नवी दिल्ली : सुशील कुमार प्रकरण आता एका साक्षीदारावर केंद्रीत झालेले पाहायला मिळत आहे. कारण सुशील कुमारच्या सर्व प्रकरणात एक साक्षीदार सर्वात महत्वाचा ठरू शकतो. कारण त्याने हे सर्व प्रकरण जवळून पाहिले असून तोच या प्रकरणातील सत्य बाहेर काढू शकतो, असे समजले जात आहे. हा साक्षीदार नेमका आहे तरी कोण, जाणून घ्या...सुशील कुमारच्या प्रकरणाला वेगवेगळे वळण मिळत आहे. दिल्ली पोलिसांना आता साक्षीदारांची चौकशी करायला सुरुवात केली आहे. या चौकशीमध्ये सर्वात महत्वाचा साक्षीदार आहे तो सागरचा जवळचा मित्र सोनू महाल. आतापर्यंत सोनूने जे काही दिल्ली पोलिसांना सांगितले आहे, ते सर्व धक्कादायक आहे. कारण सोनू महालने आपल्या साक्षीमध्ये सांगितलेल्या गोष्टींमुळे आता या प्रकरणाला नवीन वळण मिळू शकते. सुशील कुमारचे ध्येय हे सागरला मारहाण करण्याचेच होते, हे सोनूने आपल्या साक्षीमध्ये सांगितले आहे. सुशील कुमारने सागर आणि त्याच्या मित्रांचे अपहरण केल्याचे सोनूने सांगितले आहे. हीच गोष्ट सुशील कुमारला आता गोत्यामध्ये आणू शकते. कारण सुशील कुमारने जर सागरला मारहाण करण्याचा प्लॅन केला असेल आणि ते जर सिद्ध झाले तर सुशीलच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होऊ शकते. त्याचबरोबर सोनू महालने यावेळी बऱ्याच गोष्टी दिल्ली पोलिसांना सांगितल्या आहेत, ज्या आतापर्यंत कधीच समोर आल्या नव्हत्या. त्यामुळे सोनूची साक्ष ही सर्वात महत्वाची ठरणार आहे. कोण आहे हा सोनू महाल... सोनू महाल हा सागरचा मित्र असल्याचे या प्रकरणात दाखवण्यात येत असले तरी त्याची ओळख अजून वेगळीही आहे. सोनू हा काला जठेडी या गँगस्टरचा भाचा आहे. काला जठेडीची कामं सोनू सांभाळतो, असेही म्हटले जात आहे. सुशील आणि काला जठेडी यांच्यामध्ये एका गोष्टीवरुन वाद झाला होता. त्यानंतर सुशील कुमारने सागरबरोबर सोनूलाही मारहाण केली. त्यानंतर काला जठेडी हा चांगलाच भडकलेला होता. फरार असताना सुशील कुमारने काला जठेडीची माफी मागण्याचा प्रयत्न केल्याचेही म्हटले जात होते. पण काला जठेडी सुशील कुमारवर चांगलाच रागावलेला आहे, असे समजते आहे. या प्रकरणात आता सोनूची साक्ष महत्वाची समजली जात असून तो दिल्ली पोलिसांना नेमकं काय सांगतो, हे आता महत्वाचे ठरणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ziA3BC
No comments:
Post a Comment