साउदम्प्टन: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल सुरू आहे. गेल्या दोन वर्षांपासून क्रिकेट विश्वाला या फायनल मॅचची प्रतिक्षा होती. पण पावसाने सर्वांची निराशा केली. वाचा- फायनल सामन्यातील पहिल्या चार पैकी दोन दिवसांचा खेळ वाया गेला. पहिल्या आणि चौथ्या दिवशी एकही चेंडू टाकता आला नाही. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पूर्ण ९० षटकांचा खेळ होऊ शकला नाही. आता पाचव्या दिवशी आणि सहाव्या दिवशी संपूर्ण वेळ मॅच होण्याची आशा आहे. भारताने पहिल्या डावात २१७ धावा केल्या असून न्यूझीलंडने पाचव्या दिवशी दुसऱ्या सत्रात ६ बाद १६२ धावा केल्या होत्या. वाचा- दोन्ही संघातील ही लढत ड्रॉ होण्याची शक्यता अधिक आहे. अशात परिस्थितीत भारत आणि न्यूझीलंड यांना संयुक्त विजेतेपद दिले जाईल. वाचा- जर ही लढत ड्रॉ झाली तर भारतीय संघाचे नुकसान अधिक होईल. कारण संयुक्त विजेतेपद मिळाल्यानंतर भारतीय संघाला आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवण्याची संधी जाईल. भारत दुसऱ्या स्थानावर राहिल. त्याचे १२२ गुण असतील तर न्यूझीलंड १२३ गुणांसह पहिल्या स्थानावर कायम राहतील. वाचा- या उलट जर भारताने विजय मिळवला तर विजेतेपदासह क्रमवारीत भारताला फायदा होईल. भारताचे १२४ गुण होतील आणि ते न्यूझीलंडला मागे टाकत पहिल्या स्थानावर पोहोचतील. न्यूझीलंड १२१ गुणांसह दुसऱ्या स्थानावर जातील.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qeQlra
No comments:
Post a Comment