साउदम्प्टन: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल जिंकण्यासाठी दोन्ही संघाचे कर्णधार जोरदार प्रयत्न करतील यात काही शंका नाही. विराट कोहली () आणि केन विलियसमन () हे दोन्ही खेळाडू १९ वर्षाखालील क्रिकेटपासून एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. दोन्ही कर्णधार आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेचे पहिले विजेतेपद मिळवण्यास उत्सुक असतील. जाणून घेऊयात फायनल सामन्यात कर्णधाराची भूमिका आणि कामगिरी किती आणि कशी महत्त्वाची आहे ते... वाचा- साउदम्प्टनच्या द रोझ बाऊल स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात जो कर्णधार योग्य संघ आणि धोरणासह मैदानात उतरेल तसेच योग्य वेळी योग्य निर्णय घेईल तोच संघ विजय ठरले. कर्णधार म्हणून या दोन्ही खेळाडूंमध्ये मैदानावर मोठी चुरस पाहायला मिळले. पण त्याच बरोबर फलंदाज म्हणून देखील या दोघांवर मोठी जबाबदारी असले. विराट आणि केन हे दोघेही त्यांच्या संघातील फलंदाजीचे मुख्य स्तंभ आहेत. या दोघांच्या कामगिरीचा परिणाम संघांच्या विजयावर होणार आहे. वाचा- ... विराट कोहली आणि केन विलियमसन हे दोन्ही खेळाडू कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज मानले जातात. केन एक शानदार फलंदाज आहे. पण जेव्हा भारताविरुद्ध कसोटीमधील त्याच्या कामगिरीचा विचार केला जातो तेव्हा फार दिलासादायक चित्र दिसत नाही. केनने भारताविरुद्धच्या ११ कसोटीतील २० डावात ३६.४०च्या सरासरीने ७२८ धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतकांचा देखील समावेश आहे. १३१ ही त्याची भारताविरुद्धची सर्वोत्तम खेळी आहे. ११ कसोटीत ३७ची सरासरी ही कामगिरी फार चांगली म्हणता येणार नाही. वाचा- दुसऱ्या बाजूला भारताचा कर्णधार विराट कोहलीची न्यूझीलंडविरुद्धची कामगिरी दमदार आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्ध आतापर्यंत ९ कसोटीतील १७ डावात ५१.५३च्या सरासरीने ७७३ धावा केल्या आहेत. यात ३ शतकांचा समावेश आहे. न्यूझीलंडविरुद्ध २११ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. विराटची सरासरी ५०च्या पुढे असल्याने न्यूझीलंडविरुद्ध त्याची कामगिरी सातत्यपूर्ण असल्याचे दिसते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3vrl8Ss
No comments:
Post a Comment