लंडन: इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिली लढत ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर होत आहे. या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खराब सुरुवातीनंतर न्यूझीलंडचा सलामीवीर याने शतक झळकावत संघाला समाधनकारक धावसंख्या उभी करून दिली. वाचा- पहिल्या दिवशी पदार्पणातच लॉर्ड्स मैदानावर शतक झळकावताना कॉन्वेने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा २५ वर्ष जुना विक्रम मोडला होता. त्यानंतर सामन्याच्या दुसऱ्या दिवशी १५० धावा करत त्याने आणखी एक विक्रम केला. वाचा- कॉन्वेने १५४वी धाव घेत इंग्लंडमध्ये कोणत्याही सलामीवीराकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला. पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या कॉन्वेला न्यूझीलंडने मोठी संधी दिली. या संधीचे त्याने सोने केले. प्रथम त्याने ९१ चेंडूत ६ चौकारांसह अर्धशतक नंतर १६३ चेंडूत ११ चौकारांसह शतक पूर्ण केले. त्यानंतर २५८ चेंडूत १८ चौकारांसह १५० धावा केल्या. न्यूझीलंडकडून अशी कामगिरी करणारा तो १२वा फलंदाज ठरला. वाचा- पहिल्या दिवशी १३२वा धावा घेताच गांगुलीचा विक्रम ( ) मागे टाकल्यानंतर कॉन्वेने डब्ल्यू सी ग्रेस यांनी केलेला १४१ वर्ष जुना विक्रम मोडला. १९८० साली इंग्लंडकडून पदार्पण करताना ग्रेस यांनी १५३ धावा केल्या होत्या. इंग्लंडच्या भूमीवर पदार्पणात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आता कॉन्वेच्या नावावर जमा झाला आहे. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Tv0gfM
No comments:
Post a Comment