मुंबई: भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आणि विकेटकिपर याला राष्ट्रीय संघात कशी संधी मिळली हे अनेकांना माहिती आहे. धोनीला जेव्हा घेतले होते तेव्हाचे राष्ट्रीय संघाचे निवड समिती प्रमुख असलेल्या यांनी एक मोठा खुलासा केलाय. टीम इंडियाकडून खेळण्याच्या आधी धोनीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी केली होती. तरी देखील भारतीय संघात त्याला स्थान मिळत नव्हते. संघात दीप दासगुप्ता, अजय रात्रा, पार्थिव पटेल आणि दिनेश कार्तिक सारखे विकेटकिपर होते. पण या कोणीच संघात स्थान पक्के केले नव्हेत. म्हणून भारतीय निवड समिती नवा विकेटकिपर शोधत होती जो वेगाने धावा करू शकेल. वाचा- तेव्हाचे निवड समितीप्रमुख मोरे यांनी धोनीचा संघात समावेश करण्यासाठी कर्णधार सौरव गांगुलीला १० दिवस मनवत होतो. आम्हाला असा एक विकेटकीपर हवा होता, जो आक्रमक फलंदाजी देखील करू शकेल आणि राहुल द्रविडची जागा घेईल. आमचा शोध धोनीच्या ठिकाणी येऊन संपला. तेव्हा राहुल द्रविड वनडे संघात विकेटकीपर म्हणून जबाबदारी पार पाडत होता. वाचा- तेव्हा आम्ही पॉवर हिटरचा शोध घेत होतो. जो सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर येऊन वेगाने ४०-५० धावा करू शकले. राहुल विकेटकीपर म्हणून खेळत होता त्याने ७५ सामने खेळले होते. त्यामुळे आम्ही वेगाने शोध सुरु केला. वाचा- २००४च्या दिलीप ट्रॉफी फायनलमध्ये विकेटकीपर म्हणून धोनीला संधी मिळावी माझी इच्छा होती. यावरून गांगुली आणि दीपदास गुप्ता सोबत माझी खुप चर्चा झाली. त्यानंतर धोनीला संधी द्यावी यासाठी मी गांगुलीच्या मागे १० दिवस लागलो होतो. वाचा- ही लढत नॉर्थ झोन आणि इस्ट झोन यांच्यात होती. धोनी, गांगुली आणि गुप्ता इस्ट झोनमध्ये होते. तेव्हा धोनीने सलामीला येत पहिल्या डावात २१ तर दुसऱ्या डावात ४७ चेंडूत ६० धावा केल्या. धोनीने नॉर्थ झोनच्या सर्व गोलंदाजांच्याविरुद्ध धावा केल्या. यात आशिष नेहराचा देखील समावेश होता. त्यानंतर आम्ही धोनीला इंडिया ए संघासोबत केनियाला पाठवले. तेथे मालिकेत ६०० धावा केल्या आणि मग धोनीने मागे पाहिले नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3yXUAvh
No comments:
Post a Comment