मुंबई: भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध १८ जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळायची आहे. भारतीय संघ आज मुंबईतून इंग्लंडला रवाना होईल. ते उद्या ३ जून रोजी इंग्लंडमध्ये पोहोचणार आहेत. इंग्लंडमध्ये क्वारंटाइनमध्ये काही काळ घालवल्यानंतर भारतीय संघ थेट न्यूझीलंडविरुद्ध कसोटी खेळण्यासाठी मैदानात उतरले. वाचा- फायनल मॅच बद्दल बोलताना भारताचा फिरकीपटू अश्विन म्हणाला, इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर भारतीय संघ एक देखील सराव सामने खेळणार नाही. हीच मोठी समस्या आहे. भारतीय खेळाडू कोणत्याही सरावाशिवाय थेट मैदानात उतरेल आणि हेच मोठे आव्हान असेल. वाचा- एका इंग्रजीवृत्तपत्राशी बोलताना अश्विन म्हणाला, सरावाची कमतरता हाच काळजीचा विषय असेल. अर्थात भारतीय खेळाडू तेथील परिस्थितीशी लवकर जुळवून घेतील, जसे आम्ही ऑस्ट्रेलियात केले होते. आयपीएल स्थगित झाल्यानंतर आम्ही कोणीच क्रिकेट खेळले नाही. त्यामुळे तेच मोठे आव्हान असेल. पण तेथील परिस्थितीशी जुळवून घेऊन आम्ही ऑस्ट्रेलिया प्रमाणे कामगिरी करू. वाचा- एखाद्या सामन्यासाठी तयारी करणे आणि एखादा सराव सामना खेळणे या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आम्ही आयपीएलनंतर इतक्या मोठ्या काळानंतर खेळणार तर न्यूझीलंडचा संघ दोन सामने खेळणार आहे. ज्याचा फायदा त्यांना होईल. अर्थात इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामने पाहून आम्ही काही गोष्टी शिकू शकतो. या सामन्यात न्यूझीलंडचे खेळाडू कशी कामगिरी करतात त्यावरून आम्ही योजना आखू शकतो, असे अश्विन म्हणाला. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3iaMFEJ
No comments:
Post a Comment