक्षर पटेलने डॉमनिक सिबलीला माघारी पाठवत इंग्लंडला तिसरा धक्का दिला. तर अश्विनने पुन्हा एकदा बेन स्टोक्सला बकरा केले. त्याने स्टोक्सला शून्यावर माघारी पाठवत इंग्लंची अवस्था ४ बाद ३० अशी केली. पाचव्या विकेटसाठी जो रूट आणि ओली पोप हे दोघे काही काळ पिचवर टिकले. दोघांना ३५ धावा करता आल्या. पोपला अक्षरने १५ धावांवर बाद केले. त्याच्या पुढील ओव्हरमध्ये अश्विनने कर्णधार जो रूटला बाद केले आणि भारताच्या विजयातील मोठा अडथळा दूर केला. रुटने ३० दावा केल्या. तो बाद झाला तेव्हा इंग्लंडची अवस्था ६ बाद ६५ अशी झाली होती. त्यानंतर सातव्या विकेटसाठी बेन फोक्स आणि लॉरेंन्स यांनी ४३ धावांची भागिदारी केली. ही जोडी अक्षरने फोडली. स्लीपमध्ये अजिंक्यने एक शानदार कॅच घेत फोक्सला माघारी पाठवले. डोमिनिक बेसला बाद करत अक्षरने इंग्लंडची आठवी विकेट घेतली. दरम्यान लॉरेंन्सने कसोटीतील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. अश्विनने जॅक लीचला बाद करत इंग्लंडची नववी विकेट घेतली. अजिंक्य रहाणेचा पुन्हा एकदा शानदार कॅच घेतला. चार सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने चेन्नईत झालेल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला. पण त्यानंतर भारतीय संघाने धमाकेदार कमबॅक केले. चेन्नईतील दुसऱ्या कसोटीत मोठा विजय साकारला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर अहमदाबाद येथील डे-नाइट कसोटीत इंग्लंडचा दुसऱ्या दिवशी पराभव करत भारताने २-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर आज चौथ्या कसोटीत विजय मिळवून या दौऱ्यातील पहिल्या मालिकेत विजय मिळवला.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qk8yC8

वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद ९६ धावा हे शतक समजले जाईल; कारण...

अहमदाबाद: इंग्लंडविरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताचा डाव ३६५ धावांवर संपुष्ठात आला. इंग्लंडने पहिल्या डावात केलेल्या २०५ धावांना भारताने चोख उत्तर दिले. विशेषत: टीम इंडियाने १४६ धावांवर ६ विकेट गमवल्या असताना तळातील फलंदाजांनी शानदार कामगिरी केली आणि १६० धावांची महत्त्वाची आघाडी मिळून दिली. वाचा- भारताकडून पहिल्या डावात ऋषभ पंतने शतक झळकावले. तर ( )चे शतक ४ धावांनी हुकले. त्याने १७४ चेंडूत १० चौकार आणि १ षटकारासह ५५.१७च्या स्ट्राइक रेटने नाबाद ९६ धावा केल्या. सुंदर फलंदाजीला आला होता तेव्हा भारताने ६ विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर त्याने पंतसोबत शतकी भागिदारी केली आणि दुसऱ्या दिवसाचा डाव संपला तेव्हा संघाला आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या दिवशी त्याने अक्षर पटेल सोबत शतकी भागिदारी करून पहिल्या डावातील आघाडी मोठी केली. वाचा- तरी सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत. भारताचे माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी सुंदरच्या या ९६ धावा म्हणजे शतकच आहे. ज्या परिस्थितीत त्याने शतक केले ते सोपे नव्हते. तो फक्त गोलंदाज नाही तर एक अष्ठपैलू असल्याचे सिद्ध झाले आहे. सुंदरने अशा वेळी फलंदाजी आणि गोलंदाजी केली आहे जेव्हा संघात रविंद्र जडेजा नाही. वाचा- वाचा- यामुळे शतक करू शकला नाही सुंदर भारताने ११३.५ षटकात ७ बाद ३६५ धावा केल्या होत्या. ११४व्या षटकात अक्षर पटेलने एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि तो धावबाद झाला. तेव्हा वॉशिंग्टन सुंदर ९६ धावांवर खेळत होता आणि नॉन स्ट्रायकरवर होता. पटेलच्या जागी आलेल्या इशांत शर्माला पहिल्याच चेंडूवर बेन स्टोक्सने LBW बाद केले. त्यानंतर मोहम्मद सिराज फलंदाजीसाठी आला. सिराजने बेन स्टोक्सचे दोन चेंडू खेळून काढले. पण ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर तो बोल्ड झाला आणि सुंदर ९६ धावांवर नाबाद राहिला. वाचा- सुंदरचे शतक पूर्ण न झाल्याबद्दल सर्व चाहते निराश झाले. पण त्याच्या या नाबाद ९६ धावा शतका इतक्याच महत्त्वाच्या ठरल्या.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/30jnshe

Video: विकेटच्या मागे इतका बडबड का करतोस? पंतने दिले मन जिंकणारे उत्तर

अहमदाबाद: इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या चौथ्या कसोटीतील पहिल्या डावात भारताचा विकेटकिपर ()ने दमदार शतक झळकावले. पंतच्या या शतकामुळे भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध आघाडी घेता आली. गेल्या काही महिन्यात पंतने त्याच्या कामगिरीत कमालीची सुधारणा केली आहे आणि यासाठी त्याचे कौतुक देखील केले जात आहे. वाचा- काल दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर रोहित शर्माने पंतला त्याच्या शतकाबद्दल विचारले. तसेच तो विकेटकिपिंग करताना सारखा काही ना काही बडबडत असतो त्याच्याबद्दल विचारणा केली. त्यावर पंतने जे उत्तर दिले त्याने सर्वांची मने जिंकली. रोहित शर्माने पंत आणि वॉशिंग्टन सुंदर यांची एक छोटी मुलाखत घेतली. याचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला. जेव्हा रोहितने पंतला विचारले, तु विकेटच्या मागे सारखा काही ना काही बडबडत असतो, असे लोक म्हणतात. विकेटच्या मागे का इतका दंगा करतोस? वाचा- यावर पंत म्हणाला, मी क्रिकेटचा आनंद घेत असतो. यामुळे संघाचा आत्मविश्वास देखील वाढतो. माझा प्रयत्न असतो की कशाही पद्धतीने संघाला मदत झाली पाहिजे. डोक्यात फक्त तेच सुरू असते. वाचा- ... वाचा- चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने पहिल्या डावात १४६ धावांवर पाच विकेट गमावल्या होत्या. तेव्हा पंतने सुंदरसह शतकी भागिदारी केली. या दोघांनी ११३ धावा केल्या. त्यानंतर पंतने कसोटीमधील तिसरे शतक पूर्ण केले. पंतने ११८ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकारांसह १०५ धावा केल्या.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ro24DA

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...