लंडन: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल लढतीसाठी भारतीय संघाने इंग्लंडमध्ये अभ्यास सुरू केला आहे. साउथम्टन येथे होणाऱ्याया लढतीसाठी विराट आणि कंपनी जोरदार तयारी करत आहे. पण या लढती आधी न्यूझीलंड संघाने भारताला गंभीर इशारा दिला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १८ जूनपासून सुरू होणाऱ्या या लढतीआधी केन विलियमसनच्या नेतृत्वाखाली खेळणारा न्यूझीलंडचा संघ लयमध्ये दिसतोय. इंग्लंडविरुद्ध झालेला पहिला कसोटी सामना ड्रॉ करण्यात त्यांना यश आले. पावसामुळे या कसोटी सामन्यातील काही वेळ वाया गेला असला तरी सामन्यावर न्यूझीलंडचे वचर्स्व दिसत होते. न्यूझीलंडच्या या शानदार कामगिरीने भारतीय संघाला इशारा मिळाला आहे. वाचा- न्यूझीलंडचा सलामीवीर डेवोन कॉन्वेचे द्विशतक, टीम साउदीची गोलंदाजी याचा केनने भरपूर फायदा घेतला. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीनंतर भारतीय संघासाठी न्यूझीलंडविरुद्धची अंतिम लढत सोपी असणार नाही हे स्पष्ट झाले आहे. पदार्पणाच्या सामन्यात कॉन्वेने शानदार फलंदाजी करत द्विशतक झळकावले. त्याने या एका सामन्यात अनेक विक्रम मागे टाकले. कॉन्वेच्या द्विशतकामुळे न्यूझीलंडला पहिल्या डावात मोठी धावसंख्या करता आली. यामुळे WTC फायनलसाठीचा त्याचा विश्वास वाढला असेल. तर भारतीय संघाचे टेन्शन नक्कीच वाढले असेल. वाचा- दुसरीकडे गोलंदाजीत टीम साउदीने इंग्लंडविरुद्ध शानदार कामगिरी केली. त्याने पहिल्या डावात ६ तर दुसऱ्या डावात एक विकेट घेतली. साउदी चेंडू हवेत स्विंग करण्यासाठी ओळखला जातो. त्याने इंग्लंडमधील परिस्थितीचा पूरेपूर फायदा घेतला. साउदीकडे ७८ कसोटी सामन्याचा अनुभव असून ३०८ विकेट घेतल्या आहेत. साउदीची गोलंदाजी भारतासाठी डोकेदुखी ठरू शकते. डावाच्या सुरुवातीला शुभमन गिल आणि रोहित शर्माला तो अडचणीत टाकू शकतो. वाचा- WTC फायनलच्या आधी भारतीय संघ एकही सराव सामना खेळणार नाही. तर न्यूजीलंड तोपर्यंत दोन कसोटी सामने खेळले असेल. विराट आणि कंपनीने अखेरची लढत मार्च महिन्यात खेळली होती. तेव्हा भारताने इंग्लंडचा घरच्या मैदानावर पराभव केला होता. भारतीय संघातील खेळाडूंनी अखेरचे आयपीएल खेळले आहे. त्यामुळे सरावाची कमतरता भारताला अडचणीत आणू शकते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2T2VQga
No comments:
Post a Comment