दुबई: म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वर्ल्डकप आयोजनासंदर्भात एक मोठा बदल केला आहे. आयसीसीकडून आयोजित केल्या जाणाऱ्या मोठ्या स्पर्धांचे आयोजनाच्या प्रक्रियेवर आता वापरल्या जाणाऱ्या पद्धतीवर त्यांनी युटर्न घेतला आहे. वाचा- आयसीसीच्या स्पर्धांच्या यजमानपद मिळवण्यासाठी जगभरातील क्रिकेट बोर्डांना बोली लावावी लगत असे. पण आता तसे होणार नाही. या स्पर्धांचे आयोजन कुठे करावे याचा निर्णय आयसीसी बोर्ड करणार आहे. स्पर्धांच्या आयोजनासाठी बोली लावण्याचा निर्णय ऑक्टोबर २०१९ साली घेण्यात आला होता. आयसीसीकडून घेण्यात आलेला हा सर्वात वादग्रस्त असा निर्णय ठरला होता. वाचा- मंगळवारी झालेल्या आयसीसीच्या बैठकीत एफटीपी संदर्भात काही निर्णय घेण्यात आले. यात २०१४ ते २०३१ या काळातील आयसीसीद्वारे आयोजित स्पर्धांचे यजमानपद कोणाला द्यायचे याचा निर्णय बोर्ड करले. अर्थात ही निवड कशी केली जाईल याबाबत अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही. पण यामुळे बोली लावून यजमानपद मिळवण्याचा निर्णयाचा विरोध करणारे बोर्ड आनंदी झाले आहेत. अशा विरोध करणऱ्यांमध्ये इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचा देखील समावेश होता. वाचा- पुढील काळात सर्व पुरुष आणि महिला तसेच १९ वर्षाखालील स्पर्धांसाठी बोली लावण्या ऐवजी यजमानपदासाठी निवड प्रक्रिया राबवली जाईल. आयसीसीच्या भविष्यातील कार्यक्रमात चॅम्पियन्स ट्रॉफीचा समावेश करण्यात आला आहे. त्याच बरोबर प्रत्येक दोन वर्षांनी टी-२० वर्ल्डकप असेल. वाचा- एक जून रोजी झालेल्या बैठकीत आयसीसीने प्रत्येक वर्षी किमान एक तरी मोठी स्पर्धा आयोजित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या वर्षी दोन मोठ्या स्पर्धा आहेत. एक म्हणजे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि दुसरी भारतात होणारा टी-२० वर्ल्डकप होय.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3z99U8q
No comments:
Post a Comment