
नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांचे आयसीसीच्या क्रमवारीत आपले वर्चस्व कायम आहे. त्याचबरोबर भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरानेही क्रमवारीत चांगले स्थान पटकावले आहे. आयसीसीने आपली एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत विराट हा ८५७ गुणांसह दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. त्याचबरोबर रोहितने ८२५ गुणांसह आपले तिसरे स्थान कायम ठेवले आहे. क्रमवारीत पहिल्या पाच स्थानांमध्ये कोण आहे, या गोष्टीचा सर्वात जास्त महत्व असते. त्यानुसार कोहली आणि रोहित यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत पाकिस्तानचा बाबर आझम हा पहिल्या स्थानावर आहे. विराट आणि रोहितचा अपवाद वगळता अन्य भारताच्या फलंदाजांना मात्र क्रमवारीत चांगले स्थान पटकावता आलेले नाही. आता पुढील काही दिवस भारतीय संघ एकदिवसीय क्रिकेट खेळणार नाही. त्यावेळी रोहित आणि कोहली यांच्या क्रमवारीवर नेमका काय फरक पडतो, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. गोलंदाजीच्या क्रमवारीतही बुमराने चांगले स्थान पटकावले आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराने आपले पाचवे स्थान अबाधित ठेवले आहे. या क्रमावारीत न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट हा अव्वल स्थानावर विराजमान आहे, त्याच्या खात्यामध्ये ७३७ गुण आहेत. पण भारताच्या अन्य गोलंदाजांना मात्र अव्वल पाच जणांमध्ये यावेळी स्थान पटकावता आलेले नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3wWA4tb
No comments:
Post a Comment