लंडन: न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पदार्पण करताना सात विकेट घेणारा जलद गोलंदाज याला इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने निलंबित केले आहे. ओलीने आठ वर्षापूर्वी केलेल्या काही ट्विटमुळे बोर्डाने ही कारवाई केली. ओलीने वर्णद्वेषी ट्विट केले होते. वाचा- ओलीने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीतील पहिल्या दिवशी संबंधित पोस्टबद्दल माफी मागितली होती. त्यानंतर त्याने मैदानात चांगली कामगिरी केली. पण बोर्डाने त्याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबनाची कारवाई केली. आता बोर्डाकडून आणखी एका क्रिकेटपटूवर निलंबनाची कारवाई केली जाऊ शकते. वाचा- इंग्लंडच्या आणखी एका खेळाडूने युवा अवस्थेत वर्णद्वेषी वक्तव्य केले होते. या खेळाडूचे जुने ट्विट विस्डेन.कॉमने समोर आणले आहेत. हा खेळाडू कोण आहे याचे नाव मात्र अद्याप समोर आलेले नाही. कारण त्याचे वय तेव्हा १६ वर्ष होते. विस्डेने त्याच्या ट्विटचे स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. वाचा- ... आता या प्रकरणी ECBकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे. संबंधित वृत्ताची दखल घेण्यात आली आहे. याची चौकशी सुरू करण्यात आली असून योग्य वेळी त्यासंदर्भात माहिती दिली जाईल. ओली रॉबिन्सनवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर काही तासात आणखी एका खेळाडूने आक्षेपार्ह ट्विट केल्याचे समोर आले. ओलीने २०१२ आणि २०१३ मध्ये केलेल्या ट्विटची चौकशी सुरू आहे, असे ईसीबीच्या प्रवक्त्याने सांगितले. वाचा- व्हिडिओ पहिल्या कसोटीनंतर ओलीवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने दुसऱ्या कसोटीत त्याला खेळता येणार नाही. दोन्ही संघात १० जून रोजी दुसरी कसोटी सुरू होणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pB9Vh4
No comments:
Post a Comment