नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या फायनल सामन्यासाठी आता भारताच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघाने यावेळी आपला दमदार संघ या विश्व अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या फायनलसाठी निवडला आहे. भारताचे कर्णधारपद यावेळी विराट कोहलीकडे कायम आहे, तर उपकर्णधारपद अजिंक्य राहणेकडे कायम आहे. या संघात रिषभ पंत आणि वृद्धिमान साहा असे दोन यष्टीरक्षक असतील. भारताच्या डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि शुभमन गिल हे दोघे करणार आहेत. त्यानंतर तिसऱ्या स्थानावर चेतेश्वरर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे हे मातब्बर फलंदाज असतील. त्याचबरोबर हनुमा विहारीसारख्या अष्टपैलू खेळाडूला या सामन्यासाठी संघात स्थान देण्यात आले आहे. या संघात पाच वेगवान गोलंदाजांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि इशांत शर्मा यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे. भारतीय संघाच्या डावाची सुरुवात यावेळी रोहित शर्मा आणि शुभमन गिल करतील. त्यानंतर चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांचे स्थान जवळपास निश्चित आहे. या सामन्यात हनुमा विहारीला संधी मिळणार की नाही, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल. कारण ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात त्याेन चमकदार कामगिरी केली होती. त्याचबरोबर या संघात रवींद्र जडेजा आणि आर. अश्विन हे दोन फिरकीपटू आहेत. भारतीय संघासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पाचपैकी कोणत्या वेगवान गोलंदाजांना या सामन्यात संधी द्यायची. कारण आतापर्यंत या पाचही वेगवान गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे आता या पाचपैकी तीन किंवा चार वेगवान गोलंदाजांना निवडणे भारतीय संघासाठी सोपे नसेल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ऐतिहासिक फायनल मॅच जिंकणाऱ्या विजेत्या संघाला आयसीसीकडून ११.७१ कोटी रुपये मिळणार आहेत. तर उपविजेत्या संघाला ५.८ कोटी रुपये मिळणार आहेत. पाहा न्यूझीलंडचा संघ...केन विलियमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डोवोन कॉन्वे, कॉलिन डी ग्रँडहोमे, मॅट हेन्नरी, काइल जॅमीसन, टॉम लँथम, हेन्नरी निकोल्स, एजाज पटेल, टीम साउदी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वॉटलिंग, विल यंग.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3wtEJTh
No comments:
Post a Comment