लंडन: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी फक्त ७ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या या लढती अंतिम ११ मध्ये कोणाला स्थान दिले जाईल याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. अनके दिग्गज खेळाडूंनी अंतिम ११ मध्ये कोणाला स्थान द्यावे याबद्दल त्याची मते सांगितली आहेत. वाचा- भारतीय संघ व्यवस्थापन या सामन्यात चार जलद गोलंदाज खेळवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसे झाले तर संघात फिरकीपटू आणि ऑलराउंडर म्हणून आर अश्विनचा समावेश केला जाऊ शकतो. चार जलद गोलंदाज असताना संघात रविंद्र जडेजाच्या ऐवजी आर अश्विनचा समावेश केला जाऊ शकतो. भारताच्या अनेक माजी क्रिकेटपटूंनी असा संघ सुचवला आहे. वाचा- भारतीय संघाने अश्विनला संघात घेतले तर त्याची न्यूझीलंडविरुद्धची आतापर्यंतची कामगिरी कशी आहे. हे देखील पाहावे लागले. अश्विन कसोटी करिअरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध ६ कसोटी सामने खेळले आहेत. या सहा सामन्यातील ११ डावात त्याने ४८ विकेट घेतल्या आहेत. एका डावात ५९ धावा आणि ७ विकेट तर एका सामन्यात १४० धावा आणि १० विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. न्यूझीलंडविरुद्ध ६ वेळा त्याने पाच विकेट घेतल्या आहेत. तर तीन वेळा १० विकेट घेतल्या आहेत. त्याची सरासरी १६.९७ तर इकॉनमी रेट ३.०७ इतका आहे. वाचा- या उटल जर जडेजाचा विचार केल्यास ६ कसोटीतील १२ डावात त्याने १९ विकेट घेतल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्ध भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये बिशन सिंह बंदी अव्वल स्थानी आहे. त्यांनी १२ कसोटीत ५७ विकेट घेतल्या आहेत. तर ई प्रसन्न यांनी १० कसोटीत ५५ आणि अनिल कुंबळेने ११ कसोटीत ५० विकेट घेतल्या आहेत. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cSCiSP
No comments:
Post a Comment