लंडन: बुधवारी रात्री इंग्लंडच्या चार महिन्यांच्या दौऱ्यासाठी भारताचा पुरुष आणि महिला संघ मुंबईतून रवाना झाले. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या कुटुंबियांसह सर्वजण इंग्लंडमध्ये गुरुवारी पोहोचले आहेत. भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू केएल राहुलने इंग्लंडच्या भूमीवर पोहोचल्यानंतर विमानतळावरील एक फोटो इस्टाग्रामवर शेअर केला. वाचा- भारतीय संघातील खेळाडूंनी बीसीसीआयने एका चार्टड विमानाने सुरक्षितपणे इंग्लंडमध्ये पोहोचवले. भारतीय खेळाडू विमानतळावरून थेट हॉटेलमध्ये रवाना झाले. खेळाडू ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत ते स्टेडियमच्या परिसरात आहे. वाचा- आता भारतीय संघाला तीन दिवसांच्या कठोर क्वारंटाइनमध्ये रहावे लागले. त्यानंतर टप्प्या टप्प्याने त्यांना सरावाची परवानगी दिली जाईल त्याच बरोबर करोनाची टेस्ट देखील केली जाणार आहे. राहुलने शेअर केलेल्या फोटोत तो विमानाच्या समोर उभा आहे. हा फोटो शेअर करताना त्याने टचडाउन असे म्हटले आहे. वाचा- वाचा- मुंबई विमानतळावरील भारतीय संघाचे फोटो वाचा- भारताचा इंग्लंड दौरा- संपूर्ण वेळापत्रक WTC फायनल न्यूझीलंडविरुद्ध- १८ ते २२ जून (वेळ-पहाटे साडे तीन), साउथहँप्टन इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका पहिली कसोटी- ४ ते ८ ऑगस्ट, नॉटिंघम दुसरी कसोटी- १२ ते १६ ऑगस्ट, लॉर्ड्स तिसरी कसोटी- २५ ते २९ ऑगस्ट, लीड्स चौथी कसोटी- २ ते ६ सप्टेंबर, द ओव्हल पाचवी कसोटी- १० ते १४ सप्टेंबर, मॅनचेस्टर असा आहे भारतीय संघ- रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, , अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, , ऋद्धीमान साहा स्टॅडबाय खेळाडू- अभिमन्यू ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, अवेश खान, अर्जन नागवासवाला
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3g4HKTl
No comments:
Post a Comment