Ads

Wednesday, June 9, 2021

'जर मी ठरवले तर भारत टी-२० वर्ल्डकप जिंकू शकतो'; संघाबाहेर असेलल्या खेळाडूचे वक्तव्य

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचे लक्ष्य न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिपच्या फायनलवर आहे. त्याच बरोबर या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपच्या दृष्टीने भारताची तयारी सुरू आहे. या वर्ल्डकपसाठी भारतीय संघात कोणाला स्थान मिळले याची उत्सुकता आतापासून लागली आहे. अशात भारताच्या एका खेळाडूने वर्ल्डकप संदर्भात महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. वाचा- सध्या भारतीय संघातून बाहेर असलेला विकेटकीपर आणि फलंदाज लवकरच नव्या भूमिकेत दिसणार आहे. आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिपच्या फायनल सामन्यासाठी दिनेश कार्तिक समालोचन करताना दिसणार आहे. कार्तिकला माजी फलंदाज सुनील गावस्कर यांच्या समालोचन टीममध्ये स्थान देण्यात आले आहे. वाचा- कार्तिक नव्या भूमिकेत असला तरी सध्या आयपीएलमध्ये मध्ये खेळणाऱ्या भारताच्या या विकेटकीपरची नजर भारतीय संघाकडून पुन्हा खेळण्याची आहे. एका मुलाखतीत कार्तिकने सांगितले की टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघात स्थान मिळवायचे आहे. जर तुम्ही माझे टी-२० मधील आकडेवारी पाहिले. मग ते देशांतर्गत क्रिकेट असे की आयपीएल, ते पाहता मला १०० टक्के भारतीय संघात स्थान मिळाले पाहिजे. मला विश्वास आहे की भारतीय संघात स्थान मिळले. बाकी निवड समितीवर अवलंबून आहे की ते काय विचार करतात, असे कार्तिक म्हणाला. वाचा- भारतीय संघात मी मधळ्या फळीत फिनिशरची भूमीका पार पाडू शकतो. मला वाटते की मधळ्या फळीत मी योगदान देऊ शकतो. टी-२० वर्ल्डकपमध्ये स्वत:चे कौशल्य दाखवू शकतो. मी खेळपट्टीवर जाऊन प्रभाव सोडू शकतो. याच एका कारणामुळे भारतीय संघात माझी गरज आहे. गेल्या वेळी मी त्यांना त्याचा नमुना देखील दाखवला होता. मी जर कौशल्य दाखवले तर भारताकडे वर्ल्डकप जिंकण्याची चांगली संधी आहे, असे कार्तिकने सांगितले.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3z7jicF

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...