साउदम्प्टन: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल इंग्लंडमधील साउदम्प्टन येथे होणार आहे. पण सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसाने हजेरी लावल्याने पहिल्या सत्राचा खेळ होणार नाही. इतक नव्हे तर पुढील पाच दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. वाचा- साउदम्प्टन येथे पडणाऱ्या या पावसामुळे दोन्ही संघांना अडचणी होऊ शकतात. आयसीसीने या सामन्यासाठी एक दिवस राखीव ठेवला आहे. पण जर पाऊस असाच पडला राहिला तर मात्र त्या राखीव दिवसाचा उपयोग होणार नाही. पाऊस आणि ढगाळ वातावरणात जरी सामना सुरू झाला तर खेळपट्टीतून फिरकी गोलंदाजांना मदत मिळणार नाही. वाचा- भारतीय संघाने कालच अंतिम अकरा खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. संघात आर अश्विन आणि रविंद्र जडेजा या दोन फिरकीपटूंचा समावेश करण्यात आलाय. यामुळे भारतीय संघाला मोठा फटका बसू शकतो. खेळपट्टी ओली असल्याने चेंडू जास्त वळणार नाही आणि फिरकी गोलंदाजांना गोलंदाजी करणे अवघड होईल. भारताकडे तीन जलद गोलंदाज आहेत जे वेगवान खेळपट्टीवर कमाल करू शकतील. वाचा- अश्विनने इंग्लंडमध्ये आतापर्यंत ६ कसोटीत १४ विकेट घेतल्या आहेत. जडेजाने ५ कसोटीत १६ विकेट घेतल्या आहेत. अश्विन आणि जडेजा ही जोडी कुंबळे आणि हरभजन सिंग यांच्यानंतरची ही दुसरी यशस्वी जोडी मानली जाते. वाचा- फायनल मॅचवर पावसाचा प्रभाव पडणार आहे. त्यामुळेच संघातील ११ खेळाडूंची निवड महत्त्वाची ठरणार आहे. भारताने प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. तर न्यूझीलंडने अद्याप ती जाहीर केली नाही. आता हवामान आणि खेळपट्टी याचा अंदाज घेऊन केन विलियमसन संघ जाहीर करू शकतो. वाचा- मॅच
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3iU9ooW
No comments:
Post a Comment