दुबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १८ जूनपासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी दोन अंपायर्स आणि मॅच रेफरी कोण असतील यांची घोषणा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने केली आहे. आयसीसीने या प्रतिष्ठेच्या सामन्यासाठी रिचर्ड इलिंगवर्थ आणि मायकल गॉफ यांची मैदानावरील अंपायर्स म्हणून निवड केली आहे. तर इंग्लंडचे माजी सलामीवीर ख्रिस ब्रॉड यांची सामनाधिकारी म्हणून निवड केली आहे. वाचा- यासंदर्बात आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार एलीट पॅनलचे सदस्य रिचर्ड कॅटलब्रो हे टीव्ही अंपायर असतील तर एलेक्स वॉर्फ हे चौथे अंपायर म्हणून भूमिका पार पाडतील. आम्ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी अनुभवी मॅच अधिकाऱ्यांची निवड केल्याचा आम्हाला आनंद आहे, असे आयसीसीचे वरिष्ठ अधिकारी एड्रियन ग्रिफिथ यांनी सांगितले. गेल्या काही वर्षात ज्यांनी सातत्याने चांगले काम केले आहे त्यांची निवड या प्रतिष्ठेच्या लढतीसाठी करण्यात आली आहे. करोना काळात ही गोष्ट सोपी नव्हती. आम्ही त्या सर्वांना शुभेच्छा देतो, असे ग्रिफिथ म्हणाले. वाचा- सामन्यात फायनल मॅचसाठी भारतीय संघ इंग्लंडमध्ये ३ जून रोजी दाखल झाला आहे. त्यानंतर तीन दिवसांनी भारतीय खेळाडूंनी सराव सुरू केला. या उटल न्यूझीलंडचा संघ इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळून भारताविरुद्ध फायनल खेळणार आहे. त्यामुळे त्यांना फायनल सामन्यासाठी फायदा होऊ शकतो असे मत अनेक माजी खेळाडूंनी व्यक्त केले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pC18eQ
No comments:
Post a Comment