नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाकडून खेळणारा पण गेल्या काही वर्षापासून संघातून बाहेर असणारा अनुभवी फिरकीपटू अचानक चर्चेत आला आहे. हरभजन सिंग चर्चेत येण्याचे कारण क्रिकेट नव्हे तर त्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्ट आहे. वाचा- हरभजन सिंगने रविवारी खलिस्थानी दहशतवादी याच्या पुण्यतिथी निमित्ताने त्याला अभिवादन करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. त्याच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर टर्बनेटरवर जोरदार टीका सुरू झाली. भारतीय संघातून बाहेर असलेला हरभजन सिंग सध्या आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. त्याने इस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली यात दहशतवादी जनरल सिंग भिंडरावाले याला शहीद म्हटले आणि त्याला अभिवादन केले. स्टोरी मध्ये तो म्हणतो, सन्मानासह जगणे आणि मृत्यू पत्करणे. १ जून ते ६ जून १९८४ या काळात सुवर्ण मंदिरात शहीद होणाऱ्या सर्वांना कोटी कोटी प्रणाम! वाचा-
हरभजनच्या या पोस्टनंतर तो ट्विटवर ट्रेंड मध्ये आला. अनेकांनी त्याच्यावर टीक करण्यास सुरुवात केली. पण हरभजनकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. हरभजनने त्याच्या पोस्टमध्ये भिंडरावालेचा निळ्या फेट्यातील फोटो लावला आहे. खलिस्तानी नेता भिंडरावाले ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये मारला गेला होता. वाचा- गेल्या काही वर्षांपासून हरभजनला भारतीय संघात स्थान मिळाले नाही. आयपीएलच्या २०२१च्या हंगामात तो कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळताना दिसला होता. त्याच्या आधी हरभजन चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सकडून देखील खेळला आहे. भज्जीने भारताकडून १०३ कसोटीत ४०७ तर २३६ वनडेत २६९ विकेट घेतल्या आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2SeZGCK
No comments:
Post a Comment