Ads

Friday, February 5, 2021

IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध पहिल्याच दिवशी भारतीय 'तारे जमीन पर'; जो रुटचे विक्रमी शतक

चेन्नई: ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाचे तारे जमीन पर आल्याचे चित्र इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी दिसले. चेन्नईतील एमए चिदंबरम मैदानावर सुरू झालेल्या पहिल्या कसोटीतील पहिला दिवस इंग्लंडने गाजवला. १००वी कसोटी खेळणारा कर्णधार जो रूट याने शतक झळकावले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने ३ बाद २६३ धावा केल्या होत्या. दिवसाच्या अखेरच्या दिवशी जसप्रीत बुमराहने डोनिनिक सिबलीला ८७ धावांवर बाद करत इंग्लंडला तिसरा धक्का दिला. त्याने रुटसह तिसऱ्या विकेटसाठी २०० धावांची भागिदारी केली. रुट १२८ धावांवर नाबाद आहे. वाचा- पहिल्या कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने या सामन्यात अक्षर पटेल ऐवजी शाहबाद नदीमला संधी दिली. पटेल दुखापतीमुळे संघाबाहेर झाला. इंग्लंडचे सलामीवीर रोरी बर्न्स आणि डोमिनिक सिबली यांनी पहिल्या विकेटसाठी ६३ धावांची भागिदारी केली. भारताचा विकेटकिपर ऋषभ पंतने दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर कॅच सोडला. फिरकीपटू आर अश्विनने बर्न्सची (३३) विकेट घेत भारताला पहिले यश मिळून दिले. त्यानंतर दुसऱ्याच ओव्हरमध्ये बुमराहने डॅनियल लॉरेन्स शून्यावर बाद करत भारताला दुसरे यश मिळून दिले. लागोपाठ दोन विकेट पडल्याने इंग्लंडची अवस्था २ बाद ६३ झाली. लॉरेन्सच्या जागी कर्णधार जो रूट आला. रूटची ही १००वी कसोटी होती. त्याने सिबली सोबत तिसऱ्या विकेटसाठी २०० धावांची भागिदारी करून इंग्लंडला मजबूत स्थितीत पोहोचवले. वाचा- वाचा- या दोघांनी प्रथम अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर कर्णधार रूटने आरामात १०० झळकावले. १००व्या कसोटीत शतक करणारा तो जगातील नववा तर ९८,९९ आणि १०० अशा तिनही कसोटीत शतक करणारा तो पहिला फलंदाज ठरला. वाचा- वाचा- पहिल्या दिवशी पहिले सत्र वगळता भारतीय संघाला फार चांगली कामगिरी करता आली नाही. पहिल्या सत्रात भारताने २ बाद ६७ असे रोखले होते. पण नंतर सिबली आणि रूट यांनी भारतीय गोलंदाजांना विकेट मिळून दिली नाही. भारताने अनुभव नसलेले दोन फिरकीपटू खेळवले. सुंदर आणि नदीम यांच्याकडे फक्त एका कसोटीचा अनुभव आहे. याचा फायदा इंग्लंडच्या फलंदाजांनी घेतला. भारताकडून अश्विन आणि बुमराह यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2LslA24

IND vs ENG : शंभराव्या कसोटीत शतक झळकावण्याचा मान आतापर्यंत कोणाला मिळाला आहे, पाहा...

चेन्नई, : शंभरावा कसोटी सामना हा प्रत्येक खेळाडूसाठी महत्वाचा असतो. पण शंभराव्या कसोटीत शतक झळकावण्याचा मान मात्र क्रिकेट विश्वात आतापर्यंत फक्त काही जणांनाच मिळाला आहे. जो रुटने आजच्या सामन्यात हा मान पटकावला आहे. पण आतापर्यंत आपल्या शंभराव्या कसोटी सामन्यात कोणत्या फलंदाजांना शतकं झळकावता आलेली आहेत, पाहा... शंभराव्या कसोटी सामन्यात शतक झळकावणारा रुट हा क्रिकेट जगतातील फक्त नववा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी आपल्या शंभराव्या कसोटीत शतक झळकावण्याचा मान कॉलिन काऊड्री (इंग्लंड), जावेद मियाँदाद (पाकिस्तान), गॉर्डन ग्रनिज (वेस्ट इंडिज), अॅलेक स्टुअर्ट (इंग्लंड) इंझमाम उल हक (पाकिस्तान), रिकी पाँटींग ( ऑस्ट्रेलिया), ग्रॅमी स्मिथ (दक्षिण आफ्रिका), हशिम आमला (दक्षिण आफ्रिका) आणि आता जो रुट यांनी पटकावलेला आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रुटने शंभराव्या कसोटीत आपले शतक साजरे केले. आतापर्यंत बऱ्याच काही क्रिकेटपटूंनी शंभराव्या कसोटीत शतक झळकावले आहे. पण रुटने जी गोष्ट केली आहे, ती क्रिकेट विश्वात कोणालाही करता आलेली नाही. इंग्लंडच्या कर्णधार जो रुटने शंभराव्या कसोटी शतक झळकावण्याचा पराक्रम केला. पण यावेळी रुटने अशी एक गोष्ट केली की ती आतापर्यंत कोणत्याही क्रिकेटपटूला करता आलेली नाही. आपल्या ९८, ९९ आणि १००व्या कसोटीत शतक करणारा जो रूट हा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी इंग्लंडचा संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर होता. या दौऱ्यातील दोन्ही सामन्यांमध्ये रुटने शतक झळकावलेले होते. हे रुटचे अनुक्रमे ९८ आणि ९९ वे सामने होते. भारताविरुद्धच्या शंभराव्या सामन्यातही रुटने दमदार शतक झळकावत क्रिकेटमधील अनोखा विश्वविक्रम रचला आहे. त्याबरोबर रुटचे भारताबरोबर चांगले कनेक्शन असल्याचेही आता पुढे आले आहे. रुट हा जगातील असा एकच क्रिकेटपटू आहे की, ज्याचे सर्व महत्वाचे सामने हे भारतात खेळले गेले. भारतामध्ये पहिला, ५०वा आणि शंभरावा कसोटी सामना खेळणारा रुट हा क्रिकेट विश्वातील पहिलाच परदेशी खेळाडू ठरला आहे. रुटने २०१२ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण नागपूरमध्ये केले होते. या सामन्यात रुटने ७३ धावांची खेळी साकारली होती. रुट आपला ५०वा सामनाही भारतामध्येच खेळला. २०१६ साली रुट आपला ५०वा सामना विशाखापट्टणम येथे खेळला होता. आता आपला शंभरावा कसोटी सामना रुट चेन्नईमध्ये खेळत आहे. या सामन्यातील पहिल्या डावात रुटने आतापर्यंत आपले शतक साजरे केले आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2O47q81

IND vs ENG : भारताविरुद्ध खेळताना इंग्लंडच्या खेळाडूंनी का बांधली काळी फित, जाणून घ्या खरं कारण...

चेन्नई, : भारताविरुद्धचा आपला पहिला कसोटी सामना खेळत असताना इंग्लंडच्या खेळाडूंनी आपल्या टी-शर्टवर काळी फित बांधल्याचे पाहायला मिळाले. त्यावेळी काही जणांना वाटले की, भारतामध्ये सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत इंग्लंडच्या संघाने काळी फित बांधली आहे की काय? पण याबाबतचा खुलासा आता इंग्लंडच्या संघाकडूनच करण्यात आला आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघाने काळी फित का बांधली, याचे उत्तर इंग्लंडच्या संघाचे मीडिया मॅनेजर यांनी दिले आहे. या काळ्या फितीबद्दल त्यांनी सांगितले की, " दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटीश सेनाचे कॅप्टन टॉम मूर हे होते. त्यांनी या महायुद्धात मोलाची भूमिका बजावली होती. त्याचबरोबर करोनाविरुद्धही त्यांनी लढाई दिली होती. टॉम यांना करोनाची बाधा झाली होती आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण वयाच्या १००व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यामुळे टॉम यांचा सन्मान करण्यासाठी इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टी-शर्टवर काळी फित बांधली आहे." भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. इंग्लंडचा कर्णधार जो रुट आज आपला शंभरावा कसोटी सामना खेळत आहे. त्यामुळे सामना सुरु होण्यापूर्वी रुटचा सत्कार करण्यात आला. पण शंभरावा कसोटी सामना खेळत असताना रुटने एक अनोखा विश्वविक्रम रचला आहे. आतापर्यंत क्रिकेट विश्वात ही गोष्ट कोणत्याही क्रिकेटपटूला करता आलेली नाही. रुट हा जगातील असा एकच क्रिकेटपटू आहे की, ज्याचे सर्व महत्वाचे सामने हे भारतात खेळले गेले. रुटने २०१२ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण नागपूरमध्ये केले होते. या सामन्यात रुटने ७३ धावांची खेळी साकारली होती. त्यानंतर रुट आपला ५०वा सामनाही भारतामध्येच खेळला. २०१६ साली रुट आपला ५०वा सामना विशाखापट्टणम येथे खेळला होता. त्यानंतर आता आपला शंभरावा कसोटी सामना रुट चेन्नईमध्ये खेळत आहे. या सामन्यातील पहिल्या डावात रुटने आतापर्यंत आपले शतक साजरे केले आहे. पण भारतामध्ये पहिला, ५०वा आणि शंभरावा कसोटी सामना खेळणारा रुट हा क्रिकेट विश्वातील पहिलाच परदेशी खेळाडू ठरला आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3twsm8b

रोहित शर्माबाबत वादग्रस्त ट्विट डिलीट करणाऱ्या कंगना राणौतला चाहत्यांनी झापले, म्हणाले तुझी...

मुंबई : शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत भारताचा धडाकेबाज क्रिकेटपटू रोहित शर्माने काल एक ट्विट केले होते. रोहितच्या या ट्विटला बॉलीवूडची अभिनेत्री कंगना राणौतने ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिले होते. पण हे ट्विट आक्षेपार्ह असल्यामुळे ते डिलीट करावे लागले. कंगनाचे ट्विट डिलीट झाल्यावर तिला चाहत्यांनी चांगलेच झापल्याचे पाहायला मिळत आहे. चाहत्यांनी यावेळी रोहितचे भारतासाठीचे योगदान दाखवून दिले आहे आणि त्याचा अपमान करण्याची तुझी पात्रता आहे का, असा सवालही यावेळी विचारला आहे. रोहितने ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलं होतं...आपल्या ट्विटमध्ये रोहित शर्मा म्हणाला होता की, "जेव्हाही आपण एकत्र उभं राहिलो आहे, तेव्हा तेव्हा भारत आणखी ताकदवान झाला आहे. काही तरी पर्याय किंवा उपाय नक्कीच काढावा लागेल. आपल्या देशात शेतकरी महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. मला आशा आहे की, आपण सर्व एकत्र येऊन काही तरी उपाय नक्कीच काढू'." कंगनाने या ट्विटवर नेमकं काय म्हटलं होतं, पाहा...रोहितच्या ट्विटवर कंगना म्हणाली की, "क्रिकेटपटूंची अवस्था अशी का झाली आहे, 'ना घर का ना घाट का'. शेतकरी अशा कायद्याविरुद्ध का जातील जो त्यांच्यासाठीच क्रांतिकारी ठरणार आहे. हे दहशदवादी आहेत, जे गोधंळ घालतायत. असं बोलायला भीती का वाटतेय?" चाहत्यांनी या सर्व प्रकारानंतर कंगनाला चांगलेच ट्रोल केले आहे. रोहितने आतापर्यंत भारतासाठी किती धावा केल्या आहेत, किती विक्रम केले आहेत, हे त्यांनी कंगनाला सांगितले आहे. त्याचबरोबर रोहितच्या योगदानाच्या एक टक्काही काम कंगनाला करता आलेले नाही, असे चाहत्यांनी यावेळी म्हटलेले आहे. कंगनाने क्रिकेटपटूंना धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का... असे म्हटले होते. त्यानंतर कंगनावर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यामुळे हे वादग्रस्त ट्विट डिलीट करावे लागले. त्यानंतर कंगनावर चाहत्यांनी जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता कंगना या विषयावर नेमकी काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36GoU0M

IND vs ENG : शंभरावी कसोटी खेळणाऱ्या जो रुटने रचला विश्वविक्रम, जगात ठरला पहिलाच क्रिकेटपटू

चेन्नई, : इंग्लंडचा कर्णधार जो रुट आज आपला शंभरावा कसोटी सामना खेळत आहे. त्यामुळे सामना सुरु होण्यापूर्वी रुटचा सत्कार करण्यात आला. पण शंभरावा कसोटी सामना खेळत असताना रुटने एक अनोखा विश्वविक्रम रचला आहे. आतापर्यंत क्रिकेट विश्वात ही गोष्ट कोणत्याही क्रिकेटपटूला करता आलेली नाही. रुट हा जगातील असा एकच क्रिकेटपटू आहे की, ज्याचे सर्व महत्वाचे सामने हे भारतात खेळले गेले. रुटने २०१२ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण नागपूरमध्ये केले होते. या सामन्यात रुटने ७३ धावांची खेळी साकारली होती. त्यानंतर रुट आपला ५०वा सामनाही भारतामध्येच खेळला. २०१६ साली रुट आपला ५०वा सामना विशाखापट्टणम येथे खेळला होता. त्यानंतर आता आपला शंभरावा कसोटी सामना रुट चेन्नईमध्ये खेळत आहे. या सामन्यातील पहिल्या डावात रुटने आतापर्यंत आपले अर्धशतक साजरे केले आहे. पण भारतामध्ये पहिला, ५०वा आणि शंभरावा कसोटी सामना खेळणारा रुट हा क्रिकेट विश्वातील पहिलाच परदेशी खेळाडू ठरला आहे. परदेशात आपला पहिला आणि शंभरावा कसोटी सामना खेळणारा रुट हा जगातील तिसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांनी आपला पहिला आणि शंभरावा कसोटी सामना पाकिस्तानमध्ये खेळला होता. त्यानंतर वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार कार्ल हुपरने आपला पहिला आणि शंभरावा कसोटी सामना भारतामध्ये खेळला होता. त्यानंतर या यादीमध्ये रुटचा तिसरा क्रमांक लागत आहे. सर्वात कमी वयात शंभर कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही आता रुटचा समावेश झाला आहे. रुट आपला शंभरावा कसोटी सामना हा २९ वर्षे आणि १३४ दिवसांमध्ये खेळत आहे. या यादीत पहिल्या स्थानावर इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कुकचा समावेश आहे. कुकने २८ वर्षे आणि ३५३ दिवसांमध्ये आपला शंभरावा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आहे. सचिनने आपला शंभरवा कसोटी सामना २९ वर्षे आणि १३४ दिवसांमध्ये खेळला होता.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pQE1MR

IND vs ENG : पहिल्याच चेंडूवर पंतने झेल सोडला आणि बुमराचे स्वप्न भंगले...

चेन्नई, : पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराच्या पहिल्याच चेंडूवर यष्टीरक्षक रिषभ पंतने झेल सोडला. यामुळे भारतामध्ये पहिलीच कसोटी सामना खेळणाऱ्या बुमराचे पहिल्यात चेंडूवर विकेट मिळवण्याचे स्वप्न भंग पावले. बुमराने आपला पहिलाच चेंडू लेग स्टम्पच्या दिशेने टाकला होता. हा चेंडू लेग साईडला मारण्याचा इंग्लंडचा सलामीवीर रॉरी बर्न्स प्रयत्न करत होता. पण यावेळी रॉरीच्या बॅटची कडा चेंडूने घेतली. हा चेंडू यष्टीरक्षक पंतच्या दिशेने जात होता. पंतने यावेळी आपल्या उजव्या बाजूला सूर मारुन हा झेल टिपण्याचा प्रयत्न केला. पण पंतला हा झेल काही टिपता आला नाही. पंतने जेव्हा रॉरीला जीवदान दिले तेव्हा तो फक्त एका धावेवर होता. पण त्यानंतर रॉरीने ३३ धावांची खेळी साकारली. पण त्यानंतर बुमराने इंग्लंडच्या डॅन लॉरेन्सला शून्यावर बाद केले आणि भारतामधील पहिल्या कसोटी सामन्यात बळी मिळवला. बुमराने चहापानापर्यंत १३ षटकांमध्ये ३० धावा देत एक बळी मिळवला होता. बुमरा आपल्या भारतातील पहिल्या कसोटी सामन्यात काय कमाल करतो, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल. जसप्रीत बुमराहने पहिल्या कसोटीत ज्या गोलंदाजाचा विक्रम मोडला तो खेळाडू सामन्याचा मॅच रेफरी आहे. इंग्लंडविरुद्धची पहिली कसोटी ही बुमराहच्या करिअरमधील १८वी कसोटी आहे. याआधी त्याने भारतात एकही कसोटी मॅच खेळली नाही. बुमराहच्या पदार्पणाला तीन वर्ष झालीत. पण त्याने भारतात एकही कसोटी सामना खेळला नाही. या काळात भारतात कसोटी सामने झाले. पण तेव्हा दुखपतीमुळे खेळता आले नाही. यामुळे आता बुमराहच्या नावावर एक विक्रम नोंदला गेलाय. परदेशात सर्वाधिक कसोटी खेळल्यानंतर मायदेशात कसोटी सामना खेळण्याचा विक्रम बुमराहच्या नावावर नोंदला गेलाय. याआधी हा विक्रम माजी जलद गोलंदाज जवागल श्रीनाथच्या नावावर होता. त्याने पदार्पणानंतर १२ कसोटी सामने परदेशात खेळले होते आणि १३वी कसोटी भारतात खेळली. श्रीनाथ सध्या चेन्नईतील कसोटीत सामनाधिकारी म्हणून काम करत आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2YMwmmF

चेन्नई कसोटीतील मॅच रेफरीचा विक्रम मोडला; बुमराहने केली अनोखी कामगिरी

चेन्नई: भारतीय संघाचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने शुक्रवारी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत एक विक्रम स्वत:च्या नावावर केला. जगभरातील फलंदाजांच्यात भिती निर्माण करणाऱ्या बुमराहला चेन्नईतील पहिल्या कसोटीसाठी काही विशेष प्रयत्न करावे लागले नाही. बुमराहने पहिल्या कसोटीत ज्या गोलंदाजाचा विक्रम मोडला तो खेळाडू सामन्याचा मॅच रेफरी आहे. इंग्लंडविरुद्धची पहिली कसोटी ही बुमराहच्या करिअरमधील १८वी कसोटी आहे. याआधी त्याने भारतात एकही कसोटी मॅच खेळली नाही. बुमराहच्या पदार्पणाला तीन वर्ष झालीत. पण त्याने भारतात एकही कसोटी सामना खेळला नाही. या काळात भारतात कसोटी सामने झाले. पण तेव्हा दुखपतीमुळे खेळता आले नाही. यामुळे आता बुमराहच्या नावावर एक विक्रम नोंदला गेलाय. परदेशात सर्वाधिक कसोटी खेळल्यानंतर मायदेशात कसोटी सामना खेळण्याचा विक्रम बुमराहच्या नावावर नोंदला गेलाय. याआधी हा विक्रम माजी जलद गोलंदाज जवागल श्रीनाथच्या नावावर होता. त्याने पदार्पणानंतर १२ कसोटी सामने परदेशात खेळले होते आणि १३वी कसोटी भारतात खेळली. श्रीनाथ सध्या चेन्नईतील कसोटीत सामनाधिकारी म्हणून काम करत आहे. या यादीत आरपी सिंह ११ कसोटी, १० कसोटी आणि आशिष नेहरा १० कसोटीसह तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. जसप्रीत बुमराहने पाच जानेवारी २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते. त्यानंतर तो कसोटी संघात होता. पण जेव्हा जेव्हा भारतीय संघ मायदेशात खेळला बुमराह कोणत्या तरी कारणामुळे संघाबाहेर होता. बुमराहने १७ कसोटीत २१.५९च्या सरासरीने ७९ विकेट घेतल्या आहेत. त्याने पाच वेळा एका डावात पाच विकेट घेतल्या असून २७ धावांवर ६ विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ruPJND

या खेळाडूची दीड तासापूर्वी संघात निवड झाली; कुलदीप यादव बघत राहिला

चेन्नई: भारत आणि इंग्लंड () यांच्यात चेन्नईत पहिला कसोटी सामना सुरू आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने पहिल्या कसोटी संघ निवड करताना एक धक्कादायक निर्णय घेतला. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी सराव सत्रात अक्षर पटेलला दुखापत झाली. त्यामुळे तो सामन्यातून बाहेर झाला. सामना सुरू होण्याच्या दीड तास आधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ही माहिती दिली. अक्षर पटेलच्या जागी भारतीय संघात () आणि राहुल चाहर यांना घेतल्याचे बीसीसीआयने सांगितले. वाचा- अक्षर पटेलला पहिल्या कसोटीत संधी मिळण्याची शक्यता होती. पण दुखापतीमुळे तो बाहेर झाला. नाणेफेकच्या वेळी कर्णधार विराट कोहलीने शाहबाज नदीम संघात असल्याचे आणि तो करिअरमधील दुसरा सामना खेळणार असल्याचे सांगितले. वाचा- भारतीय संघात ( )ला संधी मिळेल अशी चर्चा होती. पण टॉसच्या वेळी हे स्पष्ट झाले की तो संघात नाही. नदीमने २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पदार्पण केले होते. त्यानंतर दोन वर्ष त्याला संधी मिळाली नाही. पहिल्या कसोटीत नदीमने ४ विकेट घेतल्या होत्या. भारतीय संघाने पहिल्या कसोटीत तीन फिरकीपटू अश्विन, नदीम आणि सुंदर यांना संधी दिली आहे. तर जलद गोलंदाजांमध्ये इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना स्थान दिले आहे. असा आहे भारतीय संघ रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह,शाहबाद नदीम


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2YJsQJO

Thursday, February 4, 2021

मारिया तू बरोबर होतीस, आम्ही सचिनला ओळखत नाही; माफ कर...

नवी दिल्ली: देशातील शेतकरी आंदोलनाला () परदेशातील अनेकांनी पाठिंबा दिल्यानंतर भारतातील सिनेस्टार, खेळाडू आणि अन्य प्रसिद्ध व्यक्तींनी यासंदर्भात जाहीरपणे मते मांडली होती. यामध्ये मास्टर ब्लास्टर ()चा देखील समावेश होता. पण सचिनने देशाच्या सार्वभौमत्वबद्दल मत व्यक्त केल्यानंतर अनेकांनी त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. राजधानी दिल्लीत आणि परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून करत आहेत. केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्याला शेतकरी विरोध करत आहेत. या आंदोलनाला पॉप स्टार रिहानासह जगभरातील अन्य काही लोकांनी पाठिंबा दिला होता. भारताच्या अंर्गतग गोष्टीत लक्ष घालण्याची गरज नाही, असे उत्तर अनेकांनी सोशल मीडियावरुन दिले. वाचा- सचिन तेंडुलकरने देशाच्या सार्वभौमत्वाशी कधीच तडजोड मान्य केली जाणार नाही. परदेशातील लोक बघ्याची भूमिका घेऊ शकतात. पण ते हस्तक्षेप करू शकत नाही. भारतीय लोकांना या देशाबद्दल अधिक माहिती आहे आणि त्यांनीच निर्णय घ्यायला हवा. देश म्हणून आपण सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे. सचिनच्या या ट्विटवरून अनेकांनी त्याच्यावर टीका केली. सचिनवर टीका करणाऱ्यांना उत्तर देताना एका भारतीय युझरने रशियाची टेनिसपटू ()ची माफी मागितली आहे. आता सचिनच्या ट्वीटचा आणि मारियाचा काय संबंध असा तुम्हाला प्रश्न पडले. मारियाने २०१५ साली एका मुलाखतीत सचिन तेंडुलकरला ओळखत नसल्याचे म्हटले होते. तेव्हा भारतीय लोकांनी तिच्यावर बरीच टीका केली होती. वाचा- आता एका भारतीय युझरने तिची त्या घटनेबद्दल माफी मागितली आहे. या युझरच्या मते, तू जेव्हा सचिनला ओळखत नाही असे म्हणाली होतीस तेव्हा आम्ही तुझ्यावर टीका केली होती. पण आता हे सिद्ध झाले आहे की सचिन विषयी एखाद्याला माहिती नसावी. तू बरोबर होतीस, आम्ही तुझी माफी मागतो. आम्ही ज्या पद्धतीने तुझ्याशी वागलो यासाठी... तू बरोबर होती, आम्हाला माहिती नाही की सचिन कोण आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3rpvwZy

पहिल्या कसोटी आधी भारतीय संघाला मोठा झटका; हा खेळाडू झाला संघाबाहेर

चेन्नई: इंग्लंडविरुद्ध आजपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याआधी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. मालिकेसाठी संघात निवड झालेला अष्ठपैलू पहिल्या कसोटीतून बाहेर झाला आहे. पहिल्या कसोटी सामन्यासाठी नाणेफेक होण्याआधी काही तास आधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने याची माहिती दिली. वाचा- पहिल्या कसोटी सामन्यात अक्षर पटेल कसोटीत पदार्पण करण्याची शक्यता होती. कर्णधार विराट कोहलीने देखील गोलंदाज अष्ठपैलूना संधी दिली जाईल असे स्पष्ट केले होते. संघात रविंद्र जडेजा नसल्यामुळे अक्षर पटेल त्याच्या जागी योग्य होता. पण दुखापतीमुळे तो पहिल्या कसोटीत खेळू शकणार नाही. बीसीसीआयने शाहबाद नदीम आणि राहुल चाहर यांचा संघात समावेश केला आहे. हे दोन्ही खेळाडू स्टॅड बाय म्हणून संघा सोबत सराव करतील, असे बीसीसीआयने स्पष्ट केले. वाचा- पहिल्या कसोटीत इंग्लंडचा कर्णधार जो रुटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या कसोटीसाठी असा आहे भारतीय संघ रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह,शाहबाद नदीम


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2ObPDw1

IND vs ENG Live: भारत विरुद्ध इंग्लंड आजपासून पहिली कसोटी, टॉसच्या आधी टीम इंडियाला झटका

चेन्नई: इंग्लंडच्या भारत दौऱ्याला आजपासून सुरूवात होत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना आज (५ फेब्रुवारी)पासून चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरू होईल. चार सामन्यांच्या या मालिकेतील पहिल्या दोन लढती याच मैदानावर होणार आहेत. या मैदानावर भारतीय संघाची कसोटी आणि इंग्लंडविरुद्धची कामगीर शानदार आहे. त्यामुळे भारताचे पारडे जड मानले जात आहे. LIVE अपडेट ( ) >> असा आहे भारतीय संघ- रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह,शाहबाद नदीम >> भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय >> जो रुटची १००वी कसोटी >> जसप्रीत बुमराह भारतात प्रथमच कसोटी सामना खेळणार >> दुखापतीमुळे अक्षर पटेल पहिल्या कसोटीत खेळू शकणार नाही >>


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2MVS7hc

IND vs ENG : पहिल्या कसोटीपूर्वी भारतीय संघाचे झकास फोटोशूट, व्हिडीओ झाला व्हायरल...

चेन्नई, : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना उद्यापासून सुरु होणार आहे. पण पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचे झकास फोटोशूट झाले आहे. भारतीय संघातील खेळाडूंनी यावेळी कशी पोझ दिली, याचा व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. पहिल्या कसोटी सामन्याच्या पूर्वी झालेले भारतीय संघाचे फोटोशूट चांगलेच चर्चेत आले आहे. या फोटोशूटमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली, ,उपकर्णधार अजिंक्य रहाणे, हार्दिक पंड्या, रिषभ पंत, चेतेश्वर पुजारासारख्या भारतीय खेळाडूंनी भन्नाट पोझ दिल्याचे यावेळी पाहायला मिळत आहे. बीसीसीआयने पोस्ट केलेला हा व्हिडीओ चाहत्यांच्या चांगलाच पसंतीला उतरला आहे. त्यामुळे हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाल्याचेही पाहायला मिळत आहे. आपल्या आवडत्या खेळाडूंची पोझ यावेळी चाहत्यांना या व्हिडीओमध्ये पाहता येणार आहे. उद्यापासून चेन्नईत सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटीत रोहित शर्मा आणि शुभमन गिल हे भारतासाठी सलामीची धुरा सांभाळतील, असे संकेत कर्णधार कोहलीने दिले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत रोहित आणि गिल यांनी दमदार फलंदाजी करत चांगली सलामी दिली होती. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातही रोहित आणि गिल हेच सलामीला येतील, असे संकेत कोहलीने यावेळी दिले आहेत. पंतबाबत कोहली नेमकं काय म्हणाला...रिषभ पंतबद्दलही कोहलीने आपले मत व्यक्त केले आहे. पंतबाबत कोहली म्हणाला की, " ऑस्ट्रेलियाने पंतने दमदार फलंदाजी केली होती. तो भारतासाठी मॅच विनरही ठरला आहे. पंतने फलंदाजीवर अथक मेहनत घेतली आहे आणि तो चांगल्या फॉर्मममध्येही आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात नक्कीच आम्ही पंतला संधी देणार आहोत." कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत फक्त एकच कसोटी सामना खेळला होता. हा सामना भारताने गमावला होता. पण त्यानंतरच्या तीन कसोटी सामन्यांमध्ये अजिंक्यने भारताचे नेतृत्व केले होते. या तीनपैकी दोन सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला होता आणि ऐतिहासिक मालिका विजय साकारला होता. त्यानंतर प्रथमच कोहली भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pNqJ3u

IND vs ENG : शेतकऱ्यांच्या आंदोलनाचीही झाली टीम इंडियाच्या बैठकीत चर्चा, पाहा नेमकं काय घडलं...

चेन्नई, : सध्याच्या घडीला भारतामध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. याच महत्वाच्या मुद्द्याची चर्चा ही भारतीय संघाच्या बैठकीतही झाली. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये उद्यापासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. त्यापर्वी आज भारतीय संघाची एक बैठक झाली. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनावर चर्चाही झाली. याबाबत भारताचा कर्णधार विराट कोहलीने सांगितले की, " फक्त क्रिकेट नाही तर अन्य बऱ्याच गोष्टींची चर्चा भारतीय संघाच्या बैठकीमध्ये होत असते. यावेळीही भारतीय संघाच्या बैठकीत आम्ही सध्याच्या घडीला चर्चेत असलेल्या गोष्टीची चर्चा केली. यामध्ये क्रिकेटपटूंनी आपली मतं व्यक्त केली. भारतीय संघाच्या बैठकीच्या सुरुवातीलाच आम्ही या विषयावर चर्चा केली आणि त्यांनतर आम्ही क्रिकेट मालिकेबाबत संवाद साधला." शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत कोहलीसह अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा यांनीही आपले मत ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केले होते. भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने याबाबत एक ट्विट काल केले होते. हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले होते. त्यानंतर आज भारताच्या क्रिकेटपटूंनी या आंदोलनाबाबत आपली मतं व्यक्त केली होती. शेतकऱ्यांच्या आंदोनलाबाबत बऱ्याच भारतीय क्रिकेटपटूंनी ट्विट केल्याचे पाहायला मिळत आहे. भारताचे क्रिकेटपटू शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत नेमकं काय म्हणाले, पाहा... सचिन तेंडुलकरभारताच्या सार्वभौमत्वशी कधीच तडजोड केली जाणार नाही. परदेशातील व्यक्ती फक्त पाहू शकतात पण त्यात भाग घेऊ शकत नाहीत. भारताला भारतीय लोकच ओळखतात आणि भारताबाबतचे निर्णय भारतीयांनीच घेतले पाहिजेत. एक देश म्हणून आपण एकत्र राहूयात, असे सचिनने सोशल मीडियावर म्हटले होते. विराट कोहलीसध्याच्या घडीला या कठीण प्रसंगी आपल्या सर्वांनीच एकजूट दाखवण्याची गरज आहे. शेतकरी हे आपल्या देशातील महत्वपूर्ण घटक आहेत. मला वाटते की, याबाबत नक्कीच तोडगा निघेल. सध्या घडीला आपण सर्वांनीच शांत राहून पुढचा विचार करणे गरजेचे आहे. युवराज सिंगभारताचे नागरीक म्हणून सध्याच्या या कठीण प्रसंगात आपण सर्वांनीच एकत्र राहण्याची गरज आहे. आतापर्यंत कोणताच अशा प्रश्न नाही, जो सुटलेला नाही. आपले शेतकरी हे देशासाठी सर्वात महत्वाचे आहेत आणि मला विश्वास आहे की, शांतपणे या प्रश्नावर नक्कीच तोडगा निघेत. अजिंक्य रहाणेजर आपण सर्व एकत्र राहिलो तर असा कोणताच प्रश्न नाही की जो सुटू शकत नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला शांत राहून हा प्रश्न कसा सोडवता येईल, याकडे आपण पाहायला हवे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pQ3x4P

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत कोण करणार भारताची सलामी, कोहलीचा व्हिडीओ व्हायरल

चेन्नई, : उद्यापासून इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. अजूपर्यंत या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आलेला नाही. पण तरीही भारताचा कर्णधार विराट कोहलीचा एक व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये भारताच्या डावाची सलामी कोण करणार, याबाबत कोहलीने आपले मत व्यक्त केले आहे. त्याचबरोबर बाबा झाल्यानंतर नेमकं कसं वाटत आहे, याबाबतही कोहलीने आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात भारतीय संघाने सलामीसाठी बरेच पर्याय वापरले होते. त्यामुळे आता इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात सलामी करण्याची संधी कोणाला द्यायची, हा भारतीय संघापुढे प्रश्न होता. त्याचबरोबर कोहली संघात आल्यामुळे एका खेळाडूला संघाबाहेर राहावे लागणार आहे. पण तरीही कोहलीने आपल्या एका मुलाखतीमध्ये भारतीय संघाची सलामी कोण करणार, याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. चेन्नईत उद्यापासून सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटीत रोहित शर्मा आणि शुभमन गिल हे भारतासाठी सलामीची धुरा सांभाळतील, असे संकेत कोहलीने दिले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत रोहित आणि गिल यांनी दमदार फलंदाजी करत चांगली सलामी दिली होती. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातही रोहित आणि गिल हेच सलामीला येतील, असे संकेत कोहलीने यावेळी दिले आहेत. रिषभ पंतबाबत कोहली नेमकं काय म्हणाला... यावेळी रिषभ पंतबद्दलही कोहलीने आपले मत व्यक्त केले आहे. पंतबाबत कोहली म्हणाला की, " ऑस्ट्रेलियाने पंतने दमदार फलंदाजी केली होती. तो भारतासाठी मॅच विनरही ठरला आहे. पंतने फलंदाजीवर अथक मेहनत घेतली आहे आणि तो चांगल्या फॉर्मममध्येही आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात नक्कीच आम्ही पंतला संधी देणार आहोत." ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत कोहली फक्त एकच कसोटी सामना खेळला होता. हा सामना भारताने गमावला होता. पण त्यानंतरच्या तीन कसोटी सामन्यांमध्ये अजिंक्यने भारताचे नेतृत्व केले होते. या तीनपैकी दोन सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला होता आणि ऐतिहासिक मालिका विजय साकारला होता. त्यानंतर प्रथमच कोहली भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3axL4mX

'बीसीसीआयने क्रिकेटपटूंना शेतकऱ्यांच्या आंदोलनावर जबरदस्तीने ट्विट करायला लावू नये'

मुंबई : शेतकऱ्यांचे आंदोन गेल्या दोन महिन्यांपासून सुरु आहे. पण भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरसह भारताच्या खेळाडूंनी गेल्या काही तासांमध्ये याबाबात ट्विट केले. यानंतर बीसीसीआय या क्रिकेटपटूंना शेतकऱ्यांच्या आंदोलनावर जबरदस्तीने ट्विट करायला लावत आहे, असा आरोप काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांनी केला आहे. कार्ती चिदंबरम यांनी यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, "प्रिय बीसीसीआय, भारताच्या क्रिकेटपटूंना तुम्बी जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या आंदोलनावर ट्विट करायला लावू नका, कारण ते बालिश वाटतं..." भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत एक ट्विट केले होते. हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले होते. त्यानंतर आज भारताच्या अन्य क्रिकेटपटूंनीही यावर भाष्य करत ट्विट केले आहे. हे सर्व बीसीसीआयने घडवून आणले आहे, असा आरोप आता कार्ती चिदंबरम यांनी केला आहे. पण याबाबत बीसीसीआयने अजूनही कोणते भाष्य केल्याचे पाहायला मिळत नाही. त्यामुळे बीसीसीआय यावर आता काय भूमिका मांडते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. भारतीय क्रिकेटपटूंनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत नेमके काय ट्विट केले आहे, पाहा... सचिन तेंडुलकर भारताच्या सार्वभौमत्वशी कधीच तडजोड केली जाणार नाही. परदेशातील व्यक्ती फक्त पाहू शकतात पण त्यात भाग घेऊ शकत नाहीत. भारताला भारतीय लोकच ओळखतात आणि भारताबाबतचे निर्णय भारतीयांनीच घेतले पाहिजेत. एक देश म्हणून आपण एकत्र राहूयात, असे सचिनने सोशल मीडियावर म्हटले होते. विराट कोहली सध्याच्या घडीला या कठीण प्रसंगी आपल्या सर्वांनीच एकजूट दाखवण्याची गरज आहे. शेतकरी हे आपल्या देशातील महत्वपूर्ण घटक आहेत. मला वाटते की, याबाबत नक्कीच तोडगा निघेल. सध्या घडीला आपण सर्वांनीच शांत राहून पुढचा विचार करणे गरजेचे आहे. युवराज सिंग भारताचे नागरीक म्हणून सध्याच्या या कठीण प्रसंगात आपण सर्वांनीच एकत्र राहण्याची गरज आहे. आतापर्यंत कोणताच अशा प्रश्न नाही, जो सुटलेला नाही. आपले शेतकरी हे देशासाठी सर्वात महत्वाचे आहेत आणि मला विश्वास आहे की, शांतपणे या प्रश्नावर नक्कीच तोडगा निघेत. अजिंक्य रहाणे जर आपण सर्व एकत्र राहिलो तर असा कोणताच प्रश्न नाही की जो सुटू शकत नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला शांत राहून हा प्रश्न कसा सोडवता येईल, याकडे आपण पाहायला हवे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39Mv6q5

'सचिन तेंडुलकरसारख्या महान क्रिकेटपटूचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला...'

मुंबई : भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत एक ट्विट केले होते. हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले होते. या ट्विटनंतर काही जणांनी सचिनवर टीका करायला सुरुवात केली. त्याचबरोबर ही टीका करताना काही जणांनी पातळी सोडून सचिनचा अपमान केल्याचेही पाहायला मिळाले. त्यानंतर मात्र नेटकरी चांगलेच खवळले आहे. सचिनसारख्या महान क्रिकेटटपटूचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असा सवाल आता बरीचं लोकं सोशल मीडियावर विचारत आहेत. जर परदेशातील व्यक्ती भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत बोलू शकतात, तर तो अधिकार , अनिल कुंबळेसारख्या क्रिकेटपटूंनाही आहे. सचिन आणि कुंबळेसारख्या खेळाडूंनी आपली पर्वा न करता ते देशासाठी जीव ओतून खेळले आहेत. त्यामुळे त्यांना हे बोलण्याचा अधिकार आहे, पण यासारख्या महान खेळाडूंचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असा सवाल सोशल मीडियावर विचारला जात आहे. सचिन तेंडुलकरने नेमके काय ट्विट केले होते...भारताच्या सार्वभौमत्वशी कधीच तडजोड केली जाणार नाही. परदेशातील व्यक्ती फक्त पाहू शकतात पण त्यात भाग घेऊ शकत नाहीत. भारताला भारतीय लोकच ओळखतात आणि भारताबाबतचे निर्णय भारतीयांनीच घेतले पाहिजेत. एक देश म्हणून आपण एकत्र राहूयात, असे सचिनने सोशल मीडियावर म्हटले होते. त्यानंतर काही जणांनी सचिनवर जोरदार टीका केली होती. पण सचिनवर टीका करत असताना त्याने दिलेले देशासाठी दिलेले योगदान मात्र टीकाकार विसरले. त्याचबरोर काही जणांनी तर सचिनसारख्या महान क्रिकेटपटूचा यावेळी अपमानही केला. त्यामुळे सचिनसारख्या महान खेळाडूचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असा सवाल सध्या सोशल मीडियावर विचारला जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून भारतात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पॉप स्टार रिहानाने पाठिंबा दिला होता. यावरून देशातील अनेक स्टार लोकांनी सडेतोड उत्तर दिले. भारताच्या अंतर्गत गोष्टीत लक्ष घालण्याची गरज नाही, अशा शब्दात रिहानाला अनेकांनी ऐकवले. आता भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने देखील रिहानाला सुनावले होता.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2YGZATQ

सचिन तेंडुलकरच्या शेतकरी आंदोलनाच्या ट्विटनंतर धोनी शांत, तरीही सोशल मीडियावर आहे त्याचीच चर्चा

मुंबई : सचिन तेंडुलकरने काल शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत एक ट्विट केले होते. त्यानंतर विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, युवराज सिंगहीत बऱ्याच आजी-माजी क्रिकेटपटूंनी याबाबत ट्विट करत आपली भावना व्यक्त केली आहे. पण यामध्ये कुठेच भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे नाव आलेले पाहायला मिळत नाही. धोनीने याबाबत आपले मत व्यक्त केले नसेल तरी त्याचीच चर्चा सध्याच्या घडीला सोशल मीडियावर चांगलीच होत आहे. सध्याच्या घडीला सोशल मीडियावर धोनीचा ट्रेंड जोरात आहे. धोनीने शेतकरी आंदोलनाबाबत एकही ट्विट केलेले नाही किंवा अन्य कुठेही आपले मत व्यक्त केलेले नाही. पण तरीही धोनी सध्याच्या घडीला चर्चेचा विषय ठरला आहे. काही जणांच्या मते धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर शेती करायला सुरुवात केली आहे. धोनी सध्याच्या घडीला सेंद्रीय शेती करत आहे. त्यामुळे धोनी या वादात पडलेला नाही, असे काही जणांचे म्हणणे आहे. सचिनने नेमके काय ट्विट केले होते...भारताच्या सार्वभौमत्वशी कधीच तडजोड केली जाणार नाही. परदेशातील व्यक्ती फक्त पाहू शकतात पण त्यात भाग घेऊ शकत नाहीत. भारताला भारतीय लोकच ओळखतात आणि भारताबाबतचे निर्णय भारतीयांनीच घेतले पाहिजेत. एक देश म्हणून आपण एकत्र राहूयात, असे सचिनने सोशल मीडियावर म्हटले होते. शेतकरी आंदोलनाबाबत विराट कोहली म्हणाला...सध्याच्या घडीला या कठीण प्रसंगी आपल्या सर्वांनीच एकजूट दाखवण्याची गरज आहे. शेतकरी हे आपल्या देशातील महत्वपूर्ण घटक आहेत. मला वाटते की, याबाबत नक्कीच तोडगा निघेल. सध्या घडीला आपण सर्वांनीच शांत राहून पुढचा विचार करणे गरजेचे आहे. युवराज सिंग नेमकं काय म्हणाला, पाहा...भारताचे नागरीक म्हणून सध्याच्या या कठीण प्रसंगात आपण सर्वांनीच एकत्र राहण्याची गरज आहे. आतापर्यंत कोणताच अशा प्रश्न नाही, जो सुटलेला नाही. आपले शेतकरी हे देशासाठी सर्वात महत्वाचे आहेत आणि मला विश्वास आहे की, शांतपणे या प्रश्नावर नक्कीच तोडगा निघेत. अजिंक्य रहाणेने ट्विट करत काय सांगितले, पाहा...जर आपण सर्व एकत्र राहिलो तर असा कोणताच प्रश्न नाही की जो सुटू शकत नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला शांत राहून हा प्रश्न कसा सोडवता येईल, याकडे आपण पाहायला हवे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pZRYry

सचिन तेंडुलकरच्या शेतकरी आंदोलनाच्या ट्विटनंतर भारतीय क्रिकेटपटूंनी व्यक्त केल्या भावना, म्हणाले

मुंबई : भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने काल शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत एक ट्विट केले होते. सचिनचे हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले होते. पण सचिनच्या या ट्विटनंतर भारताच्या आजी-माजी क्रिकेटपटूंनीही यावेळी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सचिनने नेमके काय ट्विट केले होते...भारताच्या सार्वभौमत्वशी कधीच तडजोड केली जाणार नाही. परदेशातील व्यक्ती फक्त पाहू शकतात पण त्यात भाग घेऊ शकत नाहीत. भारताला भारतीय लोकच ओळखतात आणि भारताबाबतचे निर्णय भारतीयांनीच घेतले पाहिजेत. एक देश म्हणून आपण एकत्र राहूयात, असे सचिनने सोशल मीडियावर म्हटले होते. शेतकरी आंदोलनाबाबत विराट कोहली म्हणाला...सध्याच्या घडीला या कठीण प्रसंगी आपल्या सर्वांनीच एकजूट दाखवण्याची गरज आहे. शेतकरी हे आपल्या देशातील महत्वपूर्ण घटक आहेत. मला वाटते की, याबाबत नक्कीच तोडगा निघेल. सध्या घडीला आपण सर्वांनीच शांत राहून पुढचा विचार करणे गरजेचे आहे. युवराज सिंग नेमकं काय म्हणाला, पाहा...भारताचे नागरीक म्हणून सध्याच्या या कठीण प्रसंगात आपण सर्वांनीच एकत्र राहण्याची गरज आहे. आतापर्यंत कोणताच अशा प्रश्न नाही, जो सुटलेला नाही. आपले शेतकरी हे देशासाठी सर्वात महत्वाचे आहेत आणि मला विश्वास आहे की, शांतपणे या प्रश्नावर नक्कीच तोडगा निघेत. अजिंक्य रहाणेने ट्विट करत काय सांगितले, पाहा...जर आपण सर्व एकत्र राहिलो तर असा कोणताच प्रश्न नाही की जो सुटू शकत नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला शांत राहून हा प्रश्न कसा सोडवता येईल, याकडे आपण पाहायला हवे. गेल्या दोन महिन्यांपासून भारतात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पॉप स्टार रिहानाने पाठिंबा दिला होता. यावरून देशातील अनेक स्टार लोकांनी सडेतोड उत्तर दिले. भारताच्या अंतर्गत गोष्टीत लक्ष घालण्याची गरज नाही, अशा शब्दात रिहानाला अनेकांनी ऐकवले. आता भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने देखील रिहानाला सुनावले होते.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3jiAZOE

सचिन तेंडुलकरच्या ट्विटनंतर बाळासाहेब ठाकरेंचा 'तो' व्हिडीओ झालाय व्हायरल...

मुंबई : भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने काल शेतकरी आंदोलनाबाबत एक ट्विट केले होते. सचिनच्या या ट्विटनंतर वाद-विवाद चांगलेच रंगत आहेत. पण त्याचवेळी शिवसेना प्रमुख दिवंगत यांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये बाळासाहेबांनी सचिनबद्दल भाष्य केल्याचे पाहायला मिळत आहे. सचिनने नेमके काय ट्विट केले होते...भारताच्या सार्वभौमत्वशी कधीच तडजोड केली जाणार नाही. परदेशातील व्यक्ती फक्त पाहू शकतात पण त्यात भाग घेऊ शकत नाहीत. भारताला भारतीय लोकच ओळखतात आणि भारताबाबतचे निर्णय भारतीयांनीच घेतले पाहिजेत. एक देश म्हणून आपण एकत्र राहूयात, असे सचिनने सोशल मीडियावर म्हटले होते. बाळासाहेबांनी आपल्या व्हिडीओमध्ये नेमकं काय म्हटलं आहे... बाळासाहेबांची एका जुन्या मुलाखतीमधील सचिनबाबतचे वक्तव्य आता चांगलेच व्हायरल झाले आहे. बाळासाहेबांनी सचिनबद्दल म्हटले होते की, " जेव्हा कोणी सचिनकडे मदत मागतं तेव्हा तो आपली बॅट किंवा टी-शर्ट अशा गोष्टींचा लिलाव करतो. पण या गोष्टीला मदत म्हणत नाहीत. मदत करायची असेल तर ती वेगळ्या स्वरुपात असायला हवी" गेल्या दोन महिन्यांपासून भारतात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पॉप स्टार रिहानाने पाठिंबा दिला होता. यावरून देशातील अनेक स्टार लोकांनी सडेतोड उत्तर दिले. भारताच्या अंतर्गत गोष्टीत लक्ष घालण्याची गरज नाही, अशा शब्दात रिहानाला अनेकांनी ऐकवले. आता भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने देखील रिहानाला सुनावले आहे. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. या प्रकरणी अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. यात काही आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे. रिहानाने दोन फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात आंदोलन करणारे शेतकरी दिसत आहेत. रिहानाने आपण याबद्दल का बोलत नाही असा प्रश्न विचारला होता. सचिनने याबाबत काल ट्विट केले होते. सचिनच्या या ट्विटनंतर नवा वादंग सुरु झाला आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3oNp1Oq

Wednesday, February 3, 2021

अजिंक्य म्हणाला, विराट नव्हता म्हणून नेतृत्व केले; पुन्हा गरज...

चेन्नई: भारतीय संघाने ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आता घरच्या मैदानावर टीम इंडिया इंग्लंडचा मुकाबला करणार आहे. ()ने ऑस्ट्रेलियात कर्णधार म्हणून भारताला विजय मिळून दिला होता. आता इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने भारताचा कर्णधार ()ला मदत करण्याचे ठरवले आहे. वाचा- भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिली लढत ५ फेब्रुवारीपासून चेन्नईत होणार आहे. ही मालिका भारतीय संघासाठी महत्त्वाची आहे. कारण या मालिकेतूनच जूनमध्ये लॉडर्सवर होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमधील न्यूझीलंडविरुद्ध लढणाऱ्या संघाचा निर्णय होणार आहे. वाचा- इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी अजिंक्य रहाणे म्हणाला, माझे काम आहे विराटची मदत करणे. माझे काम आता सोपे झाले आहे. जेव्हा विराट काही विचारेल तेव्हा मी त्याला सांगेन. विराट कोहली कर्णधार होता आणि कौटुंबीक कारणांमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून भारतात परतला होता. त्यामुळेच मी ऑस्ट्रेलियात कर्णधाराच्या भूमिकेत होतो. वाचा- ऑस्ट्रेलियात मिळवलेला विजय हा आता भूतकाळ आहे. आम्ही आता इंग्लंड संघाचा सम्मान करतोय. ज्यांनी श्रीलंकाचा पराभव केला आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी अद्याप पाच महिन्यांचा कालावधी आहे. न्यूझीलंडचा संघ फार चांगला खेळला आहे. वाचा- चेन्नईत होणाऱ्या पहिल्या कसोटीत फिरकीपटूंना मदत मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संघात अक्षर पटलेला संधी मिळेल का या प्रश्नावर अजिंक्य म्हणाला, आम्ही संघा निवडीबाबत उद्या (गुरुवार) सराव झाल्यानंतर निर्णय घेऊ.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cE3chB

सचिनने रिहाना आणि कंपनीला सुनावले, भारताच्या सार्वभौमत्वशी कधीच...

नवी दिल्ली: भारतात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पॉप स्टार ()ने पाठिंबा दिला होता. यावरून देशातील अनेक स्टार लोकांनी सडेतोड उत्तर दिले. भारताच्या अंतर्गत गोष्टीत लक्ष घालण्याची गरज नाही, अशा शब्दात रिहानाला अनेकांनी ऐकवले. आता भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू ( )ने देखील रिहानाला सुनावले आहे. केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याला अनेकांनी विरोध केला आहे. यात पर्यावरण आणि जल यासाठी काम करणाऱ्या ग्रेटा थनबर्ग, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्या भाचीचा यांचा देखील समावेश आहे. वाचा- रिहानाने भारतातील गोष्टीत लक्ष घालू नये याबद्दल माजी क्रिकेटपटू प्रज्ञान ओझा आणि अन्य बॉलिवडूमधील स्टार देखील सोशल मीडियावर बोलले आहेत. आता गॉड ऑफ क्रिकेट सचिनने यासंदर्भात ट्वीट केले. भारताच्या सार्वभौमत्वशी कधीच तडजोड केली जाणार नाही. परदेशातील व्यक्ती फक्त पाहू शकतात पण त्यात भाग घेऊ शकत नाहीत. भारताला भारतीय लोकच ओळखतात आणि भारताबाबतचे निर्णय भारतीयांनीच घेतले पाहिजेत. एक देश म्हणून आपण एकत्र राहूयात, असे सचिनने सोशल मीडियावर म्हटले आहे. वाचा- वाचा- कृषी कायद्यावर परेदशातील अनेक लोकांनी विरोध केलाय. यावरून भारतीय लोकांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने लोकांना सत्य जाणून न घेता प्रतिक्रिया देऊ नये असा सल्ला दिला आहे. वाचा- दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. या प्रकरणी अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. यात काही आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे. रिहानाने दोन फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात आंदोलन करणारे शेतकरी दिसत आहेत. रिहानाने आपण याबद्दल का बोलत नाही असा प्रश्न विचारला होता. वाचा- रिहानाच्या या पोस्टवर भारताचा माजी फिरकीपटू प्रज्ञान ओझा (pragyan ojha )ने उत्तर दिले आहे. आमचा देश शेतकऱ्यांवर गर्व करतो आणि आम्हाला माहिती आहे की तो किती महत्त्वाचा आहे. २०२० साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या ओझाने रिहानाला उत्तर देताना म्हटले आहे की, मला विश्वास आहे की हा प्रश्न लवकरच मिटेल. आमच्या अंतर्गत प्रश्नात बाहेरच्या व्यक्तीने लक्ष घालण्याची गरज नाही. वाचा- केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. प्रजासत्ताक दिनाला दिल्लीतील लाल किल्ला परिसरात मोठा राडा झाला होता. त्यामुळे दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच बरोबर आंदोलन करणाऱ्या ठिकाणी इंटरनेट सेवा बंद गेली गेली आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cE4VUq

शेतकरी आंदोलन: 'या' क्रिकेटपटूला घ्यायची आहे रिहानाची मुलाखत

नवी दिल्ली: जगप्रसिद्ध पॉप सिंगर (pop star ) भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला ( ) पाठिंबा दिला होता. तिने यासंदर्भात एक ट्विट केले होते. त्यानंतर भारतातील अनेकांनी तिच्यावर टीक केली होती. बॉलिवडूमधील स्टार आणि क्रिकेटपटू प्रज्ञान ओझाने देकील तिला भारताच्या अंतर्गत प्रश्नात लक्ष घालण्याची गरज नाही अशा शब्दात सडेतोड उत्तर दिले होते. आता एका क्रिकेटपटूने तिची मुलाखत घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. वाचा- इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू () याने रिहानाला शेतकरी आंदोलनावर चर्चा करण्यासाठी आमंत्रित केले आहे. रिहानाने भारतातील शेतकऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या ट्वीटला उत्तर देत मॉटीने त्याच्या द फुल मॉटी या रेडिओ कार्यक्रमात मुलाखत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मी या शनिवारी पंजाब रेडिओ आणि एशियन एफएक्स रेडिओवरील द फुल मॉटी कार्यक्रमात भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर तुझी मुलाखत घेऊ इच्छितो, असे मॉटी पनेसरने म्हटले आहे. वाचा- रिहानाने दोन फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात आंदोलन करणारे शेतकरी दिसत आहेत. रिहानाने आपण याबद्दल का बोलत नाही, असा प्रश्न विचारला होता. वाचा- ओझाने दिले उत्तर आमचा देश शेतकऱ्यांवर गर्व करतो आणि आम्हाला माहिती आहे की तो किती महत्त्वाचा आहे. २०२० साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या ओझाने रिहानाला उत्तर देताना म्हटले आहे की, मला विश्वास आहे की हा प्रश्न लवकरच मिटेल. आमच्या अंतर्गत प्रश्नात बाहेरच्या व्यक्तीने लक्ष घालण्याची गरज नाही. वाचा- केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून करत आहेत. प्रजासत्ताक दिनाला दिल्लीतील लाल किल्ला परिसरात मोठा राडा झाला होता. त्यामुळे दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच बरोबर आंदोलन करणाऱ्या ठिकाणी इंटरनेट सेवा बंद गेली गेली आहे. दिल्लीच्या बाहेरच्या भागात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देताना इंटरनेट सेवा बंद केल्याबद्दल रिहानाने टीका केली होती.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3rhbQa3

IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत कोणाला संधी मिळणार; हा आहे भारताचा संभाव्य संघ

चेन्नई: for भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला ५ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. भारतीय संघात कोणाला संधी मिळणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. चेन्नईत होणाऱ्या पहिल्या कसोटीत फिरकीपटूंना अधिक मदत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारत या सामन्यात दोन जलद गोलंदाज आणि तीन फिरकीपटूंना संधीत देऊ शकते. वाचा- भारत दोन जलद गोलंदाजांसह खेळण्याची शक्यता असल्याने संघात जसप्रीत बुमराहसोबत इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज यापैकी कोणाला संधी मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. चेपॉक मैदानावर नेहमी फिरकीपटूंना मदत मिळते. त्यामुळे दुसरा जलद गोलंदाज म्हणून कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री कोणाला संधी देतात हे पाहावे लागले. वाचा- इशांत शर्माने गेल्या एका वर्षापासून लाल चेंडूने क्रिकेट खेळला नाही. या उलट सिराजने ऑस्ट्रेलिया धमाकेदार कामगिरी केली होती. ब्रिस्बेन कसोटीच्या एका डावात त्याने पाच विकेटसह मालिकेत १३ विकेट घेतल्या होत्या. इशांतने नुकत्याच झालेल्या सैय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीत १४.१ ओव्हर गोलंदाजी केली होती. वाचा- येत्या दोन दिवसात गोलंदाजीचे प्रशिक्षक इशांत किंवा सिराज यांच्यापैकी एकाला घेण्याबाबत निर्णय घेतील. दुसरा निर्णय फिरकीपटूंच्या बाबतचा असले. आर अश्विनसोबत वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यापैकी कोणाची निवड केली जाते हे पाहावे लागले. वाचा- सुंदरने ब्रिस्बेन कसोटीत पदार्पण करताना अर्धशतक आणि चार विकेट घेतल्या होत्या. पण सुंदरचा समावेश केलास संघात असे दोन फिरकीपटू असतील ज्यांच्याकडे कमी अनुभव असेल. हार्दिक पंड्या हा आणखी एक पर्याय भारताकडे आहे. तो बुधवारी सकाळी क्वारटाइनचा कालावधी पूर्ण करून सराव सत्रात सहभागी झाला. पंड्या वैयक्तीक कारणामुळे उशीरा चेन्नईत दाखल झाला होता. पंड्याला संधी मिळो की नाही. पण त्याच्यावर गोलंदाजी करण्यासाठीचा दबाव वाढत चालला आहे. पहिल्या कसोटीसाठी संभाव्य संघ रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर/अक्षर पटेल, आर अश्विन, कुलदीप यादव, इशांत शर्मा/ मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ri7mzT

शेतकरी आंदोलन: भारतीय क्रिकेटपटूने दिले रिहानाला सडेतोड उत्तर

नवी दिल्ली: बारबाडोसची प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ( pop star rihanna) हिने भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. रिहानाच्या या पाठिंब्यावरून तिच्यावर अनेकांनी टीका केली. भारताच्या अंतर्गत गोष्टीत लक्ष दिल्यावरून भारताच्या माजी क्रिकेटपटूने देखील रिहानाला सडेतोड उत्तर दिले आहे. वाचा- दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. या प्रकरणी अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. यात काही आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे. रिहानाने दोन फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात आंदोलन करणारे शेतकरी दिसत आहेत. रिहानाने आपण याबद्दल का बोलत नाही असा प्रश्न विचारला होता. वाचा- रिहानाच्या या पोस्टवर भारताचा माजी फिरकीपटू ( )ने उत्तर दिले आहे. आमचा देश शेतकऱ्यांवर गर्व करतो आणि आम्हाला माहिती आहे की तो किती महत्त्वाचा आहे. २०२० साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या ओझाने रिहानाला उत्तर देताना म्हटले आहे की, मला विश्वास आहे की हा प्रश्न लवकरच मिटेल. आमच्या अंतर्गत प्रश्नात बाहेरच्या व्यक्तीने लक्ष घालण्याची गरज नाही. वाचा- केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. प्रजासत्ताक दिनाला दिल्लीतील लाल किल्ला परिसरात मोठा राडा झाला होता. त्यामुळे दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच बरोबर आंदोलन करणाऱ्या ठिकाणी इंटरनेट सेवा बंद गेली गेली आहे. दिल्लीच्या बाहेरच्या भागात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देताना इंटरनेट सेवा बंद केल्याबद्दल रिहानाने टीका केली होती.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pIWoTD

क्रिकेटमधील नवा वर्ल्ड रेकॉर्ड; अशी कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू

ढाका: भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. तर टी-२० मध्ये हा विक्रम सध्या भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या नावावर आहे. देशाकडून खेळताना तिनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आजपर्यंत कोणत्याही क्रिकेटपटूला करता आला नव्हता. पण आता हा विक्रम एका क्रिकेटपटूने करून दाखवला आहे. बांगलादेशचा फलंदाज () याने वनडे, टी-२० आणि कसोटी या तिनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. तो जगातील एकमेव असा क्रिकेटपटू आहे ज्याने देशाकडून खेळताना सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या. वाचा- तमीम इकबाल हा जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे ज्याने कसोटी, टी-२० आणि वनडेत सर्वाधिक धावा केल्या. जगातील अन्य कोणत्याही देशातील क्रिकेटपटूला अशी कामगिरी करता आलेली नाही. सध्या बांगलादेश आणि वेस्ट इंडिज () यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेआधी तमीम वनडे आणि टी-२० मध्ये बांगलादेशकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. कसोटीत विकेटकिपर मुशफिकुर रहीमला मागे टाकत त्याने तिनही प्रकारात अव्वल स्थान मिळवले. वाचा- चटगाव येथील अहमद चौधरी स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात ९वी धाव घेत त्याने हा विक्रम केला. तमीमने बांगलादेशकडून ६१ कसोटीत ९ शतकांसह ४ हजार ४१४ धावा केल्या आहेत. तर रहीमने ७० कसोटीत ७ शतक आणि २१ अर्धशतकासह ४ हजार ४१३ धावा केल्या आहेत. तमीमने हा विक्रम केला आणि तो लगेच बाद झाला. वाचा- या कसोटीत रहीम देखील खेळत आहे. जर त्याने दोन धावा केल्या तर पुन्हा कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर जमा होईल आणि तमीम मागे पडेल. तमीमने वनडेत २१० सामन्यात ७ हजार ३६० धावा केल्या आहेत. यात १३ शतक आणि ४९ अर्धशतकांचा समावेश आहे. तर टी-२० मधील ७४ लढतीत त्याने १ शतक आणि ७ अर्धशतकांसह १ हजार ७०१ धावा केल्या आहेत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39EyS4F

Tuesday, February 2, 2021

विराटने केली धोनीची कॉपी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

चेन्नई: ind vs engभारतीय संघ ५ फेब्रुवारीपासून इंग्लंडविरुद्ध ४ सामन्यांची कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सुट्टीवर गेलेला भारताचा नियमीत कर्णधार ( ) पुन्हा एकदा मैदानावर कमबॅक करण्यास सज्ज झाला आहे. भारतीय संघाने क्वारंटाइन कालावधी पूर्ण केल्यानंतर सरावाला सुरूवात केली आहे. बीसीसीआयने भारतीय खेळाडूंच्या सराव सत्राचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. वाचा- बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये भारतीय खेळाडू विविध प्रकारचे सराव करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीचा एक छोटा पार्ट सध्या चर्चेत आला आहे. सराव करताना भारतीय संघातील खेळाडू आनंद घेताना या व्हिडिओमध्ये दिसते. विराटने सराव करताना माजी कर्णधार ()च्या हेलिकॉप्टर शॉट ()ची नकल केली. वाचा- विरटाने धोनीच्या केलेल्या या शॉटची नकल सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. वाचा- इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहलीला काही विक्रम करण्याची संधी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून १२ हजार धावा पूर्ण करण्याची त्याला संधी आहे. यासाठी त्याला फक्त १८९ धावांची गरज आहे. त्या बरोबर भारतीय मैदानावर इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर करण्याची त्याला संधी आहे. इंग्लंडविरुद्ध त्याने ९ सामन्यात ८४३ धावा केल्या आहेत. या यादीत सुनिल गावस्कर १ हजार ३३१ धावांसह पहिल्या तर सचिन तेंडुलकर ९६० धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. चेतेश्वर पुजाराने इंग्लंडविरुद्ध भारतात ८३९ धावा केल्या आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेपैकी पहिल्या दोन लढती चेन्नईतील चिंदबरम मैदानावर होणार आहेत. त्यानंतरच्या दोन लढती अहमदाबादच्या मोटेरा मैदानावर होतील.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36Bnuor

भारतीय क्रिकेटपटूची निवृत्ती; BCCIला पाठवला ई-मेल

कोलकाता: भारतीय संघातील जलद गोलंदाज () याने मंगळवारी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली. डिंडाने भारताकडून १३ वनडे आणि ९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने डिंडाने वनडेत १२ तर टी-२० मध्ये १७ विकेट घेतल्या आहेत. वाचा- बीसीसीआयचे आभार मी आज क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त होत आहे. बीसीसीआय () आणि गोवा असोसिएशन (Goa Cricket Association)ला यासंदर्भात मेल पाठवला आहे. भारताकडून खेळण्याचे सर्वांचे स्वप्न असते. मी बंगालकडून खेळले आणि देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. बीसीसीआयचे मनापासून धन्यवाद ज्यांनी मला भारताकडून खेळण्याची संधी दिली. वाचा- आयपीएलमधील कामगिरी डिंडाने आयपीएलमधील दिल्ली डेअरडेव्हिल्स, कोलकाता नाइट रायडर्स, पुणे वॉरियर्स, रायजिंग पुणे सुपरजायट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या संघाचे प्रतिनिधित्व केले. त्याने ७८ सामन्यात २२.२० च्या सरासरीने ६८ विकेट घेतल्या. डिंडाने २०१० साली झिम्बाब्वेविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. डिंडाने ११६ प्रथम श्रेणी सामन्यात ४२० विकेट घेतल्या. त्याने २६ वेळा डावात ५ विकेट घेतल्या. २००९ साली श्रीलंकेविरुद्ध टी-२० मध्ये पदार्पण केले. वाचा- नुकत्याच झालेल्या सैय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत डिंडा गोवा संघाकडून खेळला. लिस्ट ए च्या ९८ सामन्यात १५१ विकेट घेतल्या आहेत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pWeYIl

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धची मालिका जिंकल्यावर भारतीय संघाला बसू शकतो धक्का...

चेन्नई, : इंग्लडविरुद्ध दोन हात करण्यासाठी भारतीय संघ चेन्नईच्या मैदानात घाम गाळत आहे. पण इंग्लंडविरुद्धची मालिका जिंकल्यावरही भारतीय संघाला मोठा धक्का बसू शकतो, असे सध्याचे चित्र आहे. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा रद्द केला आहे. त्यामुळे न्यूझीलंडच्या संघाला चांगलाच फायदा झाला आहे. कारण जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत न्यूझीलंडचा संघ फायनलमध्ये पोहोचला आहे. भारताला जर या फायनलमध्ये पोहोचायचे असेल तर त्यांना इंग्लंडवर फक्त विजय मिळवून चालणार नाही. जाणून घ्या काय आहे समीकरण... न्यूझीलंडच्या संघाकडे सध्या ४२० गुण आहे आणि त्यांची जिंकण्याची टक्केवारी ही ७० टक्के आहे. यानंतर न्यूझीलंड एकही कसोटी मालिका खेळणार नाही. त्यामुळे आता न्यूझीलंड या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. न्यूझीलंडला टक्कर देण्यासाठी आता तीन संघांमध्ये शर्यत आहे. यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांचा समावेश आहे. भारताची सध्या जिंकण्याची टक्केवारी ही ७१.७ टक्के आहे, तर ऑस्ट्रेलियाची ६९.२ टक्के आहे. भारताची इंग्लंडबरोबरची मालिका बरोबरीत सुटली तर ऑस्ट्रेलिया या फानलमध्ये जाऊ शकते आणि भारताचा पत्ता कट होऊ शकतो. त्याचबरोबर भारताने १-० अशी जरी ही मालिका जिंकली तरी त्यांना फायनलमध्ये पोहोचता येणार नाही. भारताने जर ही मालिका २-१ अशी जिंकली तर त्यांना अंतिम फेरीत पोहोचता येणार आहे. पण जर इंग्लंडला फायनलमध्ये पोहोचायचे असेल तर त्यांना भारताला ३-०, ३-१ किंवा ४-० अशा फरकाने पराभूत करावे लागणार आहे. गेल्या काही कसोटी मालिकांमध्ये इंग्लंडने सातत्याने विजय मिळवला आहे. त्यामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिका कोण जिंकतो यापेक्षा किती फरकाने जिंकली जाते, यावर फायनलचे गणित अवलंबून असेल. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी १८ जुनला खेळवण्यात येणार आहे. यामध्ये न्यूझीलंडच्या संघाचे स्थान निश्चित झाले आहे. पण भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेच्या निकालावर अंतिम फेरीत दुसरा कोणता संघ खेळू शकतो, हे ठरणार आहे. त्यामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष हे भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेवर असणार आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36yqCkK

BCCIच्या या स्पर्धेसाठी संभाव्य खेळाडूंमध्ये अर्जुन तेंडुलकरचा समावेश

मुंबई : भारताचा मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा () मुंबई संघाचे प्रतिनिधीत्व करतो. काही दिवसांपूर्वी अर्जुन सैय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीत खेळला होता. आता अर्जुनला आणखी एक स्पर्धेत मुंबईचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी आहे. बीसीसीआयकडून आयोजित स्पर्धेसाठीच्या संभाव्य खेळाडूंमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. वाचा- बीसीसीआय ( )ने या वर्षी मुश्ताक अली ट्रॉफीनंतर रणजी स्पर्धेच्या ऐवजी विजय हजारे ट्रॉफी आयोजित करणार असल्याचा निर्णय घेतला होता. या स्पर्धेसाठी मुंबई संघाने जाहीर केलेल्या खेळाडूंच्या यादीत अर्जुनचा देखील समावेश आहे. अर्थात मुंबईने १०४ जणांची यादी जाहीर केली आहे. इतक्या खेळाडूमधून अर्जुनची अंतिम संघात निवड होते का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. वाचा- या संभाव्य खेळाडूंमध्ये पृथ्वी शॉचा देखील समावेश आहे. पण पृथ्वी सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात देखील त्याला धावा करता आल्या नाहीत. पहिल्या दोन डावात शून्यावर बाद झाल्यानंतर अन्य तीन सामन्यात पृथ्वीला संधी दिली गेली नाही. वाचा- अर्जुनने या वर्षी सैय्यद मुश्ताक अली स्पर्धेत पदार्पण केले होते. त्याने हरियाणा आणि पुद्दुचेरी विरुद्ध सामने खेळले होते. अर्जुन जलद गोलंदाज आहे आणि त्याने भारतीय संघ तसेच आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना नेट्समध्ये गोलंदाजी केली आहे. मुश्ताक अली स्पर्धेत अर्जुनने दोन सामन्यात ६७ धावा देत दोन विकेट घेतल्या होत्या. वाचा- मुंबईच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत श्रेयस अय्यर, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, अरमान जाफर, आदित्य तारे, सिद्धेष लाड यांचा समावेश आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3oCfBoV

IND vs ENG : 'पहिल्या कसोटीत हार्दिकला या खेळाडूमुळे संधी मिळणार नाही'

चेन्नई: ind vs eng 2021 यांच्यातील पहिला कसोटी सामना सुरू होण्यास फक्त दोन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. दोन्ही संघातील पहिली लढत चेन्नईच्या चेपॉक मैदानावर होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात ज्या खेळाडूंचे कमबॅक झालाय त्यामध्ये ()चा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत हार्दिक संघात नव्हता. आता इंग्लंडविरुद्ध त्याला अंतिम ११ मध्ये संधी मिळते का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. वाचा- भारतीय क्रिकेट संघाचा माजी जलद गोलंदाज इरफान पठाण याने इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीत हार्दिक पंड्याला संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले आहे. हार्दिकच्या ऐवजी संघात अष्ठपैलू वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळू शकते. फिरकीपटू असलेल्या सुंदरने ब्रिस्बेन कसोटीत शानदार फलंदाजी देखील केली होती. त्यामुळे पहिल्या कसोटीत त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे, असे पठाण म्हणाला. वाचा- वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळाली तर तो सातव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. त्यामुळेच हार्दिकला संधी मिळण्याची शक्यता कमी वाटते. सुंदरने फक्त एकच कसोटी सामना खेळला आहे. या पदार्पणाच्या सामन्यात भारताने ब्रिस्बेन मैदानावर ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्याने पहिल्या डावात ६२ तर दुसऱ्या डावात २२ धावा केल्या. या शिवाय ऑस्ट्रेलियाच्या चार महत्त्वाच्या विकेट घेतल्या होत्या. वाचा- भारत आणि इंग्लंड यांच्यात चार कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. त्यानंतर पाच टी-२० आणि मग ३ सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. कसोटी सामने चेन्नई आणि अहमदाबाद, टी-२० लढती अहमदाबाद तर वनडे लढती पुण्यात होणार आहेत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3j94FOl

ऑस्ट्रेलियातील यशा मागे होता राहुल द्रविड; अजिंक्यने मुलाखतीत केला मोठा खुलासा

मुंबई : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजय मिळवला. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी भारताने २-१ने स्वत:कडे राखली. भारतीय संघाच्या या विजयात अनेक खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. पण विराट कोहली नसताना आणि संघातील मुख्य खेळाडू दुखापतीमुळे बाहेर बसल्यावर अजिंक्यने युवा खेळाडूंसह ऑस्ट्रेलियात इतिहास घडवला. वाचा- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताचा ३६ वर ऑल आउट झाला होता. त्यानंतर अजिंक्यकडे जबाबदारी आली. ही जबाबदारी त्याने यशस्वीपणे पार पाडली. अजिंक्यला हे सर्व करता आले कारण त्याला भारताचा दिग्गद क्रिकेटपटू राहुल द्रविडने एक महत्त्वाचा सल्ला दिला होता. समालोचक हर्षा भोगले यांच्याशी बोलताना अजिंक्यने हा खुलासा केला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत राहुलने अजिंक्यला सांगितले होते की, नेट्समध्ये अधिक फलंदाजीचा सराव करू नको आणि कर्णधारपद असताना अतिरिक्त दबाव घेऊ नको. वाचा- राहुल भाईने मला मालिकेच्या आधी फोन केला होता. तेव्हा आम्ही दुबईतून ऑस्ट्रेलियाला जात होतो. कोणताही दबाव घेऊ नको. मला माहिती आहे की पहिल्या कसोटीनंतर तुला नेतृत्व करायचे आहे. पण काळजी करू नको. मानसिकरित्या मजबूत रहा. नेट्समध्ये अधिक फलंदाजी करू नको. राहुल भाईकडून तुम्ही कधीच अशा प्रकारच्या सल्ल्याची अपेक्षा करत नाही, असे अजिंक्य म्हणाला. वाचा- रहाणेने कर्णधारपद संभाळल्यानंतर भारताने दुसऱ्या कसोटीत आठ विकेटनी विजय मिळवला. त्यानंतर तिसरी सिडनी कसोटी ड्रॉ झाली आणि अखेरच्या ब्रिस्बेन कसोटीत ऐतिहासिक विजय मिळवला. वाचा- राहुलने मला नेट्समध्ये अधिक सराव करू नको असे सांगितले. तुझी तयारी चांगली सुरू आहे. फलंदाजी छान करतोयस. दबाव घेऊ नको. फक्त याचा विचार कर की तु संघाला कसे नेतृत्व देशील आणि खेळाडूंचा आत्मविश्वास कसा वाढवशील. परिणामांचा विचार करू नको, सर्व काही चांगले होईल. द्रविड सोबत झालेल्या या चर्चेने माझे काम सोपे झाले, असे अजिंक्य म्हणाला.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2NQ5Vdy

IND vs ENG : कपड्यांचा व्यापारी बनवतोय चेन्नईची खेळपट्टी, धक्कादायक निर्णय

चेन्नई, : एका कपड्यांच्या व्यापाऱ्याला आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला सामना होणाऱ्या चेन्नईची खेळपट्टी बनवण्यास सांगितले आहे. व्ही. रमेश कुमार हे कपड्यांचे व्यापारी आहेत. पण त्यांना जेव्हा चेन्नईची खेळपट्टी बनवण्यास सांगितली तेव्हा त्यांनाही मोठा धक्का बसला होता. रमेश हे सिटी तिरपूर येथे कपड्याचे व्यापारी आहेत. आतापर्यंत एकदाही त्यांनी प्रथम श्रेणी सामन्यांसाठी खेळपट्टी बनवलेली नाही. याबाबत जेव्हा रमेश यांना समजले तेव्हा त्यांनाही मोठा धक्का बसला होता. याबाबत रमेश यांनी सांगितले की, " तामिळनाडू क्रिकेट संघटनेने मला दोन कसोटी सामन्यांसाठी खेळपट्टी बनवण्यास सांगितली आहे. पण या निर्णयामुळे मीदेखील चकित झालो आहे." आतापर्यंत रमेश यांनी प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांसाठीही खेळपट्टी बनवली नाही. त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटची खेळपट्टी बनवण्याचा अनुभव नाही. पण तरीही त्यांच्याकडे तामिळनाडू क्रिकेट संघटनेने एक महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. या जबाबदारीला पूर्णपणे न्याय देण्यासाठी रमेश आता आपले काम चोख बजावत आहेत. बहुतांशी क्युरेटर हे पिच मेकिंगची कला शिकून घेतात आणि त्यानंतर अनुभवाच्या जोरावर खेळपट्टी बनवण्यास तयार होतात. पण रमेश यांच्याकडे या गोष्टीचा कोणताही अनुभव नाही. रमेश हे आपल्या महाविद्यालयीन जीवनात चांगले अॅथलीट होते. तामिळनाडूचे त्यांनी ११० मीटर धावण्याचा शर्यतीमध्ये प्रतिनिधीत्व केले होते, त्याचबरोबर ते राज्याच्या रिले संघाचेही सदस्य होते. रमेश यांनी १९९६ साली दोन राष्ट्रीय पदके जिंकलेली आहे. रमेश यांची पत्नी मालारविजी गिरी या चार्टर्ड अकाउंटेंट आहेत. चेन्नईची खेळपट्टी असेल तरी कशी, पाहा... चेन्नईच्या खेळपट्टीवर पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाजांसाठी पोषक वातावरण असेल. पण त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी ही खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त ठरू शकते. त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या दिवशी या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना चांगली मदत मिळू शकते, असे म्हटले जात आहे. चेन्नईमध्ये दोन कसोटी सामने खेळण्यात येणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला ५ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36zcPKC

टी. नटराजनला बीसीसीआयने खेळण्याची परवानगी नाकारली, झाला मोठा खुलासा

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया गाजवणारा भारताचा युवा वेगवान गोलंदाज टी. नटराजनला बीसीसीआयनेच खेळण्याची परवानगी नाकारली आहे. या गोष्टीचा खुलासा दस्तुरखुद्द नटराजननेच केला आहे. भारतामध्ये आल्यावर एका मुलाखतीमध्ये नटराजनने या गोष्टीचा खुलासा केल्याचे पाहायला मिळाले आहे. हा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर नेट बॉलर म्हणून गेला होता. पण त्याच्यातील गुणवत्ता पाहून त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आले. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये पदार्पण करण्याची संधी नटराजनला मिळाली आणि हा एक विक्रम आहे. पण भारतात परतल्यावर मात्र नटराजनला क्रिकेट खेळण्याची परवानगी बीसीसीआयने नाकारल्याचे पाहायला मिळत आहे. बीसीसीआयने आपल्याला परवानगी का नाकारली, याचे उत्तरही यावेळी नटराजनने दिले आहे. याबाबत नटराजनने सांगितले की, " भारतात परतल्यावर मी सय्यद मुश्ताक अकली ट्वेन्टी-२० स्पर्धा खेळावी, असे मला तामिळनाडूच्या क्रिकेट संघटनेने सांगितले होते. पण मला ही स्पर्धा खेळता आली नाही. कारण मला ही स्पर्धा खेळण्याची परवानगी बीसीसीआयने दिली नाही. बीसीसीआयने मला सध्याच्या घडीला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे मला त्यांनी या स्पर्धेत खेळायची परवानगी दिली नाही. पण यानंतरच्या स्पर्धांमध्ये मला जर खेळायचे असेल तर मला बीसीसीआयची परवानगी घ्यावी लागेल. बीसीसीआयने परवानगी दिल्यावरच मी त्यानंतर स्पर्धांमध्ये खेळू शकतो." ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यानंतर नटराजनला विश्रांती घेण्याचा सल्ला बीसीसीआयने दिला आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात भारताचे बरेच खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते. त्यामुळे यापुढे असे होऊ नये, यासाठी बीसीसीआय खबरदारीचे उपाय घेत आहे आणि त्यामुळेच नटराजनला सध्याच्या घडीला कोणतीही स्पर्धा खेळण्याची परवागी बीसीसीआयने दिलेली नाही. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठीही नटराजनची निवड भारतीय संघात करण्यात आलेली नाही. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यानंतर बीसीसीआयने काही खेळाडूंना विश्रांती दिली आहे. त्यामध्ये नटराजनचाही समावेश आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात चार कसोटी सामन्याची मालिका पाच फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. मालिकेतील पहिल्या दोन लढती चेन्नईत होणार आहेत. तर उर्वरित लढती दोन लढती अहमदाबाद येथे होतील.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2YCM5oo

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी, स्टार खेळाडू झाला फिट

चेन्नई, : इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वी भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये दुखापतग्रस्त झालेला भारताचा स्टार खेळाडू आता फिट झाला असून तो लवकरच संघात दाखल होणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये दुखापतीमुळे लोकेश राहुलला कसोटी मालिकेत खेळता आले नव्हते. ऑस्ट्रेलियातील मर्यादीत षटकांचे सामने तो खेळला होता. त्यानंतर दोन कसोटी सामन्यांमध्ये त्याला संघात स्थान देण्यात आले नव्हते. पण त्यानंतर राहुलला दुखापत झाली आणि तो या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यातून बाहेर पडला होता. पण आज मंगळवारी आपण पूर्णपणे फिट असल्याचे राहुलने सांगितले आहे. त्यामुळे आता लवकरच तो भारतीय संघात दाखल होणार आहे. राहुलने आपल्या फिटनेसबाबत एक ट्विट केले आहे. राहुलने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, " मला आनंद आहे की, माझ्या दुखापतींचे चांगले पुनर्वसन करण्यात आले आहे. आता मी पूर्णपणे फिट आहे आणि पूर्वीपेक्षा अधिक चांगली मला वाटत आहे. भारताचे प्रतिनिधीत्व करणे हा एक मोठा सन्मन आहे. त्यामुळे मला आता खेळायला कधी मिळणार, याची उत्सुकता आहे. खेळाडूंबरोबर एकत्रित राहण्याचा आनंद काही औरच असतो." दुखपतीनंतर राहुल बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये गेला होता. अकादमीमध्ये त्याच्या दुखापतीचे पुनर्वसन करण्यात आले. त्यानंतर राहुल आता पूर्णपणे फिट झाला आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो भारतीय संघात दाखल होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. जानेवारी महिन्यात बीसीसीआयच्या निवड समितीने राहुलबाबत एक वक्तव्य केले होते. त्यानुसार राहुलची निवड करण्यात आली आहे. पण गेल्या बऱ्याच कालावधीपासून राहुल एकही कसोटी सामना खेळलेला नाही. त्यामुळे यावेळी थेट त्याला संघात स्थान मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात चार कसोटी सामन्याची मालिका पाच फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. मालिकेतील पहिल्या दोन लढती चेन्नईत होणार आहेत. तर उर्वरित लढती दोन लढती अहमदाबाद येथे होतील. या मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि इंग्लंडचा कर्णधार जो रूटसह अन्य खेळाडूंना विक्रम करण्याची संधी आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cBjbgu

गूड न्यूज... केकेआरच्या स्टार खेळाडूच्या घरी पाळणा हलला, फोटो झाला व्हायरल

नवी दिल्ली : आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्स संघाचा स्टार क्रिकेटपटू सुनिल नरिनच्या घरी आनंदाची बातमी आली आहे. नरिन आणि त्याची पत्नी अँजेलिना यांच्या कुटुंबात आता एक नवीन पाहुणा आला आहे. नरिनच्या पत्नीने मुलाला जन्म दिला आहे. नरिनने आपल्या बाळाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून तो चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. पण नरिन सध्या आपल्या पत्नीबरोबर नसल्याचे समजते आहे. नरिनने डिसेंबर महिन्यातच याबाबतची माहिती दिली होती. आपल्याला जानेवारी महिन्यात बाळ होणार असल्याचे त्याने डिसेंबरमध्येच सांगितले होते. त्यानंतर नरिन आणि अँजेलिना यांनी खास फोटो शूटही केले होते. त्यावेळीही नरिनने आपल्या सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले होते आणि त्याला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला होता. नरिनने यानंतर एक भावनिक पोस्टही लिहिली आहे. नरिनने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, " आमच्या ह्रदयात एक जागा रिक्त आहे, याची जाणीव आम्हाला नव्हती. पण ही रीक्त जागा तु भरुन काढली आहेस. तुझ्या या गोंडस चेहऱ्यात आम्हाल देवाची कृपा दिसत आहे. आमचे तुझ्यावर खुप प्रेम आहे." नरिनच्या घरी मुलाचा जन्म झाला असला तरी तो आपल्या पत्नीबरोबर नाही. कारण नरिन हा सध्याच्या घडीला आबुधाबी येथे टी-१० लीग खेळत आहे. या लीगमध्ये नरिनची कामगिरी चांगली होत आहे. नरिनसाठी अजून एक आनंदाची बातमी म्हणजे त्याला कोलकाता नाइट रायडर्स या संघाने रिटेन केले आहे. गेल्यावर्षी युएईमध्ये झालेल्या आयपीएलमध्ये नरिनला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्याचबरोबर नरिनच्या गोलंदाजी शैलीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यामुळे नरिनला आयपीएलमधील काही सामन्यांना मुकावे लागले होते. पण त्यानंतर नरिनने आपल्या गोलंदाजी शैलीची चाचणी दिली होती. या चाचणीत पास झाल्यानंतर नरिन पुन्हा एकदा मैदानात परतला होता. पण नरिनला या आयपीएलमध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. पणण तरीही कोलकाता नाइट रायडर्स संघाने त्याला आपल्या ताफ्यात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3oHQpxb

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेत होणार आहेत हे पाच मोठे विक्रम

नवी दिल्ली: भारत आणि इंग्लंड यांच्यात चार कसोटी सामन्याची मालिका पाच फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. मालिकेतील पहिल्या दोन लढती चेन्नईत होणार आहेत. तर उर्वरित लढती दोन लढती अहमदाबाद येथे होतील. या मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार आणि इंग्लंडचा कर्णधार जो रूटसह अन्य खेळाडूंना विक्रम करण्याची संधी आहे. जाणून घेऊयात कोणत्या खेळाडूंना कोणते विक्रम करण्याची संधी आहे. वाचा- १) भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेत सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम एलिस्टर कुकच्या नावावर आहे. त्याने भारताविरुद्ध पाच कसोटी सामने जिंकले आहेत. विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध १० सामन्यात पाच विजय मिळवले आहेत. कुक आणि कोहली संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहेत. तर जो रुटने भारताविरुद्ध चार कसोटीत विजय मिळवला आहे. जर कोहलीने विजय मिळवला तर तो सर्वाधिक सामने जिंकणारा कर्णधार ठरले. त्याच बरोबर रुटकडे देखील विक्रम मोडण्याची संधी आहे. वाचा- २) भारताची फिरकीपटू आर अश्विनला या मालिकेत हरभजन सिंगचा विक्रम मोडण्याची संधी आहे. त्याने कसोटीत आतापर्यंत भारतीय मैदानावर २५४ विकेट घेतल्या आहेत. तर हरभजनने २६५ विकेट. इंग्लंडविरुद्ध त्याने १२ विकेट घेतल्यास अश्विन हरभजनला मागे टाकू शकतो. भारतात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अश्विनला दुसऱ्या क्रमांकावर पोहोचण्याची संधी आहे. या यादीत दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे पहिल्या स्थानावर आहे. त्याने भारतात ३५० विकेट घेतल्या आहेत. या शिवाय अश्विनला इंग्लंडविरुद्ध भारतात ५० विकेट पूर्ण करण्यासाठी ८ विकेटची गरज आहे. वाचा- ३) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीने कर्णधार म्हणून ११ हजार ८११ धावा केल्या आहेत. कर्णधार म्हणून करिअरमध्ये १२ हजार धावा करण्यासाठी त्याला १८९ धावांची गरज आहे. त्याने इंग्लंड विरुद्ध १८९ धावा केल्यास अशी कामगिरी करणारा तो तिसरा कर्णधार ठरेल. याआधी रिकी पॉन्टिंग (१५ हजार ४४०) आणि ग्रीमी स्मिथ (१४ हजार ८७८) यांनी अशी कामगिरी केली आहे. वाचा- ४) इंग्लंडविरुद्ध इशांत शर्माला देखील एक विक्रम करण्याची संधी आहे. कसोटीत ३०० विकेट घेण्यासाठी त्याला फक्त ३ विकेटची गरज आहे. हा टप्पा पार केल्यास कसोटीत ३०० विकेट घेणारा तो सहावा भारतीय गोलंदाज ठरले. इशांतने २९७ विकेट घेतल्या आहेत. तर भारतात १०० विकेट घेण्यासाठी त्याला २ विकेटची गरज आहे. ५) भारताविरुद्धची पहिली कोसटी ही जो रूटची १००वी कसोटी असेल. २०१२ साली रूटने भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. विशेष म्हणजे त्याने ५०वी कसोटी भारताविरुद्ध खेळली होती.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39F8ub1

क्रिकेटपटू बापाने चेंडू फास्ट टाकल्याने मुलीने बॅट फेकली; पाहा व्हायरल व्हिडिओ

नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाला सलामीवीर फलंदाज ( ) सोशल मीडियावर सक्रीय असतो. भारतीय गाण्यांची आवड असलेल्या वॉर्नरने करोना लॉकडाउन काळात पत्नी आणि मुलींसह अनेक व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते. काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार ()ने वॉर्नरच्या मुलीला कसोटी संघाची जर्सी भेट दिली होती. याचा फोटो वॉर्नरने सोशल मीडियावर शेअर केला होता. आता वॉर्नरची मुलगी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वाचा- वॉर्नरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात त्याची मुलगी क्रिकेट खेळताना दिसतेय. वॉर्नर मुलीला चेंडू टाकतो. पण तो चेंडू फास्ट असल्याने तिला मारता येत नाही. चेंडू फास्ट का टाकला यावरून ती बापावर नाराज होते आणि रागाने बॅट फेकून निघून जाते. वाचा- व्हिडिओत वॉर्नर आणि त्याचे कुटुंबीय नेटमध्ये क्रिकेट खेळताना दिसतात. तो मुलीला चेंडू टाकतो, ती तो मारण्याचा प्रयत्न करते पण तिला शक्य होत नाही. यावर ती बापाला रागावत, चेंडू फास्ट टाकू नको आणि रागाच्या भरत बॅट फेकून देते. हा व्हिडिओ शेअर करताना वॉर्नर म्हणतो, माझा सर्वात आवडता व्हिडिओ आहे. त्याने व्हिडिओत पत्नी कॅडीला देखील टॅग केले आहे आणि चाहत्यांना व्हिडिओसाठी कॅप्शन देण्यास सांगितले आहे. वाचा- विराटने भेट दिली होती जर्सी ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरची मुलगी इंडी रे ही भारताचा कर्णधार विराट कोहलीची फार मोठी फॅन आहे. काही दिवसांपूर्वी विराटने तिला स्वत:ची जर्सी भेट दिली होती. वॉर्नरने याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. आम्ही मालिका गमावली आहे. पण आमच्याकडे एक मुलगी आहे जी फार खुस आहे. धन्यवाद विराट कोहली. कसोटी संघाची जर्सी दिल्या बद्दल इंडीला ही जर्सी खुप आवडली. तिला वडील आणि एरॉन फिंचसह विराट कोहली खुप आवडतो, असे वॉर्नरने हा फोटो शेअर करताना म्हटले होते. वॉर्नरला ३ मुली आहेत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39CvcR2

पाहा व्हिडिओ: फिल्डिंग करताना कपडे बदलत होता खेळाडू आणि...

अबुधाबी: क्रिकेट मैदानावर सामना सुरू असताना अनेक गंमतीशीर घटना घडतात. अशा घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अबुधाबीत सध्या (T 10 League) सुरू आहे. या स्पर्धेत अनेक फलंदाजांनी स्फोटक खेळी केल्याच्या बातम्या येत आहेत. पण सध्या या स्पर्धेतील असा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे जो पाहिल्यानंतर तुम्हाला पोट धरून हसू येईल. वाचा- अबुधाबी आणि नॉर्दर्न वॉरिअर्स () यांच्यात झालेल्या सामन्यात वॉरिअर्सकडून खेळणारा ( ) सीमा रेषेवर फिल्डिंग करत होता. फलंदाजाने जेव्हा शॉट मारला तेव्हा तो चेंडू पकडण्याचे सोडून स्वत:चा टी शर्ट बदलत होता. रोहन मुस्तफा सामना सुरू असताना कर असलेला प्रकार पाहून चाहते देखील हैराण झाले. वाचा- रोहन सीमारेषेवर फिल्डिंगसाठी उभा होता. फलंदाजाने चेंडू मारला तेव्हा रोहन मुस्तफा टी-शर्ट बदलत होता. त्यामुळे चेंडू त्याच्या जवळून गेला आणि त्याला तो पकडता आला नाही. यामुळे अबुधाबी संघाला चौकार मिळाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सामन्यात वासिम मोहम्मदने केलेल्या ७६ धावांच्या जोरावर नॉर्दर्न वॉरियर्सने ८ विकेटनी विजय मिळवला. अबुधाबीने १० षटकात ३ बाद १२३ धावा केल्या होत्या. अनेक युझर्स या व्हिडिओवर मजेदार कमेंट देत आहेत. तर काहींनी याला अनप्रोफेशनल असे म्हटले आहे. टी-२० क्रिकेटची लोकप्रियता सर्वाधिक असताना आता टी-१० लीग सुरू झाले आहे. या लीगमधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आयसीसीने अबुधाबीत सुरू असलेल्या टी-१० लीग स्पर्धेला मान्यता दिली आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pAq7y9

Monday, February 1, 2021

निमित्त स्टेडियमच्या फोटोचे; भारत-पाकिस्तान चाहत्यांमध्ये सोशल मीडियावर पुन्हा राडा

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात असलेल्या राजकीय वादाचे पडसाद सर्व ठिकाणी उमटतात. सोशल मीडियावर देखील कोणत्या ना कोणत्या कारणामुळे या दोन्ही देशातील चाहत्यांमध्ये राडा सुरू असतो. यावेळी देखील अशीच एक घटना घडली आहे. यासाठी निमित्त ठरले ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने शेअर केलेल्या एका फोटोचे... वाचा- आयसीसीने सोशल मीडियावर बलुचिस्तानमधील ग्वादर क्रिकेट ( )स्टेडियमचे दोन फोटो शेअर केले. हा फोटो शेअर करताना त्यांनी बलुचिस्तानमधील ग्वादर क्रिकेट स्टेडियममधील या फोटोचे आणखी फोटो आम्हाला पाठवा, आम्ही वाट पाहत आहोत. वाचा- ... आयसीसीच्या या पोस्टनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट चाहत्यांमध्ये राडा सुरू झाला. दोन्ही देशातील चाहत्याचे यावर कमेंट वॉर सुरू झाले. अनेक भारतीय चाहत्यांनी आयसीसीला धर्मशाला () येथील क्रिकेट स्टेडियमचे फोटो पाठवले. काहींनी तर केरळमधील केसीए स्टेडियमचे फोटो पाठवले. अर्थात ही पहिली वेळ नाही जेव्हा भारत आणि पाकिस्तान मधील चाहते सोशल मीडियावर एकमेकांविरुद्ध भिडले. काही दिवासांपूर्वी आयसीसीने एक पोल घेतला होता. त्यामध्ये कर्णधार झाल्यानंतर कोणत्या खेळाडूची कामगिरी सर्वोत्तम झाली असा प्रश्न विचारण्यात आला होता. या पोलमध्ये विराट कोहलीला मागे टाकून पाकिस्तानचे माजी कर्णधार इम्रान खान यांनी बाजी मारली होती. पोलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्स आणि ऑस्ट्रेलियाची मेग लॅनिंग यांचा देखील समावेश होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यात राजकीय संबंध तणावाचे असल्याने क्रिकेट सामने होत नाही. दोन्ही संघ फक्त आयसीसीच्या स्पर्धेत सामने खेळतात. पण सोशळ मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणावरून चाहत्यांमध्ये वॉर सुरूच असते.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cy0pqn

IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध विजयासाठी भारताकडे आहे हुकमी एक्का; मालिकेत विक्रमाची संधी

नवी दिल्ली: भारत आणि इंग्लंड () यांच्यातील कसोटी मालिकेला ५ फेब्रुवारीपासून सुरूवात होत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षात भारतीय संघाच्या विजयात ()चे महत्त्वाचे योगदान आहे. शानदार गोलंदाजीच्या जोरावर अश्विनने संघात स्थान भक्कम केले आहे. नुकत्याच ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत त्याने ३ सामन्यात १२ विकेट घेतल्या होत्या. चौथ्या आणि अंतिम कसोटीत तो दुखापतीमुळे खेळू शकला नाही. वाचा- ... कसोटीत भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अश्विन आता चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने ७४ कसोटीत ३७७ विकेट घेतल्या आहेत. या यादीत अनिल कुंबळे ६१९ विकेटसह पहिल्या, कपिल देव ४३४ विकेटसह दुसऱ्या तर ४१७ विकेटसह तिसऱ्या स्थानावर आहेत. अश्विन फक्त गोलंदाजी नाही तर फलंदाजी देखील करू शकतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धची तिसरी कसोटी त्याच्या फलंदाजीमुळे भारताला ड्रॉ करता आली. इंग्लंडचे फलंदाज अश्विन सामना कसा करतात त्यावर मालिकेचा निकाल ठरेल. वाचा- इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत अश्विनला हरभजन सिंगचा एक विक्रम मोडण्याची संधी आहे. अश्विनने कसोटीत घेतलेल्या ३७७ विकेटपैकी २५४ विकेट भारतात घेतल्या आहेत. तर हरभजनने भारतात २६५ विकेट घेतल्या आहेत. इंग्लंडविरुद्ध अश्विनने १२ विकेट घेतल्यास तो हरभजन सिंगला मागे टाकू शकतो. भारतीय भूमीवर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अश्विन दुसऱ्या क्रमांकावर येऊ शकतो. या यादीत अनिल कुंबळे अव्वल स्थानावर आहे. त्याने भारतात ३५० विकेट घेतल्या आहेत. भारतात इंग्लंडविरुद्ध ५० विकेट घेण्याासाठी अश्विनला ८ विकेटची गरज आहे. त्याने आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध २७ कसोटीत ५६ विकेट घेतल्या आहेत. एका डावात ५५ धावा देत ६ विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. एका कसोटीत १६७ धावा देत १२ ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2YyBpan

भर मैदानात क्रिकेटपटूवर आली सर्वांसमोर पँट काढण्याची वेळ, व्हिडीओ झाला व्हायरल...

नवी दिल्ली : क्रिकेटच्या मैदानात नुकताच एक मजेदार किस्सा घडल्याचे पाहायला मिळाले. कारण भर मैदानात खेळाडूला आपली पँट काढण्याची वेळ आली. यावेळी चाहत्यांसह समालोचकांना हसू आवरता आले नाही. या गोष्टीचा व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. ही गोष्ट घडली ती ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू उस्मान ख्वाजाच्या बाबतीत. उस्मान हा बिग बॅग लीगमध्ये सिडनी थंडर या संघाकडून खेळत आहे. उस्मान यावेळी सिडनीच्या संघाकडून फलंदाजी करण्यास मैदानात उतरला होता. यावेळी उस्मानने २५ चेंडूंत २६ धावा केल्या होत्या. त्यावेळी सिडनीच्या संघाच्या आठ षटकांमध्ये १ बाद ६० अशी स्थिती होती. त्यावेळी उस्मानवर भर मैदानात आपली पँट काढण्याची वेळ आली. काही वेळा खेळत असताना काही क्रीडा साहित्यांमध्ये बदल करावा लागतो. उस्मानला यावेळी आपला अॅपडॉमन गार्ड बदलायचा होता. त्यामुळे उस्मानने सुरुवातीला आपली पँट अर्धवट काढली. त्यानंतर त्याने आपले शूज काढले. त्यानंतर आपल्या ऑरेंज हाफ पँटवर उस्मानने गार्ड लावला होता. हा गार्ड त्याने यावेळी काढला. त्यानंतर सिडनीच्या संघाचा एक राखीन खेळाडू यावेळी उस्मानसाठी गार्ड घेऊन आला होता. उस्मानने तो गार्ड घातला आणि त्यानंतर पुन्हा पँट चढवून तो खेळायला लागला. उस्मानने सुरुवातीला जेव्हा पँट काढली तेव्हा कोणालाही काही समजले नव्हते. समालोचकही उस्मान नेमकं काय करतोय, याची चर्चा करत होता. पण उस्मानने जेव्हा आपला गार्ड काढला तेव्हा त्याला नेमकं काय करायचं आहे, हे समालोचकांनाही समजले. त्यावेळी एकच हशा पिकल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर उस्मान जेव्हा या सर्व गोष्टी करत होता, तेव्हा मैदानातील प्रेक्षकांनाही नेमकं काय चाललं आहे, हे समजत नव्हते. त्यावेळी काही चाहत्यांनी उस्मानची हुर्योही उडवली. या सामन्या सिडनी थंडरला ब्रिस्बेन हिट संघाकडून ९ विकेट्सने पराभव पत्करावा लागला. हा सामना एकतर्फी झाल्याचे पाहायला मिळाले. पण सामन्यात जेवढी रंगत भरलेली नव्हती तेवढी उस्मानच्या एका कृत्यामुळे पाहायला मिळाली. हा व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3tiqgsc

रोहित शर्मा आणि धवल कुलकर्णी महाराष्ट्रात या ठिकाणी उभारणार क्रिकेट अकादमी

मुंबई : भारताचा धडाकेबाज फलंदाज आणि उपकर्णधार रोहित शर्मा व वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी नांदेडमध्ये क्रिकेट अकादमी सुरू करण्यास इच्छूक आहेत. यासंदर्भात धवल कुलकर्णीनेआज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन विचारविनिमय केला. सोमवारी सायंकाळी मुंबई येथे झालेल्या या भेटीत धवल कुलकर्णी व 'क्रिककिंगडम'चे पराग दहिवल यांनी या संकल्पनेवर चव्हाण यांच्याशी प्राथमिक चर्चा केली. नांदेडमध्ये अनेक प्रतिभावान खेळाडू असून, ही अकादमी सुरू झाल्यास त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीचे दर्जेदार प्रशिक्षण मिळेल, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली. कुलकर्णी यांनी यावेळी अकादमीसंदर्भात विस्तृत माहिती दिली व नांदेड शहरात उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती घेतली. कुलकर्णी व दहिवल यांनी या भेटीची आठवण म्हणून ना. अशोक चव्हाण यांना एक टी-शर्ट भेट दिले. या अकादमीच्या उभारणीची चर्चा करण्यासाठी पुढील बैठक लवकरच होणार आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3tgpMmx

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून परतल्यावर भारतीय खेळाडूने मानले देवाचे आभार; पाहा काय केले

नवी दिल्ली: भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या ऐतिहासिक कसोटी मालिका विजयात अनेक नव्या खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. या दौऱ्यात तिनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या भारताच्या ()ने जागतिक क्रिकेटमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यॉर्करच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांच्या मनात धडकी भरणाऱ्या या गोलंदाजाने मायदेशात परतल्यावर देवाचे आभार मानले. वाचा- टी नटराजनने तामिळनाडूतील पळनी मुरुगन मंदिरात जाऊन त्याचे केस अर्पण केले. या मंदिराला भेट दिल्यानंतर नटराजनने त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोत त्याने केस कापल्याचे दिसते. फोटो शेअर करताना Feeling blessed असे म्हटले आहे. वाचा- नटराजनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत पदार्पण केले होते. या पहिल्याच सामन्यात त्याने २ विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर टी-२० मालिकेत त्याने ३ सामन्यात ६ विकेट घेतल्या. तर अखेरच्या कसोटीत त्याला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. ब्रिस्बेन कसोटीत नटराजनने शानदार गोलंदाजी करत चार विकेट घेतल्या होत्या. वाचा- मायदेशात आल्यावर सालेममध्ये त्याला रथामध्ये बसवण्यात आले आणि मिरवणूक काढण्यात आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. नटराजनने केस कापल्याचा फोटो शेअर केल्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांना माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीची आठवण आली. भारतीय संघाने जेव्हा २०११ साली आयसीसी वनडे वर्ल्डकप जिंकला होता. तेव्हा धोनीने केस कापले होते. भारताने धोनीच्या नेतृत्वाखाली मुंबईत झालेल्या अंतिम लढतीत श्रीलंकेचा पराभव करून दुसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकला होता.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3rhnKkp

कोलकाता ते कानपूर व्हाया मद्रास; ३६ वर्षे झाली भारतीय खेळाडूचा विक्रम कोणी मोडू शकले नाही

नवी दिल्ली: भारतीय संघाचा माजी कर्णधार ( )च्या नावावर एक अनोखा विक्रम आहे. जागतिक क्रिकेटमध्ये अझरचा हा विक्रम आजपर्यंत कोणाला मोडता आला नाही. अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू आहे. अझरच्या त्या विक्रमाला आज ३६ वर्ष झाली आहेत. वाचा- मोहम्मद अझरूद्दीने ३६ वर्षापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत खळबळ उडवली होती. मनगटाने शानदार फटकेबाजी करणाऱ्या अझरला वंडर बॉय म्हणून ओळखले जायचे. अझरने फक्त पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावले नव्हेत तर पहिल्या तिनही कसोटीत शतक करण्याची ऐतिहासिक कामगिरी त्याने केली होती. अझरचा हा विक्रम १ फेब्रुवारी १९८५ रोजी झाला होता, जो आजपर्यंत कायम आहे. वाचा- अझरने ३१ डिसेंबर १९८४ रोजी इंग्लंडविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटीत ११० धावा केल्या होत्या. पदार्पणात शतक करून अझर थांबला नाही. तर त्यानंतर चेन्नईत (मद्रास) झालेल्या दुसऱ्या कसोटीत ४८ आणि १०५ धावा केल्या. तर मालिकेतील अखेरच्या कसोटीत (कानपूर) त्याने पहिल्या डावात १२२ तर दुसऱ्या डावात नाबाद ५४ धावा केल्या. गेल्या ३६ वर्षात अझरूद्दीनच्या या विक्रमाच्या जवळ ५ फलंदाज पोहोचले. पण या कोणत्याही फलंदाजाला त्याचा विक्रम मोडता आला नाही. या सर्वांनी पदार्पणात सलग दोन शतक केली. या खेळाडूंमध्ये सौरव गांगुली आणि रोहित शर्मा या दोन भारतीय खेळाडूंचा देखील समावेश आहे. गांगुलीने १९९६ मध्ये लॉर्ड्स मैदानावर पदार्पणातच आणि त्यानंतर नॉटिंघम येथे दुसऱ्या कसोटीत शतक केले होते. रोहितने २०१३ साली वेस्ट इंडिजविरुद्ध कोलकाता आणि नंतर मुंबईत शतकी खेळी केली. वाचा- २०१९-२० मध्ये पाकिस्तानचा आबिद अलीकडून अझरचा विक्रम मोडला गेला असता. त्याने श्रीलंकेविरुद्ध पदार्पणात नाबाद १०९ आणि नंतर दुसऱ्या कसोटीत १७४ धावा केल्या होत्या. पण तिसऱ्या कसोटीत बांगलादेशविरुद्ध तो शून्यावर बाद झाला. असे झाले होते अझरचे पदार्पण इंग्लंडचा संघ १९८४-८५ मध्ये पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर होता. पहिल्या मुंबई कसोटीत भारताने विजय मिळवला. पण दुसऱ्या दिल्ली कसोटीत त्याचा पराभव झाला. या पराभवाला कपिल देव यांच्या खराभ फलंदाजीला जबाबदार धरण्यात आले. यावरून बराच राडा झाला. त्यामुळे कोलकात्यात होणाऱ्या कसोटीत कपिल देव यांना वगळले. संदीप पाटील देखील संघाबाहेर होते. तेव्हाच २१ वर्षीय अझरला संधी मिळाली. त्याने सलग तीन शतक केली आणि अशी कामगिरी करणारा पहिला आणि एकमेव फलंदाज होण्याचा मान मिळवला. हा विक्रम अद्याप त्याच्या नावावर आहे. अझरने ९९ कसोटीत २२ शतक झळकावली. त्याने मार्च २००० मध्ये खेळलेल्या अखेरच्या कसोटीत १०२ धावा केल्या होत्या.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pBXkJG

जसप्रीत बुमराने केली अनिल कुंबळेच्या गोलंदाजीची मजेदार नक्कल, व्हिडीओ झाला व्हायरल...

चेन्नई : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने चेन्नईमध्ये सराव करत असताना भारताचे माजी महान फिरकीपटू अनिल कुंबळे यांच्या गोलंदाजीची नक्कल केल्याचे पाहायला मिळाले. बुमराचा हा व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाला आहे. बुमहा आपल्या वेगवान गोलंदाजीसाठी जगप्रसिद्ध आहे. पण भारतीय संघाच्या नेट्समध्ये मात्र कुंबळे यांच्या गोलंदाजीची नक्कल करत असल्याचे पाहायला मिळाले आहे. बीसीसीआयनेच बुमराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि त्याला भन्नाट प्रतिसादही मिळाला आहे. बुमराचा हा व्हिडीओ पाहून कुंबळे यांनी आपली प्रतिक्रीयाही दिली आहे. बुमराचा व्हिडीओ पाहिल्यावर कुंबळे यांनी म्हटले आहे की, " वेल डन बुमरा. तु माझ्या गोलंदाजी शैलीच्या फार जवळ गेला आहेस. पुढच्या पिढीच्या वेगवान गोलंदाजांसाठी तु एक प्रेरणास्थान आहेस. युवा पिढीतील बरेच जण तुझ्या गोलंदाजीचीही नक्कल करत असल्याचे पाहायला मिळते. आगामी मालिकांसाठी तुला शुभेच्छा..." भारताकडून सर्वाधिक कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये विकेट्स मिळवण्याचा मान कुंबळे यांच्या नावावर आहे. २००८ साली कुंबळे यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. कुंबळे यांच्या नावावर ६१९ कसोटी विकेट्स आहेत. निवृत्तीनंतर कुंबळे यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षकपदही भूषवले होते. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये ५ फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियातील विजयानंतर आता आपल्याच मैदानात इंग्लंडबरोबर दोन हात करणार आहे. पण यावेळी भारतीय संघाचे कर्णधारपद अजिंककडे नसून ते विराट कोहलीकडे देण्यात आले आहे. या मालिकेत अजिंक्य हा भारतीय संघाचा उपकर्णधार असेल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वीच चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. चाहत्यांना चेन्नईतील दोन्ही कसोटी सामने आता लाइव्ह पाहाता येणार आहेत. करोनानंतर भारतामध्ये पहिल्यांदाच प्रेक्षकांना हे सामने स्टेडियममध्ये जाऊन पाहता येणार आहेत. त्यामुळे आता चाहत्यांचा या कसोटी सामन्यांना कसा प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3oDSJoM

अर्थसंकल्पात देखील टीम इंडिया; ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या विजयाचा झाला असा उल्लेख

नवी दिल्ली: Budget 2021केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन () यांनी आज सोमवारी १ फेब्रुवारी २०२१ रोजी या दशकातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्र्यांनी करोनानंतरच्या काळात अर्थव्यवस्थेसाठीच्या अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. आपल्या भाषणात सीतारामन यांनी भारतीय क्रिकेट संघाने गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या ऐतिहासिक मालिका विजयाचा उल्लेख केला. वाचा- भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत २-१ने विजय मिळवला. या विजयाबद्दल सर्वजण त्यांचे कौतुक करत आहेत. अशातच देशाचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अर्थमंत्री सीतारामन यांनी देखील भारतीय क्रिकेटपटूंचे कौतुक केले. भारतीय संघाने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल बोलताना सीतारामन म्हणाल्या, यावरून लक्षात येते की आमच्याकडे किती गुणवत्ता आहे. जे मागच्या क्रमांकावर होते त्यांनी पुढे येऊन कामगिरी बजावली. वाचा- भारतीय क्रिकेट संघाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियात विजय मिळवला. भारतीय संघाचा नियमित कर्णधार पहिल्या कसोटीनंतर मायदेशात परतला होता. त्यानंतर मालिकेत १-०ने पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघाने मेलबर्नमध्ये विजय मिळवत बरोबरी केली. त्यानंतर चौथ्या आणि अखेरच्या कसोटीत ब्रिस्बेनवर ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. अनेक स्टार खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर असताना देखील भारताने मिळवलेल्या या विजयाचे कौतुक अर्थसंकल्पीय भाषणात करण्यात आले. वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मन की बात या कार्यक्रमातून भारतीय संघाच्या विजयाचा उल्लेख केला होता. PM मोदींनी केलेल्या या कौतुकाबद्दल याने सोशल मीडियावरून त्यांचे आभार मानले होते.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pCX3Gk

IND vs ENG : भारत-इंग्लंड मालिकेपूर्वीच चाहत्यांसाठी आली ही आनंदाची बातमी, पाहा नेमकं काय होणार

चेन्नई, : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वीच चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. चाहत्यांना चेन्नईतील दोन्ही कसोटी सामने आता लाइव्ह पाहाता येणार आहेत. करोनानंतर भारतामध्ये पहिल्यांदाच प्रेक्षकांना हे सामने स्टेडियममध्ये जाऊन पाहता येणार आहेत. तामिळनाडूच्या सरकारने चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. तामिळनाडू सरकारने स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश देण्याचे मान्य केले आहे. सरकारच्या नियमानुसार आता स्टेडियमच्या ५० टक्के क्षमतेएवढे प्रेक्षक आता कसोटी सामना पाहू शकतात. त्यामुळे आता चेन्नईतील दोन्ही कसोटी सामन्यांसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार आहे. भारतातील सामने प्रेक्षकांना पाहता यावे, यासाठी बीसीसीआय प्रयत्न करत होती. बीसीसीआयच्या प्रयत्नांना आता यश आल्याचे पाहायला मिळत आहे. भारत-इंग्लंड मालिकेतील तिसरा आणि चौथा सामना अहमदाबाद येथे होणार आहे. या सामन्यासाठींही प्रेक्षकांना प्रवेश मिळू शकतो, अशी शक्यता आहे. याबाबत गुजरात सरकार विचार करत असून लवकरच याबाबतची घोषणाही करण्यात येणार आहे. त्यामुळे आता भारतातील सर्व क्रिकेट सामन्यांना प्रेक्षकांना उपस्थिती लावता येईल, असे चित्र आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये ५ फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियातील विजयानंतर आता आपल्याच मैदानात इंग्लंडबरोबर दोन हात करणार आहे. पण यावेळी भारतीय संघाचे कर्णधारपद अजिंककडे नसून ते विराट कोहलीकडे देण्यात आले आहे. या मालिकेत अजिंक्य हा भारतीय संघाचा उपकर्णधार असेल. त्यामुळे या मालिकेत कोहलीची कामगिरी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात ०-१ अशा पिछाडीवरुन २-१ असा ऐतिहासिक विजय मिळवला होता. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने हा अविस्मरणीय विजय मिळवला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचे यावेळी कौतुक केले आहे. भारतीय संघाचा हा विजय प्रेरणादायी होता, असे मोदी यांनी म्हटेल आहे. त्यानंतर बीसीसीआय आणि हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी त्यांचे आभार मानल्याचे पाहायला मिळत आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cvH610

Ind vs Eng भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका: या दोन खास व्यक्तींना BCCI चे आमंत्रण

नवी दिल्ली: भारत आणि इंग्लंड यांच्यात २४ फेब्रुवारीपासून अहमदाबाद येथे होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी मिळू शकते. या दोन्ही संघातील अखेरच्या लढती जगातील सर्वात क्रिकेट मैदान असलेल्या मोटेरा अर्थात सरदार वल्लभभाई पटेल मैदानावर होणार आहे. गेल्या वर्षी करोना व्हायरसमुळे भारतात आंतरराष्ट्रीय सामने झाले नाहीत. आता एका वर्षांनी होणाऱ्या सामन्यासाठी कदाचित प्रथमच प्रेक्षकांना मैदानावर प्रवेश मिळू शकतो. दोन्ही संघात ५ फेब्रुवारीपासून कसोटी मालिका सुरू होणार आहे. चार सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन लढती चेन्नईत होणार आहेत. या सामन्यात आधी प्रेक्षकांना प्रवेश दिला जाईल असे वृत्त होते. पण करोना परिस्थितीमुळे प्रेक्षकांशिवाय सामना खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. वाचा- भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यासाठी बीसीसीआयने , भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि क्रीडा मंत्री किरन रिजिजू यांना आमंत्रण पाठवले आहे. त्याच बरोबर केंद्रीय गृहमंत्री जे गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत ते देखील हा सामना पाहण्यासाठी येण्याची शक्यता आहे. कसोटी मालिकेतील अखेरच्या दोन लढतीनंतर याच मैदानावर टी-२० लढती देखील होणार आहेत. वाचा- बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या मैदानाची क्षमता एक लाखापेक्षा अधिक आहे. त्यामुळेच तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यासाठी ५० टक्के प्रेक्षकांना प्रवेश दिला जाऊ शकतो. सरकारने ५० टक्के प्रेक्षकांना बोलवण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे तसा निर्णय घेतला जाऊ शकतो. या सामन्यात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना देखील प्रवेश दिला जाऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभरापूर्वी अमेरिकेचे तकालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह या मैदानाचे उदघाटन केले होते.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2YxoxBf

Sunday, January 31, 2021

Syed Mushtaq Ali Trophy Final : दिनेश कार्तिकच्या तामिळनाडूची जेतेपदला गवसणी, बडोद्यावर मिळवला विजय

अहमदाबाद : दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखालील तामिळनाडूच्या संघाने सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली. तामिळनाडूने भेदक गोलंदाजी करत बडोद्याच्या संघाला १२० धावांमध्ये रोखले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना तामिळनाडूने तीन विकेट्स गमावत हे आव्हान यशस्वीरीत्या पेलले आणि जेतेपद पटकावले. तामिळनाडूने यावेळी नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार दिनेश कार्तिकचा हा निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवला. कारण तामिळनाडूने यावेळी बडोद्याच्या संघाला २० षटकांत १२० धावाच करु दिल्या. खासकरून तामिळनाडूचा फिरकीपटू मनिमरम सिद्धार्थने यावेळी भेदक गोलंदाजी केली. सिद्धार्थने यावेळी आपल्या चार षटकांत २० धआवा देत चार विकेट्स मिळवले आणि बडोद्याच्या संघाचे कंबरडे मोडले. बडोद्याच्या डावाची सुरुवात यावेळी चंगली झाली नाही. कारण दुसऱ्याच षटकात बाबा अपराजितने निनाद राथवाला बाद करत बडोद्याला पहिला धक्का दिला. त्यानंतर बडोद्याचा कर्णधार केदार देवधरही बाद झाला आणि त्यानंतर बडोद्याचा संघ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. सिद्धार्थने यावेळी केदारला बाद करत आपला पहिला बळी मिळवला. बडोद्याची १ बाद २२ वरुन यावेळी ६ बाद ३६ अशी दयनीय अवस्था झाली होती. त्यावेळी बडोद्याचा संघ हा शंभर धावांचा टप्पा तरी ओलांडणार का, असा प्रश्न काही जणांनी पडला होता. पण त्यानंतर बडोद्याचा विष्णू सोळंकी हा संघासाठी धावून आला. सोळंकीला यावेळी अतित सेठची चांगली साथ मिळाली. सोळंकी आणि सेठ यांनी यावेळी सातव्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी रचली आणि त्यामुळेच बडोद्याच्या संघाला १२० धावांपर्यंत मजल मारता आली. सोनू यादवने यावेळी ही जोडी फोडली. सोनूने अतित सेठला बाद केले आणि ही स्थिरस्थावर झालेली जोडी फुटली. अतितने यावेळी ३० चेंडूंत २ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर २९ धावा केल्या. सोळंकीचे अर्धशतक यावेळी फक्त एका धावेने हुकले. अखेरच्या षटकात मोठा फटका मारताना सोळंकी बाद झाला. सोळंकीने यावेळी ५५ चेंडूंत १ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ४९ धावांची खेळी साकारली.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3aiG99A

IND vs ENG : भारत आणि इंग्लंडमध्ये कोण जिंकणार कसोटी मालिका, महान क्रिकेटपटूची भविष्यवाणी

नवी दिल्ली, : भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये ५ फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पण या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये कोणता देश जिंकू शकतो, याची भविष्यवाणी क्रिकेट विश्वातील एका महान खेळाडूंनी केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यापूर्वीही त्यांनी काही विधानं केली होती आणि ती खरी ठरली होती. त्यामुळे त्यांच्या या भविष्यवाणीला अनोखे वजन प्राप्त झाले आहे. क्रिकेटविश्वातील माजी महान क्रिकेटपटू इयान चॅपेल यावेळी म्हणाले की, " भारतीय संघाच्या डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि शुभमन गिल करतील. त्यानंतर चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेसारखे अनुभवी फलंदाज भारतीय संघात आहेत. त्याचबरोब रिषभ पंतसारखा धडाकेबाज फलंदाजही भारताकडे आहे. त्याचबरोबर हार्दिक पंड्यासारखा अष्टपैलू खेळाडू संघात आल्यानंतर त्यांची ताकद अजून वाढलेली आहे." चॅपेल यांनी पुढे सांगितले की, " इंग्लंडने श्रीलंकेला त्यांच्याच मातीत २-० असे पराभूत केले आहे. त्यामुळे त्यांचे मानसीक बळ कमालीचे वाढलेले असेल, पण भारतीय संघातील खेळाडू आणि त्यांच्या सध्याच्या फॉर्मकडे पाहिले तर इंग्लंडपेक्षा भारताचे पारडे जड दिसत आहे. विराट कोहली भारतीय संघात आल्यामुळे त्यांची ताकद नक्कीच वाढलेली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये कठीण परिस्थितीनंतही भारताने हार मानली नव्हती. भारताने पहिल्या पराभवानंतरही मालिका जिंकली होती. त्यामुळे या मालिकेसाठी भारताचा संघच माझ्यासाठी फेव्हरेट असेल." चॅपेल यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वीच अजिंक्य रहाणेचे कौतुक केले होते. अजिंक्य हा एक आक्रमक कर्णधार आहे, पण त्याच्या देहबोलीतून ते दिसत नाही. त्यामुळे अजिंक्य भारतीय संघ चांगल्यापद्धतीने हाताळेल, असे चॅपेल यांनी सांगितले होते. चॅपेल यांची ही गोष्ट कसोटी मालिकेत पाहायला मिळाली. कारण अजिंक्यच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियातील विजयानंतर आता भारतीय संघ आपल्याच मैदानात इंग्लंडबरोबर दोन हात करणार आहे. पण यावेळी भारतीय संघाचे कर्णधारपद अजिंककडे नसून ते विराट कोहलीकडे देण्यात आले आहे. या मालिकेत अजिंक्य हा भारतीय संघाचा उपकर्णधार असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36sQcYk

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...