साउदम्प्टन: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल लढत वेळेत सुरू होईल का अशा प्रश्न सर्व चाहत्यांना पडला आहे. या लढतीसाठी दोन्ही संघ आणि चाहते मोठ्या काळावधीपासून प्रतिक्षा करत आहेत. अशात काल रात्रीपासून सुरू असलेल्या साउदम्प्टन येथे पावसाने हजेरी लावली आहे. वाचा- साउदम्प्टन येथून जी बातमी येत आहे त्यामुळे चाहत्यांचे टेन्शन वाढत चालले आहे. काल रात्रीपासून साउदम्प्टन येथे जोरदार पावसाची सुरुवात झाली आहे. भारताचा ऑलराउंडर रविंद्र जडेजाने पावसाचा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केलाय. वाचा- काल रात्रभर पाऊस झाल्याने आता असा प्रश्न निर्माण होतो की सामना नियोजित वेळेनुसार सुरू होईल का? भारतीय वेळेनुसार टॉस दुपारी २.३० वाजता तर सामना ३ वाजता सुरू होणार आहे. वाचा- हवामान विभागाने याआधीच पुढील पाच दिवस जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. इतक नव्हे तर सामन्यासाठी राखीव ठेवण्यात आलेला सहावा दिवस म्हणजे २३ जून रोजी देखील पाऊस पडणार आहे. वाचा- इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मॉटी पनेसरने सोशल मीडियावरून हवामानाचे अपडेट दिले आहेत. त्यानुसार पुढील पाच दिवस साउदम्प्टन येथे ७०- ८० टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. १७ आणि १८ या दोन दिवसात पावसाची शक्यता ८० टक्के इतकी आहे. सामन्याच्या पहिल्या दोन दिवसात वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसऱ्या दिवशी हवामान ढगाळ असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3wCZzjk
No comments:
Post a Comment