Ads

Sunday, December 13, 2020

आयपीएल गाजवलेल्या खेळाडूने लग्नाच्या स्टेजवरच केले पत्नी आऊट, व्हिडीओ झाला व्हायरल

नवी दिल्ली : आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करून भारतीय क्रिकेट संघाचे दार ठोठावणाऱ्या एका खेळाडूने शनिवारी लग्न केले. पण या लग्नात एक अनोखी गोष्ट पाहायला मिळाली. कारण लग्नाच्या स्टेजवरच या क्रिकेटपटूने आपल्या पत्नीला आऊट केल्याचे पाहायला मिळाले. या गोष्टीचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. यावर्षी झालेल्या आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळताना 'मिस्ट्री स्पिनर' अशी आपली ओळख निर्माण केली ती वरुण चक्रवर्तीने. शनिवारी वरुण चक्रवर्तीने गर्लफ्रेंड नेहा खेडेकरबरोबर लग्न केले. पण लग्न झाल्यावर एक अनोखा प्रकार पाहायला मिळाला. लग्न झाल्यावर स्टेजवर बॅट आणि बॉल आणले गेले. वरुण हा गोलंदाज आहे त्यामुळे त्याच्या हातात चेंडू देण्यात आला तर नेहाला फलंदाजी करण्यास सांगितले गेले. यावेळी वरुणने आपल्या गोलंदाजीवर नेहाला आऊट केल्याचे पाहायला मिळाले. फक्त एकदाच नाही तर वरुणने दोनवेळा नेहाला आपल्याच गोलंदाजीवर कॅच पकडत बाद केले. वरुणने आयपीएलमध्ये भेदक गोलंदाजी केली होती. त्यामुळेच वरुणला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात स्थान मिळाले होते. पण त्यानंतर वरुण दुखापतग्रस्त असल्याचे समजले आणि त्यामुळे वरुणला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाता आले नाही. करोनामुळे वरुणचे लग्न पुढे ढकलण्यात आले होते. पण अखेर शनिवारी वरुण आणि नेहा यांचे लग्न झाले. कोलकाता नाइट रायडर्सच्या संघाने यावेळी वरुण आणि नेहा यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर वरुण आणि नेहा यांचा व्हिडीओही कोलकाता नाइट रायडर्सने आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. वरुण आणि नेहा यांनी चेन्नईमध्ये आपले कुटुंबिय आणि जवळच्या मित्रांच्या साक्षीने लग्न केले. या दोघांच्या लग्नाचे फोटो पहिल्यांदा व्हायरल झाले, त्यानंतर चाहत्यांनी या दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानंतर कोलकाता नाइट रायडर्सने एक व्हिडीओ क्लीप सोशल मीडियावर शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये हे दोघेही क्रिकेट खेळताना पाहायला मिळाले आहेत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mffdLQ

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाच्या संघात नव्या खेळाडूची एंट्री, भारतासाठी वाढला धोका

सिडनी, : ऑस्ट्रेलियाच्या संघात एका पहिल्या कसोटी सामन्यात आता एक नव्या खेळाडूची एंट्री झालेली आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी धोका वाढलेला असल्याचे पाहायला मिळत आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आज सांगितले की, भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचा प्रवेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान खेळपट्ट्यांवर स्टार्कने आतापर्यंत भेदक मारा केला आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी आता चिंता वाढली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पहिला कसोटी सामना अॅडलेड येथे खेळवण्यात येणार आहे. हा सामना दिवस-रात्र असून १७ डिसेंबरला हा सामना सुरु होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चार कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. स्टार्क हा भारताविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघात होता. पण त्याच्या कुटुंबियातील व्यक्ती आजारी पडला होता, त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ सोडून स्टार्क आपल्या घरी गेला होता. स्टार्क आता सोमवारी ऑस्ट्रेलियाच्या 'अ' संघाबरोबर सिडनी येथे दाखल होणार आहे. त्यानंतर स्टार्क हा ऑस्ट्रेलियाच्या संघाबरोबर सराव करणार आहे. दोन वर्षापूर्वी भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली इतिहास घडवला होता. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात प्रथमच कसोटी मालिका जिंकली होती. भारताच्या दिग्गज कर्णधारांना ७१ वर्षात जे जमले नव्हते ते विराट कोहलीने करून दाखवले होते. आता भारतीय संघ पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियात त्यांच्याविरुद्ध कसोटी मालिकेत लढत आहे. कसोटी मालिका १) पहिली कसोटी- १७ ते २१ डिसेंबर, एडिलेड ओव्हल- डे/नाईट (सकाळी ९ वाजता) २) दुसरी कसोटी- २६ ते ३० डिसेंबर, मेलबर्न (पहाटे ५ वाजता) ३) तिसरी कसोटी- ७ ते ११ जानेवारी २०२१, सिडनी (पहाटे ५ वाजता) ४) चौथी कसोटी- १५ ते १९ जानेवारी, २०२१, गाबा (पहाटे साडे पाच वाजता) भारताच्या या दौऱ्यातील सर्व सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण सोनी सिक्स आणि डीडी स्पोट्स वर होणार आहे. या शिवाय Sony LIVवर लाइव्ह स्ट्रीमिंग होईल. कसोटी मालिका फक्त सोनी सिक्स आणि Sony LIV वर दिसेल. या शिवाय भारतीय संघ दोन सराव सामने खेळणार आहे. या सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अॅपवर केले जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या लढतीचे LIVE UPDATE आणि स्कोअरकार्ड महाराष्ट्र टाइम्सच्या वेबसाइटवर तुम्ही पाहू शकता.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Ki323F

Saturday, December 12, 2020

स्फोटक शतक करून ऋषभ पंतने संघ व्यवस्थापनाला टाकले गोंधळात

सिडनी: ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या एडिलेड येथील पहिल्या कसोटी सामन्याआधी भारतीय संघ व्यवस्थापनासमोर गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. हा गोंधळ निर्माण केला आहे तो ऋषभ पंतने होय. सिडनी येथे सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्धच्या सराव कसोटी सामन्यात पंतने धमाकेदार शतकी खेळी साकारली. यामुळे आता पहिल्या डे-नाइट कसोटी सामन्यासाठी विकेटकिपर म्हणून कोणाची निवड करायची असा प्रश्न भारतीय संघ व्यवस्थापनापुढे निर्माण झालाय. वाचा- डे-नाइट सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऋषभ पंतने धमाकेदार शतक केले. त्याने ७३ चेंडूत ६ षटकार आणि ९ चौकारांसह शतक पूर्ण केले. दुसऱ्या दिवसाच्या अखेरच्या षटकात त्याने २२ धावा केल्या आणि शतक झळकावले. गेल्या महिन्यांपासून पंतवर चांगली कामगिरी करण्याचा दबाव होता. त्यावरून त्याच्यावर अनेकदा टीका देखील झाली होती. इतक नव्हे तर पंतला संघाबाहेर किंवा अंतिम ११ मध्ये स्थान मिळाले नव्हते. वाचा- वाचा- पंतने दुसऱ्या दिवशी आक्रमक फलंदाजी केली. अखेरच्या षटकात त्याने चार चौकार आणि एक षटकार मारत २२ धावा केल्या. शेवटच्या चेंडूवर चौकार मारत त्याने शतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी झालेल्या आयपीएलमध्ये पंतची कामगिरी अपेक्षेनुसार झाली नव्हती. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० आणि वनडे मालिकेत त्याला संधीच मिळाली नाही. पहिल्या कसोटीसाठी वृद्धीमान साहा हीच संघ व्यवस्थापनाची पहिली निवड होती. पण त्याआधी शतक करून पंतने संघ व्यवस्थापनासमोर गोंधळाची परिस्थिती निर्माण केली आहे. वाचा- वाचा- आता कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यातून काय मार्ग काढतात हे पाहावे लागले. विकेटकिपिंगच्या बाबत पंत हा साहाच्या मागे नाही. त्यामुळे पंतला कसोटीत विकेटकिपर म्हणून चांगली कामगिरी करावी लागले. आता पहिल्या कसोटीत विकेटकिपर म्हणून कोणाला संधी मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37esrEp

'इंग्लंडच्या भारत दौऱ्यात मुंबई इंडियन्सच्या या दोन खेळाडूंना मिळणार संधी'

मुंबई: भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परत आल्यानंतर इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात चार कसोटी, पाच टी-२० आणि तीन वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जेव्हा संघाची निवड झाली होती तेव्हा बराच वाद झाला होता. तेव्हा ज्या खेळाडूंना संधी मिळणे अपेक्षित होते पण मिळाली नाही अशांना यावेळी इंग्लंड दौऱ्यात संधी मिळण्याची शक्यता आहे. वाचा- भारताचा माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट विश्लेषक आकाश चोप्राने आयपीएलमधील मुंबई इंडियन्स (mumbai indians) संघातील दोन खेळाडूंना राष्ट्रीय संघात स्थान मिळू शकते असा अंदाज व्यक्त केला आहे. मुंबईचे ( ) आणि () यांना भारतीय संघात स्थान मिळू शकते. आयपीएल २०२० मध्ये या दोन्ही खेळाडूंनी धमाकेदार कामगिरी केली होती. सूर्यकुमारला ऑस्टेलिया दौऱ्यात संधी मिळाली नाही. यावरून बराच वाद झाला होता. वाचा- आकाश चोप्राच्या मते, इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेत या दोन्ही खेळाडूंना संधी मिळू शकते. फेब्रुवारी महिन्यात इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. तेव्हा इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांना संधी मिळू शकते. कारण श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन यांचे संघातील स्थान नक्की नाही. वाचा- अय्यर आणि सॅसमन यांचे संघाती स्थान पक्के नाही. सॅमसनला संधी मिळाली पण त्याचा त्याने उपयोग केला नाही. अय्यरचे स्थान देखील ५०-५० इतकेच आहे. ऑस्ट्रेलियात अय्यरची कामगिरी चांगली झाली नाही. संघात मनीष पांडेचे स्थान देखील पक्के नाही. अशा परिस्थितीत सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांना संधी मिळू शकते. वाचा- अय्यर, सॅमसन आणि मनीष यांच्या अपयशामुळे सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांना भारतीय संघात स्थान मिळू शकते. या दोघांनी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली. जर २०२१ मध्ये देखील चांगली कामगिरी केली तर ते निश्चितपणे आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळाली.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2JNNGnF

BCCIने दिला धक्का; फिटनेस टेस्ट पास होऊन देखील रोहितचे खेळणे अनिश्चित

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघातील स्टार ओपनर रोहित शर्माने बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फिटनेस टेस्ट पास केली. आता रोहित ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत खेळण्यास सज्ज झाला आहे. रोहित चार पैकी अखेरच्या दोन कसोटी सामन्यात खेळू शकतो. पण अखेरच्या दोन कसोटी सामने खेळण्याआधी रोहितच्या फिटनेसवर लक्ष ठेवले जाणार आहे आणि त्याच्या फिटनेसची पुन्हा एकदा चाचणी घेतली जाईल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने शनिवारी ही माहिती दिली. वाचा- शनिवारी ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाल्याची माहिती बीसीसीआयने दिली. त्याच बरोबर रोहितच्या फिटनेस संदर्भात त्यांनी काही अपडेट दिले. NCA मध्ये रोहितने रिहॅबिलिटेशनची प्रक्रिया पूर्ण केली असून तो आता फिट आहे. एनसीएच्या वैद्यकीय टीमने रोहितच्या फिजिकल फिटनेसची चाचणी घेतली आणि ते समाधानी आहेत. रोहित फलंदाजी, फिल्डिंग आणि विकेटच्या दरम्यान धावने याबाबत पूर्ण फिट आहे. आता त्याला फिटनेस कायम राखावा लागले. वाचा- ऑस्ट्रेलियातील क्वारंटाइनच्या कालावधी रोहितसाठी एक कार्यक्रम तयार केला जाईल. या कार्यक्रमाचे दोन आठवडे त्याला पालन करावे लागले. क्वारंटाइन पूर्ण झाल्यानंतर रोहितची पुन्हा फिटनेस चाचणी घेतली जाईल. ज्यामुळे त्याच्या फिटनेसबद्दलची स्थिती समजून घेता येईल. यानंतरच बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील अखेरच्या दोन सामन्यात त्याचा समावेश करायचा की नाही याचा निर्णय घेतला जाईल. वाचा- रोहित शर्मा १९ नोव्हेंबरपासून एनसीएमध्ये रिहॅबिलिटेशन आणि ट्रेनिंग घेत आहे. आयपीएलचा १३वा हंगामात रोहितला हॅम्स्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्यानंतर तो फिट झाला होता आणि मुंबई इंडियन्स कडून अखेरच्या ३ लढती खेळला होता. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने पाचव्यांदा विक्रमी विजेतेपद मिळवले होते. वाचा- ...


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gGYX4Z

ऋषभ पंतकडून ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई; ६ षटकारांसह ७३ चेंडूत शतक

सिडनी: 2nd practice match भारतीय क्रिकेट संघातील विकेटकिपर () ने ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या सराव सामन्यात धमाकेदार फलंदाजी केली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्यापूर्वी सुरू असलेल्या डे-नाइट सराव सामन्यात पंतने ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध तुफानी शतक केले. त्याने फक्त ७३ चेंडूत शतक पूर्ण केले. अखेरच्या षटकात त्याने २२ धावा केल्या आणि शतक झळकावले. वाचा- पंतच्या या धमाकेदार शतकामुळे भारताने ४७२ धावांची मोठी आघाडी घेतली. पहिल्या डावात भारताने फक्त १९४ धावा केल्या होत्या. तेव्हा जसप्रीत बुमराहच्या अर्धशतकी खेळीमुळे भारत २००च्या जवळ पोहोचला होता. दुसऱ्या डावात पंतच्या आधी ( ) ने शतक पूर्ण केले. त्याने १९४ चेंडूत १३ चौकारांच्या मदतीने नाबाद १०४ धावा केल्या. तर पंतने ७३ चेंडूत ६ षटकार आणि ९ चौकारांसह १०३ धावा केल्या. वाचा- पंत आणि विराहीच्या शतकांमुळे भारताने दुसऱ्या डाात ४ बाद ३८६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात फक्त १०८ धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या डावात भारताची सुरुवात खराब झाली. पृथ्वी शॉ फक्त ३ धावा करून बाद झाला. त्यानंतर मयांक अग्रवाल आणि शुभमन गिल यांनी अर्धशतक केले. गिल ६५ धावांवर बाद झाला तर अग्रवाल ६१ धावांवर माघारी परतला. कर्णधार अजिंक्य रहाणे ३८ धावा करू शकला. वाचा- .... भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्याआधी पंतने सराव सामन्याचा फायदा घेतला आणि धमाकेदार फलंदाजी केली. दुसऱ्या दिवशाच्या अखेरच्या षटकात त्याने २२ धावा केल्या आणि शतक पूर्ण केले.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mbDSRr

India vs Australia: ऑस्ट्रेलिया आणि भारत- सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज

सिडनी: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १७ डिसेंबरपासून चार सामन्यांची सुरू होणार आहे. मालिकेची सुरूवात डे-नाइट कसोटीने होणार असून ही मॅच एडिलेड येथे होईल. कसोटी सामन्याचा निकाल तोपर्यंत लागत नाही जोपर्यंत विरुद्ध संघाच्या २० विकेट घेतल्या जात नाही. सामना जिंकण्यासाठी २० विकेट घेण्याची गरज असते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत झालेल्या कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांवर एक नजर... वाचा- अनुल कुंबळे (भारत)भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या एकूण कसोटी मालिकेत अनिल कुंबळे असा एकमेव गोलंदाज आहे ज्याने १०० हून अधिक विकेट घेतल्या आहेत. कुंबळेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २० कसोटी सामन्यात १११ विकेट घेतल्या आहेत. त्याने एका सामन्यात १० वेळा १० विकेट घेण्याचा आणि एका डावात ५ विकेट घेण्याची कामगिरी १० वेळा केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ६ कसोटी सामन्यात त्याने संघाचे नेतृत्व देखील केले आहे. वाचा- हरभजन सिंग (भारत) या यादीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार कामगिरी करणाऱ्या गोलंदाजांमध्ये टर्बनेटर हरभजन सिंग दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या १८ कसोटीत ९५ विकेट घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरभजनची कामगिरी शानदार होती. त्याने कोलकाता येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध हॅटट्रिक घेतली होती. वाचा- नाथन लायन (ऑस्ट्रेलिया) ऑस्ट्रेलियाच्या या गोलंदाजाने भारताविरुद्ध ८५ विकेट घेतल्या आहेत. भारताविरुद्ध कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा तो गोलंदाज आहे. १८ कसोटी सामन्यात त्याने ३२.६०च्या सरासरीने विकेट घेतल्या आहेत. लायनने सात वेळा डावात पाच विकेट तर एक वेळा सामन्यात १० विकेट घेतल्या आहेत. कपिल देव (भारत)भारताच्या कपिल देव यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७९ विकेट घेतल्या आहेत. त्यांनी २० कसोटीत ही कामगिरी केली. एका डावात सात वेळा ५ विकेट घेतल्या आहेत. १०६ धावा देत ८ विकेट ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. आर अश्विन (भारत) या यादीत पाचव्या स्थानावर भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आहे. त्याने १५ कसोटी सामन्यात ७७ विकेट घेतल्या आहेत. डावात पाच वेळा पाच विकेट तर सामन्यात एक वेळा १० विकेट घेतल्या आहेत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gJSJkP

पृथ्वीचा फ्लॉप शो सुरूच; चाहत्यांनी सोशल मीडियावर केले ट्रोल

सिडनी: भारतीय संघातील युवा खेळाडू ( ) गेल्या काही काळापासून फॉर्ममध्ये दिसत नाही. आयपीएलच्या १३व्या हंगामात त्याने चांगली सुरुवात केली होती. पण नंतर दिल्ली कॅपिटल्सकडून त्याला काही लय मिळाली नाही. त्यामुळेच पृथ्वी शॉला संघाबाहेर ठेवण्यात आले होते. वाचा- पृथ्वीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी संघात स्थान देण्यात आले. पण त्याआधीच्या सराव सामन्यात त्याची कामगिरी निराशजनक झाली. यामुळे सोशल मीडियावर त्याला ट्रोल केले जात आहे. पृथ्वी शॉने गेल्या १० डावात ०,०,७,१०,९,०,०,१९,४० आणि ३ अशा धावा केल्या आहेत. सिडनीत सुरू असलेल्या डे-नाइट सराव सामन्यात पृथ्वीने पहिल्या डावात टी-२० स्टाइलने फलंदाजी केली. पण सलग ३ चौकार मारून तो बोल्ड बाद झाला. त्याने २९ चेंडूत ४० धावा केल्या. दुसऱ्या डावात तो ३ धावांवर बाद झाला. वाचा- पृथ्वीच्या या खराब कामगिरीमुळे अनेकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. काही धावा केल्यानंतर पृथ्वी म्हणतो, चला आता मी जातो. दुसऱ्या एका युझरने मिर्जापूर २ मधील डायलॉगसह पृथ्वीचा फोटो शेअर केला आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/34n4NDV

IPL 2021: आयपीएलचा १४वा हंगाम महाराष्ट्रात? या तारखेनंतर सुरू होणार स्पर्धा

नवी दिल्ली: करोना व्हायरसमुळे आयपीएलचा १३वा हंगाम भारता ऐवजी युएईमध्ये घेण्यात आला. आता आयपीएलच्या १४व्या हंगामाची तयारी सुरू झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने अद्याप २०२१ साली होणाऱ्या आयपीएलच्या तारखांची घोषणा केली नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जगातील ही सर्वात श्रीमंत क्रिकेट स्पर्धा १० एप्रिलच्या आधी सुरू होऊ शकते. आयपीएलच्या १४व्या हंगामाबद्दल अद्याप काही घोषणा केली नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १० एप्रिलच्या आधी ही स्पर्धा सुरू होऊ शकते. कारण इंग्लंडचा भारत दौरा २८ मार्च रोजी संपणार आहे. त्यानंतर २०२१चे आयोजन होऊ शकते. वाचा- बीसीसीआयने गुरुवारी भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार कसोटी, पाच टी-२० आणि तीन वनडे मालिकेची घोषणा केली. इंग्लंडचा दौरा दोन महिन्याचा आहे. पाच फेब्रुवारी रोजी चेन्नई कसोटीपासून याची सुरूवात होईल आणि २८ मार्च रोजी पुणे येतील वनडे मालिकेने त्याचा अखेर होईल. या मोठ्या दौऱ्यानंतर खेळाडू संबंधित संघाच्या सराव सत्रात भाग घेण्याआधी ब्रेक घेतील. वाचा- आयपीएल एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होण्याची आशा आहे. त्याआधी जर बीसीसीआयने खेळाडूंचा लिलाव करू शकते. त्यामुळे खेळाडूंना त्यांच्या नव्या खेळाडूंशी समन्वय साधता येईल. पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये नव्या संघाला सहभागी करून घेण्याचा निर्णय २४ डिसेंबर रोजी होणाऱ्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेतला जाऊ शकतो. वाचा- पूर्ण हंगाम महाराष्ट्रात होणार... आयपीएलचा १४वा हंगाम भारतातच घेणार आहे. १३व्या हंगामा प्रमाणेच संपूर्ण स्पर्धा फक्त ३ मैदानावर घेतली जाऊ शकते. युएईमध्ये दुबई, अबुधाबी आणि शारजा मैदानावर सर्व सामने झाले होते. जोपर्यंत करोना परिस्थिती ठिक होत नाही तोपर्यंत सामने कमीत कमी मैदानावर घेण्याचा भर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएलचा १४वा हंगाम महाराष्ट्रात होऊ शकतो. एकट्या मुंबईत दोन आंतररष्ट्रीय मैदान (वानखेडे आणि ब्रेबोर्न) आहेत. त्याच बरोबर पुणे आणि नागपूरमध्ये देखील आंतरराष्ट्रीय मैदान आहे. या शिवाय नवी मुंबईत देखील क्रिकेट मैदान आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3nbgUeA

Happy Birthday Yuvraj Singh: वाढदिवशी युवराज म्हणाला, वडिलांच्या वक्तव्यामुळे दुःखी आणि निराश झालो

नवी दिल्ली: भारताचा माजी अष्ठपैलू क्रिकेटपटू (statement,yuvraj singh birthday ) आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. युवराजने सोशल मीडियावर घोषणा केली की, या वर्षी वाढदिवस साजरा करण्या ऐवजी आशा करतो की शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात सुरू असलेला वाद लवकर कमी व्हावा. त्याच बरोबर युवराजने वडीलांनी केलेल्या वक्तव्यापासून स्वत:ला वेगळे केले. वाचा- काही दिवसांपूर्वी युवराजचे वडील योगराज यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खेळाडूंनी पुरस्कार परत करावेत असे वक्तव्य केले होते. युवराजने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तो म्हणतो, निश्चितपणे शेतकऱ्यांमुळे देश आहे. मला वाटते की शांततेने चर्चा करून मार्ग निघेल. वाचा- या वर्षी माझ्या वाढदिवसा दिवशी एकच इच्छा की जल्लोष करण्याऐवजी शेतकरी आणि सरकार यांच्यातील चर्चा लवकर निकाली निघो, असे युवराजने म्हटले आहे. त्याच बरोबर मी मिस्टर योगराज सिंग यांनी दिलेल्या वक्तव्यापासून दुखी आणि निराश आहे. मी हे स्पष्ट करतोय की, ते वक्तव्य त्याचे वैयक्तीक असून माझी मते त्याच्या सारखी नाहीत. योगीराज यांनी केंद्राने शेतकऱ्यांची मागणी ऐकण्याचे आवाहन केले. त्याच बरोबर खेळाडूंनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत पुरस्कार परत करावेत असे ते म्हणाले होते.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2KhDseW

Friday, December 11, 2020

... याला म्हणतात माणूसकी! गोलंदाजाला चेंडू लागल्यावर सिराज बॅट सोडून त्याच्याकडे धावला, पाहा व्हिडीओ

सिडनी : सध्याच्या प्रत्येक खेळात व्यावसायिकपणा आला आहे आणि जिंकण्याची इर्षा वाढलेली आहे. पण काही खेळाडूंनी यामध्ये आपल्यामधील माणूसकी अजूनही सोडलेली नाही. याचे उत्तम उदाहरण आजच्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सराव सामन्यात पाहायला मिळाले. जेव्हा प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजाच्या डोक्यावर बॉल लागला तेव्हा त्याच्याजवळ पोहोचणारा भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हा पहिला व्यक्ती होता. धाव न घेता सिराज यावेळी गोलंदाजाच्या दिशेने धावला आणि त्याची अवस्था नेमकी कशी आहे, हे सिराजने पाहिले. त्यामुळे सध्याच्या घडीला सोशल मीडियावर सिराजवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ही गोष्ट घडली ती भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आजपासून सुरु झालेल्या सराव सामन्यात. दुसऱ्या सराव सामन्यात जसप्रीत बुमराने अर्धशतक झळकावत भारताची लाज राखली. या सामन्यात फलंदाजी करत असताना बुमराने एक स्ट्रेड ड्राइव्ह लगावला. त्यानंतर हा चेंडू गोलंदाजी करत असलेल्या कॅमेरुन ग्रीनच्या बोटाला लागला आणि त्यानंतर थेट डोक्याच्या उजव्या बाजूला आदळला. या दुखापतीनंतर संघाच्या डॉक्टरांनी मैदानात धाव घेतली. पण मैदानात डॉक्टर येण्यापूर्वी सिराज हा ग्रीनच्यादिशेने धावल्याचे पाहायला मिळाले. ग्रीनची दुखापत ही गंभीर स्वरुपाची असल्याचे डॉक्टरांना समजले आणि त्यांनी ग्रीनला मैदानातून बाहेर नेले. ग्रीनवर डॉक्टरांनी उपचार केले आहेत, त्याचबरोबर त्याच्या काही चाचण्याही करण्यात आल्या आहेत. या चाचण्यांचे अहवाल आज संध्याकाळी मिळणार आहे. त्यानंतरच ग्रीन या सामन्यात खेळू शकणार की नाही, हे स्पष्ट होऊ शकते. सराव सामन्यात डोक्यावर बॉल लागलेला ग्रीन हा दुसरा खेळाडू ठरला आहे. कारण पहिल्या सराव सामन्यात फलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर विल पुकोवस्कीच्या डोक्याला चेंडू लागला होता. त्यालाही गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे पुकोवस्कीला मैदान सोडावे लागले होते. त्यानंतर आता दुसऱ्या सराव सामन्यात ग्रीनच्या डोक्याला चेंडू लागल्याची घटना आता पुढे आली आहे. या सराव सामन्यात बुमराने भारताची लाज राखली. अखेरच्या जोडीसाठी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी ७१ धावांची भागिदारी करत भारताची लाज राखली. बुमराह ५५ धावांवर नाबाद राहिला. त्याने ५७ चेंडूत ६ चौकार आणि दोन षटकारांसह ही खेळी केली. सिराज २२ धावांवर बाद झाला.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qKZvLL

आयपीएल गाजवणाऱ्या खेळाडूने हवेत उडी मारून पकडली सुपर कॅच, व्हिडीओ झाला व्हायरल

नवी दिल्ली : यावर्षी आयपीएल गाजवणाऱ्या सनरायझर्स हैदराबादच्या संघातील जेसन होल्डरचा एक व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. कारण होल्डरने यावेळी हवेत उडी मारुन सुपर कॅच पकडला आहे. होल्डरने हा कॅच परडला तरी कसा, पाहा व्हिडीओ... सध्या वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ही गोष्ट पाहायला मिळाली. या सामन्यात न्यझीलंडचा विल यंग हा दमदार फलंदाजी करत होता आणि तो अर्धशतकाच्या जवळ आला होता. त्यावेळी शेनॉन गॅब्रियलच्या ४३व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर होल्डरने स्लीपमध्ये असताना हवेत उडी मारून दमदार कॅच पकडला. या कॅचचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे. चाहत्यांना होल्डरने पकडलेली कॅच चांगलीच आवडलेली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकल्यावर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. यावेळी न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नव्हती. त्यांची ३ बाद ७८ अशी धावसंख्या होती. पण त्यानंतर न्यूझीलंडच्या हेन्री निकोल्सने या सामन्यात आपले सहावे शतक साजरे करताना नाबाद ११७ धावा केल्या. एका बाजूने न्यूझीलंडचे फलंदाज बाद होत असले तरी निकोल्सने मात्र एक बाजू लावून धरली आणि त्याने शतक झळकावत पहिल्या दिवसअखेर संघाचा सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. निकोल्सच्या नाबाद शतकाच्या जोरावर न्यूझीलंडची पहिल्या दिवसअखेर ६ बाद २९४ अशी स्थिती आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37azJJb

IND vs AUS : रिषभ पंत आणि वृद्धिमान साहा यांच्यापैकी कोणाला संधी मिळावी, संजय मांजरेकर यांचे स्पष्ट मत...

सिडनी, : सध्याच्या घडीला भारतीय संघापुढे एक प्रश्न पडला आहे. कारण भारताच्या कसोटी संघात रिषभ पंत आणि वृद्धिमान साहा हे दोन यष्टीरक्षक आहे. त्यामुळे यापैकी पहिल्या सामन्यात नेमकी कोणाला संधी द्यायची, याचा विचार भारतीय संघ करत असेल. पण भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी मात्र या दोघांपैकी एकाची निवड केली आहे. याबाबत संजय मांजरेकर यांनी एक ट्विट केले आहे आणि त्यांचे हे ट्विट आता चांगलेच व्हायरल झाले आहे. संजय मांजरेकर यांच्यामते ज्या खेळाडूकडे यष्टीरक्षणाचे चांगले कौशल्य आहे, त्याचाच विचार पहिल्यांदा केला जायला हवा. कारण कसोटी सामन्यांमध्ये कौशल्य हे सर्वात महत्वाचं असतं. मांजरेकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, " कसोटी क्रिकेटमध्ये यष्टीरक्षणाचे कौशल्य महत्वाचे असते. या दोघांपैकी एकाने स्टीव्हन स्मिथला जीवदान दिले होते आणि त्याने त्यानंतर द्विशतक झळकावले होते. त्यामुळे माझी पहिली पसंती ही वृद्धिमान साहाला असेल. ऑस्ट्रेलियामध्ये वेगवान खेळपट्ट्या असतात आणि चेंडूही वेगाने येतो. त्यामुळे एक चांगला यष्टीरक्षकच भारतीय संघात निवडायला हवा. त्यामुळे साहालाच भारताकडून खेळण्याची संधी द्यायला हवी, असे मला वाटते." दुसऱ्या सराव सामन्यात सामन्यात रिषभ पंत हा यष्टीरक्षण करत होता, पण साहाने यावेळी आपल्याकडे आलेली या कॅचची संधी सोडली नाही. मोहम्मद सिराजच्या १६व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाच्या निक मॅडिसनने जोरदार फटका लगावला. हा फटका आता चौकार जाणार असे वाटायला लागले होते. पण या चेंडूच्या मागे विरुद्ध दिशेने साहा धावत गेला. चेंडूच्या विरुद्ध दिशेने धावणे सोपे नसते. पण साहाने यावेळी चेंडूचा पाठलाग केला आणि एक भन्नाट कॅच पकडली. साहाच्या या कॅचचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे. वृद्धिमान साहाच्या एका भन्नाट कॅचची चर्चा सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वामध्ये चांगली रंगत आहे. साहाच्या या कॅचचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालेला आहे. काही चाहत्यांना यावेळी साहाची कॅच पाहून कपिल देव यांचा विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील झेल आठवला आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gKNFwM

शमी, सैनीने ऑस्ट्रेलियाची झोप उडवली; १०८ धावांवर गुंडाळले

सिडनी: 2nd practice match भारत आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या सराव सामन्यात भारतीय फलंदाजांनी खराब कामगिरी केली म्हणून दिवसभर त्यांच्यावर टीका झाली. जसप्रीत बुमराहने केलेल्या अर्धशतकामुळे भारताने १९४ धावांपर्यंत मजल मारली. पण त्यानंतर गोलंदाजांनी धमाकेदार कामगिरी केली. त्यांनी ऑस्ट्रेलियाला १०८ धावात माघारी पाठले आणि पहिल्या डावात ८६ धावांची आघाडी मिळून दिली. वाचा- दुसऱ्या सराव सामन्यात भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल यांनी भारतीय डावाची सुरूवात केली खरी. पण मयांक दोन धावा करून माघारी परतला. त्यानंतर आलेल्या शुभमन गिलने पृथ्वी सोबत अर्धशतकी भागिदारी केली. पृथ्वीने कसोटीत टी-२० स्टाइलने फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला आणि सलग ३ चौकार मारल्यानंतर तो बोल्ड झाला. त्यानंतर हनुमा विराही १५, गिल ४३, कर्णधार रहाणे चार, ऋषभ पंत ५, वृद्धीमान साहा शून्यावर बाद झाले. वाचा- साहा बाद झाला तेव्हा भारताची अवस्था ७ बाद १११ अशी होती. त्यानंतर सैनी चारवर , मोहम्मद शामी शून्यार बाद झाले. अखेरच्या जोडीसाठी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी ७१ धावांची भागिदारी करत भारताची लाज राखली. बुमराह ५५ धावांवर नाबाद राहिला. त्याने ५७ चेंडूत ६ चौकार आणि दोन षटकारांसह ही खेळी केली. सिराज २२ धावांवर बाद झाला. वाचा- ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात बुमराहने दुसऱ्याच षटकात ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्यानंतर आणि यांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना मैदानावर स्थिर होऊ दिले नाही. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार एलेक्स कॅरीने सर्वाधिक ३२ धावा केल्या. भारताकडून सैनीने १९ धावा देत ३, शमीने २९ धावा देत ३ विकेट घेतल्या. बुमराहने २ तर मोहम्मद सिराजने एक विकेट घेतली. साहाने घेतला अफलातुन कॅच - वाचा:


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3oI4riF

IND vs AUS : यष्टीरक्षण न करताही वृद्धिमान साहाने पकडला भन्नाट कॅच, व्हिडीओ झाला व्हायरल...

सिडनी, : भारताचा क्रिकेटपटू वृद्धिमान साहाचा एक भन्नाट कॅच सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वामध्ये चर्चेचा विषय बनला आहे. चाहत्यांना साहाने पकडलेली कॅच ही फर आवडली असून या कॅचचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. ही गोष्ट घडली ती भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या सराव सामन्यात. या सामन्यात रिषभ पंत हा यष्टीरक्षण करत होता, पण साहाने यावेळी आपल्याकडे आलेली या कॅचची संधी सोडली नाही. मोहम्मद सिराजच्या १६व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाच्या निक मॅडिसनने जोरदार फटका लगावला. हा फटका आता चौकार जाणार असे वाटायला लागले होते. पण या चेंडूच्या मागे विरुद्ध दिशेने साहा धावत गेला. चेंडूच्या विरुद्ध दिशेने धावणे सोपे नसते. पण साहाने यावेळी चेंडूचा पाठलाग केला आणि एक भन्नाट कॅच पकडली. साहाच्या या कॅचचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे. सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण जसप्रीत बुमराच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने १९४ धावा केल्या होत्या. या धावा माफक वाटत असल्या तरी भारताच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाची फलंदाजी बेचिराख केली. भारतीय गोलंदाजांनी अचूक आणि भेदक मारा केल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १०८ धावांवर सर्वबाद झाला आहे. भारताकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि नवदीप सैनी यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स मिळवले. बुमराने यावेळी दोन फलंदाजांना बाद केले, तर नवदीप सैनीला एक बळी मिळवता आला. भारताच्या फलंदाजांना कसोटी सामन्यापूर्वी सराव करण्याची ही अखेरची संधी असेल. आतापर्यंत भारताला दोन्ही सराव सामन्यांमध्ये चांगली सुरुवात करता आलेली नाही. पहिल्या सामन्यात तर दोन्ही सलामीवीर झटपट बाद झाले होते. या दुसऱ्या सामन्यात भारताचा सलामीवीर मयांक अगरवालला फक्त दोनच धावा बनवता आल्या. मयांकने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली होती. पण ऑस्ट्रेलियातील वनडे मालिकेत मयांक धावा करण्यात अपयशी ठरला होता. त्याचबरोबर सराव सामन्यातही मयांककडून जास्त धावा होत नसल्याचेच पाहायला मिळत आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39ZTy7I

निवृत्तीनंतर केला धमाकेदार विक्रम, पाहा भारतीय खेळाडूची टी-२०मधील कामगिरी

नवी दिल्ली: भारताचा अष्ठपैलू इरफान पठाणने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून भलेही निवृत्ती घेतली असली तरी क्रिकेटमध्ये तो अद्याप लीग स्पर्धा खेळतोय. इरफान सध्या लंका प्रीमियर लीग स्पर्धेत कॅडी टसकर्सकडून खेळत आहे. वाचा- इरफानने लंका प्रीमियर लीग स्पर्धेत जाफना स्टालियस विरुद्ध खेळताना त्याने १९ चेंडूत २५ धावा केल्या, यात चार चौकारांचा समावेश होता. यासह त्याने टी-२० क्रिकेटमध्ये दोन हजार धावा पूर्ण केल्या. इरफानने टी-२० क्रिकेटमध्ये २ हजार धावा आणि १५० विकेट घेतल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरलाय. वाचा- भारताकडून याआधी अशी कामगिरी फक्त रविंद्र जडेजाने केली आहे. जडेजाने टी-२० क्रिकेटमध्ये २२७ साम्यात ही कामगिरी करुन दाखवली होती. तर इरफानने फक्त १८० सामन्यात हा विक्रम केला. भारताकडून टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने २ हजार धावा आणि १५० विकेट घेणारा खेळाडू ठरला आहे. वाचा- टी-२० करिअरमध्ये जडेजाने आतापर्यंत २५२ सामन्यात २ हजार ५८६ धावा आणि १६४ विकेट घेतल्या आहेत. तर इरफानने १८० सामन्यात २ हजार ९ धावा आणि १७३ विकेट घेतल्या आहेत. इरफानने या वर्षाच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. पण टी-२० खेळणार असल्याचे तो बोलला होता.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3nayyz4

आमची मुंबई... मुंबईत भेटल्यावर मराठीतच बोलणार, हार्दिक पंड्याचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

मुंबई : मराठी भाषेबद्दल आणि मुंबईबाबतचा अभिमान भारताचा धडाकेबाज खेळाडू हार्दिक पंड्याच्या बोलण्यातून एका व्हिडीओमधून जाणवला आहे. हार्दिक हा व्हिडीओ आता सोशल मीडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हार्दिकचा हा व्हिडीओ मुंबई इंडियन्सने पोस्ट केला आहे. मुंबई इंडियन्सचा संघ जेव्हा आयपीएलसाठी सराव करत होता, तेव्हाचा हा व्हीडिओ आहे. या व्हिडीओमध्ये हार्दिक म्हणाला की, " काय म्हणताय... सगळं बरं का? आमची मुंबई... खूप खूप छान. सगळं बरं आहे, पण इथे युएईमध्ये ऊन खूप आहे. मी अजून मराठी शिकणार आहे आणि जोपण मला मुंबईमध्ये भेटणार त्याच्याबरोबर मी मराठीमध्येच बोलणार आहे. मला मराठी बोलायला आता यायला लागलं आहे, त्याच़बरोबर मला मराठी भाषाही कळते. सूर्यकुमार यादव हा माझा मराठीचा शिक्षक आहे." ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत हार्दिकला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला होता. पण हा पुरस्कार त्याने युवा वेगवान गोलंदाज टी. नटराजनला दिला होता. त्यावेळीही चाहत्यांनी हार्दिकचे कौतुक केले होते. आता हार्दिकचा हा व्हिडीओ कौतुकाला पात्र ठरला आहे. त्याचबरोबर चाहत्यांना हा व्हिडीओ आता चांगलाच पंसतीस पडला आहे. आयसीसीच्या क्रमवारीतही हार्दिकने चांगले गुण कमावले आहेत. वर्ल्डकप २०१९ नंतर पहिला वनडे सामना खेळणारा भारताचा अष्ठपैलू हार्दिक पंड्याने पहिल्या वनडे ९० आणि तिसऱ्या वनडेत नाबाद ९२ धावा केल्या. क्रमवारीत तो पहिल्यांदा ५५३ गुणांसह टॉप-५० जणांमध्ये आला आहे. हार्दिक फलंदाजांच्या यादीत ४९व्या स्थानावर आहे. रविवारी सिडनीत झालेल्या टी-२० लढतीत भारताला आक्रमक फलंदाजीची गरज होती. विजयासाठी १२ धावांचे रनरेट हवे असताना हार्दिकने फक्त २२ चेंडूत ४२ धावा करत फक्त मॅच नाही तर मालिका देखील जिंकून दिली. सामना झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने त्याचे कौतुक केले. इतक नव्हे तर सोशल मीडियावर देखील सर्व जण त्याचे कौतुक करत आहेत. हार्दिकचे कौतुक करणाऱ्यांमध्ये इंग्लंडच्या एका महिला क्रिकेटपटूचा समावेश आहे. इंग्लंडची देखील पंड्याच्या फलंदाजीने हैराण झाली. पंड्याच्या धमाकेदार फलंदाजीवर हार्टलीला विश्वास बसला नाही. तिने ट्विटकरून हार्दिकचे कौतुक केले आहे. तु खरच हे करून दाखवले आहेस? या ट्विटसोबत तिने काही इमोजी वापरले आहेत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/378iYyl

IND vs AUS : विराट कोहलीचं टेन्शन वाढलं, हे ठरलं सर्वात मोठं कारण

सिडनी : भारताने ट्वेन्टी-२० मालिका जिंकली असली तरी भारताचा कर्णधार विराट कोहलीचं टेन्शन आता वाढलेले आहे. कारण आता काही दिवसांमध्ये पहिला कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे कोहलीवर एका महत्वाच्या गोष्टीमुळे जबरदस्त दडपण आल्याचे म्हटले जात आहे. भारतीय संघ आतापर्यंत दोन सराव सामने खेळला आहे. पण या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाला चांगली सलामी अजून मिळालेली नाही. पहिल्या सामन्यात तर दोन्ही सलामीवीर झटपट बाद झाले होते. या दुसऱ्या सामन्यात भारताचा सलामीवीर मयांक अगरवालला फक्त दोनच धावा बनवता आल्या. मयांकने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली होती. पण ऑस्ट्रेलियातील वनडे मालिकेत मयांक धावा करण्यात अपयशी ठरला होता. त्याचबरोबर सराव सामन्यातही मयांककडून जास्त धावा होत नसल्याचेच पाहायला मिळत आहे. भारताचा दुसरा सलामीवीर पृथ्वी शॉ याला पहिल्या सराव सामन्यातील पहिल्या डावात भोपळाही फोडता आला नव्हता. त्यानंतर या सामन्यातील दुसऱ्या डावात त्याला १९ धावा करता आल्या होत्या. पण दुसऱ्या सराव सामन्यात पृथ्वीने आठ चौकारांच्या जोरावर ४० धावा केल्या. पण एवढी चांगली सुरुवात करूनही पृथ्वीला यावेळी मोठी खेळी साकारता आली नाही. त्याचबरोबर पहिल्या सराव सामन्यात शुभमन गिलला सलामीला पाठवण्यात आले होते, पण तोदेखील मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला आहे. जोपर्यंत कोणत्याही संघाची सुरुवात चांगली होत नाही, तोपर्यंत त्यांना मोठी धावसंख्या उभारता येत नाही. सराव सामन्यात भारतीय सलामीवीर हे सातत्याने अपयशी ठरताना दिसत आहेत. त्यामुळे कोहलीपुढे हेच सर्वात मोठं टेन्शन असेल. कारण जर सलामीवीर लवकर बाद झाले तर मोठी धावसंख्या कशी उभारायची, याचा विचार कोहली करत असेल. दुसऱ्या सराव सामन्यात बुमराने भारताची लाज राखली. अखेरच्या जोडीसाठी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी ७१ धावांची भागिदारी करत भारताची लाज राखली. बुमराह ५५ धावांवर नाबाद राहिला. त्याने ५७ चेंडूत ६ चौकार आणि दोन षटकारांसह ही खेळी केली. सिराज २२ धावांवर बाद झाला.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gAnJUx

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूच्या डोक्यावर आदळला चेंडू, गंभीर दुखापतीमुळे सोडालं लागलं मैदान

सिडनी : ऑस्ट्रेलियाच्या संघातील दुखापतींचे प्रमाण आता वाढायला लागले आहे. कारण भारताविरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूच्या डोक्यावर चेंडू आदळल्याचे पाहायला मिळाले आहे. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे या खेळाडूला थेट मैदान सोडावे लागले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघात आता चिंतेचे वातावरण आहे. कारण पहिल्या सराव सामन्यातही ऑस्ट्रेलियाच्या एका फलंदाजाला डोक्याला चेंडू लागला होता. त्यानंतर त्याला गंभीर दुखापत झाल्याचे पाहायला मिळाले होते. दुसऱ्या सराव सामन्यात जसप्रीत बुमराने अर्धशतक झळकावत भारताची लाज राखली. या सामन्यात फलंदाजी करत असताना बुमराने एक स्ट्रेड ड्राइव्ह लगावला. त्यानंतर हा चेंडू गोलंदाजी करत असलेल्या कॅमेरुन ग्रीनच्या बोटाला लागला आणि त्यानंतर थेट डोक्याच्या उजव्या बाजूला आदळला. या दुखापतीनंतर संघाच्या डॉक्टरांनी मैदानात धाव घेतली. ग्रीनची दुखापत ही गंभीर स्वरुपाची असल्याचे डॉक्टरांना समजले आणि त्यांनी ग्रीनला मैदानातून बाहेर नेले. ग्रीनवर डॉक्टरांनी उपचार केले आहेत, त्याचबरोबर त्याच्या काही चाचण्याही करण्यात आल्या आहेत. या चाचण्यांचे अहवाल आज संध्याकाळी मिळणार आहे. त्यानंतरच ग्रीन या सामन्यात खेळू शकणार की नाही, हे स्पष्ट होऊ शकते. सराव सामन्यात डोक्यावर बॉल लागलेला ग्रीन हा दुसरा खेळाडू ठरला आहे. कारण पहिल्या सराव सामन्यात फलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर विल पुकोवस्कीच्या डोक्याला चेंडू लागला होता. त्यालाही गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे पुकोवस्कीला मैदान सोडावे लागले होते. त्यानंतर आता दुसऱ्या सराव सामन्यात ग्रीनच्या डोक्याला चेंडू लागल्याची घटना आता पुढे आली आहे. या सराव सामन्यात बुमराने भारताची लाज राखली. अखेरच्या जोडीसाठी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी ७१ धावांची भागिदारी करत भारताची लाज राखली. बुमराह ५५ धावांवर नाबाद राहिला. त्याने ५७ चेंडूत ६ चौकार आणि दोन षटकारांसह ही खेळी केली. सिराज २२ धावांवर बाद झाला. सिडनी मैदानावर सुरू असेल्या या सामन्यात भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण पहिल्या सराव सामन्याप्रमाणेच या देखील सामन्यात भारतीय फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल यांनी भारतीय डावाची सुरूवात केली खरी. पण मयांक दोन धावा करून माघारी परतला. त्यानंतर आलेल्या शुभमन गिलने पृथ्वी सोबत अर्धशतकी भागिदारी केली. पृथ्वीने कसोटीत टी-२० स्टाइलने फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला आणि सलग ३ चौकार मारल्यानंतर तो बोल्ड झाला. त्यानंतर हनुमा विराही १५, गिल ४३, कर्णधार रहाणे चार, ऋषभ पंत ५, वृद्धीमान साहा शून्यावर बाद झाले. साहा बाद झाला तेव्हा भारताची अवस्था ७ बाद १११ अशी होती. त्यानंतर सैनी चारवर , मोहम्मद शामी शून्यार बाद झाले.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37cOLyh

रोहित शर्मा झाला फिट; पण आता काय करावं लागणार, पाहा...

नवी दिल्ली, : रोहित शर्मा आता ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. पण रोहितसमोरच्या अडचणी आता संपलेल्या नाहीत. कारण आता रोहितला बऱ्याच गोष्टी कराव्या लागणार आहेत. रोहितचे आता शेड्युल नेमकं काय असेल आणि त्याला काय करावं लागणार आहे, पाहा... रोहित शर्माने फिटनेस टेस्ट पास केली असून तो या आठवड्याच्या शेवटी ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार आहे. रोहितला बंगळुरुहून मुंबईला येणार आहे आणि त्यानंतर तो मुंबईहून दुबईला पोहोचणार आहे. त्यानंतर रोहितला दुबईवरुन सिडनीचे विमान पकडावे लागणार आहे. रोहित १३ डिसेंबरला ऑस्ट्रेलियामध्ये दाखल होणार आहे. त्यानंतर रोहितची ऑस्ट्रेलियामध्ये करोना चाचणी होऊ शकते. रोहित करोना चाचणीमध्ये निगेटीव्ह आल्यावर त्याला १४ दिवस क्वारंटाइनमध्ये रहावे लागणार आहे. रोहितच्या क्वारंटाइनचा काळ कमी करावा, अशी मागणी यावेळी बीसीसीआय ऑस्ट्रेलियाच्या सरकारला करू शकते. ऑस्ट्रेलियाच्या सरकारने जर बीसीसीआयची मागणी मान्य केली तर रोहित लवकर भारतीय संघात दाखल होऊ शकतो. पण ऑस्ट्रेलियाने बीसीसीआयची मागणी मान्य केली नाही, तर काय होऊ शकते पाहा.... ऑस्ट्रेलियाने जर बीसीसीआयची मागणी मान्य केली नाही तर रोहितला १४ दिवस क्वारंटाइनमध्ये रहावे लागणार आहे. त्यामुळे रोहितला पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये खेळता येणार नाही. कारण रोहितचा क्वारंटाइनचा कालावधी हा ख्रिसमसनंतर संपणार आहे. त्यामुळे रोहित हा ७ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकतो. पण जर ऑस्ट्रेलियाने बीसीसीआयची मागणी मान्य केली तर रोहित दुसऱ्या सामन्यातही खेळताना आपण पाहू शकतो. त्यामुळे आता बीसीसीआय ऑस्ट्रेलियाला याबाबत विनंती करणार का आणि त्याचे पुढे काय होणार, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. भारताचा पहिला कसोटी सामना हा अॅडलेड येथे १७ ते २१ डिसेंबर या कालावधीमध्ये होणार आहे. हा सामना दिवस-रात्र असेल. यानंतर दुसरा कसोटी सामना २६ ते ३० डिसेंबर या कालावधीमध्ये मेलबर्न येथे होणार आहे. या मालिकेतील तिसरा सामना ७ जानेवारीपासून सिडनी येथे सुरु होणार आहे. त्यानंतर या मालिकेतील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना १५ जानेवारीला ब्रिस्बेन येथे सुरु होणार आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3m9f9gH

सराव सामन्यात भारताचे शेर झाले ढेर; अर्धशतक करून बुमराहने लाज राखली

सिडनी: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना १७ डिसेंबर रोजी होणार आहे. या सामन्याआधी भारत आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यात दुसरा होत आहे. सिडनी मैदानावर सुरू असेल्या या सामन्यात भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण पहिल्या सराव सामन्याप्रमाणेच या देखील सामन्यात भारतीय फलंदाजांनी निराश कामगिरी केली. पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल यांनी भारतीय डावाची सुरूवात केली खरी. पण मयांक दोन धावा करून माघारी परतला. त्यानंतर आलेल्या शुभमन गिलने पृथ्वी सोबत अर्धशतकी भागिदारी केली. पृथ्वीने कसोटीत टी-२० स्टाइलने फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला आणि सलग ३ चौकार मारल्यानंतर तो बोल्ड झाला. त्यानंतर हनुमा विराही १५, गिल ४३, कर्णधार रहाणे चार, ऋषभ पंत ५, वृद्धीमान साहा शून्यावर बाद झाले. साहा बाद झाला तेव्हा भारताची अवस्था ७ बाद १११ अशी होती. त्यानंतर सैनी चारवर , मोहम्मद शामी शून्यार बाद झाले. अखेरच्या जोडीसाठी आणि मोहम्मद सिराज यांनी ७१ धावांची भागिदारी करत भारताची लाज राखली. बुमराह ५५ धावांवर नाबाद राहिला. त्याने ५७ चेंडूत ६ चौकार आणि दोन षटकारांसह ही खेळी केली. सिराज २२ धावांवर बाद झाला. भारताकडे चांगल्या फलंदाजांची फळी असताना देखील त्यांना कोणाला अर्धशतक देखील करता आले नाही. बुमराहने म्हणजे १०व्या क्रमांकाच्या फलंदाजाने सर्वाधिक नाबाद ५५ धावा केल्या.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3oIpB09

Breaking News आनंदाची बातमी; रोहित शर्मा फिटनेस टेस्ट पास झाला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार कसोटी

बेंगळुरू: भारताचा स्टार सलामीवीर रोहित शर्माने फिटनेस टेस्ट पास केली आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये शुक्रवारी फिटनेस टेस्ट झाल्यानंतर आता रोहित ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या अखेरच्या दोन कसोटीत खेळू शकणार आहे. भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून या दोन्ही संघात वनडे आणि टी-२० मालिका झाली आहे. या दोन्ही मालिकेत अनेकदा उप कर्णधार रोहित शर्माची कमी जाणवत होती. आता कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून सुरूवात होत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यासाठी आज रोहितची बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत अर्थात एमसीए येथे फिटनेस टेस्ट झाली. युएईमध्ये झालेल्या आयपीएलच्या १३व्या हंगामात त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्यानंतर NCA मध्ये तो फिटनेसवर काम करत होता. वाचा- रोहित आधीच पहिल्या दोन कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे. तिकडे ऑस्ट्रेलियात विराट कोहली पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतात परत येईल. कोहली भारतात परतल्यानंतर त्याच्या जागी रोहित सारखा फलंदाज संघात असेल तर भारतासाठी आश्वासक ठरू शकते. आता याबाबतचा अंतिम निर्णय बीसीसीआयवर आहे. वाचा- ऑस्ट्रेलिया दौऱ्यात निवड समितीने रोहितला दुखापतीमुळे संधी दिली नव्हती. त्यावरून बराच वाद झाल्यानंतर आयपीएलमधील फिटनेस पाहता त्याचा कसोटी संघात समावेश करण्यात आला होता.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2IBSFqH

रोहित शर्मासाठी आज महत्त्वाचा दिवस; होणार भवितव्याचा निर्णय

नवी दिल्ली: भारतीय संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्मासाठी आजचा म्हणजे ११ डिसेंबर हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून या दोन्ही संघात वनडे आणि टी-२० मालिका झाली आहे. या दोन्ही मालिकेत अनेकदा उप कर्णधार रोहित शर्माची कमी जाणवत होती. आता कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून सुरूवात होत आहे. वाचा- आजचा दिवस रोहितसाठी महत्त्वाचा आहे कारण आज त्याची फिटनेस टेस्ट होणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यासाठी आज रोहितची बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत अर्थात एमसीए येथे फिटनेस टेस्ट होणार आहे. युएईमध्ये झालेल्या आयपीएलच्या १३व्या हंगामात त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. आज होणाऱ्या फिटनेस टेस्टनंतर रोहित या दुखापतीमधून बाहेर आला आहे का हे लक्षात येईल. फिटनेस टेस्टच्या निकालानंतरच तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाईल की नाही हे निश्चित केले जाईल. वाचा- जर या फिटनेस टेस्टमध्ये पास झाला तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या दोन कसोटी सामन्यात तो खेळू शकले. रोहित आताच पहिल्या दोन कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे. तिकडे ऑस्ट्रेलियात विराट कोहली पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतात परत येईल. कोहली भारतात परतल्यानंतर त्याच्या जागी रोहित सारखा फलंदाज संघात असेल तर भारतासाठी आश्वासक ठरू शकते. वाचा- ऑस्ट्रेलिया दौऱ्यात निवड समितीने रोहितला दुखापतीमुळे संधी दिली नव्हती. पण नंतर आयपीएलमधील फिटनेस पाहता त्याचा कसोटी संघात समावेश करण्यात आला. पण फिटनेस नसल्याने तो पहिल्या दोन कसोटीतून बाहेर झाला. आता आज फिटनेट टेस्ट पास झाला तर तो ऑस्ट्रेलियाला जाऊ शकेल. बीसीसीआय ऑस्ट्रेलियातील त्याचा क्वारंटाइन कालावधी कमी करण्याची विनंती करू शकते.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3oHZbfa

Thursday, December 10, 2020

कोहली आणि धोनी यांच्यामध्ये दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू कोण, सुनील गावस्कर यांनी केली एकाचीच निवड

नवी दिल्ली : गेल्या दहा वर्षांतील सर्वोत्तम क्रिकेटपटू कोण, असा प्रश्न भारताचे माजी महान फलंदाज आणि समालोचक सुनील गावस्कर यांना विचारण्यात आला होता. यावेळी गावस्कर यांच्यापुढे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि विद्यमान कर्णधार विराट कोहली, असे दोन पर्याय ठेवण्यात आले होते. यावेळी गावस्कर यांनी धोनी आणि कोहली यांच्यामधील एकाचीच निवड केली आहे. याबाबत गावस्कर म्हणाले की, " जर तुम्ही व्यक्तिगत कामगिरी पाहिली तर गेल्या १० वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू मला विराट कोहली वाटतो. कारण कोहलीने एक फलंदाज म्हणून दमदार कामगिरी केली आहे. त्याचबरोबर धावांचा पाठलाग करताना कोहलीने उत्तम कामगिरी केली आहे आणि त्याच्या या कामगिरीच्या जोरावर भारताने बरेच सामने जिंकले आहेत." गावस्कर यांनी पुढे सांगितले की, " मी हे सर्व सांगत असताना फक्त धावा किंवा विकेट्स पाहत नाही, तर एखाद्या खेळाडूचा प्रभाव मी पाहतो. याबाबतीमध्ये तुम्हालाही मानावे लागेल की हे जे दशक आहे ते विराट कोहलीच्याच नावावर असेल. कारण भारतीय संघाने जे सामने जिंकले आहेत त्यामध्ये कोहलीचा प्रभाव सर्वाधिक आहे. त्यामुळे या दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू मला कोहली वाटतो." ऑस्ट्रेलियाचा माजी धडाकेबाज सलामीवीर मॅथ्यू हेडनलाही हाच प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी हेडनने सांगितले की, " मला सर्वात महत्वाचे वाटते की, धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी करंडक स्पर्धा जिंकली आहे. माझ्यासाठी विश्वचषक हा मैलाचा दगड आहे, तो सर्वात महत्वाचा समजला जातो. माझ्यामते धोनीला मी पसंती देईन. कारण विश्वचषक खेळत असताना तुमच्यावर फार मोठे दडपण असते त्यावेळी एक चांगला कर्णधार तोच असतो जो शांतपणे सर्व निर्णय घेत असतो. हे गुण धोनीमध्ये आपण सर्वांनीच पाहिले आहे. धोनी हा एक सर्वोत्तम कर्णधार म्हणून सर्वांनाच परिचीत आहे. त्याचबरोबर एक खेळाडू म्हणूनही धोनीने चांगले नाव कमावलेले आहे."


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/375guAH

सचिन तेंडुलकर नेमका करतोय तरी काय, व्हायरल झाला फोटो

नवी दिल्ली : भारताचा माजी महान क्रिकेटपटू नेमका काय करतोय, हे सध्याच्या घडीला तरी कोणाला माहिती नाही. सचिन हा मार्च महिन्यानंतर कुठेही बाहेर फिरताना दिसलेला नाही. पण सचिनचा एक फोटो सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. सचिन हा गेल्या काही दिवसांमध्ये कुठेही बाहेर फिरताना दिसलेला नाही. आयपीएलमध्येही सचिन हा कुठे पाहायला मिळाला नव्हता. पण सध्याच्या घडीला सचिन हा सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्येच सचिनचा एक फोटो चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. सचिन आपल्या कुटुंबियांबरोबर सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. सचिनने यावेळी आपल्या सोशल मीडियावर मुलगी साराबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो चांगलाच व्हायरल झालेला आहे. या फोटोखाली साराने म्हटले आहे की, " बाबा, आपण समुद्रामध्ये कुठे हरवलो तरी नाही नाही ना..." यावर सचिनने म्हटले आहे की, " मी नेमकं तुला सांगू शकत नाही." भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने पहिल्यांदाच रोहित शर्माबाबत आपले वक्तव्य केले होते. त्याचबरोबर रोहित हा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर नेमका कधी जाऊ शकतो, याबाबतही सचिनने भाष्य केले होते. सचिन म्हणाला होता की, " जेव्हा एखाद्या महत्वाच्या खेळाडूला दुखापत होते, तेव्हा त्याला न खेळवणेच योग्य ठरते. वेस्ट इंडिजच्या दौऱ्यात अनिल कुंबळे हा संघासाठी सर्वात महत्वाचा गोलंदाज होता. पण तो दुखापतग्रस्त असल्यामुळे त्याला आम्ही खेळवले नव्हते. पण जर एखादा खेळाडू पूर्णपणे फिट असेल आणि त्याच्याकडे चांगला अनुभव असेल तर नक्कीच त्याला संधी द्यायला हवी." रोहितला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर का पाठवायला हवे, पाहा... ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर रोहितला का पाठवायला हवे, याबाबतही सचिनने आपले मत व्यक्त केले आहे. सचिन म्हणाला की, " भारताचा कर्णधार विराट कोहली हा फक्त पहिला कसोटी सामना खेळणार आहे. त्यानंतर कोहली हा भारतामध्ये येणार आहे. त्यावेळी कोहलीची जागा भारतीय संघाला भरुन काढणाऱ्या अनुभवी खेळाडूची नक्कीच गरज असेल. त्यामुळे रोहित जर फिट असेल आणि त्याने सर्व निकष जर पूर्ण केलेले असतील तर रोहितला नक्कीच ऑस्ट्रेलियाला पाठवायला हवे. रोहित जर दुसऱ्या कसोटी सामन्यापासून भारतीय संघात सहभागी झाला तर ती चांगली गोष्ट असेल. पण रोहितची फिटनेस टेस्ट कधी होते, त्यामध्ये तो पास होतो का आणि पास झाल्यावर संघ व्यवस्थापन नेमका काय निर्णय घेते, यावर सर्व गोष्टी अवलंबून असतील असे मला तरी वाटते."


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39VdvwB

रवी शास्त्री यांनी ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधारालाच सांगितला संघाचा प्लॅन, सामन्यापूर्वी दिली महत्वाची माहिती

सिडनी, : भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधारालाच आपल्या संघाचा प्लॅन सांगितल्याची धक्कादायक माहिती आता पुढे येत आहे. कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच शास्त्री यांनी महत्वाची माहिती ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराला दिल्याचे आता पुढे येत आहे. याबाबतचा खुलासा ऑस्ट्रेलियाच्या त्याला माजी क्रिकेटपटूंनीच केला आहे. भारतासाठी ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका स्वात महत्वाची आहे. पण या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच शास्त्री यांनी प्रतिस्पर्धी देशाच्या माजी कर्णधारापुढे आमली महत्वाची माहिती उघड केल्याचे आता समजते आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांना शास्त्री यांनी भारतीय संघाबाबत महत्वाची माहिती दिल्याचे आता पुढे येत असून याबाबतचे वृत्त दैनिक जागरण या संकेतस्थळाने दिले आहे. याबाबत चॅपेल यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, " मी आणि रवी शास्त्री त्या दिवश ड्रिंक्स घेत होतो. त्यावेळी त्यांनी मला सांगितले की, उमेश यादव हा भारताचा तिसरा वेगवान गोलंदाज असेल. कारण मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरा हे दोन गोलंदाज भारताकडे आहेत. पण इशांत शर्मा या मालिकेत खेळू शकणार नाही. त्यामुळे तिसऱ्या वेगवान गोलंदाजाची जबाबदारी ही उमेश यादववर देण्यात येईल. त्याचबरोबर अॅडलेडच्या मैदानात जो संघ पहिल्यांदा फलंदाजी करताना ३००पेक्षा जास्त धावा बनवेल त्यांना सामना जिंकण्याची नामी संधी असेल." आतापर्यंत विराट कोहलीच आक्रमक कर्णधार आहे, असे बऱ्याच जणांना माहिती होते. पण अजिंक्य रहाणेही कर्णधार म्हणून आक्रमक असून तो चांगले नेतृत्व करेल, असा विश्वास ऑस्ट्रेलियाचे माजी महान क्रिकेटपटू इयान चॅपेल यांनी व्यक्त केला आहे. यावेळी चॅपेल यांनी अजिंक्यने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एका सामन्यात आक्रमक नेतृत्व केले होते, यावरही प्रकाशझोत टाकला आहे. याबाबत चॅपेल म्हणाले की, " भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एक सामना धरमशाला येथे झाला होता. या सामन्यात अजिंक्यने भारताचे कर्णधारपद भूषवले होते. यावेळी अजिंक्य हा कसा आक्रमक कर्णधार आहे, हे पाहायला मिळाले होते. कारण त्यावेळी वॉर्नर फॉर्मात होता. त्यावेळी अजिंक्यने फिरकीपटू कुलदीप यादवला गोलंदाजी दिली आणि त्याचा हा निर्णय योग्य ठरल्याचे पाहायला मिळाले. कारण कुलदीपने वॉर्नरला बाद केले." चॅपेल पुढे म्हणाले की, " भारताला या सामन्यात जिंकण्यासाठी कमी धावा हव्या होत्या. पण खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली नव्हती आणि भारताच्या विकेट्सही पडल्या होत्या. त्यावेळी अजिंक्यने आक्रमक फलंदाजी करायला सुरुवात केली आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. माझ्यामते कसोटी क्रिकेटमध्ये आक्रमकपणा हा फार महत्वाचा असतो. त्यामुळे रहाणेचे नेतृत्व मला आवडते. कारण त्याची नेतृत्व करण्याची शैली ही भिन्न आहे. आतापर्यंत त्याला ज्यावेळी संधी मिळाली आहे, त्यावेळी रहाणेने चांगले नेतृत्व केले आहे. पण आता रहाणेला पुन्हा एकदा संधी मिळाली तर तो संघाचे चांगले नेतृत्व करू शकतो."


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2IGyEQ0

BCCI सुस्साट; ३ मैदानांवर होणार १२ लढती, जगातील मोठ्या मैदानावर डे-नाइट कसोटी

मुंबई: करोना व्हायरसमुळे जवळजवळ एका वर्षापासून भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने झाले नाहीत. भारतीय खेळाडूंनी आयपीएल २०२० स्पर्धा युएईमध्ये खेळली. त्यानंतर ते थेट ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेले. या वर्षाच्या सुरुवातीला भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका झाली होती. तीन सामन्यांची वनडे मालिका भारताने जिकंली होती. त्यानंतर भारताचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता. वाचा- न्यूझीलंड दौऱ्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मलिका करोनामुळे रद्द झाली. भारतात १९ जानेवारी २०२० रोजी अखेरची आंतरराष्ट्रीय मॅच झाली होती. त्यानंतर आयपीएल स्पर्धा युएईमध्ये झाली आणि अन्य दौरे स्थगित करण्यात आले. आता भारतात वर्षभराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात होत आहे. वाचा- इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्याची सुरुवात पाच फेब्रुवारीपासून होत आहे. इंग्लंड दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेने होणार आहे. यातील तिसरा कसोटी सामना डे-नाईट असणार आहे. हा सामना गुजरातमधील अहमदाबाद येथील सरदार पटेल मोटेरा स्टेडियमवर होणार असून हे मैदान जगातील सर्वात मोठे क्रिकेटचे मैदान आहे. मालिकेतील तिसरा आणि चौथा कसोटी सामना याच मैदानावर होणार आहे. वाचा- या शिवाय मोटेरा स्टेडियमवर दोन्ही संघातील पाच टी-२० सामने होणार आहेत. या मैदानाची क्षमता १ लाख १० हजार इतकी आहे. सध्या प्रेक्षकांच्या क्षमतेचा विचार करता मेलबर्न मैदान हे सर्वात मोठे क्रिकेटचे स्टेडियम आहे. मेलबर्न मैदानावर एक लाख प्रेक्षक सामना पाहू शकतात. बीसीसीआयने करोना व्हायरसमुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील सर्व १२ सामने फक्त ३ मैदानावर आयोजित केले आहेत. हे सामने चेन्नई, अहमदाबाद आणि पुण्या होणार आहेत. वाचा- इंग्लंडच्या भारत दौऱ्याचे वेळपत्रक कसोटी मालिका पहिली कसोटी, चेन्नई- ५ ते ९ फेब्रुवारी दुसरी कसोटी, चेन्नई- १३ ते १७ फेब्रुवारी तिसरी कसोटी, अहमदाबाद- २४ ते २८ फेब्रुवारी (डे-नाईट) चौथी कसोटी, अहमदाबाद- ४ ते ८ मार्च --- टी-२० मालिका पहिली मॅच- १२ मार्च दुसरी मॅच- १४ मार्च तिसरी मॅच- १६ मार्च चौथी मॅच- १८ मार्च पाचवी मॅच- २० मार्च --- वनडे सामने पहिली वनडे- २३ मार्च दुसरी वनडे- २६ मार्च तिसरी वनडे- २८ मार्च


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37VopQc

मुंबई इंडियन्सने पार्थिव पटेलला निवृत्तीनंतर दिली महत्वाची जबाबदारी, अंबानी यांनी नेमके काय सांगितले पाहा...

: भारताचा सदाबहार यष्टीरक्षक पार्थिव पटेलने बुधवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृती जाहीर केली. पण पार्थिवने निवृत्ती जाहीर केल्यावर फक्त एकाच दिवसात आयपीएलमधील सर्वात यशस्वी ठरलेल्या मुंबई इंडियन्सने महत्वाची जबाबदारी दिली आहे. यावेळी संघाचे मालक अंबानी यांनी पार्थिवबद्दल नेमके काय म्हटले आहे, पाहा... पार्थिव २०१५ ते २०१७ या कालावधीमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळला होता. या कालावधीमध्ये पार्थिव नेमका कसा खेळाडू आहे, हे मुंबई इंडियन्सच्या संघाला समजले होते. त्यामुळे त्यांनी आता पार्थिववर एक महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्यानुसार पार्थिव मुंबई इंडियन्सच्या संघासाठी आता टॅलेंट स्काऊटचे काम करणार आहे. त्याचबरोबर पार्थिवला आता मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट स्टाफबरोबर काम करण्याची संधी मिळणार आहे. टॅलेंट स्काऊटचे काम नेमके असते तरी काय... आतापर्यंत आयपीएमध्ये आपण असे बरेच खेळाडू पाहिले की त्यांना यापूर्वी कोणीही ओळखत नव्हते. त्यांचा चेहरा किंवा त्यांची कामगिरी लक्षात आली नव्हती. पण हे खेळाडू स्थानिक पातळीवर दमदार कामगिरी करत होते. स्थानिक पातळीवर कोणते युवा खेळाडू नेत्रदीपक कामगिरी करत आहेत आणि त्याचा आपल्या संघाला नेमका कसा फायदा होऊ शकतो, हे शोधण्याचे काम टॅलेंट स्काऊटचे असते. टॅलेंट स्काऊट युवा प्रतिभांना शोधून संघाच्या प्रशिक्षकांपुढे सादर करत असतो. त्यानंतर या युवा खेळाडूंना चाचपडले जाते आणि त्यानंतरच त्यांचा संघात समावेश केला जातो. भविष्यात जर एखाद्या संघाला राखीव फळी जर चांगली बनवायची असेल तर त्यासाठी टॅलेंट स्काऊटची भूमिका महत्वाची ठरत असते. पार्थिवबाबत अंबानी नेमके काय म्हणाले, पाहा...पार्थिव पटेल हा आमच्या संघासोबत जोडला गेला, हे पाहून मला आनंद झाला आहे. तो जेव्हा आमच्या संघातून क्रिकेट खेळत होता तेव्हा त्याच्याकडे खेळ आणि खेळाडूंची चांगली माहिती आहे, हे आम्हाला समजले होत. या गोष्टीचाच फायदा संघासाठी होऊ शकतो. मला आशा आहे की, पार्थिव पटेलमुळे आमच्या संघाची राखील फळी भक्कम होईल आणि संघाकडून जास्त युवा खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतील, असे मुंबई इंडियन्सच्या संघाचे मालक आकाश अंबानी यांनी सांगितले आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gA3K8m

IND v ENG: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; भारत आणि इंग्लंडचे किती सामने पाहायला मिळणार, पाहा...

नवी दिल्ली, : करोना, लॉकडाऊन या सर्व गोष्टींनंतर पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दौऱ्याचे वेळापत्रक आता जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार पुणेकरांना आता सुवर्णसंधी मिळणार आहे. कारण या दौऱ्यातील फक्त एक नाही तर त्यापेक्षा जास्त सामने आता पुण्यात होणार आहे. करोनानंतर इंग्लंडच्या दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर करताना बीसीसीआयने खबरदारीचे काही उपाय घेतले आहेत. त्यानुसार भारत आणि इंग्लंड यांच्यातील जास्त सामने एकाच ठिकाणी खेळण्यावर बीसीसीआयने भर दिला आहे. जेणेकरून संघांना जास्त प्रवास करावा लागू नये आणि त्याचबरोबर करोनापासूनही त्यांना सुरक्षित ठेवता येऊ शकते. भारत आणि इंग्लंड यांच्यातील संपूर्ण एकदिवसीय मालिकाच पुण्यात रंगणार आहे. या एकदिवसीय मालिकेत तीन सामने होणार आहेत. यामधील पहिला एकदिवसीय सामना २३ मार्चला होणार आहे. त्यानंतर दुसरा एकदिवसीय सामना २६ मार्चला होणार आहे. या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना २८ मार्चला खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील संपूर्ण एकदिवसीय मालिका पाहण्याची पर्वणी आता पुणेकरांना मिळणार आहे. कसोटी मालिकेचे वेळापत्रकपहिली कसोटी, चेन्नई- ५ ते ९ फेब्रुवारी दुसरी कसोटी, चेन्नई- १३ ते १७ फेब्रुवारी तिसरी कसोटी, अहमदाबाद- २४ ते २८ फेब्रुवारी (डे-नाईट) चौथी कसोटी, अहमदाबाद- ४ ते ८ मार्च टी-२० मालिकेचे वेळापत्रकपहिली मॅच- १२ मार्च दुसरी मॅच- १४ मार्च तिसरी मॅच- १६ मार्च चौथी मॅच- १८ मार्च पाचवी मॅच- २० मार्च (कसोटी मालिकेनंतर पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला सुरूवात होईल. या सर्व लढती अहमदाबाद येथेच होतील.) वनडे सामन्यांचे वेळापत्रकपहिली वनडे- २३ मार्च दुसरी वनडे- २६ मार्च तिसरी वनडे- २८ मार्च (इंग्लंड दौऱ्याची अखेर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेने होणार आहे. टी-२० प्रमाणेच वनडे मालिका एकाच ठिकाणी होईल. या सर्व लढती पुण्यात होणार आहेत.)


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3lYFXjy

२०२० मध्ये घडली करोना व्हायरसला मागे टाकणारी घटना; क्लिक करा आणि जाणून घ्या

नवी दिल्ली: २०२० मध्ये पेक्षा मोठी कोणतीही घटना झाली नसेल या विधानावर कोणीही हरकत घेणार नाही. लाखो लोकांचा मृत्यू, लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम आणि लाखो लोकांच्या गेलेल्या नोकऱ्या यामुळे करोनामुळे २०२० हे वर्ष वाया गेले. पण करोनावर मात करणारी एक गोष्ट या वर्षात घेतली आहे. आता तुम्हाला ही प्रश्न पडेल की करोना पेक्षा चर्चेत असेलली कोणती गोष्टी असेल. तर त्याचे उत्तर दिले आहे गुगलने... वाचा- गुगलने २०२० मधील टॉप ट्रेंडसची () घोषणा केली. यात भारतीय लोकांचे क्रिकेटबाबतचे प्रेम किती अधिक आहे हे दिसून आले. करोनामुळे यावर्षी आयपीएल प्रथम स्थगित करण्यात आले. त्यानंतर भारतात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने स्पर्धा युएईमध्ये घेण्यात आली. देशात बाहेर प्रथमच संपूर्ण आयपीएलचे आयोजन करण्यात आले. पण त्याची लोकप्रियता कमी तर झालीच नाही उटल जास्त वाढली. वाचा- जगातील सर्वात श्रीमंत टी-२० लीग स्पर्धा असलेल्या आयपीएलने गुगलवर सर्चच्या बाबत करोना व्हायरसला देखील मागे टाकले आहे. करोनाला मागे टाकत आयपीएल संदर्भात लोकांनी सर्वाधिक सर्च केल्याचे आढळले आहे. २०२० मध्ये गुगलवर सर्च झालेल्या आघाडीच्या गोष्टींची यादी जाहीर केली. यात आयपीएल अव्वल स्थानी आहे. गेल्या वर्षी म्हणजेच २०१९ साली आयसीसी वनडे वर्ल्डकप अव्वल स्थानी होता. वाचा- गुगल सर्चवर एकूणच क्रीडा आणि बातम्या या श्रेणीत सर्वात जास्त सर्च करण्यात आले ते आयपीएलच्या १३व्या हंगामाबाबतच्या माहितीसाठी आणि त्यानंतर क्रमांक येतो तो करोना व्हायरसचा होय. या शिवाय अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी, बिहार निवडणूक आणि दिल्ली निवडणूक याबाबत अधिक सर्च झाले. वाचा- आयपीएलची उत्सुकता भारत आणि बाहेरच्या देशात आहे. करोना व्हायरसमुळे ही स्पर्धा होणार नाही असे वाटत होते. मार्चमध्ये होणारी आयपीएल या वर्षी रद्द होईल असे वाटत होते. पण आयसीसीने ऑस्ट्रेलियात होणारा वर्ल्डकप पुढे ढकलला आणि बीसीसीआयला आयपीएलच्या आयोजनासाठी वेळ मिळाला. भारतीय क्रिकेट बोर्डाने १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात युएईमध्ये आयपीएलच्या १३व्या हंगामाचे आयोजन केले. यावर्षी मुंबई इंडियन्सने विक्रमी पाचवे विजेतेपद मिळवले आणि नवा इतिहास घडवला. अंतिम लढतीत त्यांनी दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. या वर्षीच्या आयपीएलचे आणखी एक खास वैशिष्ट म्हणजे दर वर्षी प्ले ऑफमध्ये पोहोचणाही चेन्नई सुपर किंग्ज या वर्षी सातव्या क्रमांकावर राहिली.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gKxJL3

आयपीएलमध्ये १० संघ नेमके कधी पाहायला मिळतील, बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी केला मोठा खुलासा

नवी दिल्ली : आयपीएलमध्ये १० संघ नेमके कधी पाहायला मिळतील, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. कारण यावर्षीचे संपल्यावर स्पर्धेत १० संघ जिंकतील, असे म्हटले जात होते. आता बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची खास माहिती दिली आहे. आयपीएलमधील दोन नवीन संघांसाठी अदानी ग्रुप आणि संजीव गोएंका ग्रुप हे शर्यतीत अग्रस्थानी होते असे म्हटले जात होते. यावर्षीचे आयपीएल हे मार्च-एप्रिल महिन्यात खेळवण्यात येईल, असे म्हटले जात आहे. पण स्पर्धेपूर्वी आयपीएलचा लिलाव होणार आहे. त्याचबरोबर करोनाशी लढण्यासाठी कोणत्या सुरक्षाव्यवस्था करायच्या, हेदेखील बीसीसीआयला पाहावे लागणार आहे. याबाबत बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, " आयपीएलमध्ये १० संघांचा समावेश असावा असा बीसीसीआयचा मानस आहे. पण सध्याची परिस्थिती पाहिली तर पुढच्या वर्षीच्या आयपीएलसाठी फार कमी अवधी राहीलेला आहे. त्याचबरोबर खेळाडूंचा लिलावही होणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी तरी आयपीएलमध्ये १० संघ दिसतील, असे वाटत नाही. पण २०२२ साली होणाऱ्या आयपीएलमध्ये आपल्याला दोन नवीन संघ दिसू शकतील. त्यामुळे २०२२ साली आयपीएलमध्ये १० संघ दिसू शकतील, असे आम्हाला वाटत आहे." बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, " सध्या आयपीएलचे प्रसारणाचे हक्क स्टार स्पोर्ट्सकडे आहेत. स्टारबरोबरचा बीसीसीआयचा करार हा २०२१ साली संपत आहे. त्यामुळे हा करार संपल्यावर आयपीएलमध्ये दोन नवीन संघांचा समावेश करण्यात यावा, असे बीसीसीआयमधील बऱ्याच जणांना वाटत आहे. पण याबाबतचा अंतिम निर्णय हा बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत होणार आहे. ही सभा काही दिवसांमध्ये होणार आहे. या सभेत पुढील वर्षभराचा आराखडा तयार करण्यात येईल. त्यावेळीच आयपीएलमध्ये किती संघ ठेवायचे, याचा निर्णय घेण्यात येईल." स्टारबरोबरचा आयपीएलच्या प्रसारणाचा करार २०२१ साली संपत आहे. त्यानंतर बीसीसीआय प्रसारणाच्या हक्कासाठी निविदा काढणार आहे. या निविदा काढताना आयपीएलमध्ये नेमके किती संघ असतील, याची माहितीही त्यांना द्यावी लागणार आहे. त्यामुळे जेव्हा या निविदा निघतील तेव्हा आयपीएलमधील संघांचे चित्र स्पष्ट होऊ शकेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2KfrvGs

करोनानंतर भारतात होणार पहिली आंतरराष्ट्रीय मॅच; BCCIने जाहीर केला कार्यक्रम

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने पुढील वर्षी होणाऱ्या इंग्लंडच्या भारत दौऱ्याचा कार्यक्रम आणि वेळापत्रक जाहीर केले आहे. इंग्लंडचा संघ चार कसोटी, पाच टी-२० आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. वाचा- भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. त्यानंतर टीम इंडिया मायदेशात इंग्लंड विरुद्ध टी-२०, कसोटी आणि वनडे मालिका खेळणार आहे. इंग्लंडच्या भारत दौऱ्याची सुरूवात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेने होणार आहे. पहिला कसोटी सामना ५ ते ९ फेब्रुवारी रोजी चेन्नईत, दुसरा कसोटी सामना १३ ते १७ फेब्रुवारी दरम्यान चेन्नईत, तिसरा कसोटी सामना २४ ते २८ फेब्रुवारी दरम्यान अहमदाबाद येथे होणार आहे. तिसरी कसोटी टे-नाईट असेल. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानावर ही डे-नाईट लढत होईल. भारतातील ही दुसरी डे-नाईट लढत असेल. याआधी बीसीसीआयने गेल्या वर्षी कोलकाता येथे पहिल्या डे-नाईट सामन्याचे आयोजन केले होते. चौथा आणि अखेरचा कसोटी सामना ४ ते ८ मार्च दरम्यान अहमदाबाद येथेच होईल. वाचा- कसोटी मालिकेचे वेळापत्रक पहिली कसोटी, चेन्नई- ५ ते ९ फेब्रुवारी दुसरी कसोटी, चेन्नई- १३ ते १७ फेब्रुवारी तिसरी कसोटी, अहमदाबाद- २४ ते २८ फेब्रुवारी (डे-नाईट) चौथी कसोटी, अहमदाबाद- ४ ते ८ मार्च वाचा- कसोटी मालिकेनंतर पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला सुरूवात होईल. या सर्व लढती अहमदाबाद येथेच होतील. वाचा- टी-२० मालिकेचे वेळापत्रक पहिली मॅच- १२ मार्च दुसरी मॅच- १४ मार्च तिसरी मॅच- १६ मार्च चौथी मॅच- १८ मार्च पाचवी मॅच- २० मार्च इंग्लंड दौऱ्याची अखेर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेने होणार आहे. टी-२० प्रमाणेच वनडे मालिका एकाच ठिकाणी होईल. या सर्व लढती पुण्यात होणार आहेत. वाचा- वनडे सामन्यांचे वेळापत्रक पहिली वनडे- २३ मार्च दुसरी वनडे- २६ मार्च तिसरी वनडे- २८ मार्च


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qRsZrF

Video: अंपायरच्या निर्णयावर कोणालाच नाही विश्वास, तुम्हीच सांगा आउट की नॉट आउट

नवी दिल्ली: अंपायरच्या निर्णयामुळे क्रिकेट मैदानावर अनेक वाद झाले आहेत. पण सध्या क्रिकेटमध्ये तिसऱ्या अंपायरने दिलेल्या निर्णयामुळे वाद सुरू झाला आहे. मैदानावरील अंपायरचे निर्णय चुकतात म्हणूनच तिसऱ्या पंचाची किंवा DRSची मदत घेतली जाते, मात्र येथे तिसऱ्या पंच्याच्या निर्णयावरू वाद झालाय. न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना हेलिल्टन येथे झाला. या सामन्यात न्यूझीलंडने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि १३४ धावांनी पराभव केला. या सामन्यात अशी एक घटना झाली ज्यामुळे सर्व जण हैराण झाले. वाचा- वेस्ट इंडिजचा फलंदाज जॉन कॅपबेलला अंपायरने बाद दिले आणि वाद सुरू झाला. सलामीवीर कॅपबेले मारलेल्या शॉटवर चेंडू थेट स्लिपमध्ये गेला आणि फिल्डर टॉम लॅथमने तो पकडला. पण लॅथमने कॅच निट पकडला की नाही याबद्दल शंका होती. मैदानावरील अंपायरने तिसऱ्या अंपायरची मदत मागितली. तिसऱ्या अंपायरने बराच वेळ घेतल्यानंतर कॅपबेलला बाद दिले. पण तो खरच बाद होता का यावरून वाद सुरू आहे. वाचा- कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात ही घटना घडली. दुसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर ट्रेंट बोल्टने कॅपबेलची विकेट घेतली. कॅपबेलने बोल्टचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. पण तो स्लिपमध्ये उभ्या असलेल्या लॅथमच्या जवळ गेला. त्याने पुढच्या बाजूला दोन्ही हाताने कॅच पकडण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू निट पकडला की नाही याबाबत अद्याप शंका आहे. वाचा- मैदानावरील अंपायर ख्रिस गफ्नेय आणि वेन नाइट्स यांनी कॅपबेलला बाद दिले, पण अंतिम निर्णय तिसऱ्या अंपायरकडे सोपवला. रिप्लेमध्ये लॅथमच्या हातात जाण्याआधी चेंडूचा जमीनीवर स्पर्ष झाला हे स्पष्ट होत नव्हते. अखेर टीव्ही अंपायर ख्रिस ब्राऊन यांनी मैदानावरील अंपायरचा निर्णय कायम ठेवला आणि कॅपबेलला आउट दिले. न्यूझीलंडने पहिला कसोटी सामना चौथ्या दिवशीच जिंकला. आता त्यांचा मुकाबला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. या मालिकेत न्यूझीलंडने विजय मिळवला आणि भारत विरुद्ध ऑस्टेलिया यांच्यातील मालिकेचा निर्णय न्यूझीलंडला हवा तसा लागला तर कसोटी क्रमवारीत ते पहिल्या दोन मध्ये जागा मिळवू शकतील. न्यूझीलंडने वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका २-० अशी जिंकली तर ते आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपच्या क्रमवारीत इंग्लंडला मागे टाकत तिसऱ्या स्थानावर पोहोचू शकतात.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qM5wrs

Explainer: भारत तयार करत आहे टी-२० वर्ल्डकपसाठीचा संघ; या खेळाडूंना मिळेल संधी

नवी दिल्ली: पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपच्या दृष्टीने भारतीय संघाने तयारी सुरू केली आहे. आयसीसी पुढील वर्षी ऑक्टोबरमध्ये होणार आहे. सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने टी-२० मालिकेत चांगली कामगिरी केली. भारताने मालिका २-१ अशी जिंकली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतच भारतीय संघाने वर्ल्डकपच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. पुढील वर्षी वर्ल्डकप होणार आहे. तोपर्यंत भारताचा स्टार ओपनर रोहित शर्मा पूर्ण फिट होऊ शकतो. त्यामुळे भारतीय संघ रोहित आणि शिखर धवन या जोडीने पुन्हा एकदा डावाची सुरूवात करू शकतो. केएल राहुलला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला यावे लागू शकते. पण भारतीय संघात मधळ्या फळीतील अनिश्चितता अद्याप कायम आहे. वाचा- मधळ्याफळीत संजू सॅमसन, मनीष पांडे, श्रेयस अय्यर याचे नाव सर्वात आघाडीवर आहे. सॅमसनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत संधी मिळाली होती. पण त्याचा त्याला फायदा उठवता आला नाही. त्याने शॉर्टची चांगली निवड केली होती, हाच काय तो भारतीय संघासाठी दिलासा ठरणारी गोष्टी आहे. या उटल एडम जम्पाची एक ओव्हर वगळता श्रेयस अय्यरला काहीच प्रभाव टाकता आला नाही. तर मनीष पांडेला संधीच मिळाली नाही. या संघात सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांचा समावेश केल्यास कर्णधार विराट कोहलीला अधिक पर्याय मिळू शकतात. मंगळवारी झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यानंतर कोहली मान्य केले की, भारतीय संघाने मधल्या षटकात चांगली फलंदाजी केली नाही. याच बरोबर आता असा देखील एक प्रश्न उपस्थित केला जात आहे की, पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्डकप संघात ऋषभ पंतला संघात स्थान मिळेल की नाही. वाचा- हार्दिक पंड्याने एक दमदार फिनिशरच्या रुपाने सहाव्या क्रमांकची जागा फिक्स केली आहे. पण वर्ल्डकप पर्यंत तो चार षटके गोलंदाजी करू शकेल का? हार्दिकने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत गोलंदाजी केली होती. त्याच्या गोलंदाजीच्या शैलीत बदल झाला आहे. पण जर तो गोलंदाजी करू लाकला तर भारतीय संघासाठीची मोठी ताकद ठरेल. याच बरोबर घरच्या मैदानावर रविंद्र जडेजाची तुलना कोणासोबत होऊ शकत नाही. सध्याच्या परिस्थितीत भारताकडे जडेजा हा एक अष्ठपैलू म्हणून आहे. यामुळे संघात अन्य खेळाडूला संधी मिळू शकते. त्याच्या फलंदाजीचा फॉम पाहता जडेजा पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो आणि हार्दिक पंड्या सहाव्या क्रमांकावर येऊ शकतो. टीम इंडियाकडे सातव्या क्रमांकासाठी आणखी अष्ठपैलू खेळाडूचा पर्याय आहे. जे गोलंदाजीचा सहावा पर्याय म्हणून देखील वापरता येईल आणि आक्रमक फलंदाजी देखील करू शकेल. यासाठी टीम इंडियाच्या व्यवस्थापनापुढे राहुल तेवतिया, क्रुणाल पंड्या, अक्षर पटेल, हर्षल पटेल, विजय शंकर ही नावे आहेत. यातील कोणाला संधी द्यायची हाच खरा प्रश्न असेल. वाचा- वर्ल्डकप स्पर्धेपर्यंत भारत कदाचित शार्दुल ठाकूरला फलंदाजी सुधारण्यास सांगू शकते. ठाकूरने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात आक्रमक फलंदाजी केली होती. त्याने फलंदाजीत सुधारणा केली तर संघ व्यवस्थापन त्याला सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवू शकते. युजवेंद्र चहलचे घरच्या मैदानावर खेळणे जवळपास फिक्स आहे. जडेजा देखील अंतिम ११ मध्ये असू शकतो. या सोबत जर वॉशिंग्टन सुंदरचा समावेश केला तर टी-२० मधील सर्वात आक्रमक फिरकी भारताकडे असेल. ऑस्ट्रेलियात सुंदरने ७.०८च्या रनरेटने धावा दिल्या. तो फलंदाजी देखील करू शकतो. खराब फिल्डिंग... भारतीय संघात जगातील सर्वोत्तम फिल्डर्स आहेत. पण ऑस्ट्रेलियात असे दिसले नाही. भारतीय संघातील सर्वोत्तम फिल्डर्सनी गजाळ क्षेत्ररक्षण केले. जलद गोलंदाजी जलद गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांची जागा पक्की आहे. आता टी नटराजनने देखील मिळालेल्या संधीचे सोने केले आहे. त्याने ऑस्ट्रेलियात अचूक गोलंदाजी केली. कर्णधार विराट कोहलीने देखील नटराजन टीम इंडियाच्या वर्ल्डकप योजनेचा भाग असेल असे म्हटले आहे. अशात दीपक चाहरचे काय होणार हा प्रश्नच आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3oIuDJV

अजिंक्य रहाणे होणार भारताचा कर्णधार; माजी क्रिकेटपटूचे वक्तव्य

सिडनी: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून सुरूवात होत आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली मायदेशात परतणार आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात विराट बाप होणार आहे. त्यासाठी तो भारतात परतणार आहे. विराट नसताना भारतीय संघाचे उर्वरीत तीन कसोटी सामन्यांसाठी कोण नेतृत्व करेल याचा निर्णय अद्याप झालेला नाही. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात अजिंक्य रहाणेला भारतीय संघाचे नेतृत्व दिले जाऊ शकते. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार यांच्या मते शानदार कर्णधार आहे आणि त्याचे नेतृत्वात आक्रमक शैली आहे. वाचा- पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना चॅपल म्हणाले, ऑस्ट्रेलिया विरुद्ध धर्मशाला मार्च २०१७ मध्ये झालेल्या कसोटी सामन्यात मी त्याला नेतृत्व करताना पाहिले आहे. मला त्याचे नेतृत्व शानदार वाटले. खर तर तो एक आक्रमक कर्णधार आहे. कसोटी मालिकेचे वेळापत्रक १) पहिली कसोटी- १७ ते २१ डिसेंबर, एडिलेड ओव्हल- डे/नाईट (सकाळी ९ वाजता) २) दुसरी कसोटी- २६ ते ३० डिसेंबर, मेलबर्न (पहाटे ५ वाजता) ३) तिसरी कसोटी- ७ ते ११ जानेवारी २०२१, सिडनी (पहाटे ५ वाजता) ४) चौथी कसोटी- १५ ते १९ जानेवारी, २०२१, गाबा (पहाटे साडे पाच वाजता) वाचा- तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात डेव्हिड वॉर्नर आक्रमकपणे खेळत होता. कुलदीप यादव त्याची पहिली कसोटी खेळत होता आणि त्याने वॉर्नरची विकेट घेतली. भारत तेव्हा छोट्या धावांचा पाठलाग करत होता आणि त्यांनी दोन विकेट गमावल्या होत्या. पण रहाणे मैदानावर ठामपणे आक्रमकपणे फलंदाजी करत राहिला. त्याने २७ चेंडूत ३८ धावा केल्या. मला त्याचा आक्रमकपणा आवडला असे चॅपल म्हणाले. कर्णधार म्हणून तुमच्याकडे दोन पर्याय असतात एक आक्रमक दुसरा बचावात्मक. माझ्या मते कसोटी क्रिकेटसाठी आक्रमक नेतृत्व गरजेचे आहे आणि राहणे आक्रमक आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3m1P4jh

बायो बबल व्यवस्थेचा फज्जा उडाला; दौरा रद्द करण्याचा क्रिकेट बोर्डाचा विचार

नवी दिल्ली: दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असलेल्या इंग्लंडचा संघ वनडे मालिका न खेळताच माघारी परतला आहे. दोन्ही देशातील टी-२० मालिका झाल्यानंतर वनडे मालिका होणार होती. पण करोनामुळे पहिली वनडे प्रथम स्थगित करण्यात आली आणि नंतर संपूर्ण मालिकाच रद्द केली गेली. करोना व्हायरस रोखण्याबाबत दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाला आलेल्या अपयशामुळे एका देशाने दौराच रद्द करण्याचा निर्णय घेतला. वाचा- इंग्लंडचा दक्षिण आफ्रिका दौरा कधी हॉटेलमधील कर्मचारी तर कधी खेळाडूंना करोना झाल्यामुळे चर्चेत आला. टी-२० मालिका झाल्यानंतर पहिला वनडे सामना स्थगित करण्यात आला. नव्याने निश्चित केलेल्या दिवशी देखील सामना न झाल्याने अखेर तो रद्द करावा लागला. कारण दोन्ही संघ ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, त्या हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली होती. त्यानंतर इंग्लंड संघातील दोघा खेळाडूंचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे पूर्ण मालिकाच रद्द करण्याचा निर्णय दोन्ही क्रिकेट बोर्डांनी घेतला. या संपूर्ण घटनेमुळे श्रीलंका क्रिकेट बोर्डाची झोप उडाली आहे. वाचा- करोनाचा धोका असताना अनेक देशात क्रिकेट मालिका होत असताना आता आफ्रिकेतील घटनांमुळे श्रीलंका बोर्ड दौरा रद्द करण्याचा विचार करत आहे. आफ्रिकेतील बायोबबल व्यवस्थेची लंकेच्या बोर्डाला काळजी वाटते. त्यामुळेच ते दौरा रद्द करण्याचा विचार करत आहेत. या महिन्याच्या अखेरीस श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. पण इंग्लंड विरुद्धची वनडे मालिका रद्द झाल्याने लंका बोर्ड ही मालिका रद्द करण्याचा विचार करत आहे. कदाचित श्रीलंकेचा संघ आफ्रिकेला जाण्याऐवजी आफ्रिकेच्या संघाला लंकेत येण्याचे आमंत्रण देऊ शकतील. वाचा- दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या टी-२० मालिकेआधी करोना व्हायरसने डोक वर काढले होते. पण नंतर करोना रिपोर्ट नेगेटिव्ह आल्याने टी-२० मालिका झाली.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Lpl3gT

Wednesday, December 9, 2020

IND vs AUS : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाचे ऑस्ट्रेलियाच्या महान खेळाडूकडून कौतुक, म्हणाले...

सिडनी : आतापर्यंत विराट कोहलीच आक्रमक कर्णधार आहे, असे बऱ्याच जणांना माहिती होते. पण अजिंक्य रहाणेही कर्णधार म्हणून आक्रमक असून तो चांगले नेतृत्व करेल, असा विश्वास ऑस्ट्रेलियाचे माजी महान क्रिकेटपटू इयान चॅपेल यांनी व्यक्त केला आहे. यावेळी चॅपेल यांनी अजिंक्यने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एका सामन्यात आक्रमक नेतृत्व केले होते, यावरही प्रकाशझोत टाकला आहे. याबाबत चॅपेल म्हणाले की, " भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एक सामना धरमशाला येथे झाला होता. या सामन्यात अजिंक्यने भारताचे कर्णधारपद भूषवले होते. यावेळी अजिंक्य हा कसा आक्रमक कर्णधार आहे, हे पाहायला मिळाले होते. कारण त्यावेळी वॉर्नर फॉर्मात होता. त्यावेळी अजिंक्यने फिरकीपटू कुलदीप यादवला गोलंदाजी दिली आणि त्याचा हा निर्णय योग्य ठरल्याचे पाहायला मिळाले. कारण कुलदीपने वॉर्नरला बाद केले." चॅपेल पुढे म्हणाले की, " भारताला या सामन्यात जिंकण्यासाठी कमी धावा हव्या होत्या. पण खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली नव्हती आणि भारताच्या विकेट्सही पडल्या होत्या. त्यावेळी अजिंक्यने आक्रमक फलंदाजी करायला सुरुवात केली आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. माझ्यामते कसोटी क्रिकेटमध्ये आक्रमकपणा हा फार महत्वाचा असतो. त्यामुळे रहाणेचे नेतृत्व मला आवडते. कारण त्याची नेतृत्व करण्याची शैली ही भिन्न आहे. आतापर्यंत त्याला ज्यावेळी संधी मिळाली आहे, त्यावेळी रहाणेने चांगले नेतृत्व केले आहे. पण आता रहाणेला पुन्हा एकदा संधी मिळाली तर तो संघाचे चांगले नेतृत्व करू शकतो." भारताचा कर्णधार विराट कोहली हा ऑस्ट्रेलियामध्ये एकच कसोटी सामना खेळणार आहे. त्यानंतर कोहली हा मायदेशी परतणार आहे. भारतीय संघाचा उपकर्णधार हा अजिंक्य रहाणे आहे. त्यामुळे कोहली भारतात परतल्यावर भारतीय संघाची धुरा अजिंक्य रहाणेकडे येणार आहे. त्यामुळे अजिंक्यला आपले नेतृत्वगुण दाखवून देण्याची ही चांगली संधी आहे, असे म्हटले जात आहे. कारण ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामना जिंकणे, ही सोपी गोष्ट नसते. त्यामुळे अजिंक्य यावेळी संघ कसा हाताळतो आणि भारताला विजय मिळवून देतो का, याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागून राहिलेले असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36Z15BS

farmers protest : शेतकऱ्यांच्या आंदोनलानात आयपीएलमधील खेळाडूही सहभागी, म्हणाला...

नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता आयपीएमधील किंग्स इलेव्हन पंजाबच्या खेळाडूने आता पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर या आंदोलनात हा खेळाडू सहभागीही झाला होता. त्याचबरोबर माझे वडिल असते तर ते या आंदोलनात सहभागी नक्कीच झाले असते, असे वक्तव्यही त्याने केले आहे. या खेळाडूने आपेल काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले असून त्यांना चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद येत असल्याचे पाहायला मिळत आहे. आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघातील क्रिकेटपटू आणि पंजाबच्या रणजी संघाचा कर्णधार मनदीप सिंग यावेळी शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाला होता. यावेळी मनदीप म्हणाला की, " मी या आंदोलनात सहभागी झालो आहे. कारण माझे वडिल जर जीवंत असते तर ते नक्कीच या आंदोलनात उतरले असते. आज त्यांना आपल्या मुलाचा गर्व वाटत असेल. कारण माझ्यापरीने मी या आंदोलनासाठी पूर्णपणे प्रयत्न केले आहेत." मनदीप आणि त्याचा भाऊ हरविंदर सिंग या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी मनदीप म्हणाला की, " सध्याच्या घडीला देशात जबरदस्त थंडी पडलेली आहे. पण या परिस्थितीतही हे शेतकरी बांधव रस्त्यावर राहून शांतपणे आंदोलन करत आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठीच मी या आंदोलनात उतरलो आहे." करोनाकाळातही नव्या कृषी कायद्याविरोधात हरयाणा आणि पंजाबचे शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांविरोधात 'बळाचा वापर' करण्याच्या भाजप सरकारचा निषेध करत आपले पुरस्कार परत करण्याचा निर्णय या खेळाडूंनी घेतला आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला दिवसेंदिवस क्रीडा क्षेत्रातूनही चांगलाच पाठिंबा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू माँटी पनेसारने आता शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता. त्याचबरोबर पनेसारने एक व्हिडीओ बनवला असून त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅगही केलला होता. या व्हिडीओमध्ये पनेसारने लिहिले होते की, " आता तुम्हाला तुम्हीच घेतलेला निर्णय बदलण्याची वेळ आलेली आहे. देशातील शिख बांधव तुमच्याकडे त्यासाठी आले आहेत, जोपर्यंत तुम्ही हा निर्णय बदलत नाही तोपर्यंत ते तुमच्याकडे येतच राहतील."


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mWCwLv

भारतीय शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी विराट पुढे येणार तरी कधी, रागाच्या भरात महिलेकडून कानउघडणी...

सिडनी, : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यापूर्वी एक विचित्र गोष्ट पाहायला मिळाली. या सामन्यापूर्वी जेव्हा भारताचा कर्णधार विराट कोहली जेव्हा पेव्हेलियनमध्ये जात होता. तेव्हा एक महिला चाहती रागावून कोहलीवर ओरडल्याचे पाहायला मिळाले. या गोष्टीचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल व्हायला लागला आहे. कोहली हा तिसऱ्या सामन्यापूर्वी पेव्हेलियनच्या दिशेने जात होता. तेव्हा एक महिला चाहती पेव्हेलियनच्या जवळच्या स्टँडमध्ये उपस्थित होती. कोहलीला पाहून ती चाहता रागने ओरडली आणि म्हणाली की, " भारतामध्ये शेतऱ्यांचे आंदोलन सुरु आहे आणि कोहली तु त्यांच्या बाजूने उभे राहायला हवे." कोहील हा सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी सांगत असतो, त्याचबरोबर तो काही समाजिक प्रश्नही हाताळताना दिसतो. पण आतापर्यंत कोहलीने देशात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत आपली प्रतिक्रीया दिलेली नाही. त्यामुळे आपल्या लाडक्या खेळाडूने याबाबत कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही, हे पाहून ही महिला चाहती चांगलीच रागावलेली पाहायला मिळाली. त्याचबरोबर शेतकऱ्यांबाबत काही घोषणाही या महिला चाहतीने दिल्याचे पाहायला मिळाले. सध्याच्या घडीला देशभरात शेतकऱ्यांचे आंदोन सुरु आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या अजूनही मान्य करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ८ डिसेंबरला भारत बंदची हाक देण्यात आली होती आणि त्याचा चांगला प्रतिसादही मिळाल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर काही क्रिकेटपटूंनी यावेळी भारत बंदला पाठिंबा दिला आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी विनंतीही केली. यामध्ये भारताचा क्रिकेटपटू हरभजन सिंगचाही समावेश होता. त्याचबरोबर इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू माँटी पनेसारनेही यावेळी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याची विनंतीही केली होती. करोनाकाळातही नव्या कृषी कायद्याविरोधात हरयाणा आणि पंजाबचे शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांविरोधात 'बळाचा वापर' करण्याच्या भाजप सरकारचा निषेध करत आपले पुरस्कार परत करण्याचा निर्णय या खेळाडूंनी घेतला आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला दिवसेंदिवस क्रीडा क्षेत्रातूनही चांगलाच पाठिंबा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/340sIsy

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० मालिकेने भारताच्या या दोन खेळाडूंना झाला फायदा

दुबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिका झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने टी-२० मधील क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारताच्या खेळाडूंना फायदा झालाय. वाचा- आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत भारतीय संघाचा कर्णधार आणि विकेटकीपर लोकेश राहुल यांच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत तिसऱ्या तर विराट कोहली आठव्या स्थानावर आहे. वाचा- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारताने २-१ असा विजय मिळवला. आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत दोन भारतीय खेळाडू आहेत. इंग्लंडचा डेव्हिड मलान ९१५ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा बाबर आजम ८७१ गुणांसह दुसऱ्या, तर केएल राहुल ८१६ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच आणि अष्ठपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल यांचे स्थान घसरले आहे. फिंच चौथ्या तर मॅक्सवेल सातव्या स्थानावर आहे. वाचा- वाचा- गोलंदाजांच्या क्रमवारीत एडम जम्पा पहिल्या पाच मध्ये पोहोचला आहे. ख्रिस जॉर्डनने पहिल्या १० मध्ये जागा मिळवली आहे. आदिल राशिद तिसऱ्या, पाकिस्तानचा इमाद वासीम आठव्या तर वेस्ट इंडिजचा शेल्डन कॉटरेल नवव्या स्थानावर आहे. या तिघांच्या क्रमवारीत वाढ झाली आहे. अफगाणिस्तानचा राशिद खान पहिल्या तर मुजीब उर रहमान दुसऱ्या स्थानावर आहे. वाचा-


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37U3v4e

भारतीय गोलंदाजाचा धोकादायक चेंडू, ऑस्ट्रेलियाचा फलंदाज जमीनीवर कोसळला; पाहा Video

नवी दिल्ली: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू मर्यादीत षटकांची मालिका संपली आहे. वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाने तर भारताने टी-२० मालिकेत बाजी मारली. ऑस्ट्रेलियाने वनडेत २-१ तर भारताने देखील टी-२० मध्ये २-१ असा विजय मिळवला. आता दोन्ही संघात १७ डिसेंबरपासून चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. वाचा- या कसोटी मालिकेआधी भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यात सराव सामना झाला. ही लढत ड्रॉ झाली. या सामन्यात एक अनपेक्षित घटना घडली ज्यामुळे सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. वाचा- ऑस्ट्रेलियाचा डाव सुरू असताना भारताचा जलद गोलंदाज कार्तिक त्यागीने एक बाउसर चेंडू टाकला. हा चेंडू ऑस्ट्रेलियाचा फलंदाज विल पुकोवस्कीच्या हेल्मेटला लागला आणि तो जमिनीवर कोसळला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा- ऑस्ट्रेलिया अ संघाकडून सलामीला आलेल्या विल पुकोवस्की कार्तिक त्यागीच्या चेंडूवर जखमी झाला. यामुळे भारत ए विरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्याला तो आता मुकणार आहे. हा दुसरा सरवा सामना ११ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. डेव्हिड वॉर्नर जखमी झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या मुख्य संघात पुकोवस्कीला संधी मिळेल असे बोलले जात होते. पण सराव सामन्यातील दुखापतीमुळे तो खेळेल की नाही याबद्दल शंका आहे. वाचा- कार्तिक त्यागीने टाकलेला बाउसर चेंडू टाकल्यावर विल पुकोवस्की खाली झुकला, तरी चेंडू त्याच्या हेल्मेटला लागला आणि तो खाली कोसळला. काही वेळात तो बरा झाला पण पुढे खेळू शकला नाही. विलने मैदान सोडले. त्याने पहिल्या डावात १ धाव तर दुसऱ्या डावात २३ धावा केल्या. वाचा- सराव सामन्यात भारत अ ने पहिल्या डावात ९ बाद २४७ धावा केल्या. भारताकडून अजिंक्य रहाणेने नाबाद ११७ धावा केल्या. ऑस्ट्रेलिया अ ने पहिला डाव ९ बाद ३०६ वर घोषित केला. त्यांच्याकडून ग्रीनने नाबाद १२५ धावा केल्या. दुसऱ्या डावात भारताने १८९ वर डाव घोषीत केला. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात एक बाद ५२ धावा केल्या.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2JNzkU9

IND vs AUS : तिसऱ्या सामन्यात पंचांवर आली हेल्मेट घालायची पाळ, व्हिडीओ झाला व्हायरल...

सिडनी, : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या सामन्यात मैदानावरील पंचांवर चक्क हेल्मेट घालायची पाळी आल्याचे आता पाहायला मिळत आहे. कारण पंचांनी एका गोष्टीचा चांगलाच धसका घेतला होता आणि त्यानंतर त्यांनी हेल्मेट घातले होते. या सामन्यात नेमकी अशी कोणती गोष्ट घडली, याचा एक व्हिडीओ सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वामध्ये चांगलाच व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातीटल तिसरा सामना सुरु होण्यापूर्वी पंच गेराल्ड अबुट हे मैदानात दाखल झाले होते. त्यावेळी मैदानात एका कॅमेराला ते आपटले, कारण त्यांचे लक्ष नव्हते. ते क्रीझकडे पाहत होते. पण हा कॅमेरा डोक्यावर आदळल्यावर मात्र अबुट यांनी चक्क हॅल्मेट मागवले आणि त्यानंतर त्यांनी सामन्यात हॅल्मेट घालूनच पंचगिरी केल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर पंच गेरार्ड यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. पण या पराभवानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला अजून एक मोठा धक्का बसला आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही ही आपली चुक मान्य केली आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) भारतीय संघाला शिक्षा सुनावल्याचे समोर आले आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डेव्हिड बुन हे या तिसऱ्या लढतीमध्ये सामनाधिकारी होते. बुन यांनी भारतीय संघाची ही चुक आयसीसीला दाखवली असून त्यामुळे आयसीसीने भारतीय संघाला शिक्षा केल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय संघावर संथ गोलंदाजी केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. कारण भारताने निर्धारीत वेळेत आपील २० षटके पूर्ण केली नव्हती. हा आरोप भारताचा कर्णधार विराट कोहलीला सांगण्यात आला. त्यानंतर कोहलीले आपल्यावरील हा आरोप मान्य केला आहे. त्याचबरोबर आयसीसीने जी शिक्षा दिली आहे तीदेखील कोहलीने मान्य केली आहे. त्यामुळेच या गोष्टीची औपचारीक घोषणा करण्यात आलेली नाही.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37MN4Xl

Breaking News: सुरेश रैना पुढच्या वर्षी आयपीएल खेळणार, पण कोणत्या संघाकडून...

नवी दिल्ली : भारताचा डावखुरा फलंदाज सुरेश रैना पुढच्यावर्षी आयपीएल खेळणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या वर्षी रैना चेन्नई सुपर किंग्सच्या संघाला सोडून युएईमधून भारतात दाखल झाला होता. पण आता पुढच्या आयपीएलमध्ये तो खेळणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. सुरेश रैनाने आता क्रिकेटचा जोरदार सराव करायला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर रैना हा काही दिवसांनी सुरु होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेत खेळणार आहे. त्याचबरोबर रैना हा पुढच्या वर्षी आयपीएलमध्ये खेळणार आहे, याबाबतचे वृत्त टाइम्स नाऊ या इंग्रजी संकेतस्थळाने दिले आहे. रैना कोणत्या संघाकडून आयपीएलमध्ये खेळणार? यावर्षी रैना चेन्नई सुपर किंग्सच्या संघाबरोबर युएईमध्ये दाखल झाला होता. पण चेन्नईच्या संघातील १३ सदस्यांना करोनाची लागण झाल्यावर रैनाने संघाला सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी रैना युएईमधून भारतात दाखल झाला होता. त्यावेळी चेन्नईच्या संघाचे मालक आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी रैनाबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्याचबरोबर रैनाला त्यांनी फटकारलेही होते. त्यामुळे पुढच्या वर्षी रैना चेन्नईच्या संघाडून खेळू शकेल का, हा सर्वात मोठा प्रश्न यावेळी उपस्थित झाला आहे. रैनाचे भवितव्य कसे ठरणार, पाहा...रैनाला जर चेन्नईच्या संघाने कायम ठेवले नाही तर त्याचे भवितव्य हे आयपीएलच्या लिलावात ठरणार आहे. कारण चेन्नईने जर रैनाला आपल्या संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला नाही तर तो लिलावासाठी उपलब्ध होऊ शकेल. रैना हा गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाकडून खेळलेला नाही. त्याचबरोबर रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीही जाहीर केली आहे. त्यामुळे गेले काही वर्षे तो स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेला नाही. त्यामुळे पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलच्या लिलावात रैनाला कोणता संघ आपल्या ताफ्यात सामील करून घेतो, याची उत्सुकता सर्व क्रिकेट चाहत्यांना नक्कीच असेल. कारण रैनाला आता कोणता संघ किती रुपये मोजू आपल्या संघात स्थान देतो, हे पाहणे सर्वात महत्वाचे ठरणार आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mW0Pcq

विराट कोहलीच्या या फोटोला मिळाले २०२० मध्ये सर्वाधिक Like; पाहा कोण होते सोबत

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार पुढील वर्षी म्हणजे जानेवारी २०२१ मध्ये बाप होणार आहे. ही गुड न्यूज त्याने सोशल मीडियावरून दिली होती. ट्टिटर इंडिया () ने २०२० सालात सर्वाधिक लाइक्स ( ) मिळालेल्या ट्विटची घोषणा केली आहे. यात विराट कोहलीने शेअर केलेल्या फोटो अव्वल स्थानी आहे. वाचा- करोना व्हायरसमुळे २०२० मध्ये काही खास असे घडले नाही. जगभरातील जवळपास सर्वच देशात लॉकडाउन होता. क्रीडा क्षेत्रात देखील शांतताच होती. आता काही सामने सुरु झाले आहेत. पण भारताचा कर्णधार विराट कोहलीसाठी हे वर्ष चांगले गेले असे म्हणावे लागले. या वर्षी त्याला बाप होणार असल्याची गुड न्यूज मिळाली. ऑगस्ट महिन्यात विराटने सोशल मीडियावरून ही माहिती सर्वांनी दिली होती. वाचा- आता ट्विटर इंडियाने २०२० मधील सर्वात लाइक केलेल्या ट्वीटची घोषणा केली आहे. हे ट्वीट विराट कोहलीने केलेले होते. विराटने शेअर केलेल्या या ट्वीटमध्ये एक फोटो आहे.या फोटोत विराट सोबत देखील आहे. या फोटोत अनुष्काचा बेबी बम्प दिसतोय. अनुष्काच्या मागे विराट उभा आहे. या फोटोला ६ लाखाहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. हा फोटो शेअर करताना विराटने, आता आम्ही तिघे होणार आहोत. जानेवारी २०२१ मध्ये नवा पाहूणा येतोय. वाचा- वाचा- ... वैयक्तीक आयुष्य सोबत विराटला क्रिकेटच्या मैदानावर बऱ्यापैकी यश मिळाले. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाचा भारतात पराभव केला. त्यानंतर न्यूझीलंड दौऱ्यात वनडे आणि कसोटीत पराभव झाला तरी टी-२० मध्ये ५-० असा विजय मिळवला होता. त्यानंतर आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वनडे मालिका गमावली पण टी-२० मध्ये विजय मिळवला. या वर्षी विराटला आयपीएलचे विजेतेपद मिळवता आले नसले तरी त्याच्या संघाने चांगली कामगिरी केली होती.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gtEjFj

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...