साउदम्प्टन: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध जर भारतीय संघाला विजय मिळवायचा असेल तर कर्णधार विराट कोहलीला महत्त्वाची भूमिका बजवावी लागले. भारताच्या सर्व चाहत्यांना हीच अपेक्षा असेल की या सामन्यात चांगली धावसंख्या करेल. याच बरोबर विराटला आयसीसीच्या स्पर्धेचे पहिल्यांदा विजेतेपद मिळवण्याची संधी आहे. वाचा- विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये नोव्हेंबर २०१९ नंतर एक देखील शतक झळकावले नाही. त्याने अखेरचे शतक कोलकातामध्ये बांगलादेशविरुद्धच्या डे-नाइट कसोटीत झळकावले होते. न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या फायनल मॅचमध्ये जर त्याने शतक झळकावले तर एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड त्याच्या नावावर होणार आहे. वाचा- घोषणा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक शतक करण्याचा विक्रम विराटच्या नावावर होऊ शकतो. याबाबत तो ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगला मागे टाकू शकतो. या दोन्ही दिग्गज खेळाडूंच्या नावावर कर्णधार म्हणून प्रत्येकी ४१ शतकांची नोंद आहे. न्यूझीलंडविरुद्ध शतक करून विराटला पॉन्टिंगला मागे टाकण्याची संधी आहे. वाचा- इंग्लंडमध्ये विराटने २०१८ साली जशी कामगिरी केली होती तशी कामगिरी केल्यास भारताला विजेतेपद मिळू शकते. विराट स्वत:ला वेळ देण्याचा प्रयत्न करेल. असे झाले तर २०१८च्या इंग्लंड दौऱ्या प्रमाणे तो धावा करू शकेल. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ww4zq2
No comments:
Post a Comment