Ads

Wednesday, December 9, 2020

रोहित शर्माबाबत सचिन तेंडुलकरने केले पहिल्यांदाच वक्तव्य, ऑस्ट्रेलियाला कधी जाऊ शकतो सांगितले...

मुंबई, : भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने पहिल्यांदाच रोहित शर्माबाबत आपले वक्तव्य केले आहे. त्याचबरोबर रोहित हा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर नेमका कधी जाऊ शकतो, याबाबतही सचिनने भाष्य केले आहे. सचिन म्हणाला की, " जेव्हा एखाद्या महत्वाच्या खेळाडूला दुखापत होते, तेव्हा त्याला न खेळवणेच योग्य ठरते. वेस्ट इंडिजच्या दौऱ्यात अनिल कुंबळे हा संघासाठी सर्वात महत्वाचा गोलंदाज होता. पण तो दुखापतग्रस्त असल्यामुळे त्याला आम्ही खेळवले नव्हते. पण जर एखादा खेळाडू पूर्णपणे फिट असेल आणि त्याच्याकडे चांगला अनुभव असेल तर नक्कीच त्याला संधी द्यायला हवी." सचिन पुढे म्हणाला की, " रोहितला दुखापत झाली होती. पण रोहित जर १०० टक्के फिट असेल तर नक्कीच त्याला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर पाठवायला हवे. रोहित सध्याच्या घडीला पूर्णपणे फिट आहे की नाही, हे रोहित किंवा बीसीसीआय सांगू शकतात. कारण ते एकमेकांच्या संपर्कात आहेत. रोहितची फिटनेस चाचणी झाली आणि त्यामध्ये जर तो पूर्णपणे फिट असेल तर त्याला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर पाठवण्यात यायला हवे. पण हा निर्णय भारतीय संघ व्यवस्थापन आणि फिजिओ यांचा असेल." रोहितला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर का पाठवायला हवे, पाहा...ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर रोहितला का पाठवायला हवे, याबाबतही सचिनने आपले मत व्यक्त केले आहे. सचिन म्हणाला की, " भारताचा कर्णधार विराट कोहली हा फक्त पहिला कसोटी सामना खेळणार आहे. त्यानंतर कोहली हा भारतामध्ये येणार आहे. त्यावेळी कोहलीची जागा भारतीय संघाला भरुन काढणाऱ्या अनुभवी खेळाडूची नक्कीच गरज असेल. त्यामुळे रोहित जर फिट असेल आणि त्याने सर्व निकष जर पूर्ण केलेले असतील तर रोहितला नक्कीच ऑस्ट्रेलियाला पाठवायला हवे. रोहित जर दुसऱ्या कसोटी सामन्यापासून भारतीय संघात सहभागी झाला तर ती चांगली गोष्ट असेल. पण रोहितची फिटनेस टेस्ट कधी होते, त्यामध्ये तो पास होतो का आणि पास झाल्यावर संघ व्यवस्थापन नेमका काय निर्णय घेते, यावर सर्व गोष्टी अवलंबून असतील असे मला तरी वाटते."


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3a7OTRx

भारतीय क्रिकेटमधील सुवर्णक्षण; हार्दिक पंड्याने मन जिंकले

नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० मालिकेत भारताचा १२ धावांनी पराभव झाला असला तरी मालिका २-१ जिंकून भारताने वनडे मालिकेतील पराभवाचा बदला घेतला. टी-२० मालिकेत भारताच्या हार्दिक पंड्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार मिळाल्यानंतर हार्दिकने जे काही केले त्यामुळे सर्वांची मने जिंकली. वाचा- वनडे पाठोपाठ हार्दिक पंड्याने टी-२० मालिकेत शानदार फलंदाजी केली. यामुळेच त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. पण हार्दिकच्या मते सामनावीर पुरस्काराचा खरा जलद गोलंदाज याला दिला पाहिजे. हार्दिकने त्याला मिळालेली सामनावीर पुरस्काराची ट्रॉफी नटराजनला दिली. इतक नव्हे तर त्याने सोशल मीडियावर पोस्ट करून नटराजनचे कौतुक केले. वाचा- नटराजन, तु या मालिकेत शानदार कामगिरी केली. कठीण परिस्थितीत पदार्पण करत शानदार कामगिरी करून स्वत:ला सिद्ध करून दाखवलेस. तुझ्या या यशा मागे मोठी मेहनत आहे. माझ्याकडून ही ट्रॉफी तुला, अभिनंदन! हार्दिकच्या या ट्विटवर सोशल मीडियावर सर्वांची मने जिंकली. सर्व जण हार्दिकचे कौतुक करत आहेत. वाचा- ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताकडून प्रथम वनडेत आणि नंतर टी-२० मध्ये पदार्पण करणाऱ्या टी नटराजनने ६ विकेट घेतल्या. मालिकेत सर्वाधिक विकेट त्यानेच घेतल्या. हार्दिकने ३ सामन्यात १५६च्या स्ट्राइक रेटने ७८ धावा केल्या. दुसऱ्या टी-२० सामन्यात त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्यामुळे त्याला सामनावीर पुरस्कार दिला गेला. वाचा- तिसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत ५ बाद १८६ धावा केल्या. भारताला विजयाचे लक्ष्य गाठण्यासाठी १२ धावा कमी पडल्या.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37RkuE0

भारताचे माजी क्रिकेटपटू सलीम दुरानी यांचे निधन की अफवा, पाहा फॅक्ट चेक...

नवी दिल्ली : प्रेक्षक जिथे सांगतील तिथे षटकार ठोकणारे भारताचे माजी लोकप्रिय फलंदाज यांचे आज निधन झाल्याचे वृत्त एका पत्रकाराने दिले होते. पण दुरानी यांचे खरंच निधन झाले आहे की ही अफवा आहे, पाहा फॅक्ट चेक... दुरानी यांचा जन्म अफगाणिस्तानमध्ये झाला होता. भारताच्या अनेक विजयांमध्ये दुरानी यांचा मोलाचा वाटा होता. भारताने जेव्हा १९६०-६१ साली इंग्लंडला भारतामध्ये पराभूत केले होते, त्यामध्ये दुरानी यांचा सिंहाचा वाटा होता. इंग्लंडविरुद्धच्या कोलकाता येथील सामन्यात दुरानी यांनी आठ विकेट्स मिळवले होते, तर चेन्नई येथील सामन्यात त्यांनी १० बळी मिळवण्याची किमया साधली होती. त्याचबरोबर वेस्ट इंडिजमध्ये भारताने जेव्हा पोर्ट ऑफ स्पेन येथे पहिला विजय मिळवला होता तेव्हा दुरानी यांनी क्लाइव्ह लॉइड आणि सर गॅरी सोबर्स यांच्या महत्वाच्या विकेट्स भारताला मिळवून दिल्या होत्या. दुरानी यांचे निधन झाल्याचे वृत्त अमृत माथूर यांनी दिले होते. पण त्यांना आपली चुक समजली आणि त्यांनी जाहीररीत्या ट्विटरवर माफी मागितली आहे. या ट्विटमध्ये माथून यांनी म्हटले आहे की, " मी माहितीमध्ये बदल करत आहे, कारण सलीम दुरानी यांची प्रकृती अजूनही चांगली आहे. मी त्यांच्याचबाबत जी माहिती दिली होती त्याबद्दल मी जाहीर माफी मात आहे. सलीम दुरानी यांना दिर्घायुष्य लाभो आणि आयुष्यातही ते आपले शतक पूर्ण करोत." दुरानी यांच्या निधनाच्या बातमीनंतर एकच खळबळ उडाली होती. कारण सलीम हे चाहत्यांचे सर्वात आवडते फलंदाज होते. कारण .प्रेक्षक मैदानात जिथे षटकार मारायला सांगतील तिथे ते सिक्सर मारायचे, यासाठी चाहत्यांचे ते लाडके होते. त्यामुळेच त्यांच्या निधनाच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली होती. पण सलीम यांची तब्येत अजून चांगली असल्याचे कळताच त्यांना सुखद धक्का बसला आणि त्यांनी दुरानी यांना दिर्घायुष्य मिळो, अशी भावना व्यक्त केली आहे. दुरानी यांचा जन्म ११ डिसेंबर १९३४ या दिवशी अफगाणिस्तान येथील काबुल येथे झाला होता. समील हे सध्या ८५ वर्षांचे आहेत. कानपूर येथे १९७३ साली जेव्हा सलीम यांना कसोटी सामन्यातून वगळण्यात आले होते, तेव्हा चाहत्यांनी ' नो दुरानी, नो टेस्ट' असे फलकही झळकावले होते. दुरानी यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याचबरोबर सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कारही दुरानी यांना मिळालेला आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3n2fmDk

AUS vs IND वनडे, टी-२० मालिका झाली; आता खरी 'कसोटी', जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

नवी दिल्ली: भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्रत्येकी तीन सामन्यांच्या वनडे आणि टी-२० मालिका झाली. आता दोन्ही देशात चार सामन्यांची होणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या दोन मालिकेत अनुक्रमे यजमान ऑस्ट्रेलिया आणि पाहूण्या भारतीय संघाने विजय मिळवला. आता दौऱ्याचा निकाल कसोटी मालिका ठरवणार आहे. वाचा- भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिका सर्वात खास आहे. कारण ही मालिका आयसीसीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतर्गत खेळवली जाणार आहे. कसोटी मालिकेची सुरूवात १७ डिसेंबरपासून होणार आहे. कसोटी मालिकेतील पहिली लढत डे-नाइट असून १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर या काळात एडिलेड येथे ही लढत होईल. या दोन्ही संघांना याआधी पिंक बॉलने डे-नाइट कसोटी सामने खेळले आहेत. पण एकमेकांविरुद्धची पहिलीच लढत असेल. त्याच बरोबर भारतीय संघ प्रथमच परदेशात डे-नाइट कसोटी खेळत आहे. या सामन्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली मायदेशात परतणार आहे. वाचा- मालिकेतील दुसरा सामना बॉक्सिंग डे कसोटी मॅच असेल, जी २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर या काळात होईल. हा लढत मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे. या सामन्यापासून भारताचा कर्णधार विराट कोहली खेळणार नाही. तिसरी कसोटी नव्या वर्षात म्हणजे ७ जानेवारी ते ११ जानेवारी या काळात सिडनी क्रिकेट मैदानावर होईल. तर मालिकेतील अखेरची कसोटी १५ जानेवारी ते १९ जानेवारी या काळात ब्रिसबेनच्या गाबा मैदानावर खेळवली जाईल. वाचा- अशा आहेत वेळा पहिला कसोटी सामना डे-नाइट असल्यामुळे त्याची वेळ वेगळी आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्याची वेळ सारखीच आहे. तर चौथ्या कसोटीची वेळ पुन्हा वेगळी आहे. डे-नाइट कसोटी सकाळी ९ वाजता सुरू होईल. दुसरा आणि तिसरा कसोटी सामना भारतीय वेळेनुसार पहाटे ५ वाजता. तर अखेरचा कसोटी सामना पहाटे साडेपाच वाजता सुरू होईल. सराव लढती ६ ते ८ डिसेंबर- सराव सामना, ड्रमोनी ओव्हल, सिडनी ११-१३ डिसेंबर- सराव सामना (डे-नाइड), सिडनी कसोटी मालिका १) पहिली कसोटी- १७ ते २१ डिसेंबर, एडिलेड ओव्हल- डे/नाईट (सकाळी ९ वाजता) २) दुसरी कसोटी- २६ ते ३० डिसेंबर, मेलबर्न (पहाटे ५ वाजता) ३) तिसरी कसोटी- ७ ते ११ जानेवारी २०२१, सिडनी (पहाटे ५ वाजता) ४) चौथी कसोटी- १५ ते १९ जानेवारी, २०२१, गाबा (पहाटे साडे पाच वाजता) भारताच्या या दौऱ्यातील सर्व सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण सोनी सिक्स आणि डीडी स्पोट्स वर होणार आहे. या शिवाय Sony LIVवर लाइव्ह स्ट्रीमिंग होईल. कसोटी मालिका फक्त सोनी सिक्स आणि Sony LIV वर दिसेल. या शिवाय भारतीय संघ दोन सराव सामने खेळणार आहे. या सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अॅपवर केले जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या लढतीचे LIVE UPDATE आणि स्कोअरकार्ड महाराष्ट्र टाइम्सच्या वेबसाइटवर तुम्ही पाहू शकता.
  1. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात किती कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. चार सामन्यांची कसोटी मालिका
  2. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना कुठे आणि केव्हा होणार आहे पहिला कसोटी सामना १७ ते २१ डिसेंबर दरम्यान एडिलेड येथे होणार आहे
  3. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे/ दुसरा कसोटी सामना कधी होणार?बॉक्सिंग डे कसोटी २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर या काळात मेलबर्न क्रिकेट मैदानावर होईल
  4. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना केव्हा आणि कुठे होईलतिसरी कसोटी नव्या वर्षात म्हणजे ७ जानेवारी ते ११ जानेवारी या काळात सिडनी क्रिकेट मैदानावर होईल
  5. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याचे वेळापत्रकमालिकेतील चौथी आणि अखेरची कसोटी १५ जानेवारी ते १९ जानेवारी या काळात ब्रिसबेनच्या गाबा मैदानावर होईल


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3lYVyzD

सेहवागने सुनावले, हा खेळाडू IPL मध्ये फक्त मजा करायला येतो!

नवी दिल्ली: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिका नुकतीस संपली. या मालिकेत भारताने २-१ असा विजय मिळवला. दोन्ही संघातील काही खेळाडूंनी धडाकेबाज फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेड आणि यांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात स्फोटक फलंदाजी केली. वाचा- मॅक्सवेलच्या फलंदाजीमुळे दुसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने १९४ पर्यंत मजल मारली. तर तिसऱ्या लढतीत देखील त्याने केलेल्या धावांमुळे ऑस्ट्रेलियाला विजय मिळवता आला. त्याच्या या फॉर्मवरून ( ) ने सुनावले आहे. मॅक्सवेल जो २०२० मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून एक षटकार देखील मारू शकला नाही. तो भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांपैकी एक ठरला. मॅक्सवेलने वनडे मालिकेत देखील अशीच स्फोटक फलंदाजी केली होती. वाचा- आयपीएलमध्ये खराब कामगिरी केली म्हणून सेहवागने त्याच्यावर याआधी देखील टीका केली होती. मॅक्सवेल क्रिकेट पेक्षा गोल्फ बाबत अधिक गंभीर आहे, असे सेहवागने म्हटले होते. आता पुन्हा एकदा सेहवागने त्यावर टीका केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना त्याची फलंदाजी बदलते. आयपीएलमध्ये तो अजीबात दबाव घेत नाही. फक्त मजा घेतो. तो सर्व काही करेल. खेळाडूंना प्रोत्साहन देईल, मजा-मस्ती करेल, डान्स करेल पण धावा करणार नाही. वाचा- मला असे कधीच वाटले नाही की तो गंभीर आहे. तो क्रिकेटपेक्षा गोल्फ खेळण्यात अधिक गंभीर असतो. जर तुम्ही गंभीर असाल तर तुमची कामगिरी चांगली होते, असे सेहवाग म्हणाला. ऑस्ट्रेलियाकडून जेव्हा तो खेळतो तेव्हा त्याची भूमिका बदलते. कारण आयपीएल खेळत असताना त्याला माहिती असेत की काही सामने खराब खेळल्यानंतर फार तर फार त्याला बाहेर केले जाईल. खराब कामगिरी नंतर देखील एक मोठी रक्कम मिळण्याची हमी असते. पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना त्याला कल्पना असते की दोन ते तीन सामन्यात खराब कामगिरी केली की संघा बाहेर ठेवतील आणि पुन्हा संघात स्थान मिळवणे कठीण असेल. आयपीएलमध्ये तसा धोका नाही. जर तुम्ही अंतिम अकरामध्ये खेळला नाही तरी १.५ मिलियन डॉलर मिळतात. तुम्ही जेव्हा प्रत्यक्षात सामना खेळत नाही तेव्हा २० ते ३० टक्के पैसे कापले जातात. १.५ मिलियन नसेल तरी किमान एक मिलियन तरी मिळतात. फक्त बसून फुटकचे पैसे मिळत असतात, अशा शब्दात सेहवागने मॅक्सवेलवर हल्ला चढवला. मॅक्सवेलने आयपीएल २०२० मध्ये १३ सामन्यात फक्त १०८ धावा केल्या. यात एका षटकाराचा देखील समावेश नव्हता. भारताविरुद्धच्या मालिकेत मॅक्सवेलची कामगिरी... पहिली वनडे- ४५ धावा, दुसरी वनडे- नाबाद ६३ आणि एक विकेट तिसरी वनडे- ५९ धावा --- पहिली टी-२०: २ धावा दुसरी टी-२०: २२ धावा तिसरी टी-२०: ५४ धावा आणि एक विकेट


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3n1WIvl

IND vs AUS: कसोटी मालिकेआधी यजमान ऑस्ट्रेलियाला धक्का; भारताचे पारडे झाले जड

सिडनी: भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा झटका बसला आहे. यजमान ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात १७ डिसेंबरपासून चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. याआधी झालेल्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाने तर टी-२० मालिकेत भारताने विजय मिळवला होता. आता दौऱ्यातील अखेरच्या मालिकेत कोण विजय मिळवते याची सर्वांना उत्सुकता आहे. वाचा- कसोटी मालिकेची सुरूवात डे-नाइट टेस्टने होणार आहे. पहिली कसोटी एडिलेट येथे होईल. पण या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर ( ) पहिल्या कसोटीला मुकणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बुधवारी ही माहिती दिली. वॉर्नर बॉक्सिंग डे कसोटीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. वाचा- वॉर्नरला भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात दुखापत झाली होती. तेव्हा त्याने ८३ धावा केल्या होत्या. पण फिल्डिंग करताना त्याला दुखापत झाली आणि मैदानाबाहेर जावे लागले. दुखापतीबद्दल बोलताना वॉर्नर म्हणाला, मला वाटते की अतिशय कमी वेळेत मी रिकव्हर झालो आहे. त्यामुळे सिडनीत होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मी खेळू शकेन असे वाटते. दुखापतीतून मी बाहेर आलोय. आता संघाकडून खेळण्यासाठी १०० टक्के फिट होण्याची गरज आहे. वाचा- ऑस्ट्रेलिया संघात वॉर्नरच्या जागी पहिल्या कसोटी सामन्यात कोणाला संधी मिळेल हे अद्याप स्पष्ट झाले नाही. कॅमरन ग्रीन याचे नाव चर्चेत आहे. भारत अ विरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने नाबाद शतक केले होते. या शिवाय विल पुकोनस्की आणि अनुभवी बर्न्स जो याला यांना देखील संधी मिळण्याची शक्यता आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3lUQ2xL

Tuesday, December 8, 2020

भारताच्या क्रिकेटपटूने सोशल मीडियावरून केली निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली: भारताचा क्रिकेटपटू () ने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पार्थिवने जेव्हा भारतीय संघाकडून कसोटीत पदार्पण केले होते तेव्हा तो सर्वात कमी वयाचा विकेटकिपर होता. त्याने १७ वर्ष आणि १५३व्या दिवशी पदार्पण केले होते. वाचा- देशांतर्गत क्रिकेटमध्ये पार्थिव गुजरातकडून खेळायचा. भारतीय संघात संधी मिळण्याचे पार्थिवने अनेकदा प्रयत्न केले. पण त्याला यश आले नाही. त्यानंतर तो आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेट खेळू लागला. २०१५च्या आयपीएलमध्ये त्याने ३३९ धावा केल्या होत्या. तेव्हा मुंबई संघाकडून त्याने सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याच वर्षी मुंबई संघाने आयपीएलचे विजेतेपद देखील मिळवले होते. वाचा- विजय हजारे ट्रॉफीत त्याने शतक झळकावले होते आणि गुजरातला विजेतेपद मिळून दिले होते. पार्थिवने फेब्रुवारी २०१६ मध्ये अखेरची आंतरराष्ट्रीय मॅच खेळली होती. तेव्हा वृद्धीमान सहाला दुखापत झाली होती म्हणून पार्थिवला संघात स्थान मिळाले होते. नुकत्याच झालेल्या आयपीएलच्या १३व्या हंगामात तो रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघात होता. पण त्याला अंतिम ११ मध्ये संधी मिळाली नाही. पार्थिवने भारतीय संघाकडून २५ कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने ३१.१३च्या सरासरीने ९३४ धावा केल्या. यात ६ अर्धशतकाचा समावेश आहे. ७१ ही त्याची सर्वोत्तम खेळी असून त्याने ६२ कॅच आणि १० स्टपिंग केले. ३८ वनडेत त्याने २३.७४च्या सरासरीने ७३६ धावा केल्या. ९५ ही त्याची वनडेतील सर्वेत्तम खेळी आहे. पार्थिवने वनडेत ३० कॅच तर ९ स्टपिंग केले आहेत. प्रथम श्रेणीत त्याने १८७ सामन्यात ४३.३६च्या सरासरीने १० हजार ७९७ धावा केल्या. २०६ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. प्रथम श्रेणीत त्याने २६ शतक आणि ५९ अर्धशतक केली आहेत. तर ४६६ कॅच आणि ७६ स्टपिंग केलेत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qEimIo

पदार्पणातच ऑस्ट्रेलियाची झोप उडवली; मलिंगा, बुमराहच्या विक्रमाशी बरोबरी

सिडनी: भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली. तिसऱ्या सामन्यात भारताचा १२ धावांनी पराभव झाला असला तरी वनडे मालिका गमावल्यानंतर भारताने टी-२० मालिकेत शानदार कामगिरी केली आणि मालिका जिंकली. भारतीय संघाकडून या संपूर्ण मालिकेत जलद गोलंदाज () ने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये धमाकेदार पदार्पण केले. वाचा- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारताने अनुभवी जसप्रीत बुमराहला संधी दिली नाही. कसोटी मालिकेसाठी त्याला विश्रांती दिली गेली होती. त्याच्या अनुउपस्थितीत टी नटराजनने मिळालेल्या संधीचे सोने केले. त्याने तीन सामन्यात एक खास विक्रम स्वत:च्या नावावर केला. नटराजनने ३ सामन्यात ६ विकेट घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० सामन्यात एका मालिकेत सर्वाधिक विकेट घेण्याच्या आणि जसप्रित बुमराह या दिग्गज गोलंदाजांशी बरोबरी केली. वाचा- बुमराहने २०१६ साली ऑस्ट्रेलियात त्यांच्याच विरुद्ध टी-२० मालिकेत सहा विकेट घेतल्या होत्या. तर अशीच कामगिरी लसित मलिंगाने २०१७ साली अशी कामगिरी केली. आता पदार्पणाच्या मालिकेत नटराजनने ही कामगिरी केली. नटराजन आणि बुमराहचे आंतरराष्ट्रीय करिअर सारख्याच पद्धतीने सुरू झाले. बुमराहला एका जखमी खेळाडूमुळे पदार्पणाची संधी मिळाली होती. नटराजन देखील दुखापतग्रस्त खेळाडूमुळे संघात आला. या दोघांनी पदार्पणाच्या सामन्यात दोन विकेट घेतल्या. आणि त्यानंतर दुसऱ्या टी-२० सामन्यात ३ तर तिसऱ्या टी-२० सामन्यात १ विकेट घेतील. इतक नव्हे तर बुमराहने देखील पहिल्या वनडेत दोन विकेट घेतल्या होत्या. या दोन्ही खेळाडूंबद्दलचा हा अजब योगायोग आहे. वाचा- टी नटराजनच्या शानदार कामगिरीमुळेच भारताचा माजी स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमध्ये मोहम्मद शमीच्या आधी नटराजनला संधी मिळाली पाहिजे असे म्हटले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज टी नटराजन- ६ विकेट (२०२०) लसित मलिंगा- ६ विकेट (२०१७) जसप्रीत बुमराह- ६ विकेट (२०१६) बुमराह आणि नटराजन यांचा योगायोग पहिली वनडे: २ विकेट पहिली टी-२०: ३ विकेट दुसरी टी-२०: २ विकेट तिसरी टी-२०: १ विकेट


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2IpFA3E

IND vs AUS : आपल्या ड्युप्लिकेटला पाहून विराट कोहलीने नेमके काय केले, व्हिडीओ झाला व्हायरल

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात एक मजेशीर घटना पाहायला मिळाली. कारण या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीचा एक ड्युपलिकेट पाहायला मिळाला. या आपल्या ड्युप्लिकेटला पाहून विराट कोहलीने नेमके काय केले, हे एका व्हिडीओमध्ये टिपण्यात आले आहे. हा व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलिया फलंदाजी करत असताना युजवेंद्र चहल सातव्या षटकात गोलंदाजी करत होता. या सातव्या षटकातील दुसऱ्या चेंडूनंतर प्रेक्षकांमध्ये कॅमेरा फिरवण्यात आल्या. तेव्हा मैदानातील एक प्रेक्षक विराट कोहलीसारखाच दिसत होता. या प्रेक्षकाने भारतीय संघाची जर्सी घातली होती, त्याचबरोबर कोहलीसारखा गॉगलही लावला होता. त्यानंतर जेव्हा कोहलीवर कॅमेरा मारण्यात आला, तेव्हा नेमके काय घडले, पाहा... कोहलीसारख्याच दिसणाऱ्या व्यक्तीला पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत होते. त्यानंतर कोहलीवर जेव्हा कॅमेरा मारण्यात आला तेव्हा कोहलीदेखी चकित झालेला पाहायला मिळाला. कोहलीने काही काळ कॅमेराकडे पाहून आपली बोलकी प्रतिक्रीया दिली आणि तो मैदानातील सामना पाहू लागला. पण यावेळी चाहत्यांमध्ये एक धमाल उडाल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीकडून एक मोठी चुक झाली आणि याचाच फटका संघाला बसल्याचे पाहायला मिळाले. ही गोष्ट ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजी करत असताना ११व्या षटकात घडली. हे षटक युवा वेगवान गोलंदाज टी. नटराजन टाकत होता. या ११व्या षटकातील चौथ्या चेंडूवर नटराजनने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मॅथ्यू वेडला पायचीत पकडले होते. त्यानंतर नटराजनने जोरदार अपील केली, पण मैदानावरील पंचांनी त्याला नाबाद ठरवले. त्यानंतर यष्टीरक्षक लोकेश राहुल हा डीआरएस घेण्यासाठी उत्सुक नव्हता. त्यामुळे सीमारेषेवर उभ्या असलेल्या कोहलीनेही यावेळी डीआरएसची मागणी केली नाही. डीआरएसच्या मागणीसाठी १५ सेकंदांचा कालावधी असतो. तो कालावधी निघून गेला आणि त्यानंतर कोहलीला आपली चूक समजली. थोड्याच वेळाने मैदानातील मोठ्या स्क्रीनवर या गोष्टीचा रिप्ले दाखवण्यात आला. त्यावेळी मॅथ्यू वेड आऊट असल्याचे दिसत होते. पण कोहलीने डीआरएसची मागणी केली नव्हती. पण जर कोहलीने डीआरएसची मागणी केली असती, तर मॅथ्यूची विकेट भारताला लवकर मिळू शकली असती. त्यानंतर मॅथ्यूने धडाकेबाज फटकेबाजी करत ८० धावांची खेळी साकारली. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाला या सामन्यात १८६ धावा बनवता आल्या.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2K0hnBu

IND vs AUS : विराट कोहलीच्या एका चुकीचा भारताला बसला मोठा फटका आणि भारताने सामना गमावला

सिडनी : भारताला आजच्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात पराभव पत्करावा लागला. पण या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीकडून एक मोठी चुक झाली आणि याचाच फटका संघाला बसल्याचे पाहायला मिळाले. भारताच्या पराभवाचे हेदेखील एक मोठे कारण ठरले. ही गोष्ट ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजी करत असताना ११व्या षटकात घडली. हे षटक युवा वेगवान गोलंदाज टी. नटराजन टाकत होता. या ११व्या षटकातील चौथ्या चेंडूवर नटराजनने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मॅथ्यू वेडला पायचीत पकडले होते. त्यानंतर नटराजनने जोरदार अपील केली, पण मैदानावरील पंचांनी त्याला नाबाद ठरवले. त्यानंतर यष्टीरक्षक लोकेश राहुल हा डीआरएस घेण्यासाठी उत्सुक नव्हता. त्यामुळे सीमारेषेवर उभ्या असलेल्या कोहलीनेही यावेळी डीआरएसची मागणी केली नाही. डीआरएसच्या मागणीसाठी १५ सेकंदांचा कालावधी असतो. तो कालावधी निघून गेला आणि त्यानंतर कोहलीला आपली चूक समजली. थोड्याच वेळाने मैदानातील मोठ्या स्क्रीनवर या गोष्टीचा रिप्ले दाखवण्यात आला. त्यावेळी मॅथ्यू वेड आऊट असल्याचे दिसत होते. पण कोहलीने डीआरएसची मागणी केली नव्हती. पण जर कोहलीने डीआरएसची मागणी केली असती, तर मॅथ्यूची विकेट भारताला लवकर मिळू शकली असती. त्यानंतर मॅथ्यूने धडाकेबाज फटकेबाजी करत ८० धावांची खेळी साकारली. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाला या सामन्यात १८६ धावा बनवता आल्या. मॅथ्यूची विकेट ही भारतासाठी सर्वात महत्वाची होती. कारण मॅथ्यू चांगलाच स्थिरस्थावर झाला होता आणि तो मोठे फटकेबाजी करत होता. पण त्याला बाद करण्याची संधी यावेळी कोहलीने गमावली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात भारताचा १२ धावांनी पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने अखेरच्या लढतीत विजय मिळवला असला तरी भारताने मालिका २-१ने जिंकली आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी १८७ धावांचे आव्हन दिले होते. भारताकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक ८५ धावा केल्या. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तीन पैकी पहिली वनडे मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ अशी जिंकली आणि आज टी-२० मालिका भारताने २-१ अशी जिंकली आता दौऱ्याचा निकाल कसोटी मालिकेने होईल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3oBU2VA

IND vs AUS : युजवेंद्र चहलकडून झाली मोठी चूक, पंचांनी मॅक्सवेलला पुन्हा फलंदाजीसाठी बोलावले

सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलकडून एक मोठी चुक झाली. या चुकीचा मोठा फटका भारतीय संघाला बसला. कारण या चुकीनंतर पंचांनी ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेलला पुन्हा फलंदाजी करण्यासाठी बोलावले. मॅक्सवेलने या चुकीचा चांगलाच फायदा उचलला आणि धडाकेबाज अर्धशतकही साकारले. ही गोष्ट १३व्या षटकात घडली, चहल त्यावेळी गोलंदाजी करत होता. १३व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर मॅक्सवेलने मोठा फटका मारला. पण यावेळी मॅक्सवेलचा झेल पकडण्यात आला आणि तो बाद झाला होता. यावेळी मॅक्सवेल १९ धावांवर होता. पण त्यानंतर पंचांनी मॅक्सवेलला थांबवले. चहलने टाकलेला चेंडू चहा नो बॉल होता. त्यामुळे पंचांनी मॅक्सवेलला नाबाद घोषित केले आणि त्यानंतर मॅक्सवेलने धमाकेदार फटकेबाजी केली. मॅक्सवेलने या जीवदानाचा चांगलाच फायदा उचलला. कारण जेव्हा मॅक्सवेलला १९ धावांवर असताना जीवदान मिळाले होते. पण त्यानंतर मॅक्सवेलने ३१ चेंडूंत आपले अर्धशतक साजरे केले. मॅक्सवेलने या सामन्यात ५४ धावांची दमदार खेळी साकारली. पण त्यानंतर भारताचा युवा वेगवान गोलंदाज टी. नटराजनने मॅक्सवेलला क्लीन बोल्ड केले आणि त्याला माघारी धाडले. बाद होण्यापूर्वी मॅक्सवेलने तीन चौकार आणि तीन षटकार लगावले होते. त्याच़बरोबर मॅक्सवेलने यावेळी ९० धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली होती. भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० लढतीत यजमान ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत ५ बाद १७६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेडने धमाकेदार ८० धावा केल्या. त्याला ग्लेन मॅक्सवेलने चांगली साथ दिली. स्मिथच्या जागी आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने वेडसह आक्रमक फलंदाजी केली. या दोघांनी अर्धशतकी भागिदारी केली. दरम्यान वेडने सलग दुसरे अर्धशतक झळकावले. त्याने ३५ चेंडूत ५० धावा केल्या. युजवेंद्र चहलच्या चेंडूवर मॅक्सवेलचा कॅच केएल राहुलने घेतला होता. पण नो बॉल असल्याने त्याला जीवनदान मिळाले. मॅक्सवेलने या जीवनदानाचा फायदा घेतला. त्याने अर्धशतक झळकावले. १९व्या षटकात शार्दुल ठाकूरने वेडची विकेट घेतली. त्याने ५३ चेंडूत ८० धावा केल्या. अखेरच्या षटकात नटराजनने मॅक्सवेलची बोल्ड घेतली. त्याने ३६ चेंडूत ५४ धावा केल्या.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ouQzs7

IND vs AUS 3rd T20I: भारताचे गचाळ क्षेत्ररक्षण; वेड, मॅक्सवेलकडून धुलाई, ऑस्ट्रेलियाच्या १८६ धावा

सिडनी: भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० लढतीत यजमान ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत ५ बाद १७६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेडने धमाकेदार ८० धावा केल्या. त्याला ग्लेन मॅक्सवेलने चांगली साथ दिली. वाचा- तिसऱ्या टी-२० लढतीत भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि कर्णधार एरॉन फिंच यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरूवात केली. पण दुसऱ्याच षटकात वॉशिंग्टन सुंदरने त्यांना पहिला धक्का दिला. त्याने फिंचला शून्यावर बाद केले. त्यानंतर आलेल्या स्टीव्ह स्मिथने वेड सोबत अर्धशतकी भागिदारी केली. ही जोडी भारताची डोकेदुखी ठरेल असे वाटत असताना पुन्हा सुंदरने भारताला ब्रेक मिळवून दिला. त्याने स्मिथची बोल्ड घेतली. तो २३ चेंडूत २४ धावा करून बाद झाला. वाचा- स्मिथच्या जागी आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने वेडसह आक्रमक फलंदाजी केली. या दोघांनी अर्धशतकी भागिदारी केली. दरम्यान वेडने सलग दुसरे अर्धशतक झळकावले. त्याने ३५ चेंडूत ५० धावा केल्या. युजवेंद्र चहलच्या चेंडूवर मॅक्सवेलचा कॅच केएल राहुलने घेतला होता. पण नो बॉल असल्याने त्याला जीवनदान मिळाले. मॅक्सवेलने या जीवनदानाचा फायदा घेतला. त्याने अर्धशतक झळकावले. १९व्या षटकात शार्दुल ठाकूरने वेडची विकेट घेतली. त्याने ५३ चेंडूत ८० धावा केल्या. अखेरच्या षटकात नटराजनने मॅक्सवेलची बोल्ड घेतली. त्याने ३६ चेंडूत ५४ धावा केल्या. वाचा- भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक २ विकेट घेतल्या. तर टी नटराजन आणि शार्दुलने प्रत्येकी एक विकेट घेतली. भारतीय संघाने ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाचा पराभव करून क्लीन स्वीप देण्याची संधी आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36XdKW9

नरेंद्र मोदी कृषी कायदा बदला, नाहीतर... इंग्लंडच्या क्रिकेटपटूने दिली ताकिद

नवी दिल्ली : भारतातील शेतकऱ्यांना आता देशाबाहेरुनही चांगला पाठिंबा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण इंग्लंडच्या एका क्रिकेटपटूने या आंदोनलात उडी मारली आहे. त्याचबरोबर या क्रिकेटपटूने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कृषी कायदा बदलण्याची मागणी केली आहे. पण मोदी यांनी हा कायदा बदलला नाही, तर काय केले जाईल, ही गोष्टही या क्रिकेटपटूने सांगितली आहे. या क्रिकेटपटूचा व्हिडीओ सध्याच्या घडीला जगभरात चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू माँटी पनेसारने आता शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला आहे. त्याचबरोबर पनेसारने एक व्हिडीओ बनवला असून त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅगही केलला आहे. या व्हिडीओमध्ये पनेसारने लिहिले आहे की, " आता तुम्हाला तुम्हीच घेतलेला निर्णय बदलण्याची वेळ आलेली आहे. देशातील शिख बांधव तुमच्याकडे त्यासाठी आले आहेत, जोपर्यंत तुम्ही हा निर्णय बदलत नाही तोपर्यंत ते तुमच्याकडे येतच राहतील." आज शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली होती. या शेतकऱ्यांच्या हाकेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारताचा फिरकीपटू हरऊजन सिंगनेही या बंदला पाठिंबा देत एक ट्विट केले आहे. शेतकऱ्यांबाबत हरभजनने केलेले ट्विट आता चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहे. हरभजनने यावेळी शेतऱ्यांबाबत एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये हरभजने लिहिले आहे की, " शेतकऱ्यांमुळेच भारत देश आहे." यानंतर हरभजनने भारताचा झेंडा पोस्ट केला आहे. हरभजनच्या या पोस्टला चाहत्यांनी चांगलाच पाठिंबा दिला आहे. त्यामुळे हरभजनचे हे ट्विट चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहे. कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये महाराष्ट्रातील अनेक शेतकरी संघटनांसह सत्ताधारी राजकीय पक्ष देखील सहभागी झाले आहेत. बंदला पहाटेपासूनच सुरुवात झाली आहे. या बंदलाच महाराष्ट्रासहीत संपूर्ण देशामध्ये चांगला पाठिंबा मिळत आहे. त्याचबरोबर सर्व सामान्य जनतेनेही शेतकऱ्यांच्या या बंदला चांगला पाठिंबा दिला आहे. करोनाकाळातही नव्या कृषी कायद्याविरोधात हरयाणा आणि पंजाबचे शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांविरोधात 'बळाचा वापर' करण्याच्या भाजप सरकारचा निषेध करत आपले पुरस्कार परत करण्याचा निर्णय या खेळाडूंनी घेतला आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला दिवसेंदिवस क्रीडा क्षेत्रातूनही चांगलाच पाठिंबा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2VTvUl2

IND vs AUS : भारताने नाणेफेक जिंकल्यावर प्रथम गोलंदाजी का स्वीकारली, कोहलीने सांगितली ही खास गोष्ट

सिडनी, : ऑस्ट्रेलिविरुद्धच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकल्यावर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने हा निर्णय का घेतला याचा खुलासा कर्णधार विराट कोहलीने आता केला आहे. भारतीय संघाने दोन्ही ट्वेन्टी-२० सामने जिंकत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. पण भारतासाठी हा तिसरा ट्वेन्टी-२० सामनाही महत्वाचा आहे. कारण भारतीय संघाला हा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाच्या संघाला ३-० अशी धुळ चारता येईल. त्यामुळे कोहलीने आजच्या सामन्यात संघात कोणताही बदल केला नाही आणि गेल्या सामन्याती विजयी संघच कायम ठेवला आहे. तिसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकल्यावर कोहली म्हणाला की, " सिडनीचे मैदान हे तुलनेने छोटे आहे. त्यामुळे सीमारेषा जवळ आहे. या मैदानातील गेल्या सामन्यात आम्ही चांगली कामगिरी केली होती. त्याचबरोबर हा सामना आम्ही धावांचा पाठलाग करताना जिंकलो होतो. त्यामुळे यावेळीही आम्ही नाणेफेक जिंकल्यावर प्रथम गोलंदाजी करून आव्हानाचा पाठलाग करण्याचे ठरवले आहे." कोहली पुढे म्हणाला की, " आम्ही सर्वच व्यावसायिक क्रिकेटपटू आहोत. त्यामुळे आम्हाला स्वत:ला पारखून घ्यायचे आहे. ट्वेन्टी-२० क्रिकेट मालिकेमुळे आम्हाला ही संधी मिळालेली आहे. त्यामुळे या संधीचा चांगला उपयोग कसा करता येईल, हे आम्ही ठरवले आहे. जेव्हा आम्ही प्रतिस्पर्धी संघापेक्षा जास्त आघाडीवर असतो, तेव्हा आमच्यासाठी ती चांगली गोष्ट असते. चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळू सामना कसा जिंकता येईल, याकडेच आमचा कल असतो." भारतीय संघात या तिसऱ्या सामन्यासाठी गोलंदाजांमध्ये मोठे बदल होऊ शकतात, असे वाटले होते. दुसऱ्या सामन्यात युजवेंद्र चहलची चांगलीच धुलाई झाली होती. चहलने चार षटकांमध्ये तब्बल ५१ धावा दिल्या होत्या. त्यामुळे त्याला तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात डच्चू मिळेल, असे म्हटले जात होते. कारण दुसऱ्या बाजूने वॉशिंग्टन सुंदर चांगील गोलंदाजी करत आहे. त्याला चांगली साथ चहलला देता आलेली नाही. पण चहलला या सामन्यासाठी संघात कायम ठेवण्यात आले आहे. आतापर्यंतच्या ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये भारताचा युवा वेगवान गोलंदाज टी. नटराजनने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. नटराजनने आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने केले आहे. पण अजूनपर्यंत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला मात्र संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्याचबरोबर दुसऱ्या सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीलाही खेळवले नव्हते. त्यामुळे या सामन्याच या दोघांपैकी एका गोलंदाजाला संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती. पण या भारतीय संघात एकही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात जो संघ होता तोच कायम ठेवण्याचा निर्णय भारतीय संघाने यावेळी घेतला आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qyyKu9

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाच्या संघाला बसू शकतो मोठा धक्का, प्रशिक्षकांनीच दिली अपडेट

सिडनी, : ऑस्ट्रेलियाच्या संघाला अजून एक मोठा धक्का बसू शकतो, असे म्हटले जात आहे. ऑस्ट्रेलिाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी याबाबतची अपडेट एका मुलाखतीमध्ये शेअर केली होती. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाचा संघ या मोठ्या धक्क्यातून कसा सावरणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेले आहे. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे वॉर्नर भारताविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत खेळू शकला नाही. पण वॉर्नरची दुखआपत गंभीर असून तो पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही, असे वृत्त रेडिफ डॉट कॉम या संकेतस्थळाने दिले आहे. त्याचबरोबर वॉर्नरचा जागी नेमका कोणता खेळू संघात येऊ शकतो, याबाबतही या वृत्तामध्ये सांगण्यात आले आहे. वॉर्नरला झालेली दुखापत ही गंभीर स्वरुपाची आहे. या दुखापतीमधून तो अजूनही सावरलेला नाही. त्यामुळे या दुखापतीमधून फिट होण्यासाठी वॉर्नरला काही वेळ लागू शकतो. त्यामुळे वॉर्नर जर पहिला कसोटी सामना खेळणार नसले तर त्याच्या जागी ऑस्ट्रेलियाच्या 'अ' विल्यम पोकुवस्कीला संघात स्थान देण्यात येऊ शकते, असे दिसत आहे. याबाबत ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी सांगितले की, " वॉर्नरची दुखापत ही गंभीर स्वरुपाची आहे आणि त्याला वेदनाही होत आहेत. त्यामुळे कदाचित तो पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. पण संघ निवडण्यासाठी आमच्यावर जास्त दडपण नसेल. कारण ऑस्ट्रेलियाच्या 'अ'संघातील खेळाडू जहे चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे त्यांच्यापैकी एकाची निवड आम्ही वॉर्नरच्या जागी संघात करू शकतो. पण दुसरीकडे आमचे लक्ष वॉर्नऱवरही असेल. कारण वॉर्नर हा आमच्यासाठी सर्वात महत्वाचा खेळाडू आहे. त्यामुळे तो कधी पूर्णपणे फिट होू शकतो, याकडे आम्ही डोळे लावून बसलो आहोत. काही दिवसांतच वॉर्नरबाबतचे चित्र स्पष्ट झालेले आपल्याला पाहायला मिळेल." ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचलाही पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यानंतर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात खेळता आले नव्हते. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या संघाचे नेतृत्व हे स्टीव्हन स्मिथकडे सोपवण्यात आले होते. पण आता तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात मात्र फिंच खेळायला मैदानात उतरला आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gsjM4e

रोहित शर्माने बंगला खरेदी करण्यासाठी निवडली 'ही' खास जागा, कोणालाही न सांगता दिली भेट

मुंबई : भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा हा सध्याच्या घडीला आपल्या फिटनेसवर लक्ष देत आहे. पण त्याचबरोबर रोहित सध्याच्या घडीला शांतपणे वेळ व्यतित करण्यासाठी एक बंगला शोधत आहे. रोहितने गेल्या आठवड्यात एका खास जागेला भेट दिली आणि तो प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी उत्सुक असल्याचे तेथील स्थानिकांनी सांगितले आहे. रोहित गेल्या आठवड्यात दक्षिण मुंबईतून थेट अलिबागला बंगला पाहण्यासाठी गेला होता, असे वृत्त मुंबई मिररने दिले आहे. रोहितने यावेळी काळे टी-शर्ट आणि काळा मास्क परीधान केला होता. त्याचबरोबर काळ्या रंगाची थ्री-फोर्थ पँट त्याने घातली होती. रो-रो फेरीमध्ये रोहितने आपली गाडी घेतली होती आणि तो थेट अलिबागला बंगला पाहण्यासाठी गेला होता, असे सूत्रांनी सांगितले आहे. रोहितला दुखापत झाली होती. त्यामुळेच त्याला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाता आले नव्हते. त्यामुळेच रोहित सध्याच्या घडीला बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आपल्या फिटनेसवर लक्ष देत आहे. पण या कार्यक्रमामध्ये रोहितला एका दिवसाची सुट्टी देण्यात आली होती. त्यावेळी रोहित हा अलिबागला जाऊन एक खास बंगला बघून आल्याचे तेथील स्थानिकांनी सांगितले आहे. याबाबत बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, " रोहित सध्याच्या घडीला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आपल्या फिटनेसवर लक्ष देत आहे. पण या पूर्ण कार्यक्रमात रोहितला सुट्टी मिळाली होती. त्यावेळी रोहित बंगळुरुहून बाहेर गेला होता. पण रोहित नेमका कुठे गेला होता, याबाबत आम्ही सांगू शकत नाही. कारण रोहितबरोबर यावेळी बीसीसीआयची कोणतीही व्यक्ती नव्हती. त्यामुळे या सुट्टीमध्ये रोहित कुठे गेला होता, हे आम्ही सांगू शकत नाही." रोहित हा सध्याच्या घडीला बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आपल्या फिटनेसवर जास्त लक्ष देत आहे. रोहितची फिटनेस चाचणी ११ डिसेंबरला होणार आहे. या चाचणीत रोहित जर पास झाला तरच त्याला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाता येणार आहे. रोहितने आपल्या इंस्टाग्रावर एक पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये रोहितने आपला नवीन फोटो अपलोड केला आहे. या फोटोमध्ये रोहितमध्ये बराच फरक झाल्याचे पाहायला मिळत आहे. रोहितचा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला असून चाहत्यांनाही रोहितच्या या नवीन लूकला पसंती दिली आहे. त्याचबरोबर रोहित आता कधी मैदानात उतरणार आणि त्याचा खेळ कधी पाहायला मिळणार, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/33RVX0D

IND vs AUS : तिसऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघांत नेमके कोणते बदल झाले, पाहा...

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली आहे. भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अखेरच्या या ट्वेन्टी-२० सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये नेमके काय बदल झाले आहेत, पाहा... ऑस्ट्रेलियाच्या संघाला यावेळी एक आनंदाची बातमी मिळाली आहे. या तिसऱ्या आणि अखेरच्या ट्वेन्टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचचे संघात पुनरागमन झाले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाला मोठा दिलासा मिळू शकतो. त्यामुळे आता मॅथ्यू वेडबरोबर फिंच हा सलाचमीला येऊ शकतो. त्याचबरोबर या सामन्यात अष्टपैलू मार्कस स्टॉइनिसला संधी मिळेल, असे वाटत होते. मार्कसला दुखापत झाली होती, त्यामुळे तो काही काळ संघाबाहेर होता. पण ऑस्ट्रेलियाच्या संघाने यावेळी मार्कसला या सामन्यात संधी दिलेली नाही. भारतीय संघात यावेळी गोलंदाजांमध्ये मोठे बदल होऊ शकतात, असे वाटले होते. दुसऱ्या सामन्यात युजवेंद्र चहलची चांगलीच धुलाई झाली होती. चहलने चार षटकांमध्ये तब्बल ५१ धावा दिल्या होत्या. त्यामुळे त्याला तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात डच्चू मिळेल, असे म्हटले जात होते. कारण दुसऱ्या बाजूने वॉशिंग्टन सुंदर चांगील गोलंदाजी करत आहे. त्याला चांगली साथ चहलला देता आलेली नाही. पण चहलला या सामन्यासाठी संघात कायम ठेवण्यात आले आहे. आतापर्यंतच्या ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये भारताचा युवा वेगवान गोलंदाज टी. नटराजनने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. नटराजनने आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने केले आहे. पण अजूनपर्यंत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला मात्र संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्याचबरोबर दुसऱ्या सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीलाही खेळवले नव्हते. त्यामुळे या सामन्याच या दोघांपैकी एका गोलंदाजाला संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती. पण या भारतीय संघात एकही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात जो संघ होता तोच कायम ठेवण्याचा निर्णय भारतीय संघाने यावेळी घेतला आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2VOHH43

शेतकऱ्यांमुळेच भारत देश आहे; हरभजन सिंगचे ट्विट झाले व्हायरल

नवी दिल्ली : आज शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली होती. या शेतकऱ्यांच्या हाकेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारताचा फिरकीपटू हरऊजन सिंगनेही या बंदला पाठिंबा देत एक ट्विट केले आहे. शेतकऱ्यांबाबत हरभजनने केलेले ट्विट आता चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहे. हरभजनने यावेळी शेतऱ्यांबाबत एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये हरभजने लिहिले आहे की, " शेतकऱ्यांमुळेच भारत देश आहे." यानंतर हरभजनने भारताचा झेंडा पोस्ट केला आहे. हरभजनच्या या पोस्टला चाहत्यांनी चांगलाच पाठिंबा दिला आहे. त्यामुळे हरभजनचे हे ट्विट चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहे. कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये महाराष्ट्रातील अनेक शेतकरी संघटनांसह सत्ताधारी राजकीय पक्ष देखील सहभागी झाले आहेत. बंदला पहाटेपासूनच सुरुवात झाली आहे. या बंदलाच महाराष्ट्रासहीत संपूर्ण देशामध्ये चांगला पाठिंबा मिळत आहे. त्याचबरोबर सर्व सामान्य जनतेनेही शेतकऱ्यांच्या या बंदला चांगला पाठिंबा दिला आहे. करोनाकाळातही नव्या कृषी कायद्याविरोधात हरयाणा आणि पंजाबचे शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांविरोधात 'बळाचा वापर' करण्याच्या भाजप सरकारचा निषेध करत आपले पुरस्कार परत करण्याचा निर्णय या खेळाडूंनी घेतला आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला दिवसेंदिवस क्रीडा क्षेत्रातूनही चांगलाच पाठिंबा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार सन्मानित अनेक माजी खेळाडूंनी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचं समर्थन केले आहे. केंद्र सरकारनं नवीन कृषी कायदा रद्द करावा किंवा किमान हमीभावाची तरतुदी कायद्यात करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. त्यामुळे सरकारच्या विरोधानंतर हे आंदोनल चिघळलेले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आता क्रीडापटूही पुढे सरसावलेले पाहायला मिळत आहेत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/33UzTlP

IND vs AUS 3rd T20I Live Score Update: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करणार

सिडनी: IND vs AUS 3rd T20I भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज तिसरी आणि अखेरची टी-२० लढत होणार आहे. टीम इंडियाने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतील आहे. आज भारताने विजय मिळवल्यास टी-२० क्रिकेटमध्ये सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाचा घरच्या मैदानावर क्लीन स्वीप करण्याची संधी असेल. Live अपडेट (IND vs AUS )>> भारतीय संघात कोणताही बदल नाही, तर ऑस्ट्रेलिया संघात कर्णधार एरॉन फिंच परतला वाचा- >> भारतीय संघात कोणताही बदल नाही >> ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करणार >> तीन सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने २-० अशी आघाडी घेतली आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gmHr65

Monday, December 7, 2020

आज जिंकल्यास भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध करणार सर्वात मोठा विक्रम

सिडनी: यजमान ऑस्ट्रेलिया आणि पाहूणे भारत यांच्यात आज तिसरा आणि अखेरचा टी-२० सामना होणार आहे. भारतीय संघाने मालिकेतील पहिल्या दोन लढतीत विजय मिळवून २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. आजच्या सामन्यात जर विजय मिळवला तर जगातील कोणत्याही संघाला करता आली नाही अशी कामगिरी करण्याची संधी आहे. वाचा- मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेणाऱ्या टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाचा ३-० असा क्लीन स्वीप करण्याची संधी आहे. भारतीय संघाला सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर क्लीन स्वीप करता येऊ शकते. याआधी २०१६ साली भारतीय संघाने महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा ३-० असा पराभव केला होता. वाचा- आकडेवारीवर नजर टाकली तर ३ सामन्यांच्या टी-२० लढतीत ऑस्ट्रेलियाचा आतापर्यंत दोन वेळा व्हाइट वॉश झाला आहे. यातील एक भारतीय संघाने २०१६ साली तर दुसरा २०१८ साली पाकिस्तानने केला होता. यातील भारताने घरच्या मैदानावर तर पाकिस्तानने युएईमध्ये ऑस्ट्रेलियाचा क्लीन स्वीप केला होता. वाचा- टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाने ११ डिसेंबर २०१९ पासून एकही सामना गमावलेला नाही. या काळात एका सामन्याचा निकाल लागला नाही. तर न्यूझीलंडविरुद्ध झालेले दोन टाय सामने भारताने सुपर ओव्हरमध्ये जिंकले. आतापर्यंत भारताने सलग १० लढती जिंकल्या आहेत. आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवल्यास त्यांना अफगाणिस्तानच्या सलग ११ विजयाशी बरोबरी करता येईल. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विजय मिळवण्याचा विक्रम अफगाणिस्तानच्या नावावर आहे. त्यांनी सलग १२ लढती जिंकल्या आहेत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3lTAg6n

सामना सुरू असताना विराट कोणाला म्हणाला, Miss You ; पाहा व्हायरल व्हिडिओ

नवी दिल्ली: भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी चाहत्यांच्या मनावर तो अजूनही राज्य करतोय. फक्त चाहतेच नाही तर भारतीय संघातील खेळाडू सुद्धा त्याला मीस करत असतात. वाचा- भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे आणि टी-२० मालिकेत त्यांनी २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. सिडनीत झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात धोनीचे चाहते मैदानात एक पोस्टरवर त्याला मीस करत असल्याचे सांगत आहेत. वाचा- या व्हिडिओत सिडनी मैदानावरील चाहत्यांच्या हातात एक पोस्टर दिसत आहे. त्यात मीस यू असे लिहले होते. धोनी निवृत्त झाल्यानंतर याआधी देखील अनेकदा अशा पद्धतीचे पोस्टर मैदानार दिसले. पण हा व्हिडिओ व्हायरल होण्याचे कारण म्हणजे, या पोस्टरवर विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडिओमध्ये विराटने इशारा करत म्हटले आहे की, तो देखील धोनीला खुप मीस करत आहे. विराटने मी टू असा इशारा केल्याचे व्हिडिओत दिसतेय. वाचा- धोनीने जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तेव्हा विराटने सांगितले होती की, धोनीच माझा कर्णधार असेल. धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याआधी तो जुलै २०१९ मध्ये वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. धोनीच्या निवृत्तीनंतर विराटने एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करताना दिसला होता. अर्थात धोनीला या वर्षी अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. आयपीएलच्या इतिहासात चेन्नई प्रथमच प्ले ऑफमध्ये पोहोचू शकली नाही.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39R5ZTx

बॉलीवूडच्या 'या' तीन अभिनेत्री आहेत क्रिकेटपटू रशिद खानच्या फेव्हरेट, विराटची पत्नी अनुष्काचंही घेतलं नाव...

नवी दिल्ली : आयपीएलमध्ये दमदार फिरकी गोलंदाजी करणारा अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू रशिद खानच्या तीन बॉलीवूड अभिनेत्री फेव्हरेट आहेत. ही माहिती रशिदनेच दिली असून या तीन अभिनेत्रींमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माचाही समावेश आहे. रशिदने सोशल मीडियावर तीन अभिनेत्रींचे नाव घेतले आहे. यामध्ये प्रथम अनुष्का शर्माचे नाव आहे. त्याचबरोबर रशिदला प्रीति झिंटाही आवडत असल्याचे त्याने सांगितले आहे. त्याचबरोबर किआरा अडवाणीही आपल्याला आवडत असल्याचे रशिदने या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्याचबरोबर रशिदने काही दिवसांपूर्वी झालेल्या एका मुलाखतीमध्ये मला आमिर खान आवडतो, असेही म्हटले होते. त्याचबरोबर मला लगान आणि दंगल हे दोन सिनेमे सर्वाधिक आवडतात, असेही रशिदने म्हटले होते. काही दिवसांपूर्वी रशिद आणि अनुष्का यांचे नाव चर्चेत आले होते. कारण गुगलवर रशिद खानची पत्नी, असे सर्च केल्यावर अनुष्का शर्माचे नाव येत होते. त्याचबरोबर त्यांच्या लग्नाची तारीखही दाखवली जात होती. पण ही चूक गुगलची होती आणि त्यानंतर त्यांनी आपली ही चूक सुधारली होती. क्रिकेट आणि बॉलीवूड यांचे फार वर्षांपासूनचे कनेक्शन आहे. त्याचबरोबर परदेशी क्रिकेटपटूंचेही बॉलीवूडबरोबर खास नाते आहे. रशिदने आयपीएल चांगलीच गाजवली होती. आता रशिद हा बिग बॅश लीग खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचल्यावर त्याला १४ दिवस क्वारंटाइन व्हावे लागले आहे. यामध्येच रशिदने आपल्या इंस्टाग्रामवर आपल्याला बॉलीवूडमधील कोणत्या अभिनेत्री आवडतात, हे सांगितले आहे. आयपीएलमध्ये रशिद हा सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून खेळत होता. त्यावेळी रशिदने अचूक गोलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले होते. वॉर्नरच्या नेतृत्वाखालील हैदराबादचा संघ प्ले-ऑफमध्येही पोहोचला होता. या हैदराबादच्या प्रवासात रशिदचाही महत्वाचा वाटा होता. कारण रशिदने यावेळी हैदराबादची गोलंदाजीची बाजू चांगल्यापद्धतीने सांभाळली होती. आता रशिद हा ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे या बिग बॅश लीगमध्ये रशिदची कामगिरी नेमकी कशी होते, याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागून राहिलेले असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qB0GgR

धक्कादायक... करोनाचा मोठा धक्का, क्रिकेट मालिकाच करावी लागली रद्द

नवी दिल्ली : करोनाचा सर्वात मोठा धक्का आता क्रिकेट विश्वाला बसल्याचे पाहायला मिळत आहे. कारण करोनामुळे आता क्रिकेटची मालिकाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांनी हा निर्णय घेतला असून आता यापुढे हे सामने कधी खेळवायचे, याबाबतचा निर्णय मात्र अद्याप होऊ शकलेला नाही. दोन्ही संघ ज्या हॉटेलमध्ये होते तेथील कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली होती. हॉटेलमधील दोन कर्मचाऱ्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्याआधी इंग्लंडचे खेळाडू आणि अन्य कर्मचारी यांची शनिवारी रात्री पीसीआर टेस्ट झाली होती. त्यामुळे इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना रविवारी पुढे ढकलण्यात आला होता. पण त्यानंतर रविवारीही हा सामना होऊ शकला नव्हता आणि करोनामुळे एकच सामना दोनवेळा रद्द करण्याची वेळ आली होती. पण आता तर ही संपूर्ण मालिकाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दक्षिण आप्रिका आणि इंग्लंड यांच्यातील संपूर्ण मालिकेत करोना व्हायरसची चर्चा आहे. टी-२० मालिकेआधी आफ्रिकेच्या संघातील काही खेळाडूंना करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. पण त्यानंतर देखील मालिका खेळवण्यात आली होती. इंग्लंडने तेव्हा ३-० असा विजय मिळवला. त्यानंतर वनडे मालिकेच्या आधी दोन्ही संघातील एक सदस्याला करोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे केपटाउन येथील वनडे स्थगित करण्यात आली. आता पुन्हा करोनामुळे सामनाच रद्द करण्याची वेळ आली. याबाबत इंग्लंडच्या क्रिकेट संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरिसन यांनी सांगितले की, " आमच्या क्रिकेट मंडळासाठी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफची सुरक्षा सर्वात महत्वाची आहे. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आल्यावर काही गोष्टींमुळे आम्हाला चिंता नक्कीच होती. पण एवढी गंभीर अवस्था त्यावेळी नव्हती. पण सातत्याने या गोष्टी पाहायला मिळत असल्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षेसाठी इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही क्रिकेट मंडळांनी मालिका रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे." टॉम पुढे म्हणाले की, " इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांतील काही खेळाडू हे करोना पॉझिटीव्ह आढळले होते. त्याचबरोबर हॉटेलमधील स्टाफच्या काही व्यक्तींनाही करोना झाला होता. त्यामुळे आम्ही दोन्ही क्रिकेट मंडळानी एकत्र येऊन मालिका रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ही गोष्ट समजून घेऊन त्याबाबत समर्थन दिल्याबद्दल आम्ही दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाचे आभारी आहोत. आता ही रद्द झालेली मालिका कधी खेळवण्यात येईल, याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. पण दोन्ही क्रिकेट मंडळांमध्ये चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात येईल."


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qBaB64

Video: विराटने सोडला सोपा कॅच; इंग्लंडच्या क्रिकेटपटूने विचारले, तुला काही आठवते का?

नवी दिल्ली: भारताचा कर्णधार विराट कोहलीने स्वत:ची कामगिरी एका वेगळ्या उंचीवर पोहोचवली आहे. फलंदाजी असो की संघाचे नेतृत्व किंवा मग क्षेत्ररक्षण विराटची कामगिरी अव्वल असते. या सर्वोत्तम कामगिरीमुळेच त्याच्याकडून काही चूक झाली तर सर्वांचे लक्ष जाते. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराटने काही कॅच सोडले. यामुळे तो चर्चेत आला आहे. वाचा- विराट हा जसा उत्तम फलंदाज आहे तसा चांगला फिल्डर देखील आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात त्याने एक सोपा कॅच सोडला. या दौऱ्यात कॅच सोडण्याची ही त्याची पहिली वेळ नाही. पहिल्या लढतीत देखील त्याने डार्सी शॉर्टचा सोपा कॅच सोडला होता. दुसऱ्या लढतीत त्याने ऑस्ट्रेलियाचा हंगामी कर्णधार मॅथ्यू वेडचा सोपा कॅच सोडला. पण त्यासाठी भारताला फार मोठी किमत चुकवावी लागली नाही. कारण ज्या चेंडूवर विराटने कॅच सोडला त्याच चेंडूवर वेडला धावबाद केले. वाचा- वाचा- क्रिकेटमध्ये अशीच घटना याआधी घडली होती. काही महिन्यांपूर्वी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्यात इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने विराट कोहली प्रमाणे सोपा कॅच सोडला होता आणि मग धावबाद केले होते. वाचा- विराटच्या या कॅच सोडण्याच्या घटनेचा व्हिडिओ शेअर करताना स्टुअर्टने जिमी अॅडरसनला टॅग करत तुला काही आठवते का? असा प्रश्न केला आहे. विराट प्रमाणेच स्टुअर्टने कॅच सोडला होता आणि पुन्हा जोरदार कमबॅक करत मोहम्मद अब्बासला धावबाद केले होते. वाचा- स्टुअर्टने मोक्याच्या क्षणी कॅच सोडला होता तेव्हा अॅडरसनला डावातील पाच विकेट घेण्यासाठी एका विकेटची तर ६०० बळींचा टप्पा पार करण्यासाठी ३ विकेटची गरज होती.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3osbOL9

भारताच्या पराभवाचे भाकीत करणाऱ्या क्रिकेटपटूला जाफरने दिले चोख उत्तर, पाहा पोस्ट

नवी दिल्ली: ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या दोन वनडे सामन्यात पराभव झालेल्या भारतीय संघाने त्यानंतर सलग तीन विजय मिळवले आणि जोरदार कमबॅक केले. भारताने तिसऱ्या वनडेत विजय मिळवत क्लीन स्विप होऊ दिला नाही. त्यानंतर तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दोन सामन्यात विजय मिळून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. वाचा- भारताने काल रविवारी झालेल्या दुसऱ्या टी-२० लढतीत ऑस्ट्रेलियाने दिलेले १९५ धावांचे लक्ष्य यशस्वीपणे पार केले. भारताकडून हार्दिक पंड्याने २२ चेंडूत ४२ धावा करत धडाकेबाज विजय मिळवून दिला. आता मंगळवारी टी-२० मालिकेतील तिसरी आणि अखेरची लढत होईल. तेव्हा भारताला ऑस्ट्रेलियाचा क्लीन स्विप करण्याची संधी असेल. जर भारताने असे केले तर २०२० मध्ये सलग दुसऱ्यांदा भारत परदेशी भूमीवर यजमानांचा क्लीन स्विप करेल. याआधी वर्षाच्या सुरुवातीला भारताने न्यूझीलंडचा ५-० असा पराभव केला होता. वाचा- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचे सामने सुरू होण्याआधी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने असे विधान केले होते की, यजमान ऑस्ट्रेलिया भारताचा तिनही मालिकेत पराभव करेल. पण टीम इंडियाने टी-२० मालिकेत विजय मिळून वॉनची भविष्यवाणी चुकीची होती हे सिद्ध केले. वाचा- भारतीय संघाने वॉनच्या ट्वीटवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण भारताचा माजी सलामीवीर वासीम जाफरने टी-२०तील मालिका विजयानंतर वॉनला उत्तर दिले आहे. गेल्या काही काळापासून जाफर सोशल मीडियावर माजी क्रिकेटपटूंना ट्रोल करत आहे. तो मजेशीर पद्धतीने ट्रोल करतो. यावेळी जाफरच्या हाती वॉन सापडला. वाचा- जाफरने वॉनच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना गॅग्स ऑफ वासेपूरमधील एका सीनचा मीम पोस्ट केलाय. वाचा- टी-२० मालिकेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १७ डिसेंबरपासून कसोटी मालिका होणार आहे. बॉर्डर-गावसकर मालिकेतील पहिली कसोटी एडिलेट येथे होणार असून हा सामना डे-नाइट आहे. गेल्या वर्षी भारतीय संघाने कसोटी मालिकेत ऑस्टेलियाचा पराभव केला होता. अशी कामगिरी करणारा तो पहिला आशियाई संघ ठरला होता.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gmvz3V

विराट पाठोपाठ आता हा क्रिकेटपटू होणार बाप, क्रिकेटमधून घेतला ब्रेक

नवी दिल्ली: भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. वनडे मालिका गमावल्यानंतर टीम इंडियाने तिसरी वनडे आणि दोन टी-२० लढती जिंकून मालिका देखील खिशात घातली. दोन्ही संघातील अखेरची टी-२० लढत उद्या मंगळवारी होणार आहे. त्यानंतर चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. वाचा- ऑस्ट्रेलिया दौऱ्यात होणाऱ्या तीन मालिकेपैकी पहिली वनडे मालिका यजमान ऑस्ट्रेलियाने जिंकली तर टी-२० मालिका भारताने जिंकली आहे. आता दौऱ्याचा निकाल कसोटी मालिकेने होऊ शकतो. या मालिकेत भारताचा कर्णधार पहिल्या कसोटीनंतर भारतात परत येणार आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तो बाप होणार असल्याने पत्नी अनुष्कासाठी विराट भारतात येणार आहे. बीसीसीआयने विराटला सुट्टी दिली आहे. वाचा- विराटच्या या सुट्टीवर अनेकांनी वेगवेगळी मते व्यक्त केली आहेत. आता विराट कोहली प्रमाणेच आणखी एक क्रिकेटपटू बाप होणार असल्याने सुट्टी घेणार आहे. न्यूझीलंडचा कर्णधार () देखील सुट्टी घेणार आहे. केन देखील विराट प्रमाणे प्रथमच बाप होणार असून त्यासाठी त्याने क्रिकेटमधून ब्रेक करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने त्याला पाठिंबा दिला आहे. वाचा- शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केन विलियमसनने सांगितले की, माझी पत्नी डिसेंबर मध्ये किंवा अखेरपर्यंत पहिल्या मुलाला जन्म देणार आहे. हॅमिल्टन येथे झालेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने एक डाव आणि १३४ धावांनी विजय मिळवला. त्यानंतर प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी केनच्या सुट्टीला हिरवा कंदील दिला. वाचा- केन विलियमसन काही सामने मिस करू शकतो. पण केनसाठी हा क्षण देखील महत्त्वाचा आहे. आम्ही क्रिकेट खेळतो पण अन्य गोष्टी देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत. वाचा- न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना वेलिंग्टनच्या बेसिन रिजर्व्ह मध्ये होणार आहे. त्यानंतर न्यूझीलंड १८ डिसेंबरपासून पाकिस्तानविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3lXVbFC

IND vs AUS : रोहित शर्मा फक्त दुखापतीवर नाही तर 'या' गोष्टीवरही देतोय लक्ष, फोटो झाला व्हायरल

सिडनी : भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा हा दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाऊ शकला नाही. सध्याच रोहित हा आपल्या फिटनेसवर लक्ष देत आहे. पण त्याचबरोबर रोहित अजून एक चांगली गोष्ट करत असल्याचे पाहायला मिळाले आहे. रोहितचा नवीन फोटो चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. रोहित हा सध्याच्या घडीला बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आपल्या फिटनेसवर जास्त लक्ष देत आहे. रोहितची फिटनेस चाचणी ११ डिसेंबरला होणार आहे. या चाचणीत रोहित जर पास झाला तरच त्याला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाता येणार आहे. रोहित दुखापतीबरोबरच वजन कमी करण्याकडे लक्ष देत असल्याचे टाइम्स ऑफ इंडियाने आपल्या वृत्तामध्ये म्हटले आहे. वजन कमी केल्याचा रोहितला काय होऊ शकतो फायदा, पाहा... लॉकडाऊननंतर रोहित पहिल्यांदा आयपीएलमध्ये दिसला होता. त्यावेळी रोहितचे पोट सुटलेले पाहायला मिळाले होते. त्यानंतर रोहितला दुखापत झाली आणि त्याला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाता आले नाही. पण सध्या रोहित आपले वजन कमी करत आहे. वजन कमी केले आणि ते योग्य ठेवले तर दुखापतींपासून त्याला वाचता येऊ शकते. त्यामुळे वजन कमी करून दुखापतींपासून कसे लांब राहता येईल, याकडे रोहित सध्याच्या घडीला लक्ष देत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर रोहित आपल्या फिटेसवरही लक्ष देत आहे. रोहितने आपल्या इंस्टाग्रावर एक पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये रोहितने आपला नवीन फोटो अपलोड केला आहे. या फोटोमध्ये रोहितमध्ये बराच फरक झाल्याचे पाहायला मिळत आहे. रोहितचा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला असून चाहत्यांनाही रोहितच्या या नवीन लूकला पसंती दिली आहे. त्याचबरोबर रोहित आता कधी मैदानात उतरणार आणि त्याचा खेळ कधी पाहायला मिळणार, याची उत्सुकता चाहत्यांना आहे. रोहित जर फिटनेस टेस्टमध्ये पास झाला आणि त्यानंतर जर त्याचा ऑस्ट्रेलियातील क्वारंटाइनचा कालावधी कमी केला तर रोहित दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळताना पाहायला मिळू शकतो, असे म्हटले जात आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gij2hZ

IND vs AUS : पाकिस्तानला मागे टाकत भारतीय संघाने रचला मोठा विक्रम

सिडनी : भारतीय संघ सध्याच्या घडीला धमाकेदार कामगिरी करत आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची ट्वेन्टी-२० मालिका जिंकलेली आहे. या विजयासह भारतीय संघाने पाकिस्तानला मागे टाकत एक नवा विक्रम नोंदवल्याचे पाहायला मिळत आहे. पण भारताला अजून एक विक्रम खुणावत आहे. भारतीय संघाने आतापर्यंत सलग ११ ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. ही सुरुवात डिसेंबर २०१९ पासून झाली आहे. भारताने डिसेंबरमध्ये वेस्ट इंडिजच्या संघाला मुंबईत पराभूत केले होते. त्यापासून भारताच्या विजयाची ही मालिका सुरु झाली होती. त्यानंतर भारतीय संघ श्रीलंकेबरोबर आपल्या घरच्या मैदानात ट्वेन्टी-२० मालिका खेळला होता. या मालिकेतील पहिला सामना गुवाहाटी येथे होणार होता, पण पावसामुळए हा सामना रद्द करावा लागला होता. त्यानंतर भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये इंदुर आणि पुणे येथे दोन ट्वेन्टी-२० सामने झाले होते. या दोन्ही सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला होता. भारतीय संघ यानंतर न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यामध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये पाच ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात आली होती. या मालिकेत भारताने ५-० असा दमदार विजय मिळवला होता. त्यावेळी भारतीय संघाने सलग आठ विजय मिळवले होते. त्यानंतर भारतीय संघाने कॅनबेरा येथे पहिला ट्वेन्टी-२० सामना खेळला होता. या सामन्यात भारताने सलग नवव्या विजयाची नोंद केली होती आणि पाकिस्तानबरोबर बरोबरी केली होती. त्यानंतर भारतीय संघाने सिडनी येथील ट्वेन्टी-२० सामना जिंकला. भारताचा हा सलग १०वा विजय होता आणि भारताने पाकिस्तानला या विक्रमाच्या बाबतीत पिछाडीवर टाकले होते. पण भारतीय संघाला अजूनही एक विक्रम खुणावत आहे. भारतापुढे आता आव्हान असेल ते अफगाणिस्थानचे. कारण अफगाणिस्थाने आतापर्यंत सलग ११ विजय मिळवले आहे. त्यामुळे भारतीय संघाने जर तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात विजय मिळवला तर त्यांचे सलग ११ विजय होतील आणि ते अफगाणिस्थानशी बरोबरी करु शकतील. याआधी २०१६ साली भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. त्यानंतर भारताला ट्वेन्टी-२० सामन्यात एकही पराभव पत्करावा लागला नाही.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2IoYnME

IND vs AUS : भारतीय संघाला मोठा धक्का, जडेजाच्या दुखापतीबाबत आले अपडेट्स

सिडनी : भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला दुखापत झाली होती. त्यामुळेच त्याला ट्वेन्टी-२० मालिकेतून बाहेर पडावे लागले होते. आता जडेजाच्या दुखापतीबाबत नवीन अपडेट आली आहे आणि भारतीय संघाला आता अजून एक मोठा धक्का बसला आहे. जडेजाची दुखापत ही गंभीर स्वरुपाची आहे आणि तो या दुखापतीमधून अजूनही फिट झालेला नाही. जडेजाला अजून किमान तीन आठवडे तरी या दुखापतीतून बाहेर पडता येणार नाही. त्यामुळे जडेजाला पहिल्या कसोटी सामन्यात खेळता येणार नाही, असे चित्र सध्याच्या घडीला दिसत आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी हा मोठा धक्का बसला आहे. जडेजाला तीन आठवड्यांची विश्रांती देण्यात आली आहे. पण या तीन आठवड्यांनंतरही जर जडेजा फिट होऊ शकला नाही, तर त्याला दुसऱ्या कसोटी सामन्यालाही मुकावे लागू शकते. त्यामुळे आता जडेजा नेमका कधी या दुखापतीतून बाहेर येऊ शकतो, याकडे भारतीय संघाबरोबरच चाहत्यांचेही लक्ष आहे. पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात नाबाद ४४ धावांची धडाकेबाज खेळी साकारणाऱ्या रवींद्र जडेजाला दुखापत झाली होती. जडेजाच्या पायांचे स्नायू दुखावले होते. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे तो या सामन्यात गोलंदाजी करू शकत नव्हता. जडेजाच्या जागी चहलला भारतीय संघात स्थान देण्यात आले आणि त्याने गोलंदाजीही केली. पण त्यानंतर चहल भारतीय संघात आहे. पण दुसऱ्या सामन्यात युजवेंद्र चहलची चांगलीच धुलाई झाली होती. चहलने चार षटकांमध्ये तब्बल ५१ धावा दिल्या होत्या. त्यामुळे त्याला तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात डच्चू मिळेल, असे जात आहे. कारण दुसऱ्या बाजूने वॉशिंग्टन सुंदर चांगील गोलंदाजी करत आहे. त्याला चांगली साथ चहलला देता आलेली नाही. त्यामुळे चहलच्याजागी दुसऱ्या फिरकीपटूला संघात स्थान देण्याची दाट शक्यता आहे. सध्याच्या घडीला भारतीय संघाला फिरकीपटूंची उणीव जाणवत आहे. कारण वॉशिंग्टन सुंदर चांगली गोलंदाजी करत असला तरी त्याला चांगली साथ मिळताना पाहायला मिळालेली नाही. त्यामुळे जडेजानंतर भारतीय संघात दुसरा कोणता फिरकीपटू येऊ शकतो, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39PZkIX

IND vs AUS : तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला धुळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज, संघात होणार महत्वाचे बदल

सिडनी, : तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात उद्या भारतीय संघ उतरेल तो ऑस्ट्रेलियाला ३-० अशी धुळ चारण्यासाठी. भारतीय संघाने रविवारी दुसरा ट्वेन्टी-२० सामना जिंकत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात भारतीय संघात महत्वाचे बदल होऊ शकतात, असे म्हटले जात आहे. तिसऱ्या सामन्यात भारताच्या गोलंदाजीमध्ये काही बदल पाहायला मिळू शकतात. आतापर्यंतच्या ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये भारताचा युवा वेगवान गोलंदाज टी. नटराजनने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. नटराजनने आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने केले आहे. पण अजूनपर्यंत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला मात्र संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्याचबरोबर दुसऱ्या सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीलाही खेळवले नव्हते. त्यामुळे या सामन्याच या दोघांपैकी एका गोलंदाजाला संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. पण त्यासाठी दीपक चहर किंवा शार्दुल ठाकूर यांच्यापैकी एका गोलंदाजाला संघाबाहेर बसावे लागेल. गेल्या सामन्यात चहरने जास्त धावा दिल्याचे पाहायला मिळाले होते. चहरने चार षटकांमध्ये ४८ धावा दिल्या होत्या. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात चहरला संघाबाहेर बसावे लागेल, असे दिसत आहे. दुसऱ्या सामन्यात युजवेंद्र चहलची चांगलीच धुलाई झाली होती. चहलने चार षटकांमध्ये तब्बल ५१ धावा दिल्या होत्या. त्यामुळे त्याला तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात डच्चू मिळेल, असे जात आहे. कारण दुसऱ्या बाजूने वॉशिंग्टन सुंदर चांगील गोलंदाजी करत आहे. त्याला चांगली साथ चहलला देता आलेली नाही. त्यामुळे चहलच्याजागी दुसऱ्या फिरकीपटूला संघात स्थान देण्याची दाट शक्यता आहे. भारताच्या फलंदाजीमध्ये मोठे बदल होतील, असे वाटत नाही. कारण लोकेश राहुल आणि शिखर धवन चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. हार्दिक पंड्या हा सातत्याने चांगली फलंदाजी करत आहे. पण संजू सॅमसनला मात्र अजूनही चांगली लय सापडलेली नाही. त्यामुळे या सामन्यात कदाचित संजूला वगळून मनीष पांडेला संघात स्थान देण्यात येऊ शकते. मनीषला पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात संधी दिली होती. पण तो चांगली फलंदाजी करण्यात अपयशी ठरला होता. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात मनीषला संघातून डच्चू दिला होता आणि श्रेयस अय्यरला संधी देण्यात आली होती.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39St203

विराटने ऑस्ट्रेलियात इतिहास घडवला; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय

सिडनी: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने सहा विकेटनी विजय मिळवला आणि मालिकेत २-० अशी विजयी आघाडी मिळवली. या विजयासह भारताचा कर्णधार विराट कोहलीने एक खास विक्रम स्वत:च्या नावावर केला. वाचा- हा भारताचा असा कर्णधार ठरला आहे ज्याने देशाला ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडमध्ये टी-२० मालिका जिंकली आहे. याआधी कोणत्याही भारतीय कर्णधाराने या तिनही देशात जाऊन टी-२० मालिका जिंकली नव्हती. त्याच बरोबर विराटने ऑस्ट्रेलियात जाऊन तिनही फॉर्मेटमध्ये मालिका जिंकली आहे. वाचा- २०१८-१९ साली भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात मैदानावर कसोटी मालिकेत पराभूत केले होते. त्यानंतर वडने मालिकेत देखील पराभूत केले. विराट कोहली वगळता दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डु प्लेसीस असा दुसरा कर्णधार आहे ज्याने ऑस्ट्रेलियामध्ये तिनही प्रकारात मालिका विजय मिळवला आहे. वाचा- या वर्षी भारताला वनडे मालिकेत २-१ असा पराभव झाला होता. पण तिसऱ्या वनडे विजय मिळवत भारताने जोरदार कमबॅक केले. आता दोन्ही संघात तिसऱ्या टी-२० सामन्यानंतर चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. पहिला कसोटी सामना १७ डिसेंबरपासून एडिलेट येथे होणार असून ही लढत डे-नाइट असेल. हा सामना खेळल्यानंतर विराट कोहली भारतात परत येणार आहे. वाचा- विराटच्या गैरहजेरीत कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेकडे नेतृत्व दिले जाऊ शकते. सध्या ऑस्ट्रेलिया अ आणि भारत अ यांच्यात सुरू असलेल्या सराव सामन्यात अजिंक्यने शतक झळकावले आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mQvGav

हार्दिक पंड्यावर फिदा झाली ही महिला क्रिकेटपटू; सोशल मीडियावर लिहला मेसेज

सिडनी: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारताने धमाकेदार कामगिरी करत विजय मिळवला. पहिल्या दोन लढती विजय मिळून भारताने मालिका जिंकली. दुसऱ्या सामन्यात भारताला अखेरच्या षटकात १४ धावांची गरज होत आणि हार्दिक पंड्याने षटकार खेचत विजय मिळून दिला. गेल्या काही सामन्यांपासून हार्दिक गोलंदाजी करत नाही. तो संघात फलंदाजाची भूमिका पार पाडत आहे. हार्दिकला अशा पद्धतीने खेळवण्याबद्दल अनेकांनी शंका व्यक्त केली होती. पण ज्यापद्धतीने त्याने वनडे आणि टी-२०मध्ये आतापर्यंत कामगिरी केली आहे ती कौतुकास्पद आहे. वाचा- रविवारी सिडनीत झालेल्या टी-२० लढतीत भारताला आक्रमक फलंदाजीची गरज होती. विजयासाठी १२ धावांचे रनरेट हवे असताना हार्दिकने फक्त २२ चेंडूत ४२ धावा करत फक्त मॅच नाही तर मालिका देखील जिंकून दिली. सामना झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने त्याचे कौतुक केले. इतक नव्हे तर सोशल मीडियावर देखील सर्व जण त्याचे कौतुक करत आहेत. वाचा- हार्दिकचे कौतुक करणाऱ्यांमध्ये इंग्लंडच्या एका महिला क्रिकेटपटूचा समावेश आहे. इंग्लंडची देखील पंड्याच्या फलंदाजीने हैराण झाली. पंड्याच्या धमाकेदार फलंदाजीवर हार्टलीला विश्वास बसला नाही. तिने ट्विटकरून हार्दिकचे कौतुक केले आहे. तु खरच हे करून दाखवले आहेस? या ट्विटसोबत तिने काही इमोजी वापरले आहेत. वाचा- दुसऱ्या टी-२० सामन्यात हार्दिक जेव्हा मैदानात आला तेव्हा भारताला विजयासाठी ३९ चेंडूत ८२ धावांची गरज होती. तेव्हा कर्णधार विराट कोहली देखील मैदानावर होता. पण त १७व्या षटकात बाद झाला. त्यानतंर श्रेयस अय्यर सोबत १८ चेंडूत ४६ धावांचे लक्ष्य त्याने पार करून दिले. हार्दिकने २२ चेंडूत नाबाद ४२ तर अय्यरने ५ चेंडूत नाबाद १२ धावा केल्या. मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना उद्या मंगळवारी ८ डिसेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदानावर होणार आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gjpdSJ

भारतीय खेळाडूने घेतला सुपर कॅच; फलंदाजाला देखील विश्वास बसला नाही, पाहा video

सिडनी: ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात भारताचे दोन संघ क्रिकेट सामने खेळत आहे. भारताचा मुख्य संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका खेळत आहे. तर भारताचा अ संघ ऑस्ट्रेलियाच्या अ संघाविरुद्ध खेळत आहे. काल रविवारी झालेल्या दुसऱ्या टी-२० लढतीत भारताने धमाकेदार विजय मिळवून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. दुसरीकडे सिडनीत सुरू असलेल्या सराव लढतीत भारताकडून अजिंक्य रहाणे याने शतकी खेळी केली. वाचा- ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या सराव लढतीत भारतीय संघ अडचणीत सापडला होता. तेव्हा कर्णधार अजिंक्य रहाणेने शतकी खेळी केली आणि संघाला तारले. अजिंक्यने नाबाद ११७ धावा केल्या. भारताने पहिला डाव ९ बाद २४७ धावांवर घोषित केला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने त्यांचा डाव २००च्या पुढे नेण्यात यश मिळवले. ऑस्ट्रेलिया अ कडून कॅमरून ग्रीनने ११३ धावा केल्या. तर टीम पेने ८८ चेंडूत ४४ धावा केल्या. तो उमेश यादवच्या चेंडूवर बाद झाला. पृथ्वी शॉने त्याचा शानदार कॅच घेतला. फलंदाजी करताना पृथ्वीने निराशा केली होती. तो शून्यावर बाद झाला होता. त्यामुळे सोशळ मीडियावर तो ट्रोल देखली झाला होता. गेल्या काही दिवसांपासून पृथ्वी धावा करण्यात अपयशी ठरत आहे. आयपीएलमध्ये देखील पृथ्वी खराब फॉर्ममध्ये होता. पण फिल्डिंगमध्ये पृथ्वीने शानदार कॅच घेत सर्वांची मने जिंकली. वाचा- उमेश यादवच्या बाउसर चेंडूवर पेनने पुल करण्याचा प्रयत्न केल. पण चेंडूचा वेग त्याच्या लक्षात आला नाही. आणि बॅकफुट स्क्वेअर लेगवर उभा असलेल्या पृथ्वीने हवेत उडी मारून कॅच घेतला. पृथ्वीचा हा कॅच पाहून फलंदाज पेनला देखील विश्वास बसला नाही. वाचा- क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो खुप व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलिया अ च्या पहिल्या डावात भारताच्या उमेश यादवने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर मोहम्मद सिराज आणि आर अश्विनने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलिया अ ने ८ बाद २८६ धावा केल्या असून ग्रीन ११४ धावांवर खेळत आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3lKaHog

भारताचा टी-२० मालिका विजय; रोहित शर्माची प्रतिक्रिया, म्हणाला...

मुंबई: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने काल दुसऱ्या टी-२० सामन्यात () विजय मिळवून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतील. याआधी भारताने वनडे मालिका गमावली होती. तेव्हा चाहते भारतीय संघावर टीका करत होते. त्याच बरोबर सर्वांना हिटमॅन () ची आठवण येत होती. रोहित असता तर सामन्याचा निकाल बदलला असतास असेच सर्वांना वाटत होते. त्यानंतर भारताने तिसऱ्या वनडेत आणि त्या पाठोपाठ सलग दोन टी-२० लढती जिंकल्या. वाचा- भारतीय संघाने सलग १० टी-२० लढती जिंकण्याचा विक्रम केला आहे. भारताच्या या विजयावर संघातील स्टार फलंदाज रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय संघाने मलिकेत जबरदस्त विजय मिळवला आहे. ज्या पद्धतीने भारताने हा विजय मिळवला आहे ते पाहून छान वाटले. या विजयासाठी सर्वांचे अभिनंदन, असे रोहितने ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्याने बीसीसीआयला टॅग केले आहे. वाचा- दुखापतीमुळे रोहित शर्मा वनडे आणि टी-२० मालिकेसाठी संघात नाही. कदाचीत तो कसोटी मालिकेला देखील मुकण्याची शक्यता आहे. भारतीय संघाच्या विजयावर रोहितने केलेले ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि चाहते देखील त्यावर प्रतिक्रिया देत आहे. वाचा- ऑस्ट्रेलिया दौऱ्यात प्रथम रोहित शर्माची निवड करण्यात आली नव्हती. त्यावरून बराच वाद झाला. त्यानंतर वनडे आणि टी-२० साठी त्याला विश्रांती देण्यात आली आणि कसोटी संघात स्थान दिले गेले. पण तो फिट नसल्याने पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकणार आहे. या दरम्यान रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात सर्व काही ठिक नसल्याची चर्चा सुरू झाली. अखेर या सर्वावर बीसीसीआयला स्पष्टीकरण द्यावे लागले.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37MICIa

Sunday, December 6, 2020

मी धोनी नाही, त्याच्या सारखा चपळ देखील नाही; पाहा Video

सिडनी: ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने शानदार विजय मिळवत मालिका देखील खिशात घातली. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेले १९५ धावांचे लक्ष्य भारताने अखेरच्या षठकात पार केले. भारताकडून अखेरच्या षटकात हार्दिक पंड्याने स्फोटक फलंदाजी केली आणि विजय मिळून दिला. त्याआधी शिखर धवनने अर्धशतक करून संघाच्या विजयाचा पाया रचला. वाचा- दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा माजी कर्णधार ( ) च्या नावाची चर्चा झाली. धोनीची विकेटकिपिंग ही जगातील सर्वात चपळ आणि वेगवान अशी होती. त्याच्या विकेटकिपिंगचे आज देखील उदाहरण दिले जाते. धोनीच्या नावाची चर्चा होण्याचे कारण म्हणजे दुसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने त्याची आठवण काढली. वाचा- भारताच्या डावात जेव्हा शिखर धवन फलंदाजी करत होता. तेव्हा ऑस्ट्रेलियाचा हंगामी कर्णधार याने त्याला स्टपिंग करण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी झाला नाही. तेव्हा विकेटच्या मागे उभ्या असलेला वेड म्हणाला, Not Dhoni, Not quick enough like dhon (मी धोनी नाही, त्याच्या सारखा चपळ नाही) या घटनेचा व्हिडिओ क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शेअर केला आहे. यावर शिखर धवनला देखील हसू आवरता आले नाही. भारताला दोन वर्ल्डकप जिंकून देणारा धोनी जगातील सर्वोत्तम विकिटकिपर मानला जातो. त्याच्या सारखी चपळता अपवादात्मक खेळाडूंनी दाखवली आहे. त्यामुळेच की काय जेव्हा शिखर धवनला बाद करण्यात अपयश आले तेव्हा वेडने कबुली दिली की मी धोनी सारखा चपळ नाही. वाचा- सिडनीत झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने सहा विकेटनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत २० षटाकत ५ बाद १९४ धावा केल्या. हंगामी कर्णधार मॅथ्यू वेडने ५८ धावा केल्या. त्यानंतर भारतीय संघाने दोन चेंडू शिल्लक ठेवून विजय मिळवला.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3lPHCHZ

ऑस्ट्रेलियात हे फक्त टीम इंडियाच करू शकते; वनडेचा बदला घेतला टी-२०मध्ये!

सिडनी: भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० लढतीत सहा विकेटनी विजय मिळवला आणि मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियात भारताने याआधी २०१६ मध्ये देखील अशीच धमाकेदार कामगिरी केली होती. तेव्हा भारताने टी-२० मालिका ३-० अशी जिंकली होती. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानावर प्रथमच एखाद्या संघाने क्लीन स्विप दिला होता. वाचा- सिडनी क्रिकेट मैदानावर झालेल्या आजच्या सामन्यात भारताला विजयासाठी अखेरच्या षटकात १४ धावांची गरज होती. हार्दिक पांड्याने दोन षटकार मारून विजय मिळून दिला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी १९५ धावांचे लक्ष्य दिले होते. २०१६ मध्ये देखील भारताची अशीच अवस्था होती. तेव्हा अखेरच्या षटकात भारताला विजयासाठी १७ धावांची गरज होती आणि सुरेश रैनाने चौकार मारून विजय मिळवून दिला होता. वाचा- आजच्या विजयाने भारताने टी-२० प्रकारात सलग १०व्या विजयाची नोंद केली. त्यांनी पाकिस्तानच्या सलग ९ विजयाचा विक्रम मागे टाकला. आता भारतापुढे अफगाणिस्तानचा संघ आहे. त्यांनी २०१६-१७ मध्ये सलग ११ आणि २०१८-१९ मध्ये सलग १२ विजय मिळवले होते. वाचा- ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० क्रिकेटमध्ये धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम पुन्हा एकदा भारताने केला. याआधी सिडनी मैदानावर २०१६ साली भारताने १९८ धावा केल्या होत्या. तर आज त्याच मैदानावर भारताने १९५ धावा करत दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला. या वर्षात भारताने वेस्ट इंडिज विरुद्ध ३ सामन्यांची, न्यूझीलंड विरुद्ध ५ सामन्यांची मालिका एकतर्फी जिंकली होती आणि आता ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका २ -० अशी जिंकली आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qtuLit

करोनाने दिला झटका; एकच मॅच दोन वेळा रद्द करावी लागली

नवी दिल्ली: यजमान दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना चार डिसेंबर रोजी होणार होता. पण करोना व्हायरसचे एक रुग्ण आढळल्याने सामना स्थगित करण्यात आला होता. हा सामना आज म्हणजे ६ डिसेंबर रोजी केपटाउन ऐवजी पार्ल येथे होणार होता. पण सामन्याच्या आधी एक धक्कादायक बातमी आली आणि पहिली वनडे पुन्हा रद्द करण्यात आली. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडचा संघ ज्या हॉटेलमध्ये थांबला होता तेथील दोन कर्मचाऱ्यांना करोना झाला. यामुळे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड तसेच क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने आज होणारा वनडे थोड्या वेळाने खेळवली जावी. पण त्यानंतर ही मॅचच रद्द करण्यात आली. इसीबी आणि सीएसए या दोन्ही क्रिकेट बोर्डांनी मिळून सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. वाचा- हॉटेलमधील दोन कर्मचाऱ्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्याआधी इंग्लंडचे खेळाडू आणि अन्य कर्मचारी यांची शनिवारी रात्री पीसीआर टेस्ट झाली होती. ज्याचा निकाल अद्याप आलेला नाही. इसीबीला त्या चाचणीच्या निकालाची प्रतिक्षा आहे. त्यामुळेच आजची मॅच उशिरा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. पण नंतर सामना रद्द करण्यात आला. दक्षिण आप्रिका आणि इंग्लंड यांच्यातील संपूर्ण मालिकेत करोना व्हायरसची चर्चा आहे. टी-२० मालिकेआधी आफ्रिकेच्या संघातील काही खेळाडूंना करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. पण त्यानंतर देखील मालिका खेळवण्यात आली होती. इंग्लंडने तेव्हा ३-० असा विजय मिळवला. त्यानंतर वनडे मालिकेच्या आधी दोन्ही संघातील एक सदस्याला करोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे केपटाउन येथील वनडे स्थगित करण्यात आली. आता पुन्हा करोनामुळे सामनाच रद्द करण्याची वेळ आली.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/33Ltxp2

AUS vs IND 2nd T20: हार्दिक पांड्याचा धमाका; भारताचा विक्रमी मालिका विजय

सिडनी: अखेरच्या दोन षटकात हार्दिक पंड्याने केलेल्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात धमाकेदार विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी भारता समोर १९५ धावांचे आव्हान दिले होते. भारताला विजयासाठी अखेरच्या षटकात १४ धावांची गरज होती. हार्दिकने अखेरच्या ओव्हरमध्ये दोन षटकार मारत विजय मिळून दिला. या विजयासह भारताने ३ सामन्यांची टी-३० मालिका २-० अशी जिंकली. भारतीय संघाचा टी-२० क्रिकेटमधील हा सलग दहावा विजय आहे. याबाबत त्यांनी पाकिस्तानला मागे टाकले. आता भारतापुढे अफगाणिस्तान आहे त्यांनी सलग ११ आणि १२ विजय मिळवले आहेत. इतक नव्हे तर भारताने ऑस्ट्रेलियाला पुन्हा त्यांच्या देशात पुन्हा एकदा पराभूत केले. याआधी २०१६ साली भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या १९५ धावांचा पाठलाग करताना भारताच्या शिखर धवन आणि केएल राहुल यांनी चांगली सुरूवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ५६ धावा केल्या. केएल राहुल ३० धावांवर बाद झाला आणि भारताला पहिला धक्का बसला. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीने धवन सोबत संघाला १२० पर्यंत मजल मारून दिली. धवनने अर्धशतक पूर्ण केले आणि तो बाद झाला. त्याने ३६ चेंडूत ५२ धावा केल्या. वाचा- धवनच्या जागावर आलेल्या संजू सॅमसनने १० चेंडूत १५ धावा केल्या आणि तो बाद झाला. त्यानंतर विराटने धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. पण ४० धावांवर माघारी परतला. त्याने २४ चेंडूत २ चौकार आणि २ षटकार मारले. भारताला अखेरच्या ३ षटकात विजयासाठी ३७ धावा, दोन षटकात २५ धावांची गरज होती. तर अखेरच्या षटकात १४ धावांची गरज होती. पंड्याने दोन षटकार मारत विजय साकारला. भारताकडून हार्दिकने २२ चेंडूत २ षटकार आणि ३ चौकारांसह नाबाद ४२ तर श्रेयस अय्यरने ५ चेंडूत १ षटकार आणि १ चौकारांसह नाबाद १२ धावा केल्या. वाचा- त्याआधी भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन्ही संघात आज प्रत्येकी तीन बदल करण्यात आले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचच्या ऐवजी मॅथ्यू वेड संघाचे नेतृत्व करत होता. तर भारतीय संघात मोहम्मद शमीच्या जागी शार्दुल ठाकूर, मनिष पांडेच्या जागी श्रेयस अय्यर आणि रविंद्र जडेजाच्या जागी युजवेंद्र चहलला संधी देण्यात आली. वेड आणि डार्सी शॉर्टने संघाला चांगली सुरुवात करून दिली. ही जोडी धोकादायक ठरत असताना टी नटराजनने शॉर्टला ९ धावांवर माघारी पाठवले. पण दुसऱ्या बाजूने वेडने धमाकेदार फलंदाजी सुरू ठेवली होती. त्याने २५ चेंडूत अर्धशतक केले. वाचा- वॉशिंग्टन सुंदरच्या आठव्या षटकात वेडने मारलेला चेंडू विराटकडे कॅच आला होता. पण त्याने तो सोडला. याच चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न करताना तो धावबाद झाला. त्याच्या जागी आलेल्या मॅक्सवेलने आक्रमक फलंदाजी केली. पण धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. शार्दुल ठाकूरने त्याची विकेट घेतली. वनडेत भारतीय गोलंदाजांची धुलाई करणाऱ्या स्मिथने आज आक्रमक फलंदाजी केली. चहलने १८व्या षटकात त्याला ४७ धावांवर बाद केले. १९व्या षटकात नटराजनने हेनरिकेसची विकेट घेत ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का दिला. भारताकडून टी नटराजनने सर्वाधिक २ विकेट घेतल्या. तर चहल आणि ठाकूरने प्रत्येकी १ विकेट घेतली.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3giE8wp

AUS vs IND 2nd T20: भारतीय गोलंदाजांची सिडनीत पुन्हा धुलाई; विजयासाठी हव्यात १९५ धावा

सिडनी: भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० लढतीत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीकरत ५ बाद १९४ धावा केल्या आहेत. भारतीय संघाला मालिका विजयासाठी १९५ धावांची गरज आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. वाचा- ... भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन्ही संघात आज प्रत्येकी तीन बदल करण्यात आले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचच्या ऐवजी मॅथ्यू वेड संघाचे नेतृत्व करत होता. तर भारतीय संघात मोहम्मद शमीच्या जागी शार्दुल ठाकूर, मनिष पांडेच्या जागी श्रेयस अय्यर आणि रविंद्र जडेजाच्या जागी युजवेंद्र चहलला संधी देण्यात आली. वेड आणि डार्सी शॉर्टने संघाला चांगली सुरुवात करून दिली. ही जोडी धोकादायक ठरत असताना टी नटराजनने शॉर्टला ९ धावांवर माघारी पाठवले. पण दुसऱ्या बाजूने वेडने धमाकेदार फलंदाजी सुरू ठेवली होती. त्याने २५ चेंडूत अर्धशतक केले. वाचा- वॉशिंग्टन सुंदरच्या आठव्या षटकात वेडने मारलेला चेंडू विराटकडे कॅच आला होता. पण त्याने तो सोडला. याच चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न करताना तो धावबाद झाला. त्याच्या जागी आलेल्या मॅक्सवेलने आक्रमक फलंदाजी केली. पण धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. शार्दुल ठाकूरने त्याची विकेट घेतली. वनडेत भारतीय गोलंदाजांची धुलाई करणाऱ्या स्मिथने आज आक्रमक फलंदाजी केली. चहलने १८व्या षटकात त्याला ४७ धावांवर बाद केले. १९व्या षटकात नटराजनने हेनरिकेसची विकेट घेत ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का दिला. वाचा- भारताकडून टी नटराजनने सर्वाधिक २ विकेट घेतल्या. तर चहल आणि ठाकूरने प्रत्येकी १ विकेट घेतली.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36KIKs8

India vs Australia 2nd T20 Live Score Update: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

सिडनी: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी-२० सामना आज सिडनी क्रिकेट मैदानावर होणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. आजच्या लढतीत विजय मिळून भारताला मालिका विजय मिळवण्याची संधी आहे. भारताने कॅनबेरा येथे झालेल्या पहिल्या लढतीत ११ धावांनी विजय मिळवला होता. Live अपडेट ( 2nd T20I)>> ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय >> कॅनबेरा येथे झालेल्या पहिल्या टी-२० लढतीत भारताने ११ धावांनी विजय मिळवला होता. >> तीन सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3lKwyfq

सराव सामन्यात अजिंक्य रहणेचे खणखणीत शतक, पृथ्वी आणि गिल शून्यावर बाद

नवी दिल्ली: भारत ए आणि ऑस्ट्रेलिया ए यांच्यात सुरू असलेल्या सराव लढतीत भारताचा कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने जो सध्या या लढतीत कर्णधाराच्या भूमिकेत आहे त्याने शानदार शतकी खेळी केली. राहणे वगळता चेतेश्वर पुजाराने अर्धशतक झळकावले. ऑस्ट्रेलिया ए विरुद्धच्या सराव सामन्यात कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताच्या सलामीवीरांनी निराशा केली. शुभमन गिल आणि पृथ्वी शॉ हे दोघेही शून्यावर बाद झाले. त्यानंतर हनुमा विहारी देखील १५ धावा करून माघारी परतला. भारताची अवस्था ३ बाद ४० अशी झाली होती. तेव्हा पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी त्यांचा अनुभव दाखवला. त्यांनी ७६ धावांची भागिदारी केली, पुजारा ५४ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला वृद्धीमान साहाला भोपळा फोडता आला नाही. तर आर अश्विन देखील पाच धावा करून बाद झाला. वाचा- कुलदीप यादव १५ धावा करून माघारी परतला. दरम्यान अजिंक्य रहाणेने शानदार शतक झळकावले. त्याने १६ चौकार आणि एक षटकार मारला. त्याला चांगली साथ देणारा उमेश यादव २४ धावा करून माघारी परतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारताने ९० षटकात ८ बाद २३७ धावा केल्या होत्या. अजिंक्य रहाणे १०८ धावांवर तर मोहम्मद सिराज शून्यावर नाबाद होता. पृथ्वी शॉने दिले टेन्शन नुकत्याच झालेल्या आयपीएलच्या १३व्या हंगामात पृथ्वी शॉची कामगिरी खराब झाली होती. आता सराव सामन्यात देखील तो अपयशी ठरला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी १७ डिसेंबर रोजी होणार आहे. एडिलेट येथे होणारी पहिली कसोटी डे-नाइट असेल. रोहित शर्मा या लढतीत खेळू शकणार नाही त्यामुळे मयांक अग्रवाल सोबत पृथ्वी शॉ भारतीय डावाची सुरूवात करेल अशी चर्चा होती. पण आता पृथ्वी अपयशी ठरल्याने भारतीय संघ व्यवस्थापन टेन्शनमध्ये आले आहे. पृथ्वीने आतापर्यंत चार कसोटी सामन्यात ५६च्या सरासरीने धावा केल्या आहेत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2JEmyqZ

Saturday, December 5, 2020

IND vs AUS : जडेजाच्या जागी चहलला खेळवणे योग्य की अयोग्य, सुनील गावस्कर यांनी मांडले परखड मत

सिडनी, : पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात रवींद्र जडेजाला दुखापत झाली होती. त्यानंतर आयसीसीच्या नव्या नियमांनुसार युजवेंद्र चहलला भारतीय संघात स्थान देण्यात आले. जडेजाच्या जागी संघात आलेल्या चहलने गोलंदाजी केली आणि त्यानंतर जोरदार टीका व्हायला सुरुवात झाली. पण जडेजाच्या जागी चहलला खेळवणे योग्य आहे की अयोग्य, याबाबत भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी आपले मत व्यक्त केले आहे. याबाबत गावस्कर म्हणाले की, " मी आयसीसीच्या बदली खेळाडूच्या नियमाशी सहमत नाही. तुम्ही मला जुनाट विचारांचे म्हणाल, पण जर तुम्ही बाऊन्सरचा योग्यपणे सामना करू शकत नाही आणि त्यानंतर चेंडू तुमच्या डोक्याला लागतो. तेव्हा माझ्यामते हा पर्याय घेण्याच्या लायक तुम्ही नाही आहात." गावस्कर यांनी पुढे सांगितले की, " सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यावेळी आयसीसीचे सामनाधिकारी हे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डेव्हिड बून होते. जर जडेजाच्या जागी चहलला खेळवताना त्यांना कोणतीही अडचण आली नसेल किंवा प्रश्न पडले नसतील तर माझे काहीच म्हणणे नाही. नियमांनुसार जसा खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे, तसाच बदली खेळाडूही असला पाहिजे. म्हणजे फलंदाज दुखापतग्रस्त झाला तर बदली खेळाडू हा फलंदाजच असायला हवा. जर सामनाधिकारी यांनी भारतीय संघाला जडेजाऐवजी चहलला खेळण्याची परवानगी दिली असेल तर याबाबत मला कोणतीही समस्या नाहीत." रवींद्र जडेजाच्या दुखापतीवर संजय मांजरेकर यांनी उपस्थित केला सवालमांजरेकर म्हणाले की, " जेव्हा जडेजाला मैदानात दुखापत झाली होती तेव्हा फिजिओ त्याला पाहायला मैदानात का गेला नाही. जडेजाच्या डोक्यावर चेंडू आदळला होता. जर कोणत्याही खेळाडूला जेव्हा दुखापत होते, तेव्हा फिजिओ लगेच धावत मैदानात जातात. खेळाडूला कुठे दुखापत झाली आहे ते पाहतात, त्याचबरोबर त्याच्यावर उपचार करून तो खेळू शकणार की नाही, हेदेखील सांगतात. पण जडेजाच्या बाबतीत मात्र तसे झालेले पाहायला मिळाले नाही. त्यानंतर उशिराने सामना सुरु झालेला पाहायला मिळाला."


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39HioJD

IND vs AUS : रवींद्र जडेजाच्या दुखापतीवर संजय मांजरेकर यांनी उपस्थित केला सवाल, म्हणाले...

सिडनी, : भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात दुखापत झाली होती. पण या दुखापतीनंतर भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत. कारण दुखापतीनंतर जडेजा खेळू शकणार नव्हता. त्यामुळे आयसीसीच्या नियमानुसार युजवेंद्र चहलला संघात स्थान देण्यात आले आणि चहलने तीन विकेट्स घेत सामना फिरवला होता. याबाबत मांजरेकर म्हणाले की, " जेव्हा जडेजाला मैदानात दुखापत झाली होती तेव्हा फिजिओ त्याला पाहायला मैदानात का गेला नाही. जडेजाच्या डोक्यावर चेंडू आदळला होता. जर कोणत्याही खेळाडूला जेव्हा दुखापत होते, तेव्हा फिजिओ लगेच धावत मैदानात जातात. खेळाडूला कुठे दुखापत झाली आहे ते पाहतात, त्याचबरोबर त्याच्यावर उपचार करून तो खेळू शकणार की नाही, हेदेखील सांगतात. पण जडेजाच्या बाबतीत मात्र तसे झालेले पाहायला मिळाले नाही. त्यानंतर उशिराने सामना सुरु झालेला पाहायला मिळाला." जडेजाला सामन्यात दोनवेळा दुखापत झाली. पहिल्यांदा जडेजाच्या पायाचे स्नायू दुखावले होते. तेव्हा जडेजा थोडा लंगडत चालत होता. पण काही वेळातच तो बरा झाला. पण त्यानंतर जडेजाच्या हॅल्मेटवर एक चेंडू आदळला होता. त्यावेळी जडेजा चक्क मैदानात बसला होता. पण तरीही भारताचे फिजिओ त्याला पाहायला मैदानात गेले नाहीत. पण त्यानंतर जडेजाने फलंदाजी केली होती. पण पहिला डाव संपल्यावर जडेजा दुखापतग्रस्त असून ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे तो सामना खेळू शकला नव्हता. त्यामुळे जर दुखापत होऊनही जडेजा फलंदाजी करत असेल तर तो गोलंदाजी करायला मैदानात का आला नाही, असा सवालही बरेच जणं विचारायला लागले आहेत. याबाबत मांजरेकर यांनी सांगितले की, " दुखापतीनंतर जडेजाने फलंदाजी केली, पण त्याचा जास्त फायदा झाला नाही. कारण त्यानंतर भारतीय संघाने फक्त ९ धावा जमवल्या. पण जडेजाला चेंडू लागल्यावर २-३ मिनिटांमध्ये भारताचे फिजिओ मैदानात आलेले पाहायला मिळाले नाही. जर फिजिओ मैदानात आले असते तर विश्वसनीयता वाढली असती. पण तसे झाले नाही. त्यामुळेच या प्रकरणावर आता काही जणं टीका करत आहेत." मांजरेकर यांनी दुखापतीनंतर जडेजाच्या फलंदाजीने जास्त फायदा झाला नसल्याचे यावेळी सांगितले. त्याचबरोबर जडेजाच्या दुखापतीच्या विश्वसनियतेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. कारण जडेजाला मैदानात दुखापत झाल्यावर फिजिओ गेला नाही, पण त्याची दुखापत गंभीर असल्याचे नंतर समजले. त्यामुळे या सर्व प्रकरणावर आता जोरदार टीका सुरु आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2JRLBGU

IND vs AUS : रविवारी भारताला ट्वेन्टी-२० मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी, ही आहेत महत्वाची कारणं

सिडनी, : भारताला रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धची ट्वेन्टी-२० मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. भारताला एकदिवसीय मालिका १-२ अशी गमवावी लागली होती. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाला पराभवाची परतफेड करण्याची भारताकडे रविवारी सर्वात मोठी संधी आहे. दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसू शकतो, असे म्हटले जात आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचला भारताविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात दुखापत झालेली आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात तो खेळणार की नाही, याबाबतचा निर्णय उद्याच घेण्यात येणार आहे. डेव्हिड वॉर्नरला यापूर्वीच दुखापत झाली असून तो या मालिकेत खेळणार नाही. त्यामुळे आता फॉर्मात असलेला फिंच जर खेळणार नसेल तर ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कमकुवत होऊ शकते. त्यामुळे ऑस्ट्रेलियावर आता मालिका पराभवाचे संकट ओढावले आहे. त्यामुळे या गोष्टीचा चांगलाच फायदा भारतीय संघाला होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात दमदार विजय मिळवला होता. ही मालिका तीन सामन्यांची आहे. त्यामुळे रविवारी होणाऱ्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात जर भारताने विजय मिळवला तर त्यांना २-० अशी विजयी आघाडी मिळता येऊ शकते. त्याचबरोबर पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यावर भारतीय संघाचे मनोबल उंचावलेले असेल आणि या गोष्टीचा भारतीय संघाला चांगला फायदा होऊ शकतो. त्यामुळए हा सामना जिंकून भारतीय संघ मालिकेत विजयी आघाडी घेतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. भारतीय संघाने पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात दमदार विजय मिळवला. या विजयासह भारताने ट्वेन्टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो, यावर सर्वांचे लक्ष असेल. त्याचबरोबर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी हा निर्णायक सामना असेल. कारण या सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला तर या मालिकेतील त्यांचे आव्हान संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे या सामन्यात नेमका कोणता संघ बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये दुसरा ट्वेन्टी-२० सामना हा उद्या रविवारी होणार आहे. या सामन्यात भारतीय संघात तीन बदल होऊ शकतात. कारण हा सामना भारतासाठी महत्वाचा असेल. कारण या सामन्यात जर भारताने विजय मिळवला तर त्यांना ट्वेन्टी-२० मालिका जिंकता येऊ शकते.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mJD9rO

IND vs AUS : विराट कोहलीसाठी वेगळे नियम का, वीरेंद्र सेहवागने केली जोरदार टीका

सिडनी, : भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागने कर्णधार विराट कोहलीवर जोरदार टीका केली आहे. भारतीय संघात कोहलीसाठी वेगळे नियम का, असा सवाल त्याने यावेळी उपस्थित केला आहे. सेहवाग म्हणाला की, " भारतीय संघात सर्व खेळाडूंसाठी सारखेच नियम असायला हवेत. पण सध्याच्या घडीला मात्र तसे दिसत नाही. कारण कर्णधार विराट कोहलीसाठी मात्र वेगळेच नियम लागू पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. विराटच्या फलंदाजी क्रमवारीत कोणतेही बदल पाहायला मिळत नाहीत. त्याचबरोबर विराट जर फॉर्मात नसेल तर त्याला विश्रांती देण्यात येत नाही. ही गोष्ट चुकीची आहे, असे मला तरी वाटते." पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले होते. या सामन्यात श्रेयस अय्यरला डच्चू देण्यात आला होता. श्रेयस सध्या जास्त धावा करत नाही, त्यामुळे त्याला वगळण्यात आले असावे. त्याचबरोबर सलामीवीर मयांक अगरवाललाही चांगली फलंदाजी करत नसल्यामुळे त्याला पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात संधी दिली नसावी. पण दुसरीकडे विराटलाही आतापर्यंत मोठी खेळी साकारता आलेली नाही आणि कामगिरीत सातत्य ठेवता आलेले नाही. त्यामुळे कोहलीला संघात स्थान कसे मिळते, यावर सेहवागने बोट ठेवले आहे. पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात मनीष पांडेला भारतीय संघाने संधी दिली होती. पण या सामन्यात तो सपशेल अपयशी ठरला होता. त्यामुळे दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात मनीषला संघातून डच्चू देण्यात येऊ शकतो. कारण पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात श्रेयस अय्यरला बाहेर ठेवण्यात आले होते. त्यामुळे या सामन्यात श्रेयसला संघात स्थान देण्यात येऊ शकते. कारण आयपीएलमध्येही श्रेयसने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात संधी मिळू शकते. पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात फलंदाजी करताना जडेजाच्या पायांचे स्नायू दुखावले होते. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे तो या सामन्यात गोलंदाजी करू शकत नव्हता. जडेजाच्या जागी चहलला भारतीय संघात स्थान देण्यात आले आणि त्याने गोलंदाजीही केली. पण आता आगामी दोन सामन्यांसाठी संघात मुंबईकर युवा गोलंदाज शार्दुल ठाकूरची एंट्री झाली आहे. शार्दुलने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात गोलंदाजी केली होती. या सामन्यात संधीचे सोने करत त्याने तीन विकेट्स मिळवल्या होत्या आणि तो मॅचविनर ठरला होता.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mMIzlB

हिंदूंवर योगराज सिंग यांची जहरी टीका, शेतकऱ्यांच्या आंदोलनातील व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : युवराज सिंगचे वडिल आणि भारताचे माजी क्रिकेटपटू योगराज यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात हिंदूंवर जहरी टीका केली आहे. हे हिंदू गद्दार आहेत, असे समाजामध्ये फूट पाडणारे वक्तव्य योगराज यांनी केले आहे. योगराज यांच्या या भाषणाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. हे हिंदू गद्दार आहेत, शंभर वर्षे त्यांनी मुघलांची गुलामी केली, असे भडक विधान योगराज यांनी आपल्या भाषणामध्ये केले होते. त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका व्हायला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर योगराज यांना अटक करावी, अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे. त्यामुळे आता योगराज सिंग यांना सरकार अटक करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. योगराज यांचे भाषण दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणारे आहे. या आंदोलनामध्ये भडकावू भाषण करून योगराज यांना आपल्याकडे सर्वांचे लक्ष वेधून घ्यायचे आहे, अशी टीका त्यांच्यावर होत आहे. त्याचबरोबर कोणी कितीही प्रयत्न केला तरी या दोन समाजांना कोणीही वेगळे करू शकत नाही, असा सूर सोशल मीडियावर योगराज यांच्या भाषणानंतर पाहायला मिळत आहे. यानंतर योगराज यांच्या अटकेची मागणीही जोर धरू लागली आहे. करोनाकाळातही नव्या कृषी कायद्याविरोधात हरयाणा आणि पंजाबचे शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांविरोधात 'बळाचा वापर' करण्याच्या भाजप सरकारचा निषेध करत आपले पुरस्कार परत करण्याचा निर्णय या खेळाडूंनी घेतला आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला दिवसेंदिवस क्रीडा क्षेत्रातूनही चांगलाच पाठिंबा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार सन्मानित अनेक माजी खेळाडूंनी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचं समर्थन केले आहे. केंद्र सरकारनं नवीन कृषी कायदा रद्द करावा किंवा किमान हमीभावाची तरतुदी कायद्यात करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. त्यामुळे सरकारच्या विरोधानंतर हे आंदोनल चिघळलेले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आता क्रीडापटूही पुढे सरसावलेले पाहायला मिळत आहेत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mXKeVT

IND vs AUS : दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाला बसू शकतो मोठा धक्का, मालिका गमावण्याचे संकट

सिडनी, : दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसू शकतो, असे म्हटले जात आहे. त्यामुळे आता मालिका गमावण्याचे संकट त्यांच्यावर आले आहे. कारण संघातील दुखापती वाढल्या असून एक महत्वाचा खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचला भारताविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात दुखापत झालेली आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात तो खेळणार की नाही, याबाबतचा निर्णय उद्याच घेण्यात येणार आहे. डेव्हिड वॉर्नरला यापूर्वीच दुखापत झाली असून तो या मालिकेत खेळणार नाही. त्यामुळे आता फॉर्मात असलेला फिंच जर खेळणार नसेल तर ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कमकुवत होऊ शकते. त्यामुळे ऑस्ट्रेलियावर आता मालिका पराभवाचे संकट ओढावले आहे. फिंच नसल्यावर कोणाला मिळणार कर्णधारपद फिंच हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात जर फिंच खेळला नाही तर कर्णधारपद कोणाकडे द्यायचे, हा प्रश्न ऑस्ट्रेलियाच्या संघापुढे असेल. पण फिंच जर खेळणार नसेल तर स्टीव्हन स्मिथकडे ऑस्ट्रेलियाच्या संघाचे नेतृत्व जाऊ शकते, असे म्हटले जात आहे. कारण यापूर्वी स्मिथने ऑस्ट्रेलियाच्या संघाचे कर्णधारपद भूषवले आहे. त्याचबरोबर सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियाचा संघ या मालिकेत अडचणीत आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी दुसरा सामना जिंकणे, महत्वाचे असेल. कारण हा सामना जिंकला तर ऑस्ट्रेलियाच्या संघाला मालिका गमवावी लागणार आहे. त्यामुळे या सामन्यात फिंच खेळणार नसेल तर अनुभवी स्मिथकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात येऊ शकते. पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय संघाने दमदार विजय मिळवला. या विजयासह भारताने ट्वेन्टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो, यावर सर्वांचे लक्ष असेल. त्याचबरोबर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी हा निर्णायक सामना असेल. कारण या सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला तर या मालिकेतील त्यांचे आव्हान संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे या सामन्यात नेमका कोणता संघ बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ga9Ax2

IND vs AUS : दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात 'हे' तीन बदल

सिडनी, : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये दुसरा ट्वेन्टी-२० सामना हा उद्या रविवारी होणार आहे. या सामन्यात भारतीय संघात तीन बदल होऊ शकतात. कारण हा सामना भारतासाठी महत्वाचा असेल. कारण या सामन्यात जर भारताने विजय मिळवला तर त्यांना ट्वेन्टी-२० मालिका जिंकता येऊ शकते. दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय संघात दोन बदल होऊ शकतात. कारण अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा दुखापतीमुळे या सामन्यात खेळणार नाही. जडेजाच्या जागी पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात संघात युजवेंद्र चहलला संधी देण्यात आली होती. चहलने या संधीचे सोने करत तीन महत्वाच्या विकेट्सही मिळवल्या होत्या. पण जडेजाच्या जागी संघात वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात जडेजाच्या जागी चहलला संधी द्यायची की शार्दुलला, याचा विचार भारतीय संघाला करावा लागणार आहे. पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात मनीष पांडेला भारतीय संघाने संधी दिली होती. पण या सामन्यात तो सपशेल अपयशी ठरला होता. त्यामुळे दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात मनीषला संघातून डच्चू देण्यात येऊ शकतो. कारण पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात श्रेयस अय्यरला बाहेर ठेवण्यात आले होते. त्यामुळे या सामन्यात श्रेयसला संघात स्थान देण्यात येऊ शकते. कारण आयपीएलमध्येही श्रेयसने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात संधी मिळू शकते. पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला संधी देण्यात आली नव्हती. पण भारतीय संघात युवा वेगवान गोलंदाज टी. नटराजनला संधी देण्यात आली होती. या सामन्यात नटराजनने तीन विकेट्स घेत दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय संघात बुमराला संधी देण्यात येईल का, याबाबत थोडी साशंकता आहे.दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय संघात कदाचित मोहम्मद शमीच्या जागी बुमराला संधी देण्यात येऊ शकते. कारण या मालिकेतील वर्कलोड पाहता शमी थोडी विश्रांती देण्यात येऊ शकते. त्यामुळे दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय संघात हा तिसरा बदल होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2JUIXAg

IND vs AUS : रवींद्र जडेजा मालिकेतून बाहेर, 'या' मॅचविनर युवा गोलंदाजाची झाली संघात एंट्री

कॅनबेरा : पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला. कारण या सामन्यात नाबाद ४४ धावांची धडाकेबाज खेळी साकारणाऱ्या रवींद्र जडेजाला दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे त्याला आता ट्वेन्टी-२० मालिकेत खेळता येणार नाही. त्यामुळे आता जडेजाच्या जागी एका भारतीय संघा युवा गोलंदाजाची संघात एंट्री झाली आहे. पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात फलंदाजी करताना जडेजाच्या पायांचे स्नायू दुखावले होते. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे तो या सामन्यात गोलंदाजी करू शकत नव्हता. जडेजाच्या जागी चहलला भारतीय संघात स्थान देण्यात आले आणि त्याने गोलंदाजीही केली. पण आता आगामी दोन सामन्यांसाठी संघात मुंबईकर युवा गोलंदाज शार्दुल ठाकूरची एंट्री झाली आहे. शार्दुलने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात गोलंदाजी केली होती. या सामन्यात संधीचे सोने करत त्याने तीन विकेट्स मिळवल्या होत्या आणि तो मॅचविनर ठरला होता. तिसऱ्या सामन्यात शार्दुलने सर्वात कमी धावा देत सर्वात जास्त विकेट्स मिळवल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात शार्दुलने १० षटकांमध्ये ५३ धावा देत ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना बाद केले. या तीन फलंदाजांमध्ये गेल्या दोन्ही सामन्यात शतके झळकावणाऱ्या स्टीव्हन स्मिथचाही समावेश होता. भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलला पहिल्या ट्वेन्टी सामन्यात अंतिम अकरा खेळाडूंमध्ये संधी देण्यात आली नव्हती. पण या सामन्यात नाबाद ४४ धावांची धडाकेबाज खेळी साकारणाऱ्या रवींद्र जडेजाला दुखापत झाली होती. जडेजाच्या जागी चहलला बदली खेळाडू म्हणून भारतीय संघात स्थान देण्यात आले आणि त्याने या संधीचे सोने केले. चहलने या सामन्यात चार षटकांमध्ये २५ धावा देत तीन विकेट्स मिळवले आणि हाच सामन्याच्या टर्निंग पॉइंट ठरला होता. पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय संघाने दमदार विजय मिळवला. या विजयासह भारताने ट्वेन्टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो, यावर सर्वांचे लक्ष असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2L4MqfT

Friday, December 4, 2020

सलग आठ वर्ष रोहित शर्मा भारताकडून करतोय हा विक्रम; २०२० देखील अपवाद नाही

नवी दिल्ली: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघ सध्या ( ) ला सर्वात जास्त मीस करत आहे. आतापर्यंत झालेल्या तीन वनडे आणि पहिल्या टी-२० सामन्यात भारताला फलंदाजीत चांगली सुरूवात मिळाली नाही. रोहित शर्माने भारताकडून अनेक शानदार फलंदाजी खेळी केली आहे. त्यामुळे भारतीय संघाचा तो मुख्य आधारस्तंभ झाला आहे. वाचा- करोना व्हायरसमुळे या वर्षी फार क्रिकेट सामने झाले नाहीत. त्याच बरोबर रोहित शर्मा देखील दुखापतीमुळे फार क्रिकेट खेळू शकला नाही. रोहितने या वर्षी फक्त ३ वनडे सामने खेळले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत तो दुखापतीमुळे खेळू शकला नाही. तर आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध देखील रोहित संघात नाही. वाचा- या वर्षात फक्त ३ वनडे खेळून रोहित शर्माने भारताकडून या वर्षी एका सामन्यात सर्वाधिक धावा केल्या आहेत. २०२० साली वनडे क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रोहितच्या नावावर आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९ जानेवारी २०२० रोजी झालेल्या सामन्यात शतकी खेळी केली होती. तेव्हा रोहितने ११९ धावा केल्या होत्या. फक्त २०२० नाही तर गेल्या आठ वर्षापासून म्हणजे २०१३ पासून प्रत्येक वर्षी वनडेत भारतीय संघाकडून सर्वात मोठी खेळी रोहितने केली आहे. वाचा- भारतीय संघाचा कर्णधार आणि रन मशिन अशी ओळख असेलल्या विराट कोहलीने वेगाने धावा केल्या असल्या तरी याबाबत मात्र रोहित आघाडीवर आहे. या काळात रोहितने ३ वेळा द्विशतक झळकावली आहेत. २०१३ साली २०९, २०१४ साली २६४ आणि २०१७ साली २००८ अशी द्विशतके त्याने केली आहेत. २०१० ते २०२० या काळात वनडेतील एका डावात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज २०१०- सचिन तेंडुलकर, २०० नाबाद २०११- विरेंद्र सेहवाग, २१९ २०१२- विराट कोहली, १८३ २०१३- रोहित शर्मा, २०९ २०१४- रोहित शर्मा, २६४ २०१५-रोहित शर्मा, १५० २०१६- रोहित शर्मा, १७१ नाबाद २०१७- रोहित शर्मा, २०८ नाबाद २०१८- रोहित शर्मा, १६२ २०१९- रोहित शर्मा, १५९ २०२०- रोहित शर्मा, ११९


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3g8e9rA

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...