साउदम्प्टन: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलची प्रतिक्षा करणाऱ्या कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाइट बातमी आली आहे. फायनल सामन्याच्या पहिल्या दिवशी साउदम्प्टन येथे जोरदार पाऊस सुरू असल्याने पहिल्या सत्रात खेळ होणार नाही, अशी अपडेट भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने () दिले आहेत. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार काल रात्रीपासून पाऊस पडत आहे. आज सकाळपासून देखील साउदम्प्टन येथे पाऊस सुरूच होता. भारताचे क्रिकेटपटू आर अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी देखील मैदानचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. वाचा- नाणेफेक होण्यास अर्ध्यातासाचा कालावधी शिल्लक असताना बीसीसीआयने ट्विटकरून एक महत्त्वाची अपडेट दिली. WTC फायनल लढतीच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात खेळ होणार नाही, असे बीसीसीआयने म्हटले आहे. या सोबत बीसीसीआयने मैदानाचे फोटो देखील शेअर केले आहेत. वाचा- ... पुढील काही दिवस कसे असेल हवामान हवामान विभागाने याआधीच पुढील पाच दिवस जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. इतक नव्हे तर सामन्यासाठी राखीव ठेवण्यात आलेला सहावा दिवस म्हणजे २३ जून रोजी देखील पाऊस पडणार आहे. साउदम्प्टन येथे ७०- ८० टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. १७ आणि १८ या दोन दिवसात पावसाची शक्यता ८० टक्के इतकी आहे. सामन्याच्या पहिल्या दोन दिवसात वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसऱ्या दिवशी हवामान ढगाळ असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/35y9EC9
No comments:
Post a Comment